Gurucharitra Parayan

श्री गुरुचरित्र: एक आध्यात्मिक दीपस्तंभ 🌼
हा दत्तसंप्रदायातील एक पवित्र ग्रंथ आहे, जो श्री नरसिंह सरस्वती यांच्या जीवनावर आधारित आहे. १५व्या शतकात श्री नामधारक यांनी लिहिलेल्या या ग्रंथात गुरु-शिष्य परंपरा, धर्माचरण, भक्ती आणि आत्मोद्धार यांचा संगम आहे.
📚 रचना व अध्याय
५३ अध्याय आहेत ज्ञानकांड, कर्मकांड भक्तिकांड असे तीन विभाग आहेत. विविध कथा, संवाद आणि अनुभवांमधून आत्मचिंतनाची प्रेरणा मिळते.
🧘‍♂️ श्री नरसिंह सरस्वती
श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार मानले जाणारे नरसिंह सरस्वती यांनी संन्यास आश्रम स्वीकारून भारतभर भ्रमण केले. त्यांच्या चमत्कारांनी आणि उपदेशांनी भक्तांना धर्ममार्गावर चालण्याची प्रेरणा दिली.
🌿 गुरुचरित्राचे प्रभाव
या ग्रंथाचे पारायण मानसिक शांती, आत्मविकास आणि अडचणींवर मात करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

🙏 निष्कर्ष
श्री गुरुचरित्र हे एक दिव्य ग्रंथ आहे, जे जीवनाला शांती, दिशा आणि आध्यात्मिक उन्नती प्रदान करतो. हे वाचणे म्हणजे गुरुंच्या कृपेचा अनुभव घेणे आणि आत्मिक समृद्धीकडे वाटचाल करणे


Gurucharitra Parayan

*🌸सुगम पंचांग 🌸*

श्री शके: १९४७
संवत्सर: श्री विश्वावसु
अयन: उत्तरायण
ऋतू: हेमंत
मास: पौष
पक्ष: कृष्ण
तिथी: षष्ठी
नक्षत्र: पूर्वा फाल्गुनी
वार: गुरुवार
योग: सौभाग्य
करण: गरज/वणिज
दिनांक: ०८/०१/२०२६

*🪷सुगम सुविचार🪷*

*सत्संगतिः कथय किं न करोति पुंसाम् ॥*

अर्थ:

चांगल्या माणसांची संगत मानवाचे काय (भले) करत नाही? म्हणजेच, सत्संगतीमुळे माणसाची बुद्धी प्रगल्भ होते, पापाचा नाश होतो, वाणीत सत्यता येते आणि सर्व दिशांना कीर्ती पसरते. सत्संगती ही मानवासाठी सर्वार्थाने कल्याणकारीच असते.

*सुगम सुप्रभात 🙏🏻*

9 hours ago | [YT] | 18

Gurucharitra Parayan

*🌸सुगम पंचांग 🌸*

श्री शके: १९४७
संवत्सर: श्री विश्वावसु
अयन: उत्तरायण
ऋतू: हेमंत
मास: पौष
पक्ष: कृष्ण
तिथी: तृतीया/चतुर्थी
नक्षत्र: आश्लेषा
वार: मंगळवार
योग: प्रीती
करण: विष्टी/बव/बालव
दिनांक: ०६/०१/२०२६
*दिनविशेष: अंगारकी संकष्टी*

*🪷सुगम सुविचार🪷*

*विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय, लम्बोदराय सकलाय जगद्धिताय।*
*नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय, गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥*

अर्थ:
विघ्नहर्ता, वर देणारा, देवांचा प्रिय, लंबोदर, कलांनी पूर्ण, जगाचे कल्याण करणारा, हत्तीचे मुख असलेला आणि वेदांनी भूषवलेला असा जो माता पार्वतीचा पुत्र आहे, त्या गणनायकाला माझा नमस्कार असो.

*सुगम सुप्रभात 🙏🏻*

2 days ago | [YT] | 68

Gurucharitra Parayan

*🌸सुगम पंचांग 🌸*

श्री शके: १९४७
संवत्सर: श्री विश्वावसु
अयन: उत्तरायण
ऋतू: हेमंत
मास: पौष
पक्ष: कृष्ण
तिथी: द्वितीया
नक्षत्र: पुष्य
वार: सोमवार
योग: विषंभ
करण: गरज/वणिज
दिनांक: ०५/०१/२०२६

*🪷सुगम सुविचार🪷*

*यद्धात्रा निजभालपट्टलिखितं, स्तोकं महद् वा धनम् ,*
*तत् प्राप्नोति मरूस्थलेऽपि नितरां ,मेरौ ततो नाधिकम् |*
*तद्धीरो भव, वित्तवत्सु कृपणां ,वृत्तिं वृथा मा कृथाः ,*
*कूपे पश्य पयोनिधावपि घटो ,गृह्णाति तुल्यं पयः||*

*अर्थ:*
भगवंतानं जेवढं धन नशिबांत दिलेलं आहे ते वाळवंटातही मिळणारंच, अगदी मेरु पर्वतावर गेलांत तरीही त्याहून जास्त मिळणार नाही ,धीर धरा, श्रीमंतां समोर दैन्य दाखवू नका,घागरीत तेवढेच पाणी बसणार आहे , ती समुद्रातून भरा वा विहिरीतून .

*सुगम सुप्रभात 🙏🏻*

3 days ago | [YT] | 10

Gurucharitra Parayan

*🌸सुगम पंचांग 🌸*

श्री शके: १९४७
संवत्सर: श्री विश्वावसु
अयन: उत्तरायण
ऋतू: हेमंत
मास: पौष
पक्ष: कृष्ण
तिथी: प्रतिपदा
नक्षत्र: पुनर्वसु
वार: रविवार
योग: वैधृती
करण: कौलव/तैतिल
दिनांक: ०४/०१/२०२६

*🪷सुगम सुविचार🪷*

*विद्वत्त्वं च नृपत्त्वं च नैव तुल्यं कदाचन।*
*स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते॥*

अर्थ:
विद्वत्ता आणि राजेपद यांची तुलना कधीच होऊ शकत नाही. कारण राजाची पूजा (सन्मान) केवळ त्याच्या स्वतःच्या देशात होते, परंतु विद्वानाची पूजा मात्र सर्वत्र केली जाते.

*सुगम सुप्रभात 🙏🏻*

4 days ago | [YT] | 52

Gurucharitra Parayan

*🌸सुगम पंचांग 🌸*

श्री शके: १९४७
संवत्सर: श्री विश्वावसु
अयन: उत्तरायण
ऋतू: हेमंत
मास: पौष
पक्ष: शुक्ल
तिथी: पौर्णिमा
नक्षत्र: आर्द्रा
वार: शनिवार
योग: ब्रह्म/ इंद्र
करण: बव/बालव
दिनांक: ०३/०१/२०२६

*🪷सुगम सुविचार🪷*

*उत्तमः क्लेशविक्षोभं क्षमः सोढुम् न चेतरः।*
*मणिः एव महाशाणघर्षणं न तु मृत्कणः।।*

*अर्थ*

महान लोकच कठीण परिस्थितीत येणारे कष्ट सहन करू शकतात, इतर लोक नाहीत. पैलू पाडण्यासाठी केले जाणारे भयंकर घर्षण हिऱ्यासारखे रत्न सहन करते, मातीचे ढेकूळ नाही, त्याचा भुगा होऊन जातो.
याच अर्थाचा संत तुकारामांचा एक अभंग आहे. हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी । तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा ।।

*सुगम सुप्रभात 🙏🏻*

5 days ago | [YT] | 48

Gurucharitra Parayan

*🌸सुगम पंचांग 🌸*
श्री शके: १९४७
संवत्सर: श्री विश्वावसु
अयन: उत्तरायण
ऋतू: हेमंत
मास: पौष
पक्ष: शुक्ल
तिथी: चतुर्दशी
नक्षत्र: मृगशीर्ष
वार: शुक्रवार
योग: शुक्ल
करण: गरज/वणिज/विष्टी
दिनांक: ०२/०१/२०२६

*🪷सुगम सुविचार🪷*

**नाभ्युत्थानक्रिया यत्र नालापा मधुराक्षराः ।*
*गुणदोषकथा नैव तत्र हर्म्ये न गम्यते ।।*

अर्थ:
ज्याघरांत अतिथी आल्यावर उभे राहून सत्कार केला जात नाही,गोड बोलणे नसते ,आणि गुण दोषांची चर्चा होत नसेल अशा घरांत जाऊ नये .

*सुगम सुप्रभात 🙏🏻*

6 days ago | [YT] | 112

Gurucharitra Parayan

*🌸सुगम पंचांग 🌸*

श्री शके: १९४७
संवत्सर: श्री विश्वावसु
अयन: उत्तरायण
ऋतू: हेमंत
मास: पौष
पक्ष: शुक्ल
तिथी: त्रयोदशी
नक्षत्र: रोहिणी
वार: गुरुवार
योग: शुभ
करण: कौलव/तैतिल
दिनांक: ०१/०१/२०२६

*🪷सुगम सुविचार🪷*

*यथा खनन् खनित्रेण भूतोयेनाधिगच्छति।*
*तथा गुरुगतां विद्यां शुश्रूषुरधिगच्छति॥*

अर्थ:
ज्याप्रमाणे खणणारा माणूस खणण्याने भूगर्भातील पाणी प्राप्त करतो, त्याचप्रमाणे सेवा करणारा (गुरूच्या आज्ञा पाळणारा) शिष्य गुरूमध्ये असलेली विद्या (ज्ञान) प्राप्त करतो.

*सुगम सुप्रभात 🙏🏻*

1 week ago | [YT] | 38

Gurucharitra Parayan

*🌸सुगम पंचांग 🌸*

श्री शके: १९४७
संवत्सर: श्री विश्वावसु
अयन: उत्तरायण
ऋतू: हेमंत
मास: पौष
पक्ष: शुक्ल
तिथी: द्वादशी
नक्षत्र: कृत्तिका
वार: बुधवार
योग: साध्य
करण: बव/बालव
दिनांक: ३१/१२/२०२५

*🪷सुगम सुविचार🪷*

*अक्रोधेन जयेत् क्रोधम् असाधुं साधुना जयेत्।*
*जयेत् कदर्यं दानेन जयेत् सत्येन चानृतम्॥*

अर्थ:
क्रोधाला (रागाला) अक्रोधाने (शांततेने) जिंकावे. दुर्जनाला (वाईट माणसाला) सज्जनतेने (चांगुलपणाने) जिंकावे. कंजूष माणसाला दानाने जिंकावे आणि असत्याला (खोटेपणाला) सत्याने जिंकावे.

*सुगम सुप्रभात 🙏🏻*

1 week ago | [YT] | 123

Gurucharitra Parayan

*🌸सुगम पंचांग 🌸*

श्री शके: १९४७
संवत्सर: श्री विश्वावसु
अयन: उत्तरायण
ऋतू: हेमंत
मास: पौष
पक्ष: शुक्ल
तिथी: एकादशी
नक्षत्र: भरणी
वार: मंगळवार
योग: शिव
करण: वणिज/विष्टि
दिनांक: ३०/१२/२०२५

*🪷सुगम सुविचार🪷*

*उपकारिषु यः साधुः साधुत्वे तस्य को गुणः।*
*अपकारिषु यः साधुः स साधुः सद्भिरुच्यते।।*

*अर्थ*
आपल्यावर ज्यांनी उपकार केले आहेत त्यांच्याशी (सज्जनांशी) चांगले वागण्यात कसला मोठा सद्गुण आला आहे ? पण जे आपल्या वाईटावर टपले आहेत अशा दुष्ट माणसांशीसुद्धा चांगले वागणाऱ्याला साधू म्हणतात.

*सुगम सुप्रभात 🙏🏻*

1 week ago | [YT] | 101

Gurucharitra Parayan

गुरु दत्तात्रेय यांच्या वडिलांचं काय नाव होतं?

1 week ago | [YT] | 1