"लोकांना अर्थपूर्ण आणि समृद्ध जीवन जगण्यास सक्षम करणे" हा आमचा ध्यास आहे.
लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लिडरशीप अँड एक्सलन्स ही संस्था वैयक्तिक आणि व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात वर्ष २००८ पासून कार्यरत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी लक्ष्यवेधच्या विविध उपक्रमांमार्फत आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.
महाराष्ट्रीय उद्योजकांचा दीपस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटचे विविध उद्योजकता विकास प्रशिक्षणक्रम हजारो उद्योजकांनी अटेंड केले आहेत. उद्योजकांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात जाणवणाऱ्या निरनिराळ्या अडचणींसंदर्भात लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट विविध प्रशिक्षण आणि उपाययोजना राबवत असते. हजारो उद्योजकांनी आतापर्यंत लक्ष्यवेध इन्स्टिट्यूटच्या मदतीने त्यांच्या व्यवसायाचा विकास घडवून आणला आहे.
आज महाराष्ट्रात व्यवसाय प्रशिक्षण क्षेत्रात लक्ष्यवेधचे वेगळे आणि विश्वसनीय स्थान प्रस्थापित झाले आहे. लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट खाजगी आणि सरकारी संघटनांसोबत सुद्धा विविध स्तरांवर त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार ट्रेनिंग आणि कन्सल्टंसी सेवा पुरवण्यात कार्यरत आहे.
Lakshyavedh लक्ष्यवेध ®
लोकमान्य टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्या शहरातून सुरू केला? 🚩
1 week ago | [YT] | 12
View 6 replies
Lakshyavedh लक्ष्यवेध ®
एखाद्या उद्योजकाला घडताना पाहणं आनंददायक… पण त्याने स्वतःसोबत एक संपूर्ण टीम घडवताना पाहणं, हा खरा अभिमान असतो. ❤️
”नुकतेच लक्ष्यवेधचे संस्थापक अतुल राजोळी यांना FIXTO टीमच्या दोन दिवसीय Annual Team Outbound & Employee Felicitation Program मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.
या कार्यक्रमात त्यांनी Team Building या विषयावर मार्गदर्शन केले, टीमसोबत संवाद साधला आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टीम सदस्यांचा सत्कार केला.
पण लक्ष्यवेधसाठी हा क्षण आणखी खास होता…
कारण FIXTO चे संस्थापक अमित धुरू हे लक्ष्यवेधी Student Entrepreneur आहेत. ❤️
अमितचा उद्योजकीय प्रवास आम्ही जवळून पाहिला आहे — काहीतरी मोठं करण्याची त्यांची भूक, प्रचंड ऊर्जा, सातत्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतत शिकण्याची तयारी.
आज FIXTO एक मजबूत Made-in-India ब्रँड म्हणून Specialised Welding Tables आणि Welding Fixtures या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहे. वाढणारी टीम, उत्तम उत्पादने आणि भविष्यातील मोठ्या संधी पाहताना लक्ष्यवेध परिवाराला अमितच्या या प्रवासाचा नक्कीच अभिमान वाटतो. 🚀
आणि याच प्रवासातून एक महत्त्वाची गोष्ट पुन्हा अधोरेखित होते—
उद्योजक व्यवसाय सुरू करतो…
पण TEAM त्या व्यवसायाचं संस्थेत रूपांतर करते!
एका टप्प्यानंतर व्यवसायाची वाढ केवळ संस्थापकाच्या मेहनतीवर, बुद्धिमत्तेवर किंवा ऊर्जेवर अवलंबून राहू शकत नाही.
उद्योजकाला माणसं घडवावी लागतात.
लीडर्स निर्माण करावे लागतात.
उत्कृष्ट कामगिरीची दखल घ्यावी लागते.
टीममध्ये Ownership निर्माण करावी लागते.
Teamwork मजबूत करावं लागतं.
आणि प्रत्येक व्यक्तीला संस्थेच्या मोठ्या ध्येयाशी जोडावं लागतं.
तेव्हाच “माझा व्यवसाय” हळूहळू “आपली संस्था” बनतो. 🌱
आणि कदाचित उद्योजकांना मार्गदर्शन करण्यातील सर्वात सुंदर भाग हाच…
तुम्ही फक्त एका उद्योजकाला वाढताना पाहत नाही,
तर त्याच्यासोबत माणसं, टीम आणि एक संपूर्ण संस्था घडताना पाहता. ❤️
अमित आणि संपूर्ण FIXTO टीमला लक्ष्यवेध परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा!
तुमची शिकण्याची भूक आणि मोठं स्वप्न असंच कायम ठेवा.
आजपर्यंतचा प्रवास अभिमानास्पद आहे…
आणि पुढचा अध्याय आणखी मोठा असणार आहे! 🚀✨
3 weeks ago | [YT] | 18
View 0 replies
Lakshyavedh लक्ष्यवेध ®
🇮🇳 १५ ऑगस्टला एक प्रश्न स्वतःला विचारूया…
आजच्या Gen Z साठी “स्वातंत्र्य” म्हणजे नेमकं काय?
1 month ago | [YT] | 9
View 0 replies
Lakshyavedh लक्ष्यवेध ®
एक उद्योजक म्हणून तुमच्या प्रवासात ‘गुरु’ची सर्वात मोठी भूमिका काय असते?
1 month ago | [YT] | 14
View 1 reply
Lakshyavedh लक्ष्यवेध ®
जागतिक MSME दिवस 💼
उद्योजकतेची प्रत्येक छोटी सुरुवात देशाच्या प्रगतीला नवी दिशा देते. 📈
#WorldMSMEDay #Lakshyavedh #Entrepreneurship #BusinessGrowth #MSMEIndia
2 months ago | [YT] | 26
View 0 replies
Lakshyavedh लक्ष्यवेध ®
आंतरराष्ट्रीय योग दिन 🧘♀️✨
मन, शरीर आणि ध्येय यांची एकरूपता म्हणजे योग. 🌼
#InternationalYogaDay #YogaForLife #Lakshyavedh #HealthyMindHealthyBody #WellnessJourney
3 months ago | [YT] | 38
View 0 replies
Lakshyavedh लक्ष्यवेध ®
जागतिक पितृ दिन 💐
ध्येय दाखवणारा मार्गदर्शक, आत्मविश्वास देणारा आधार ー पिता म्हणजे जीवनात लक्ष्यवेध घडवणारी प्रेरणा! 🎯✨
#FathersDay #Lakshyavedh #HappyFathersDay #FatherInspiration #GuidingLight
3 months ago | [YT] | 9
View 0 replies
Lakshyavedh लक्ष्यवेध ®
⚖️ व्यवसाय वाढवताना आपण Legal Foundation मजबूत करत आहोत का?
लक्ष्यवेध पॉडकास्टमध्ये YNZ Legal चे Founder आणि Corporate Lawyer आल्हाद ओक सरांनी प्रत्येक उद्योजकासाठी महत्त्वाच्या Legal Insights शेअर केल्या आहेत.
या पॉडकास्टमधून जाणून घ्या:
✅ Contract चे महत्त्व
✅ Founder Agreement ची गरज
✅ Trademark Search का आवश्यक आहे?
✅ Risk Management कसे करावे?
✅ Governance मुळे व्यवसाय अधिक सक्षम कसा बनतो?
अनेक उद्योजक व्यवसाय वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात, पण त्याचा मजबूत कायदेशीर पाया तयार करणं तितकंच महत्त्वाचं असतं. 📈
तुमच्या व्यवसायात यापैकी कोणत्या गोष्टीकडे सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
🎙️ संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
yt.openinapp.co/q8128
#Lakshyavedh #LakshyavedhPodcast #AtulRajoli #Entrepreneurship #CorporateLawyer #BusinessGrowth #RiskManagement #Trademark #FounderAgreement #BusinessGovernance
3 months ago | [YT] | 33
View 0 replies
Lakshyavedh लक्ष्यवेध ®
🎙️ अतुल राजोळी सरांनी 3S Talk Podcast मध्ये शेअर केलेले उद्योजकतेचे काही प्रभावी धडे!
उद्योजकता म्हणजे फक्त व्यवसाय सुरू करणे नाही, तर योग्य मानसिकता, स्वाभिमान, दृश्यमानता आणि विश्वासार्हतेच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे होय. 🚀
या पॉडकास्टमध्ये जाणून घ्या:
✅ उद्योजकतेची खरी व्याख्या
✅ व्यवसायातील “स्पीड ब्रेकर” ठरणाऱ्या मानसिक सवयी
✅ Visibility + Credibility = Profitability हे यशाचे सूत्र
✅ मार्केटिंग फनेलचे महत्त्व आणि व्यवसाय वाढवण्याचा मार्ग
✅ व्यवसायाला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी आवश्यक दृष्टिकोन
तुम्हाला यापैकी कोणता मुद्दा सर्वात जास्त भावला? कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇
🎧 संपूर्ण पॉडकास्ट पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
yt.openinapp.co/qugfi
3 months ago | [YT] | 72
View 4 replies
Lakshyavedh लक्ष्यवेध ®
लक्ष्यवेध Podcast 🎯🎙️ चा Episode 03 शेअर करताना खूप आनंद होत आहे 😊
या एपिसोडमध्ये डॉ. गौरव गुप्ते यांच्यासोबत आयुर्वेदातून Holistic Healing या विषयावर अत्यंत insightful संवाद झाला.
आयुर्वेद, lifestyle disorders, root-cause healing तसेच आहार, दिनचर्या, झोप आणि मानसिक संतुलन यांचे महत्त्व यावर सखोल चर्चा करण्यात आली.
नैसर्गिक आरोग्य आणि holistic wellness मध्ये रस असणाऱ्या प्रत्येकासाठी हा संवाद उपयुक्त ठरेल 😊
संपूर्ण Episode पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
https://youtu.be/rrDDN3Uh5FA?si=SVMU4...
तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा 🤝
#Lakshyavedh #LakshyavedhPodcast #Ayurveda #HolisticHealing #AtulRajoli
3 months ago | [YT] | 10
View 0 replies
Load more