नमस्कार!
मी प्रियांका ,माझ्या युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत.
माझ्या चॅनल मध्ये तुम्हाला प्रवास, लाईफस्टाईल, व्लोग ,किचन टिप्स , रेसिपीज या प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतील.
आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत याची मला खात्री आहे.. 😄
माझ्या चॅनल ला पुढे जाण्यासाठी आपला सपोर्ट व प्रेम द्या ..🙏🙏
स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न..☺️
For Business Queries contact me on Email-priyankamangale7576@gmail.com
Priyanka patil- Mangle
मी गावी आहे त्यामुळे ४ दिवस आपल्या चॅनल वर व्हिडिओ येणार नाहीत .💐
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
Priyanka patil- Mangle
सर्व यूट्यूब familyla दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🎉💐💐🪔🎇 शुभ दिपावली 🪔
2 months ago | [YT] | 0
View 0 replies
Priyanka patil- Mangle
Red soil stories chya माध्यमातून अगदी घराघरात,प्रत्येकाच्या मनामनात राज्य करणारी जोडी .जितकं कौतुक करावं तितकं कमीच . साधेपणातही सुंदर आयुष्य जगता येत हे दाखवून देणारी व भरभरून आयुष्य जगणारी जोडी शिरीष गवस sir व त्यांची पत्नी पूजा .नुकत्याच एक वर्षाच्या लेकीला जग दाखवायचं स्वप्न पाहणारे तिचे वडील .नियतीच्या मनात काही वेगळंच होते.काय बोलावं काही सुचत नाही . डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत .शिरीष गवस sir कायमचे अनंतात विलिन झाले .भावपूर्ण श्रद्धांजली sir 🙏🙏💐rest in peace 💐
5 months ago | [YT] | 0
View 0 replies
Priyanka patil- Mangle
भावपूर्ण श्रद्धांजली 🥹💐
6 months ago | [YT] | 1
View 0 replies
Priyanka patil- Mangle
*‘बिघाड’*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
फ्रिज बिघडला.
टीव्ही बंद.
वाय-फाय डाऊन.
शनिवारी सकाळपासून घरात अघोषित आणीबाणी जाहीर झाल्यासारखं वातावरण होतं.
"आता ह्यालाही काहीतरी झालं वाटतं!" – तो कपाळावर हात मारत फ्रिजकडे पाहत होता.
सहा वेळा प्लग काढून लावला.
टीव्हीचा रिमोटही चालेनासा झाला.
नेट कनेक्शन गायब.
सगळीकडे जणू "No Signal".
तो चिडून म्हणाला,
"हे घर आहे की संकटमोचक केंद्र? दर आठवड्याला काहीतरी बिघडतंय."
त्या आवाजावर ती स्वयंपाकघरातून बाहेर आली.
ओढणी खांद्यावर टाकत, केस मानेवरून बाजूला करत तिने विचारलं,
"काय झालं?"
"काय झालं? बघ ना, फ्रिज बंद, टीव्ही बंद, वाय-फाय नाही… म्हणजे मी इथे राहत आहे की तुटक वस्तूंमध्ये?"
ती थोडं हसली. त्या हसण्यात थोडी थकवा, थोडा मिश्कीलपणा आणि थोडी चीड लपलेली होती.
ती म्हणाली—
"तरी मी चालूच आहे ना… हेच पुरेसं नाही का?"
क्षणभर तो गोंधळला.
काही क्षणातच त्याच्या चेहऱ्यावर एका जाणीवेचा प्रकाश पडला.
त्या एका वाक्यानं तो आत कुठे तरी ढवळून निघाला.
फ्रिज बंद झाला, म्हणून त्याला गरम पाणी प्यावं लागलं...
टीव्ही बंद झाला, म्हणून क्रिकेटचं स्कोअर समजलं नाही...
नेट गेलं, म्हणून ऑफिसच्या मेल्स थांबल्या…
पण ती?
ती अजूनही सकाळी उठून उठून सगळं करत होती.
गरम चहा, पोळीभाजी, मुलांची तयारी, सासूबाईंची औषधं…
सगळं 'नॉर्मल' चालू.
ती बिघडत नाही? ती थकत नाही?
ते वाक्य तिच्या तोंडून खूप सहज आलं, पण त्याचा अर्थ खोल होता.
"तरी मी चालूच आहे ना… हेच पुरेसं नाही का?"
ते वाक्य त्याच्या काळजात जाऊन बसलं.जिच्यात बिघाड झाला तरी ती स्वतःलाच दुरुस्त करते,
ती कधी ‘डाऊन’ होते का विचारतो आपण?
ती तापातही उठते.
पाळीच्या दुखण्यातही काम करते.
मनात राग असला तरी चेहऱ्यावर हसू ठेवते.
सासूबाई टोचून बोलल्या तरी चुप राहते.
कारण हे घर तिचं आहे… ती ‘चालू’ ठेवते.
तो क्षण त्याला मागच्या कित्येक वर्षांचं स्मरण करून देऊन गेला.
काही वर्षांपूर्वी
तो नवीन नोकरीला लागला होता.
तिच्या हातचं डब्यातलं जेवण खाऊन सहकारी चाट पडायचे.
ती लग्नानंतर शहरात आली, नवीन माणसं, नवीन रस्ते, नवीन भाषा… पण एकही तक्रार नाही.
सगळं ती शिकत गेली.
रात्री उशीर झाला की डोळे लाल करून वाट पहायची.
त्याचं हसणं परत यावं म्हणून ती मुलांचं हसवणं, खेळणं, स्वतः थकलेली असूनही करत राहायची.
एकदा ती तापात होती… तरी सकाळी उठून स्वयंपाक केला.
तो म्हणाला होता, “आराम कर ना थोडा…”
ती म्हणाली होती, “तू कामावर जातोस, मी घरी राहते… आराम माझ्या वाट्याला नाहीच.”
---
आणि आत्ताच…
तो फ्रिज उघडून पाहतो, "कसं जमवायचं आता सगळं?"
पण त्याच क्षणी त्याच्या मनात चमकून गेलं—
“माझ्या आयुष्याचा तापमान बिघडत असताना… किती वेळा हिने 'फ्रिज'सारखं स्थिर राहून सगळं थंड केलंय!”
तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतो.
ती पोळ्या लाटत आहे. डोळ्यांत थकवा आहे, पण हात स्थिर आहेत.
"कधी बिघडशील गं तू?" तो हळूच म्हणतो.
ती थांबते. थोडा वेळ शांत.
मग म्हणते—
"बिघडले होते… पण तुमच्यासाठी परत चालू केले स्वतःला!"
त्याच्या छातीत काहीतरी धडधडतं.
दुपारी...
तो स्वतः स्वयंपाकघरात जातो.
मुलाला विचारतो, "तुला सॅंडविच खायचंय का?"
मुलगा म्हणतो, "पप्पा, तुम्ही बनवाल?"
तो म्हणतो, "हो, आई विश्रांती घेत आहे."
ती हसते, पण त्या हसण्यात प्रश्न असतो—
"उद्या काय? पुन्हा मीच चालू?"
तो म्हणतो,
"नाही. आता मीही चालू राहीन."
रात्री...
ती शांत झोपलेली असते.
तो तिच्या पायाशी चादर घालतो.
लपवून ठेवलेला गुलाब तिच्या उशाशी ठेवतो.
आणि स्वतः मोबाईलच्या नोट्समध्ये लिहितो—
"तू चालू होतीस… म्हणून घर चाललं.
पण उद्यापासून आपण दोघं चालू राहू… कारण आता समजलंय—
तू बिघडलीस तर मीही संपलो!"
या जगातली सगळी यंत्रं बंद पडल्यावर आपण त्यांच्या मेंटेनन्सकडे लक्ष देतो.
पण जी व्यक्ती रोज चालू आहे – आई, बहीण, पत्नी, सून, मुलगी… तिच्या चालू असण्यामागची किंमत ओळखतो का?
तिचा बिघाड टाळायचा असेल, तर अधूनमधून तिला थांबू द्या.
कारण ती जर एक दिवस खरंच "Shutdown" झाली,
तर घर चालणार नाही… फक्त 'जगणं' चालू राहील… पण त्यात 'जीव' नसेल.
घराच्या गृहिणीचं काम कधीच बंद पडत नाही, कारण ती चालू असते त्या अनंत प्रेमाच्या आणि जिव्हाळ्याच्या तारेवर, ज्याला कुणी कधीच ऑफलाईन करू शकत नाही.”
सौ तृप्ती देव
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
7 months ago | [YT] | 1
View 2 replies
Priyanka patil- Mangle
पन्नास पेक्षा जास्त वयाची नैराश्याने (डिप्रेशनने) ग्रासलेली एक व्यक्ती होती. त्यांची पत्नी त्यांना घेऊन एका मनोचिकित्सकाकडे (सायकॕट्रीस्ट) गेली.
पत्नी म्हणाली :- "हे खूपच निराशाग्रस्त आहेत. यांच्या नैराश्यामुळे घरातील वातावरण बिघडले आहे."
मनोचिकीत्सकाने त्यांना तपासले. त्यात त्यांना सर्व काही ठीक दिसले. आता त्यांनी बोलायला सुरुवात केली. काही खाजगी प्रश्नही विचारले आणि त्यांच्या पत्नीला बाहेर बसायला सांगितले.
त्या व्यक्तीला बोलते केले...
"खूप त्रासात आहे...
काळजीच्या ओझ्याने दबला गेलोय... नोकरीचा ताण... मुलांच्या शिक्षण आणि त्यांना नोकरी मिळेल की नाही याची काळजी.. घरासाठी घेतलेले कर्ज, गाडीसाठी घेतलेले कर्ज...कशातच मन लागत नाही...लोक मला खूपच यशस्वी व्यक्ती समजतात... पण खरंतर माझ्याकडे काहीच नाही....मी खूपच निराश आहे..." वगैरे म्हणत संपूर्ण जीवनाचे पुस्तकच उलगडून सांगितले.
मग त्या विद्वान चिकित्सकाने काही विचार केला आणि विचारले, "दहावीला असताना कोणत्या शाळेत शिकत होतात ?"
त्या व्यक्तीने शाळेचे नाव सांगितले.
चिकित्सक म्हणाले:-
"तुम्हाला त्या शाळेत जावे लागेल. तेथून तुमच्या दहावीच्या वर्गाची नोंदवही (रजिस्टर) घेऊन या, आपल्या मित्रांची नावे बघा आणि त्यांना शोधून त्यांच्या आजच्या स्थितीची माहिती मिळवायचा प्रयत्न करा. सर्व माहिती एका वहीत लिहून काढा व एका महिन्याने ती माहिती घेऊन मला येऊन भेटा."
ती व्यक्ती आपल्या जुन्या शाळेत गेली, खुप विनंत्या करुन नोंदवही (रजिस्टर) शोधली व त्याची प्रत बनवून आणली. त्यात एकशेवीस नावे होती. महिनाभर दिवस-रात्र प्रयत्न केले तरीही मोठ्या मुश्किलीने आपल्या पंचाहत्तर ते ऐंशी वर्गमित्रांच्या विषयीच माहिती जमा करु शकले.
त्यांना मोठे आश्चर्य वाटले....
त्यातील पंधरा मित्रांचा मृत्यू झालेला होता... सात मित्र/मैत्रीणी विधवा/विधुर आणि दहा घटस्फोटीत होते... बारा जण नशेच्या अधिन झाले होते, जे बोलण्याच्या लायकीचेही नव्हते. काहींचा तर ठावठिकाणाही माहित होत नव्हता.... पाच तर इतके गरीब होते की विचारता सोय नाही... सहा इतके श्रीमंत निघाले की विश्वासच बसत नव्हता.
काही कॅन्सरने पिडीत होते, काहींना अर्धांगवायू झाला होता, कुणाला साखरेचा, कुणाला दमा तर कुणी हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होते.
एक दोघांचा अपघात होऊन हात/पाय किंवा मणक्याचे हाड मोडून अंथरुणावर पडून होते.... काहींची मुलं वेडी,व्यसनी, रिकामटेकडी,कामातून गेलेली निघाली... एक कारागृहात कैदेत होता....
एक पन्नास वय झाल्यावर स्थिरस्थावर झाला होता म्हणून आता विवाहबद्ध होण्याच्या विचारात होता तर एक अजूनही स्थिरावू शकला नव्हता दोन घटस्फोट होऊन तिसरे लग्न करायच्या बेतात होता....
महिन्याभरात दहावी इयत्तेची नोंदवही (रजिस्टर) भाग्याची व्यथा स्वतः ऐकवत होती...
चिकित्सकाने विचारले :- "आता सांगा, तुम्हाला नैराश्य (डिप्रेशन) कसलं आलं आहे?"
या व्यक्ती च्या लक्षात आले की 'त्याला कुठला आजार नाही, त्याची आर्थिक स्थिती चांगली आहे, तो भुकेने मरत नाही, मेंदू अगदी ठणठणीत आहे, कोर्ट पोलिस स्टेशनशी कधीही संबंध आला नाही, त्याची पत्नी-मुलं खूप चांगले आहेत, स्वस्थ आहेत, तोही स्वस्थ आहे, डाॅक्टर दवाखान्याची कधी गरज पडली नाही, मुलांची त्यांच्या करिअरच्या दृष्टीने प्रगतीही चांगली आहे'
त्याला असे जाणवले की जगात खरंच खूप दुःख आहे आणि मी खूप सुखी आणि भाग्यवान आहे, तेव्हा नैराश्य येण्यापासून दूर रहाण्यासाठी-
*दुसऱ्याच्या ताटात ढुंकून पहाण्याची सवय सोडून आपल्या ताटातील भोजन प्रेमाने ग्रहण करावे.*
*तुलनात्मक विचार करु नये,सर्वांची वेळ व नशिब वेगवेगळे असते*
आणि अजून एक गोष्ट.... सांगितलेल्या -ऐकलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे..
(एका इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद)
नक्की संग्रही ठेवावा.
मानवी जीवन हे अमृत आहे .
त्याचा प्रेमाणे स्वीकार करा !!!
😊😊🌹🌹😊😊
7 months ago | [YT] | 2
View 0 replies
Priyanka patil- Mangle
ज्या व्यक्तींबरोबर खूपच सांभाळून बोलावं लागतं, त्यांच्याबरोबर आपला मानसिक थकवा वाढतो.
कारण अशा नात्यांमध्ये नेहमीच एक भीती असते. आपण काही चुकून बोललो तर समोरच्याला राग येईल, किंवा गैरसमज होईल.
या सततच्या आत्मनियंत्रणामुळे संवाद नैसर्गिक राहत नाही आणि मन दडपून जातं.
मानसशास्त्र सांगतं की, जर एखाद्याबरोबर मोकळेपणाने बोलता येत नसेल, तर त्या नात्याची उंची कमी असते.
मोकळा संवाद मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतो.
कायम सावध राहण्याची सवय आत्मविश्वास घटवू शकते आणि व्यक्तिमत्त्व दडपून टाकू शकते.
अशावेळी स्वतःच्या भावना दडपण्याऐवजी त्या व्यक्तीपासून थोडं मानसिक अंतर ठेवणं कधी कधी आवश्यक ठरतं.
कारण जिथे मोकळेपणाने व्यक्त होता येत नाही, तिथे आपले विचार, भावना आणि अस्तित्व हळूहळू हरवत जातं.
स्वतःसाठी सुरक्षित, समजून घेणारी माणसं शोधणं, हे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं असतं.
राकेश वरपे | मानसशास्त्र तज्ज्ञ
7 months ago | [YT] | 2
View 0 replies
Priyanka patil- Mangle
8 months ago | [YT] | 2
View 0 replies
Priyanka patil- Mangle
Hello everyone कसे आहात सगळे ,I hope तुम्ही मस्त मजेत असाल .काही दिवस व्हिडिओ येणार नाहीत .संपूर्ण family देवदर्शनाला आलो आहोत ,त्यामुळे व्हिडिओ एडिटिंग ला वेळ nhi भेटत. सर्वांनी काळजी घ्या .
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Priyanka patil- Mangle
भावपूर्ण श्रद्धांजली आत्या 🥹🙏
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Load more