TN Maharashtra News



TN Maharashtra News

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी
८:४५ वाजता विमान अपघातात निधन झाले. ही दुर्घटना
बारामतीला निवडणूक रॅलीसाठी जात असताना घडली.
या भीषण विमान अपघातात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐💐

1 day ago | [YT] | 0

TN Maharashtra News

सोलापूरच्या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. फैज अहमद शेख यांचे अमेरिकेत निधन...
सोलापूरच्या शैक्षणिक क्षेत्रातील ज्येष्ठ आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व,
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. फैज अहमद शेख यांचे अमेरिकेत दुःखद निधन झाले आहे.
डॉ. फैज अहमद शेख हे शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते.
त्यांच्या निधनाने सोलापूरसह संपूर्ण शिक्षण विश्वावर शोककळा पसरली आहे.
TN महाराष्ट्र News परिवाराकडून डॉ. फैज अहमद शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐💐💐
#SolapurNews
#DrFaizAhmedShaikh
#BreakingNews
#TNMaharashtraNews
#Solapur
#DeathNews
#EducationLeader

1 week ago | [YT] | 2

TN Maharashtra News

“सोलापूरसह राज्यातील 29 महापालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला” #Solapur
#SolapurNews
#Mahanagarpalika
#MunicipalCorporation
#MayorElection
#MayorReservation
#महापौर
#महापौरपद
#आरक्षण
#22January
#January22
#BreakingNews
#PoliticalNews

1 week ago | [YT] | 2

TN Maharashtra News

सोलापूर महानगरपालिका निकाल 2026
पक्षीय बलाबल (एकूण जागा – 102):
#TNMaharashtranews

1 week ago | [YT] | 3

TN Maharashtra News

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात दोन देशी पिस्तुल व ८ काडतुसेसह तिघांना अटक
बातमी:
महापालिका निवडणूक सुरू असतानाच सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन देशी बनावटीचे पिस्तुल व आठ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघे कर्नाटकातील तर एकजण पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे शस्त्रसाठा नेमका कशासाठी सोलापुरात आणण्यात आला होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे लालसाब जातगर ऊर्फ मनगोळी (वय २६, रा. जातगर वस्ती, सिंदगी, विजयपूर, कर्नाटक), राजा नुरजानसाब सौदागर (वय २६, रा. भारत नगर, सिंदगी, विजयपूर, कर्नाटक) आणि प्रदीप सूर्यकांत काळभोर (वय ३५, रा. लोणी स्टेशनजवळ, लोणी कारभोर, पुणे) अशी आहेत.
गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल संताजी रोकडे व भारत पाटील यांना मध्य रेल्वे कार्यालयाजवळील मैदान परिसरात तीन संशयित इसम देशी बनावटीचे पिस्तुल बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या पथकाने घटनास्थळी छापा टाकून तिघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपींकडून दोन देशी पिस्तुल, आठ जिवंत काडतुसे व एक मोटारसायकल असा सुमारे दोन लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास शहर गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
, #TNMaharashtraNews #Solapur #SolapurCrime #महापालिका_निवडणूक #CityCrimeBranch #PoliceAction
#GunSeizure #IllegalWeapons #BreakingNews #CrimeNews #LawAndOrder

2 weeks ago | [YT] | 2

TN Maharashtra News

🔴 ब्रेकिंग न्यूज
राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय.
राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका पूर्ण करण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
आता १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
यामुळे निवडणुकांच्या घोषणेची प्रतीक्षा करणाऱ्यांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

#BreakingNews
#SupremeCourt
#ZPElection
#PSElection
#MarathiNews

2 weeks ago | [YT] | 1

TN Maharashtra News

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना!
महाडीबीटी पोर्टलवरील विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये प्रतिज्ञापत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.
GNM प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील caste category मधील विद्यार्थ्यांनी हे प्रतिज्ञापत्र भरून त्याचे ओरिजनल प्रतिज्ञापत्र स्कॅन करून विद्यार्थ्यांच्या लॉगिनमधून अपलोड करणे अनिवार्य आहे.
सदर प्रतिज्ञापत्र महाडीबीटी पोर्टलमध्येच उपलब्ध आहे.
#MahaDBT #GNMStudents #ScholarshipUpdate #StudentNotice #Scholarship
#महाडीबीटी
#शिष्यवृत्ती
#विद्यार्थीमाहिती
#शिक्षणबातमी
#नर्सिंगविद्यार्थी
#जीएनएम
#महत्त्वाचीसूचना#MahaDBT #GNMStudents #ScholarshipUpdate #महाडीबीटी #शिष्यवृत्ती #StudentAlert #EducationNews #GNMUpdate #महत्त्वाचीसूचना

2 weeks ago | [YT] | 4

TN Maharashtra News

सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात १२ जानेवारी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन हे चार धाडसी क्रांतिकारक ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढताना शहीद झाले. ब्रिटिश सरकारने १२ जानेवारी १९३१ रोजी या चौघांना फाशी देऊन त्यांचा जीव घेतला.
या हुतात्म्यांनी १९३० साली ९ ते ११ मे या कालावधीत सोलापूर शहर अवघ्या तीन दिवसांसाठी ब्रिटिश राजवटीतून मुक्त केले होते. हा पराक्रम भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक अभूतपूर्व आणि प्रेरणादायी अध्याय ठरला.
या महान क्रांतिकारकांच्या अतुलनीय बलिदानाच्या स्मरणार्थ सोलापूर शहरात दरवर्षी १२ जानेवारी रोजी ‘हुतात्मा दिन’ पाळण्यात येतो. हा दिवस स्वातंत्र्यासाठी झटलेल्या वीरांच्या शौर्याची, त्यागाची आणि देशप्रेमाची आठवण करून देतो.

2 weeks ago | [YT] | 2

TN Maharashtra News

सोलापूरचे सुपुत्र श्री. सलमान ताज पाटील, आयपीएस यांना उपमहानिरीक्षक (DIG दर्जा) पदोन्नती मिळाल्याबद्दल
TN महाराष्ट्र News कडून हार्दिक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!
#SalmanTajPatil #IPS #DIGPromotion #SolapurNews #MaharashtraNews #BreakingNews

2 weeks ago | [YT] | 2

TN Maharashtra News

🕊️ भाजपचे ज्येष्ठ नेते सिद्रामप्पा पाटील यांचे निधन 🕊️

अक्कलकोट तालुक्याचे माजी आमदार आणि सहकार क्षेत्रातील खंबीर नेतृत्व सिद्रामप्पा पाटील यांचे गुरुवारी रात्री सोलापुरातील खाजगी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांच्या निधनाने अक्कलकोट तालुका, राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

सिद्रामप्पा पाटील यांनी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, जिल्हा बँक, साखर कारखाना आणि विधानसभेपर्यंतचा प्रवास गाजवला. त्यांनी अक्कलकोट तालुक्यात भाजपाची भक्कम पायाभरणी केली आणि सहकारातून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
🙏 सिद्रामप्पा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
🎥 TN Maharashtra News Channel

2 months ago | [YT] | 0