महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील वस्तुस्थिती आणि जनसामान्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी
महाराष्ट्र जनभूमीची टीम नेहमीच आपल्या सोबत आहे. आपल्या बातम्या, प्रश्न आमच्या पर्यंत पोहोचवा
आणि जनसामान्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा.
आमच्या महाराष्ट्र जनभूमीच्या संकेतस्थळाला भेट द्या.
www.maharashtrajanbhumi.in
Contact and Follow us
Email - maharashtrabhumi09@gmail.com
Facebook - www.facebook.com/103750391358896
Twitter - twitter.com/MaharashtrajanB
Phone No. - 7719923351, 9322424178
टीम - महाराष्ट्र जनभूमी
Maharashtra JanBhumi
10 months ago | [YT] | 4
View 0 replies
Maharashtra JanBhumi
संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ल्याचा महाविकास आघाडीच्या आमदारांकडून निषेध !
10 months ago | [YT] | 4
View 0 replies
Maharashtra JanBhumi
भगवान बिरसा मुंडा – एक महान आदिवासी क्रांतिकारक
भगवान बिरसा मुंडा हे भारतातील एक महान आदिवासी नेते, स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक होते. त्यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी झारखंडमधील उलीहातू या छोट्या गावात झाला. ते मुंडा या आदिवासी जमातीचे होते.
बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश राजवटीविरोधात झारखंड परिसरात "उलगुलान" म्हणजेच मोठा उठाव उभारला. त्यांनी आपल्या लोकांना स्वाभिमानाने जगण्याचा, आपली जमीन आणि हक्क वाचवण्याचा संदेश दिला. त्यांनी आदिवासी समाजातील अंधश्रद्धा, मद्यपान आणि अन्य सामाजिक कुप्रथांविरोधात आवाज उठवला. त्यांच्या विचारांनी हजारो आदिवासींना जागृत केले.
बिरसा मुंडा यांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक जमिनीतल्या कायद्यांना कडाडून विरोध केला. त्यांनी लोकांना सांगितले की ही जमीन त्यांच्या पूर्वजांची आहे आणि ती त्यांच्या हक्काची आहे. १८९९-१९०० मध्ये त्यांनी मोठा लढा उभारला, ज्यामुळे ब्रिटिश सरकार हादरून गेले.
बिरसा मुंडा यांना ३ फेब्रुवारी १९०० रोजी अटक करण्यात आली आणि ९ जून १९०० रोजी कारागृहात त्यांचा मृत्यू झाला.
11 months ago | [YT] | 23
View 0 replies
Maharashtra JanBhumi
महाराष्ट्रात भाजप सोबत युती करत सत्ता स्थापन करणाऱ्या एनसीपी अजित पवार गटाच्या नागालँड मधील ७ आमदारांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला या घटनेवर आपले मत मांडा!
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Maharashtra JanBhumi
जुन्नर - अंजनावळे बस
नारायणगाव आगाराच्या आदिवासी भागात सेवा देणाऱ्या बस
1 year ago | [YT] | 24
View 1 reply
Maharashtra JanBhumi
💐💐💐
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Maharashtra JanBhumi
रयतेचा राजा, कुळवाडी भुषण, क्षत्रिय कुलवतसं श्रीराजा शिवछत्रपती' जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐💐
1 year ago | [YT] | 7
View 1 reply
Maharashtra JanBhumi
जुन्नर : नारायणगाव आगाराच्या ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या एसटी महामंडळच्या बसेस तर दुसरीकडे शहरी भागात सेवा देणाऱ्या एसटी बसेस
1 year ago | [YT] | 11
View 2 replies
Maharashtra JanBhumi
1 year ago | [YT] | 4
View 0 replies
Maharashtra JanBhumi
पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गजानन पाटील यांनी कार्यभार स्विकारला
राज्यातील महत्वाच्या जिल्हा परिषदांपैकी एक असलेल्या पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गजानन पाटील यांनी कार्यभार स्विकारला आहे.
संतोष पाटील यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या या पदावर गजानन पाटील यांची नियुक्ती झाली आहे.गेली काही वर्षे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव व सचिव म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांना पुणे जिल्ह्याचा सखोल अभ्यास असून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना या अनुभवाचा त्यांना चांगला फायदा होणार आहे.
या पूर्वी त्यांनी खेडचे उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. या शिवाय एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी म्हणून त्यांनी 2008 ते 2011 या कालावधीत काम केले आहे. या काळात त्यांनी चाकण एमआयडीसीतील बरेच प्रश्न मार्गी लावले होते.
काही काळ त्यांनी एम आय डी सी च्या मार्केटींग विभागाचे सरव्यवस्थापक म्हणून काम करताना कोरिया, इटली, जपान, सिंगापूर, जर्मनी देशांना भेटी देऊन तेथील गुंतवणूक राज्यात होण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. आळंदीच्या विकास आराखडयाच्या अंमलबजावणीत त्यांची महत्वाची भूमिका होती. खेड एसईझेड मध्येही त्यांनी त्या काळात शेतक-यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळवून दिला. विस्थापितांना घरे मिळवून दिली. ओझर व लेण्याद्री परिसराच्या विकासात तसेच जुन्नरचे प्रभारी नगराध्यक्षपद असतानाही त्यांनी काही कामे मार्गी लावली आहेत. शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी ही त्यांनी परिश्रम घेतले होते.
1 year ago | [YT] | 4
View 1 reply
Load more