Amhi Solapurkar News Channel

स्थानिक,प्रादेशिक, राष्ट्रीय तसेच चालू घडामोडीसाठी आम्ही सोलापूरकर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा
सोलापुरातील ब्रेकिंग घडामोडीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा

बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क करा 👉 86002 28673
9921658836


Amhi Solapurkar News Channel

मुंबई महापालिकेवर कोणाची सत्ता येईल?

6 days ago | [YT] | 1

Amhi Solapurkar News Channel

🛑 *अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात, माय-बाप शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी उभे राहू : खासदार प्रणिती शिंदे*

👉 *खासदार प्रणितीताई शिंदे यांचा अतिवृष्टी भागात पाहणी दौरा...*

👉 *शेतकऱ्याचे अंत पाहू नये सरसकट पंचनामे करा व नुकसान भरपाई द्या.*

मोहोळ, जिल्हा सोलापूर दिनांक, १२ सप्टेंबर २०२५

सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश्य पावसामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी पावसाने थैमान घातले. असून गाव, वाड्या, वस्त्या, नाले, ओढे सह सकल भागात पाणी साचल्यामुळे नागरिक, शेतकरी भयभित झाले आहेत. शेतकऱ्याचे उडीद, सूर्यफूल, सोयाबीन आदी पिकासह फळबागाचे मोठे नुकसान झालेले आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीने मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या पिकांची बांधावर जाऊन भरपावसात पाहणी केली. तालुक्यातील डिकसळ, मसले चौधरी, खुनेश्वर या परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रशासनाने शेतकऱ्याचे अंत न पाहता त्वरित सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. शेतकऱ्यांचे हाल पूरग्रस्त स्थिती पाहून खासदार प्रणिती शिंदे यांनी मा. जिल्हाधिकारी, मा. प्रांत अधिकारी, मा.तहसीलदार व संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रशासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. शनिवारी या भागातील शेतकऱ्यांसह मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रा. सातलिंग शटगार, मोहोळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेश पवार, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोज यलगुलवार, अरुण पाटील उपस्थित होते.

यावेळी खालील बाधित शेतकरी कृष्णा यादव, सुजाता धावणे, संतोष यादव, हनुमंत धावणे, नानासाहेब राऊत, सुरज यादव, युवराज यादव, विवेकराज धावणे, शिवम धावणे, विष्णू यादव, महेश यादव, स्वाती धावणे, चंद्राहार धुमाळ, तानाजी धावणे, सत्यवान धावणे, आदी बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केली.

यावेळी बंडू थिटे, दिलीप धावणे, अरुण पाटील, तानाजी शिंदे, दीपक शिरसाट, दिनकर पोटरे, वसंत चव्हाण, लक्ष्मण मगर आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‪@ManojJarange‬ ‪@PRANITISHINDEOFFICIAL‬ ‪@devendrakothe3708‬ ‪@Amhi_Solapurkar134‬ ‪@InSolapurNews109‬ #jaykumargore

3 months ago | [YT] | 3

Amhi Solapurkar News Channel

निवडणूक आयोगासोबत भाजपने संगनमत करून निवडणूक जिंकली हा राहुल गांधी यांचा आरोप योग्य वाटतो का?

4 months ago | [YT] | 2

Amhi Solapurkar News Channel

सोलापुरातील ऐतिहासिक हिप्परगा तलाव ओव्हरफ्लो....

4 months ago | [YT] | 2

Amhi Solapurkar News Channel

हॉटेल अजिंक्य समोरील कारवर झाड कोसळले

5 months ago | [YT] | 1

Amhi Solapurkar News Channel

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपूर हेलिपॅड येथे आगमन....

6 months ago | [YT] | 3

Amhi Solapurkar News Channel

आषाढी वारीच्या अनुषंगाने पालखी सोहळा प्रमुखांच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी वारीपूर्वी करण्यात येणार

- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद


*सर्व संबंधित यंत्रणांनी पालखी तळांवर मुरुमाचे साठे, रोलर व जेसीबीची व्यवस्था करून ठेवावी

पंढरपूर, दि. 26: - आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून, आषाढी यात्रा सोहळ्याच्या अनुषंगाने यापुर्वी पालखी मार्ग, तळ व रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पालखी सोहळा प्रमुखांकडून काही मागण्या व सूचना करण्यात आलेल्या होत्या, त्या सूचनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. तसेच पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांकडून काही पालखी मार्ग व तळासंबंधी नवीन सूचना व मागण्या प्राप्त झाल्या असून त्या सर्व मागणीची पूर्तता पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
आषाढी यात्रेच्या पुर्वतयारीबाबत केबीपी कॉलेज, पंढरपूर येथे दहा मानाच्या पालख्यांचे विश्वस्त, अध्यक्ष, सचिव यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, सा.बां.अधिक्षक अभियंता संजय माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, प्रांताधिकारी सचिन इथापे, सदाशिव पडदुणे, विजया पांगारकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, कार्यकारी अभियंता अमित निमकर, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी कार्यकारी अभियंता सोमशेखर हसापुरे,तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद म्हणाले, गतवर्षीच्या पालखी सोहळ्यासाठी पालखी मार्गावर, तळांवर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सोयीसुविधांबाबत पालखी सोहळा प्रमुखांनी समाधान व्यक्त केले. पालखी सोहळ्यासाठी अजूनही काही ठिकाणी सुधारणा करण्याची आवश्यकता असून, यंदा पाऊस जास्त होण्याची शक्यता असल्याने काही ठिकाणी वाढीव मुरमीकरण करण्याची आवश्यकता आहे. पालखी तळ्याच्या सर्व ठिकाणी मुरमीकरण करण्यात येणार आहे. तसेच मुरुमाचे साठे ठेवण्यात येणार असल्याने ऐन वेळेला ज्या ठिकाणी मुरमीकरण करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी तात्काळ मुरमीकरण केले जाईल त्याचबरोबर त्याठिकाणी रोलर, जेसीबी मशीनची व्यवस्था देखील
करण्यात येणार आहे.
तसेच आषाढी यात्रा कालावधीत गर्दी व्यवस्थापनाबरोबरच यावर्षी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्याने पावसामुळे कोणत्या प्रकारची आपत्ती येऊ शकते, तसेच कोणत्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या गोष्टी गृहीत धरून भाविकांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थापन आराखड्या अंतर्गत व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात येईल. त्याचबरोबर आषाढी यात्रा सोहळा कालावधीत पालखी सोहळ्यासह वारकरी, भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता प्रशासनाडून घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बैठकीत दहा मानाच्या पालख्यांचे विश्वस्त, अध्यक्ष, सचिव यांनी पालखी सोहळ्यासोबत दिवसेंदिवस दिंड्यांची संख्या वाढत असल्याने काही ठिकाणचे पालखीतळ कमी पडत असून ते तळ वाढवून मिळावेत. पालखी सोहळ्यासोबत महिलांसाठी पिंक टेन्ट व पिंक टॉयलेट उपलब्ध करून द्यावेत. पालखी सोहळ्याला आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा. टँकरची संख्या वाढवावी, पालखी सोहळे संबंधित मुक्कामाच्या ठिकाणावरून पुढे गेल्यानंतर तात्काळ स्वच्छता करावी, पालखी सोहळे पालखी मार्गावरून जात असताना वाहतुकीचे नियोजन व्हावे. पालखी तळांवर मुरमीकरण करावे.तसेच वाखरीचा तळ उत्कृष्ट मॉडेल तळ म्हणून विकसित करावा. सर्व पालखी सोहळे वाखरी येथे दाखल झाल्यानंतर सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वागत कक्ष उभारले जातात. स्वागताचे कार्यक्रम घेतल्याने पालखी सोहळे पंढरपुरात दाखल होण्यास उशीर होतो यासाठी स्वागत कक्षांची संख्या कमी करावी जेणेकरून पालखी सोहळे लवकर पंढरपुरात दाखल होतील, अशा सूचना यावेळी केल्या.

7 months ago | [YT] | 1

Amhi Solapurkar News Channel

ब्रेकिंग

मावा विक्री प्रकरणावरून वडार गल्ली आणि बाबा कादरी मशिद या दोन गटात वाद होऊन दगडफेक झाली,लोकांची पळापळ झाली.पोलीस वेळीच पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे.परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

7 months ago | [YT] | 2

Amhi Solapurkar News Channel

जगातील सर्वात शक्तिशाली देश कोणता?

9 months ago | [YT] | 0

Amhi Solapurkar News Channel

राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडोमार आंदोलन.
जिल्हाधिकारी यांच्याकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी




सोलापूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्या बाबत मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामर्थ्याची आणि कर्तुत्वाचे अवमूल्य केल्यामुळे राहुल सोलापूरकर यांनी तशी पुरावे द्यावेत अन्यथा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे
बुद्धिचातुर्य, धैर्य, गनिमा कावा अशा विविध गुणांनी त्यांनी लढवलेले डावपेच यांनी इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे. यापैकीच एक घटना म्हणजे शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका होती
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्र सह देशभरात आपल्या कर्तृत्व आणि सामर्थ्याची गाथा पोहोचणारे असल्यामुळे अनेकांचे प्रेरणास्थानी आहेत.

जगप्रसिद्ध आग्र्याच्या सुटकेच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते त्यासाठी त्यांनी कितीतरी हुंडी वाटले त्यांनी औरंगजेबाच्या वजीरासह त्याच्या बायकोला लाच दिली मोहसीन खान नावाच्या सरदाराकडून सही शिक्का असणारे अधिकृत पत्र त्यांनी घेतल्याचं त्याचबरोबर हिरकणी ही एक कथा असून हिरकणीची घटना घडलेलीच नाही महाराजांच्या शिस्तीचा मोठेपणा म्हणून ही गोष्ट रचलेली आहे असे
एका मुलाखतीत वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा दैदिप्यमान पराक्रमी इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगून त्यांची कर्तबदारी कर्तुत्व व पराक्रम कमी करण्याचा प्रयत्न या राहुल सोलापूरकर ने केलेला आहे त्यामुळे आमच्यासह तमाम शिवशंभु प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत
यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे कार्याध्यक्ष अरविंद शेळके संपर्कप्रमुख छत्रगुण माने उपाध्यक्ष सीताराम बाबर फिरोज सय्यद दिलीप निंबाळकर लखन गायकवाड आकाश नाईकवाडी वैभव धुमाळ ज्ञानेश्वर कदम आदि उपस्थित होते

11 months ago | [YT] | 2