The Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) is the statutory body responsible for the planning, development and governance of the Pune Metropolitan Region (PMR)—one of India’s largest and fastest-growing urban areas.
PMRDA oversees the integrated and sustainable development of a vast region that comprises the cities of Pune and Pimpri-Chinchwad, the tehsils of Maval, Mulshi and Haveli, as well as selected areas from the talukas of Bhor, Daund, Shirur, Khed, Purandar and Velhe. This expansive jurisdiction allows PMRDA to implement comprehensive regional planning that addresses both urban and semi-urban growth.
With a strong commitment to organized progress, cutting-edge infrastructure and seamless digital access for all, the region promises a high livability index, enhanced quality of life and economic opportunities for all.
Pune Metropolitan Region Development Authority
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक येथील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या एक मार्गिकेच्या (औंध ते शिवाजीनगर) लोकार्पणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार बापुसाहेब पठारे, आमदार हेमंत रासणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकात पुलकुंडवार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, मुख्य अभियंता रिनाज पठाण, प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता यांच्यासह वरिष्ठ उपस्थित होते.
या उड्डाणपुलामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी दूर होणार असून पुणेकरांना जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा नवा अनुभव मिळेल. PMRDA तर्फे उभारण्यात आलेला हा उड्डाणपूल पुणे शहरातील पायाभूत सुविधा व वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
#PMRDA #PuneDevelopment #Infrastructure #PuneFlyover #AundhShivajinagar
4 months ago | [YT] | 0
View 0 replies
Pune Metropolitan Region Development Authority
पुणे महानगर प्रदेशासाठी ऐतिहासिक पाऊल!
यशदा, पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब'चा शुभारंभ पार पडला. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे पुणे महानगर प्रदेशाच्या शाश्वत, नियोजित आणि समावेशक आर्थिक विकासाला दिशा देणे आहे.
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नीती आयोगाचे सीईओ बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुण्याच्या प्रगतीशीलतेवर भाष्य करत 'ग्रोथ हब'मुळे शहराचा आर्थिक आराखडा अधिक सक्षम आणि भविष्याभिमुख बनेल, असा विश्वास व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या विकासासाठी काटेकोर नियोजनाची गरज अधोरेखित केली.
या उपक्रमामुळे उत्पादन, आयटी, शिक्षण, आरोग्य, पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील प्रगतीला चालना मिळणार असून, PMR क्षेत्र हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून पुढे येईल. या कार्यक्रमात नीती आयोग, महाराष्ट्र शासन व पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्यात सामंजस्य करारही करण्यात आला.
हा कार्यक्रम पुण्याच्या समृद्ध आणि शाश्वत भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
@DevendraFadnavis @mieknathshindeofficial
#PuneGrowthHub #PMRDA #NITIAayog #DevendraFadnavis #EknathShinde #PuneDevelopment
5 months ago | [YT] | 0
View 0 replies
Pune Metropolitan Region Development Authority
पुणे महानगर प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी ऐतिहासिक पाऊल – ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ
यशदा, पुणे येथे नीती आयोग, महाराष्ट्र शासन आणि पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’ या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, “पुणे शहर नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य उभारण्यास सक्षम आहे. या ग्रोथ हबच्या माध्यमातून तयार होणारा विकास आराखडा निश्चितच पुण्याला नवी दिशा देईल.”
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नीती आयोगाचे CEO बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम, पुणे इंटरनॅशनल सेंटरचे प्रमुख पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमात पुणे महानगर क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार असून, तो ‘इंडिया@2047’ या दृष्टीकोनाशी सुसंगत असेल. पुण्याचे जीडीपी दुप्पट करण्याचे, जागतिक शहर बनविण्याचे व दरडोई उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट या माध्यमातून साधले जाणार आहे.
#PuneGrowthHub #PMRDA #DevendraFadnavis #EknathShinde #UrbanTransformation #EconomicMasterPlan #PIC #IndiaAt2047 #PuneDevelopment
5 months ago | [YT] | 0
View 0 replies
Pune Metropolitan Region Development Authority
पुणे महानगर प्रदेश 'ग्रोथ हब' कार्यक्रमाचा शुभारंभ!
5 months ago | [YT] | 0
View 0 replies
Pune Metropolitan Region Development Authority
हिंजवडीतील पायाभूत सुविधांसह वाहतूक सुधारणांच्या कामांची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) मार्फत हिंजवडीसह परिसरातील राबविण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडी दूर करण्याच्या अनुषंगाने केलेल्या कामांची शनिवारी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पाहणी करून आढावा घेतला.
या दौऱ्यादरम्यान पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी उपमुख्यमंत्री यांना मेट्रो लाईन ३, नवीन प्रस्तावित रस्ते आणि अतिक्रमण हटाव मोहिमेसह सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे मेट्रो लाईन ३, स्थानक क्र. ६, क्रोमा, हिंजवडी, क्रोमा ते मेझानाईन ते लक्ष्मी चौक ते शिंदे वस्ती ते मारुंजी रोड, मारुंजी रोड - कासार साई (कॅनोल) विप्रो सर्कल फेज-२, स्थानक क्र. ०३, डोहलर कंपनी, डोहलर कंपनी हिंजवडी फेज ३ माण गाव-पांडवनगर नगररचना रस्ता, नगररचना रस्ता ते प्राधिकरण आकुर्डी कार्यालयादरम्यान वाहतूक कोंडी सोडविण्याच्यादृष्टीने सोडविण्याच्यादृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि सुरु असलेल्या विविध विकासकामाची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
@AjitPawarSpeaks
#PMRDA #ajitpawar #punedevelopment #hinjawaditraffic #metroline3 #hinjawadi
5 months ago | [YT] | 3
View 0 replies