Knowledge Marathi - नॉलेज मराठी

नमस्कार मित्रांनो, नॉलेज मराठीवर तुमचे स्वागत आहे!
​हे फक्त एक YouTube चॅनल नाही, तर ही एक चळवळ आहे त्या प्रत्येक मराठी माणसासाठी, ज्याला आयुष्यात सामान्य राहायचे नाहीये. ज्याला गर्दीचा भाग न बनता, गर्दीचं नेतृत्व करायचं आहे.
​या चॅनलवर आमचा फोकस 'हार्ड वर्क'वर नाही, तर 'स्मार्ट वर्क' वर आहे. जगातील सर्वात यशस्वी लोकांची विचारसरणी कशी होती, हे आपण इथं शिकणार आहोत.
🧿​तुम्हाला इथे काय मिळेल?🧿
📚 Best Selling Book Summaries: जगातील सर्वोत्तम पुस्तकांचे सार, सोप्या मराठी भाषेत (Psychology, Power, Strategy).
💰 Financial Literacy: श्रीमंत होण्याचे व्यावहारिक मार्ग आणि पैशाचं मानसशास्त्र.
🧠 Self-Improvement: स्वतःला रोज १% ने कसं सुधारायचं?
🕵️‍♂️ Case Studies & Documentaries: बिझनेस आणि जगातील मोठ्या घटनांचे सखोल विश्लेषण.

बुक्स सजेशन किंवा प्रमोशन्ससाठी आपण
Knowledgemarathi11@gmail.com यांवर 📩 मेल करु शकता किंवा ☎️9421993699 यांवर व्हाट्सएपच्या माध्यमातून मेसेज करू शकता.

खूप धन्यवाद..❤️


Knowledge Marathi - नॉलेज मराठी

नमस्कार नॉलेज मराठी परिवार,
आपल्या चॅनलवर आपण सर्वजण एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत! 🚀
​आतापर्यंत तुम्ही अनेक पुस्तकांचे सारांश अर्थात Summaries ऐकले आणि त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळाला. पण 'The Power of Your Subconscious Mind' या पुस्तकाच्या व्हिडिओवर तुमच्यापैकी अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या की, "हे पूर्ण पुस्तक आम्हाला सविस्तरपणे शिकायला आवडेल."
​तुमच्या याच आग्रहाखातर, आपण आता या पुस्तकाचा 'सखोल अभ्यास' सुरू करत आहोत. आणि केवळ हे एकच पुस्तक नव्हे तर अनेक वेगवेगळ्या पुस्तकांना देखील आपण अभ्यासणार आहोत.
​आपली नवीन पद्धत कशी असेल?
​पुस्तकात एकूण २० चॅप्टर्स आहेत.
​प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण ४ चॅप्टर्स सविस्तरपणे समजून घेणार आहोत.
​म्हणजेच ५ भागांमध्ये आपल्याला या संपूर्ण पुस्तकाचे सखोल ज्ञान मिळेल.

तर तुम्ही तयार आहात ना या नवीन प्रवासासाठी? तुम्हाला हा उपक्रम कसा वाटला, याबद्दल कमेंट करून आपलं मत नक्की कळवा.

19 hours ago | [YT] | 13

Knowledge Marathi - नॉलेज मराठी

तुमच्या मते, एखादी नवीन सवय लावण्यासाठी साधारणपणे किती दिवसांचा सातत्यपूर्ण सराव लागतो?

2 weeks ago | [YT] | 7

Knowledge Marathi - नॉलेज मराठी

​🔥 आज आयुष्याला नवीन दिशा देणारा व्हिडिओ! 🔥
​तुम्ही खूप 'Busy' आहात, पण 'Productive' आहात का? कदाचित तुम्ही एकाच वेळी खूप गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहात आणि त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.
​तुमच्या या गोंधळाला उत्तर देण्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत गॅरी केलर यांच्या जगप्रसिद्ध पुस्तक "The One Thing" चा मराठी सारांश. हे पुस्तक तुम्हाला शिकवेल की तुमच्या आयुष्यातील ती एकच "The One Thing" कोणती आहे, जिच्यावर फोकस केल्यास तुमचे सर्व गोंधळ दूर होतील आणि प्रगतीचा आलेख उंचावेल.

​"यशासाठी करा फक्त ही 'एक गोष्ट'
​तुमची प्रगती आजपासूनच सुरू करा. वेळेवर हजर राहा!
​⏳ वेळ विसरू नका: आज सायंकाळी ठीक ५:०० वाजता
📺 चॅनेल: Knowledge Marathi
​बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून व्हिडिओ चुकणार नाही!

#TheOneThing #GaryKeller #MarathiMotivation #BookSummary #MarathiAudioBooks #KnowledgeMarathi #Focus #TimeManagement #SuccessSecrets

1 month ago | [YT] | 15

Knowledge Marathi - नॉलेज मराठी

​मी सध्या या ४ अप्रतिम पुस्तकांवर काम करत आहे, पण मला जाणून घ्यायचंय की सध्या तुमच्या आयुष्यात कोणती समस्या जास्त सतावतेय?
​जर तुम्हाला सतत Negative Thoughts येतात, तर १ ला वोट करा.
​जर तुम्हाला लोकांशिवाय राहण्याची भीती वाटते, तर २ ला वोट करा.
​जर तुमचं कामात लक्ष लागत नसेल, तर ३ ला वोट करा.
​जर तुम्ही खूप विचार करता पण कृती करत नाही, तर ४ ला वोट करा.
​तुमच्या एका वोटमुळे आपल्याला पुढच्या मार्गदर्शनाची दिशा मिळेल. कमेंटमध्ये सांगा तुम्ही हेच पुस्तक का निवडलं? ✍️📖

1 month ago | [YT] | 9

Knowledge Marathi - नॉलेज मराठी

'द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड' नंतर डॉ. जोसेफ मर्फी यांचे आणखी एक रहस्यमय पुस्तक - 'टेलिसायकिक्स'.
​तुमच्या सुप्त मनाची गुरुकिल्ली वापरून इच्छित गोष्टी कशा मिळवायच्या, हे जाणून घेण्यासाठी आमचा नवीन व्हिडिओ नक्की पहा.
​👇👇👇
https://youtu.be/upmGJwkXC1k

व्हिडिओची लिंक खालील कमेंट सेक्शनमध्येसुद्धा पिन (Pin) केली आहे!

​तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, हे कमेंट्समध्ये नक्की सांगा!

1 month ago | [YT] | 24

Knowledge Marathi - नॉलेज मराठी

आपल्या विचारांत आणि आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी, आज वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारी ही सहा विशेष पुस्तके ज्ञानाच्या खजिन्यात सामील होण्यासाठी अर्थात तुम्हा सर्वांसाठी मागवली आहेत! 📚💡
या सर्व पुस्तकांचा सखोल अभ्यास करून मी लवकरच प्रत्येकी विश्लेषणात्मक सारांश घेऊन येणार आहे.. तरी यातील कोणत्या पुस्तकाचा सारांश तुम्हाला सर्वात अगोदर हवा आहे? तुमची पसंती कमेंट करून नक्की सांगा.

धन्यवाद.
​टीम नॉलेज मराठी.
⤵️ 📚✨

​१. Focus On What Matters - केवळ महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देण्यासाठी.
२. Win Your Inner Battles - मनातील भीतीवर विजय मिळवण्यासाठी.
३. The Art of Being Alone - स्वतःला शोधण्यासाठी.
४. We Were Never Meant to Be - भावनांचा प्रवास समजण्यासाठी.
५. The Art of Laziness - आळस सोडून कामात गती आणण्यासाठी.
६. The Art of Not Overthinking - अतिविचारांपासून मुक्त होण्यासाठी.

KnowledgeMarathi #BookSummary #MarathiMotivation #SelfGrowth

1 month ago | [YT] | 21

Knowledge Marathi - नॉलेज मराठी

मित्रांनो, "The Fox Mindset" च्या पहिल्या भागाला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद! अनेकांनी या व्हिडीओचा दुसरा भाग घेऊन या असा आदेश दिला होता आणि म्हणूनच घेऊन आलो आहोत या प्रेरणादायी मालिकेचा दुसरा भाग!
​या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोल्ह्याप्रमाणे चतुर आणि हुशार बनण्याचे १३ अप्रतिम धडे शिकायला मिळतील. हे धडे तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी नक्कीच मदत करतील.
​जर तुम्हाला जीवनात प्रगती करायची असेल, स्मार्ट निर्णय घ्यायचे असतील आणि प्रत्येक आव्हानाचा सामना करायचा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे.
​या भागात काय आहे?
​योग्य वेळेची वाट कशी पहावी?
​भावनांवर नियंत्रण कसे मिळवावे?
​अपयशातून कसे शिकावे?
​आणि असेच अनेक महत्त्वाचे Life-Changing Lessons!
​व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा. तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका!

​➡️ व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा: [Https://youtu.be/9m_3acBFw5U]

#TheFoxMindset #MarathiMotivation #KnowledgeMarathi #LifeLessons #SuccessMindset #SmartWork #प्रेरणा #मराठीव्हिडिओ #यशस्वीजीवन

1 month ago | [YT] | 22

Knowledge Marathi - नॉलेज मराठी

जर त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार गांभीर्याने घेतले असते, तर कदाचित फाळणीच्या वेळी झालेला रक्तपात टाळता आला असता.
​आपण घेऊन येत आहोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी या पुस्तकाचं संपूर्ण विश्लेषण.
​या पुस्तकात त्यांनी १९४० मध्येच, फाळणीच्या अगदी ७ वर्ष अगोदर अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले होते:
१. फाळणी अपरिहार्य का होती?
२. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही बाजूंचा तटस्थ विचार.
३. जबरदस्तीच्या एकतेपेक्षा शांततेत वेगळे होणे का हिताचे होते?
भारताची फाळणी का आणि कशी झाली? यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय होते?
​हे समजून घेण्यासाठी त्यांचे 'पाकिस्तान अर्थात भारताची फाळणी' हे पुस्तक एकदा नक्की वाचायलाच हवे. पण पुस्तक खूप मोठे आणि अभ्यासू आहे, म्हणून मी तुमच्यासाठी या पुस्तकाची एकदम सोपी 'बुक समरी' बनवण्याचा प्रयत्न केला आहे. अपेक्षा आहे आपणास ती नक्कीच आवडेल.

​बघायला विसरू नका,
​उद्या रविवार सायंकाळी ठीक ५:०० वा. 😊

3 months ago | [YT] | 64

Knowledge Marathi - नॉलेज मराठी

गेल्या काही दिवसांपासून आपल्या फॅमिलीकडून एकाच पुस्तकाची मागणी होत होती. आणि जेव्हा तुम्ही प्रेक्षक एखादी गोष्ट एवढ्या हक्काने मागता, तेव्हा ती पूर्ण करणं हे माझं कर्तव्यच आहे.
​तुम्ही म्हणालात आणि मी व्हिडिओ बनवला नाही, असं होणार नाही. तुमच्या शब्दाला मान देऊन, 'The Power of Your Subconscious Mind' चा हा खास व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी!
​तुम्ही सुचवलेलं हे पुस्तक नक्कीच लाखो लोकांचे विचार बदलेल. थँक्यू हे पुस्तक सुचवण्यासाठी! 🙏
​पहा पूर्ण व्हिडिओ आणि सांगा, तुमची डिमांड पूर्ण झाली की नाही? 👇
​🔗 व्हिडिओची लिंक : Https://youtu.be/64NvR3eIino

3 months ago | [YT] | 16

Knowledge Marathi - नॉलेज मराठी

"जय जिजाऊ! जय शिवराय! 🚩
इतिहास फक्त पुरुषांच्या पराक्रमाचा नसतो, तर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या 'माउली'चा सुद्धा असतो.
छत्रपती शिवाजी महाराजांना 'शिवछत्रपती' बनवणारी ती अदृश्य शक्ती कोण होती? सिंदखेडराजा ते रायगड हा प्रवास कसा होता? वडलांच्या हत्येचे दुःख पचवून स्वराज्याचे स्वप्न कसे पेरले?
या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारा एक अत्यंत अभ्यासपूर्ण आणि अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ आम्ही घेऊन येत आहोत.
👇 नक्की पहा 👇
🗓️ कधी? उद्या, रविवार
🕔 किती वाजता? सायंकाळी ठीक ५:०० वाजता.
आपल्या चॅनेलवर प्रीमियर होईल. रिमाइंडर सेट करायला विसरू नका! हा इतिहास प्रत्येक घरात पोहोचला पाहिजे."

3 months ago | [YT] | 21