Marathipatra (निपक्ष मराठीपत्र) #MI MARATHI

निपक्ष मराठीपत्र (#Mi Marathi) हे वृत्तपत्र आहे.जे PRGI मध्ये नोंदणीकृत असून याचा नोंदणी क्रमांक हा MHMAR/25/A2822 हा आहे.बदलत्या काळानुसार सर्वसामान्य मराठी माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे व्यासपीठ तयार करण्यात आले असून,महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण घडामोडी यासोबतच समस्या या व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

संपर्क - दीपक बरकासे 9511260169
गुलाब वाघ 9130995647

Grievance Redressal Officer (in India) - Gulab raybhan wagh 9130995647
email id mimarathinews24@gmail.com



Marathipatra (निपक्ष मराठीपत्र) #MI MARATHI

नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद रणसंग्राम हा आपला कार्यक्रम सुरू आहे सुरवातीला चांगला प्रतिसाद मिळाला मात्र आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही कार्यकर्ते टीका करत आहेत.हा राजकीय प्रश्न आहे असे त्यांचे म्हणणे आहे.हा जर राजकीय प्रश्न असता तर मी जेव्हा नगर परिषदेच्या निवडणुका सुरू होत्या तेव्हा नगर पालिकेच्या प्रचार सुरू झाल्याच्या बातम्या सोडून पाच दिवस तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचे आंदोलन दाखवले नसते.या काळात मी राजकीय बातम्या जवळपास केल्याच नाही.आंदोलनानंतर नगर परिषद निवडणुकीच्या बातम्या केल्या.या काळात काही वृत्तपत्र सोडले तर अन्य कोणी याकडे लक्ष दिले नाही.यानंतर देखील सातत्याने याबाबत प्रश्न मांडत राहिलो.हा प्रश्न संपूर्ण मराठवाड्यातला आहे वैजापूर तालुक्यातील प्रत्येक गावातला आहे मग हा प्रश्न प्रत्येक गावात का उपस्थित केला जाऊ नये ?काहींच म्हणणे आहे की जिल्हा परिषद निवडणूक आहे त्याचे प्रश्न विचारा तो प्रश्नही विचारला जातोय मात्र जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकरी हाच मतदार आहे मग शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाच्या प्रश्न का विचारू नये? जर हा प्रश्न बाहेरचा आहे तर जिल्हा परिषद सदस्याची कामे सोडून विधानसभा सदस्याची कामे देखील कोणी सांगू नये जिल्हा परिषद मार्फत काय कामे केली तेवढच सांगाव,पंचायत समिती मार्फत काय कामे केली तेवढच सांगाव,आज हिंगोणी येथे एका कार्यकर्त्याने सांगितलं की त्याला १७ हजार हेक्टरी अनुदान मिळालं मात्र बाबतारा मंडळात ० बागायती क्षेत्र असताना यांना बागायती प्रमाणे अनुदान कस मिळालं?केवळ राजकीय नेत्यांची पाठराखण करण्यासाठी खोट बोलणं कितपत योग्य आहे, उलट हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याने उपस्थित करायला हवा अन्य कोणी हा प्रश्न का नाही घेत आहे? यागोदर अश्याच प्रकारे आम्ही कांदा आंदोलन दाखवले होते त्या ४०५ शेतकऱ्यांचे जवळपास २ कोटी त्यांना पाठपुरवठ्याने मिळाले आम्हाला वाटल पतपुरवठा ठेवला तर किमान नेते मंडळी मुद्दा हाताळतील आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर्ण २०० कोटी मिळतील मात्र काही राजकीय शेतकऱ्यांनी या प्रश्नाला विरोध केला
शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा लोकांना राजकीय प्रश्नच आवडतात यापुढे शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न आता आम्ही विचारणार नाही...कारण शेतकऱ्यांचे प्रश्न विचारून आता आम्हालाच लाज वाटू लागली आहे आणि तुम्हाला एवढच त्या मुद्द्याचं ओझ वाटत असेल तर त्या मुद्द्याची एकही बातमी यापुढे आम्ही करणार नाही उद्यापासून केवळ राजकीय प्रश्न...

16 hours ago | [YT] | 3

Marathipatra (निपक्ष मराठीपत्र) #MI MARATHI

नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर...

राज्यात गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज एका पत्रकार परिषदेद्वारे राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, या दोन्ही संस्थांसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिली आहे.

2 months ago | [YT] | 7

Marathipatra (निपक्ष मराठीपत्र) #MI MARATHI

वैजापूर नगरपालिकेचा नगरअध्यक्ष कोण होणार तुम्हाला काय वाटत ?तुमचं मत कळवा...

3 months ago | [YT] | 2

Marathipatra (निपक्ष मराठीपत्र) #MI MARATHI

सामान्य माणसाचा आवाज! आता वृत्तपत्राच्या माध्यमातून "मराठीपत्र"लवकरच

4 months ago (edited) | [YT] | 12

Marathipatra (निपक्ष मराठीपत्र) #MI MARATHI

वाकऱ्यांच्या महाकुंभला सुरवात...योगीराज सदगुरू गंगागिरी महाराज 178 वा अखंड हरिनाम सप्ताह(श्री क्षेत्र शनिदेवगाव)

5 months ago | [YT] | 314

Marathipatra (निपक्ष मराठीपत्र) #MI MARATHI

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...जय महाराष्ट्र 🚩

8 months ago | [YT] | 13

Marathipatra (निपक्ष मराठीपत्र) #MI MARATHI

सर्व दर्शकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago | [YT] | 28

Marathipatra (निपक्ष मराठीपत्र) #MI MARATHI

सर्व दर्शकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago | [YT] | 17

Marathipatra (निपक्ष मराठीपत्र) #MI MARATHI

आपल्याला कळवण्यात आनंद होत आहे की,मी मराठी न्युज चे यूट्यूब वर 10 मिलियन म्हणजे 1 कोटी व्ह्यूज पूर्ण झाले आहे.अवघ्या वर्षभरात दर्शकांनी 1 कोटी वेळेस आपल्या बातम्या बघितल्या या करिता सर्व दर्शकांचे मनापासून आभार...

- Mi Marathi News Team

1 year ago | [YT] | 58