डॉ. श्रीकृष्ण द. देशमुख उपाख्य डॉक्टरकाका यांच्या रूपाने विद्यमान काळातही एका अत्यंत श्रेष्ठ जीवनमुक्त संताचे आपल्याला दर्शन होते. आश्रमाने ते गृहस्थ, वागणुकीने वानप्रस्थी व वृत्तीने संन्यासी आहेत.
उंच, भव्य आणि अत्यंत प्रसन्न असे त्यांचे बाह्यदर्शन आहे. आत्मीयता, सौजन्य, कणव, अनाग्रह या गुणांनी त्यांचे अंतरंग नटलेले आहे. त्यांना पाहिल्यावर त्यांच्याकडे माणूस आकृष्ट होतो व सहवासात शांतीचा अनुभव घेतो.
समाजप्रबोधनाची आवश्यकता आहेच, त्यासाठी अधिकारवाणीने प्रबोधन करणाऱ्या सत्पुरुषांमध्ये डॉ. श्रीकृष्ण देशमुख यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल!
कार्य -
शुद्ध परमार्थ लोकांपर्यंत नेणे.
वेदान्तशास्त्र सांगणार्या ग्रंथांची निर्मिती करणे, परमार्थपर लेख लिहिणे.
परमार्थाविषयी रूढ असलेल्या गैरसमजुती दूर करणे.
शुद्ध परमार्थ शास्त्र, संतविचार सर्वांपर्यंत नेणारे प्रबोधक तयार करणे.
साधकांना प्रगतीचा मार्ग दाखवणे.
विविध अद्वैत संप्रदायांतील वरकरणी दिसणारा भेद व त्यांमुळे निर्माण झालेला भेदभाव दूर करणे.
संपर्कासाठी -
email - shivgadmurgud@gmail.com
phone - 9420547185
www.vedantbhasakar.org
Shivgad Pariwar
श्रद्धेय मंदाताई गंधे (अमरावती) यांच्या ठाणे दौऱ्यातील प्रवचनमाला
10 months ago | [YT] | 1
View 0 replies
Shivgad Pariwar
परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांचे ग्रंथ उपलब्ध . कृपया स्टॉल क्रमांक सी-२७, महाराणी अहिल्यादेवी होळकर मैदान, लक्ष्मी पार्क, बांगुर नगर, महाराजा अग्रसेन मार्ग, गोरेगाव (प) मुंबई येथे अवश्य भेट द्यावी. १०, ११, १२ जानेवारी २०२५, सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत
1 year ago (edited) | [YT] | 7
View 0 replies