अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!! "वासुदेव संगीत सभा" ही "श्री वेद वासुदेव प्रतिष्ठान, पुणे" ह्या संस्थेच्या कार्याचा एक भाग आहे.
भारतीय संस्कृतीचा आध्यात्मिक वारसा जपण्या सोबत सामाजिक दायित्वाचा अंगीकार व उत्तुंग संत साहित्याचा वारसा जपण्यासाठी सार्वजनिक उपासने बरोबर भारतीय संस्कृतीचा आदर्श मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या चरित्र जीवनावर आधारित पदांचा 'कुठे म्हणे राम' तसेच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर आधारित 'धन्य ती आळंदी' व दत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी रचलेल्या पदांना चाली लावून 'श्वसितम'हा सांगितिक कार्यक्रम परम आदरणीय श्री अजितदादा तुकदेव यांच्या ओघवती वाणीतील निवेदनाद्वारे ह्या संतांचे कार्य सामान्य जनांपर्यंत पोहचविण्याचे व तेणे करुन समाज प्रबोधनाचे कार्य ही संस्था करते
#वासुदेवसंगीतसभा #vasudevsangeetsabha
©. All rights are reserved. Logo, Audio, Video, Music, Songs, Description of the songs, owned by Shri. Ajit Krishna Tukdeo and the Intellectual Property of the said Owner
VASUDEV SANGEET SABHA
श्रावण वद्य पंचमी
श्रीमद् वासुदेव जन्मोत्सव सोहळा
स्थळ -हर्षल हॉल कोथरूड पुणे.
दिनांक.१२/०८/२५ मंगळवारी , वासुदेव जीवनदृष्टी गौरव पुरस्कार.सं.५-३० ते ८-३०.
दिनांक.१३/०८/२५ बुधवारी, श्रीमद् वासुदेव जन्मोत्सव सोहळा.सकाळी ६ ते रात्री ९ .
आपल्या येण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत.
वेद वासुदेव प्रतिष्ठान.पुणे.
4 months ago | [YT] | 39
View 1 reply
VASUDEV SANGEET SABHA
वासुदेव जन्मोत्सव सोहळा 2024
Extreme remembrance of this form of Yeti Vasudev.. That means *'Shrimad Vasudev birth anniversary celebrations - Shravan Krishna Panchami'*
Moments and moments of the descending of the ultimate consciousness, to experience it in reality when it is in this human body.. That means being a witness to this ceremony in reality.. That is, forgetting the body consciousness and experiencing the ceremonies of meaning, dedication, devotion..
To live all these moments at least once, to be enchanted by the divine name mantra.. To capture the ceremony of 'his' birth in the eyes, to listen to this previous glory again.. This is an extreme invitation to you..
'
"Sampurna Ved Vasudev Pratishthan' family" eagerly awaiting your arrival.. Must come.. And you and everyone else should also be invited
Date: 23 and 24 August 2024
Place: Harshal Hall, Near Cast Petrol Pump, Karve Road Pune
1 year ago | [YT] | 67
View 1 reply
VASUDEV SANGEET SABHA
Vakyarth Sabha held at Bithoor
June 14, 2024
A Vakyarth Sabha was held at Ayodhya Bhawan, Bithoor in Kanpur district on 14th of June 2024 on the occasion of Ganga Dusshera.
This Vakyarth Sabha was organized by Vasudev Vidnyan Sabha under the aegis of Ved Vasudev Pratishthan along with School of Shastric learning, KKSU amidst various other religious programs on the auspicious occasion of Ganga Dusshera which was organised by Shrimad Vasudevanand Saraswati Mahasansthanam, Dattadwaar, Bithoor.
Bithoor (also known as Brahmavarta) is a place of great significance to Datta Sampradaya as it is known to be a place of penance of P.P. Shrimad Vasudevanand Saraswati Swami Maharaj (incarnation of Shri Dattatreya).
This vakyarth sabha was presided over by Shri Dhananjay Shastri Vaidya alias Shri Niranjananand Swamiji in which esteemed shastra scholars and students presented their vakyarth. There were total 5 vakyarth which were presented by Dr. Anil Dwivedi (Vyakaran), Shri Adarsh Dwivedi (Vyakaran), Dr. Sachin Dwivedi (Vedanta), Harshal Bangde (Vedanta) and Chinmay Munje (Nyaya).
This sabha was convened by VVP president Shri Ajit Krishna Tukdeo, and Dr. Raghvedra Bhat, director of SSL, KKSU.
Vakyarth Sabha was co - ordinated by Dr. Sachin Dwivedi. Thanksgiving was further expressed by Chinmay Munje at the end. Various other vedic scholars and general public graced this sabha by their presence.
बिठूरस्थे अयोध्याभवने वाक्यार्थसभा
कानपुरजनपदस्य बिठूरग्रामस्थिते अयोध्याभवने गङ्गादशम्युत्सवमुपलक्ष्य जून् मासस्य १४ दिनाङ्के वाक्यार्थसभा आयोजिता।
श्रीमद् वासुदेवानन्द सरस्वती महासंस्थानम्, श्रीक्षेत्रदत्तद्वारम् इत्यनया संस्थया गङ्गादशम्युत्सवमुपलक्ष्य प्रतिवर्षं विविधानि धार्मिकानुष्ठानानि कार्यक्रमाश्च आयोज्यन्ते। तदङ्गभूततया अस्मिन् वर्षे वेदवासुदेवप्रतिष्ठानम् अन्तर्गता वासुदेवविज्ञानसभा तथा च शास्त्रविद्यागुरुकुलं कविकुलगुरुकालिदाससंस्कृतविश्वविद्यालयः इत्यनयोः संयुक्ततत्त्वावधानेन वाक्यार्थसभायाः आयोजनं प्रथमवारमेव कृतम्।
बिठूरग्रामे श्रीक्षेत्रदत्तद्वारम् इतीदं स्थानं भगवतः श्रीदत्तात्रेयस्यावतारभूतानां प.प. श्रीमद्वासुदेवानान्दसरस्वतीस्वामिनां तपस्यास्थलत्वेन मन्यते।
अत एव दत्तसम्प्रदाये अस्य स्थानस्य अत्यधिकं महत्त्वम् अस्ति।
श्रीनिरञ्जनानन्दस्वामिनाम् (वे.मू. धनञ्जयशास्त्रिवैद्यानाम्) आध्यक्षे जातायाम् अस्यां सभायां शास्त्रविद्भिः छात्रैश्च स्वीयशास्त्रसम्बद्धानां विषयाणां वाक्यार्थः उपस्थापितः।
तत्र डॉ. अनिलः द्विवेदी तथा श्री आदर्शः द्विवेदी व्याकरणे, डॉ. सचिनः द्विवेदी हर्षलः बाङ्गडे च वेदान्ते चिन्मयः मुञ्जे च न्याये इत्येवम् आहत्य ५ वाक्यार्थाः अभवन्।
वेदवासुदेवप्रतिष्ठानस्य अध्यक्षाः श्री अजितः तुकदेवः शास्त्रविद्यागुरुकुलस्य निर्देशकाः डॉ. राघवेन्द्रभट्टः इत्येतौ
कार्यक्रमस्यास्य संयोजकौ आस्ताम्।
वाक्यार्थसभायाः सञ्चालनं सचिनद्विवेदीवर्यः कृतवन्तः। प्रतिष्ठानपक्षतः धन्यवादसमर्पणं चिन्मयः मुञ्जे इत्यनेन विहितम्। अन्यैः वैदिकविद्वद्भिः आस्तिकजनैश्च स्वीयोपस्थित्या वाक्यार्थसभायाः शोभा ववृधिरे।
1 year ago | [YT] | 41
View 1 reply
VASUDEV SANGEET SABHA
वेद वासुदेव प्रतिष्ठान ,अंतर्गत
वासुदेव संगीत सभा प्रस्तुत - "राष्ट्ररथ विजयगान"
हा कार्यक्रम रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड ,येथे २८ऑक्टोबर २०२३शनिवार रोजी झाला .या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे आणि जी मंडळी कार्यक्रमाला येऊ शकली नाही त्यांनी जरूर या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा .पूर्ण कार्यक्रम ऐकण्यासाठी लिंक दिलेली आहे.
fb.watch/o0GNwNia16/?mibextid=Nif5oz
2 years ago | [YT] | 20
View 2 replies
VASUDEV SANGEET SABHA
"श्रीमद् वासुदेव जन्मोत्सव - दिव्य रुप प्रकटोत्सव - प्रकाशोत्सव. "
काळोखी रात्र - अंधःकार - पडलेला संमोह आणि निद्राधीन लोक. सूर्याचे क्षितिजावर येणे, आकाशात स्वतेजाच्या निमित्ताने तळपत सारे चराचर उजळवुन टाकणे - पाहणाऱ्यांना वेगळ्याने सांगावे लागत नाही - पाहु न इच्छिणाऱ्यांना जागे करता येत नाही - तरीही पाहू इच्छिणारे व पाहू न इच्छिणारे - साऱ्यांच्याच निमित्ताने हे 'वृत्तावलोकन'.
श्रावण वद्य पंचमी - प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची जन्मतिथी.
काळ - परंपरा - चराचर - साऱ्यांच्याच निमित्ताने 'चिरस्मृत' ठरलेली - युगानुयुगे 'आत्मग्लानीच्या' निमित्ताने 'विस्मृत' झालेली तिथी.
परत एकदा 'आत्मगौरवाच्या' निमित्ताने 'आत्मशोधन' व 'स्व'जाणिवेच्या पातळीवर 'परमोच्च जाणिवेचे अवतरण क्षण' - पाहू इच्छिणाऱ्या व जाणु इच्छिणाऱ्या साधकांच्या समष्टीने - 'वेद वासुदेव प्रतिष्ठाना'ने लौकिक - अलौकिक अर्थाने आरंभिलेले 'उत्सव'रुपी जागरण.
हे जागरण - ज्या व्यष्टीरुपात प्रकटले - 'जीवना'च्या निमित्ताने व्यक्त होत - अनेक जीवनांना स्पर्शून गेले - जागे होऊन - 'बघायचे काय?' याची 'दृष्टी' देऊन गेले - 'करायचे काय?' हे सांगून गेले व त्या सांगण्याच्या निमित्ताने साऱ्याच परंपरांचे 'सांगणे' - 'समाज'जीवनावर ठसवून गेले अश्या व्यष्टीरुपाचे - 'स्व. श्री विनायकराव निमदेव' यांचे स्मरण - त्या निमित्ताने समाज व राष्ट्रजीवनाप्रति कळकळीने स्वतःचे जीवन समर्पित केलेल्या 'व्यष्टींचा' सत्कार - 'वासुदेव जीवनदृष्टी गौरव पुरस्कार' - जन्मतिथीच्या पूर्वसंध्येला - श्रावण वद्य चतुर्थी या दिवशी.
दि.०३ सप्टेंबर २०२३, श्रावण वद्य चतुर्थी. स्थळ - हर्षल हॉल, कोथरूड, पुणे.
'वासुदेव जीवनदृष्टी गौरव पुरस्कार'
हा पुरस्कार सोहळा - जाणीवपूर्वक पुरस्कार देणाऱ्यांचा व जाणीवपूर्वक घेणाऱ्यांचा.
अधिष्ठान - परमोच्च जाणिवेचे - प.प. श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामीमहाराजांचे - प.पु श्रीसखाराम महाराजांचे.
व्यासपीठावर विराजमान - व्यासतुल्य व्यक्तिमत्त्वे.
पुरस्काराचे 'अधिकारी' - आ. डॉ. श्री सखामहाराज जोशी - श्रीसखाराम महाराज संस्थान वंशस्थ - ज्यांचे जीवन हे समाजाला दृष्टी प्रदान करणारे - या पुरस्काराचाच गौरव वाढविणारे होय.
पुरस्काराचे दाते - प्रतिष्ठानासाठी अत्यंत आदराचे व हक्काचे श्रद्धास्थान - प.पु श्रीमोरेश्वरबुवा जोशीमहाराज - शक्तिपात महायोग पीठाधीश्वर दीक्षाधिकारी व राष्ट्रीय कीर्तनकार - ज्यांचे 'असणे' हेच 'अधिष्ठान'.
कार्यक्रमाचे अध्यक्ष - संवाहक - वेद वासुदेव प्रतिष्ठानाचे संस्थापकाध्यक्ष - आ. श्रीअजितदादा तुकदेव - आम्हा साऱ्यांचेच 'गुरुस्थान'.
विशेष उपस्थिती - आ. श्रीगजानन निमदेव - मुख्य संपादक, तरुण भारत, नागपूर - ज्यांचे ज्ञान 'वृद्धांना' आणि कार्य 'तरुणांना' मार्गदर्शक व प्रेरक आहे असे 'भारतीपुत्र'.
आणि स्व. श्री विनायकराव निमदेव यांच्या 'धर्मपत्नी' आ. श्रीमती मालतीताई निमदेव.
पुरस्काराचे देणे वा घेणे - यापेक्षा प्रत्यक्ष परंपरेचे झालेले मिलन. हा सोहळा म्हणजे साक्षात् परंपरेनेच स्वतःचा करवुन दिलेला परिचय - विस्मरणातून प्रत्यक्ष स्मरणाकडे नेत करवून दिलेली कर्तव्याची जाणीव.
याच जाणीवेने - कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या प.पु श्रीसखाराम महाराज यांच्या पादुकांचे केलेले पूजन - कार्यक्रमाचे समापन.
कार्यक्रम संपला - क्षण सरले - सरताना - 'न सरणारे' काहीतरी देऊन गेले. 'आपण ते घेतले का?' - हा प्रश्न सोबत घेऊन आत्मचिंतनाचा क्षण येऊन ठेपला. ते आत्मचिंतन, गुरुस्मरणाच्या निमित्ताने उत्कट होऊन प्रत्यक्ष 'साकार' होऊ पाहत होते - श्वासांच्या निमित्ताने वृत्तीरुपाने चित्तरुपीभूमीत रुजू पाहत होते.
दि. ०४ सप्टेंबर २०२३, श्रावण वद्य पंचमी
स्थळ - हर्षल हॉल, कोथरूड, पुणे.
तिथी - दिवस येऊन ठेपला. अवघे चराचर चैतन्यमय - साक्षात् 'परमचैतन्या'च्या प्रतीक्षेत - उत्सवाचे साक्षित्व आणि सहभागित्व लेवून.
सकाळी ९ वाजता श्रीमद् स्वामींच्या 'श्री'पादुका उत्सव स्थळी आल्या. महामंत्रगर्जना झाली - जयजयकार झाला - वारकरी बांधवांनी 'रामकृष्णहरी' व 'ज्ञानोबामाऊलीतुकाराम' अशी भजने केलीत - आनंदाने नृत्य केली - त्या स्मरणाच्या निमित्ताने अवकाशातून प्रत्यक्ष माऊली आणि तुकोबाराय आलेत - 'स्मर्तृगामित्व प्रत्ययास आले' - श्रीमद् स्वामींना अतीव हर्षाने भेटले - स्वरूपी अभिन्न विभूतीमत्वांना भिन्नत्व पत्करण्याचा 'मोह' झाला - आणि प्रत्यक्ष उराउरी भेट घडून आली. पाहणाऱ्यांना कळले - न पाहणाऱ्यांनी जाणले - संस्कृती - परंपरा अवतरित होऊन 'साक्षात् दर्शन' देऊन गेली.
श्रीवेदांचे पठण - प्रत्यक्ष पौरुषेय वेदांचे - भगवान श्रीमद् वासुदेवांचे अधिष्ठान. सारेच लौकिक - अलौकिक प्रकटले - भगवान श्रीदत्तात्रेय अतीव प्रसन्नरुपात विराजमान झाले. 'सत्यदत्तव्रता'च्या निमित्ताने स्मरण व अर्चन केलेल्या साऱ्यांनाच अभीप्सित प्रदान करते झाले.
श्रीमद् दत्तयाग आरंभिला. प्रत्यक्ष ज्ञानाग्नि 'चेतला'. गुलालाप्रमाणे ज्ञान - भक्ती - कर्म - योग उधळल्या गेले - परमानंदात मग्न होऊन 'पूर्णानंद' नर्तनी रमला."होत सांग याग योग परि न भेट दे!" - सांगणाऱ्याला आपल्याच शब्दाचा विसर पडला.
हा उत्सव - जाणिवेच्या पातळीवर प्रत्येकानेच 'होत असताना' पाहिला - अनुभवला.
या प्रासादिक अनुभवाने - 'महाप्रसादाने' - सारेच तृप्त झाले आणि त्यांच्या येण्याच्या उत्कंठेने व्याकुळसुद्धा!
श्वासांच्या निमित्ताने देहाचे कण अन् कण - रोम अन् रोम आणि सारेच चराचर - त्यांचे येणे पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी सज्ज झाले - व्याकुळ झाले.
अर्चन - सेवन - दास्य - सख्य - स्मरण - श्रवण - वंदन असे सर्व भक्तीप्रकाराने 'त्यांना' आळवु लागले.
कीर्तन आरंभले - 'या नरदेही तरीच बरे हो' - नरदेहाची सार्थकता - नरदेहाची धन्यता ज्यात आहे 'ते' ऐकून - श्रवणाच्या निमित्ताने अंगी बाणविण्याचा निर्धार झाला. आणि त्या निर्धार व निश्चयाचा निमित्ताने 'वासुदेव' हा 'विवेकरुपाने' प्रत्येकाच्याच चित्ताकशात अवतीर्ण झाला. हा जन्म पाहून - आपल्या जन्माचे सार्थक झाले - असे साऱ्यांनाच वाटले. हे वाटणे हीच उत्सवाची फलश्रुती ठरली.
आधिदैविक - आधिभौतिक - आध्यात्मिक अश्या सर्वच पातळीवर 'उत्सव' झाला.
कीर्तनाच्या निमित्ताने अवतरित झालेल्या त्या रुपापुढे आसन घालून 'उपासने'च्या निमित्ताने स्वतःच्या जीवनाचे निवेदन करीत - प्रसादरुपी ते जीवन 'ग्रहण' करुन सारेच जण कृतकृत्य झाले.
राष्ट्र - धर्म - संस्कृती - परंपरा त्यांच्या चरणांवर नत झाल्या. आणि 'ते' या साऱ्यांनाच पुन्हा एकदा 'अभय' देते झाले - आपल्या येण्याने साऱ्यांनाच 'आश्वस्त' करते झाले. हे आश्वासन - 'कळणाऱ्यांना' व 'न कळणाऱ्यांना' - साऱ्यांनाच मिळाले.
हा जन्मोत्सव - जीवनाची दिशा दाखवून गेला - वैदिक धर्मियांना स्वतःच्या 'स्व'त्वाचे दर्शन घडवुन गेला.
2 years ago | [YT] | 23
View 3 replies
VASUDEV SANGEET SABHA
प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे ,सोमवार दि. ४ सप्टेंबर २०२३ ,श्रावण वद्य पंचमी शके १९४५ , दिव्य क्षणाचे साक्षीदार होण्यास सादरआमंत्रित आहात.🙏🙏🌺🌷🌻💐🌸🌹
2 years ago | [YT] | 37
View 0 replies
VASUDEV SANGEET SABHA
वेद वासुदेव प्रतिष्ठान आयोजित
"श्री गंगा दशहरा महोत्सव २०२२."
श्री क्षेत्र ब्रम्हावर्त, प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी , तिथेच गंगा दशहरा महोत्सवाच्या निमित्ताने श्री गंगा मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, गंगा लहरी वरील निरूपण, प्रवचन,कीर्तन,गायन , गंगा मातेला महावस्त्र अर्पण सोहळा, अरिष्ट निवारणासाठी स्वामींनी दिलेल्या मंत्रांचा जप व हवन, चतुर्वेद पारायण, उपासना, त्रिपदी तसेच गंगेची आरती अशा अनेकविध संस्कारांनी गंगा दशहरा हा महोत्सव संपन्न होणार आहे दिनांक 3१मे ते ९ जून २०२२ म्हणजेच जेष्ठ शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ शुद्ध नवमी या काळात हा सोहळा संपन्न होईल.
या सोहळ्या करिता आपण सर्व साधकांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज की जय, भगवान श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय,
परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय.
कार्यक्रमाची पत्रिका म्हणजेच हे सविनय सादर आपणा सगळ्यांना केलेले आमंत्रण होय.
https://youtu.be/o41Gioo2pbQ
3 years ago | [YT] | 32
View 0 replies
VASUDEV SANGEET SABHA
|| श्री श्रीमद् सद्गुरूसंग ||
या पत्रकाचा उद्देश फक्त "वेद वासुदेव प्रतिष्ठान " या परिवाराबद्दल माहिती पुरवणे हा नसून यात या भारतवर्षात जन्म लेल्या सर्वांसाठी एक प्रकट आवाहन आहे.आपल्याला आपली ओळख नव्याने करून देण्याचा हा परिवाराचा संघटीत प्रयत्न आहे असे म्हणता येईल.आपली परंपरा व संस्कृती जिचे बद्दल. आपण अभिमानाने फक्त बोलात असतो,तिची पुनः नव्याने ओळख करून घेण्याची वेळ आली आहे.ज्या ज्ञानयुग अथवा माहितीच्या युगात आपण वावरत आहोत,त्या युगाची आव्हाने पेलण्यासाठी या भारतवर्षात जन्मलेल्या आचार्यांनी - ज्यांनी ज्ञान संपादन हेच आपलं साधन व साध्य मानले त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जाणे क्रमप्राप्त आहे.जगाचा इतिहास पाहिल्यास सम्राट व महाराजांपेक्षा विचारांनीच कायम जगावर राज्य केले आहे पण ज्या विचारांमध्ये व्यष्टी आणि समष्टीच्या सर्वांगीण विकासाचा व कल्याणाचा विचार होता तेच चिरंतन टिकून आहे. ग्लोबल व्हिलेज ची संकल्पना आपल्या संस्कृतीने हजारो वर्षांपूर्वी प्रतिपादलेली व आचारलेली होती.(वसुधैव कुटूंबकमः) परिवर्तन हा सृष्टीचा नियम असला तरी काही काळानंतर सिंहावलोकन आवश्यक आहे. आपण प्रगतीच्या नावाखाली कुठल्या दिशेने जात आहोत हे कळण्यासाठी तरी ते आवश्यक आहे. आज समाजामध्ये परस्पर विरोधी चित्र दिसते. एकीकडे पराकोटीची समृद्धी तर दुसरीकडे पराकोटीचे दारिद्र्य एकीकडे भौतिक सुखांची रेलचेल तर दुसरीकडे मानसिक कौटुंबिक व सामाजिक अशांतता व अस्वास्थ्य. राष्ट्राची प्रगती मोजण्याचे विपरीत मानदंड ,स्वधर्महीन , मर्यादा ओलांडत असलेला समाज ,आचार्य परंपरेचे लोपत असलेले अस्तित्व व बेफाम अंकुशहीन राजसत्तेचा प्रभावी उदय.
ही आपली खरी ओळख आहे काय?
व्यक्तीमत्व - विकासाच्या अपुऱ्या मानदंडांनी , ईर्षेने झपाटलेला समाज, ज्ञान व माहिती मधील फरक न जाणणारा, शिक्षण संस्कारांच्या ताळमेळाची गरज नसणारा व चित्त व अंतःकरण या शब्दव्दयांची ओळख नसलेला पण बुद्धी व मनाच्या सहाय्याने 'अर्थ 'हीच फक्त प्राप्त करावयाची गोष्ट असें समजून संस्कार व परंपरेचा अर्थही समजून न घेण्याची आवश्यकता व अशा अर्थतज्ज्ञांनी ताब्यात घेतलेला हा देश व त्यांचे हाती देशाच्या पुढच्या पिढ्या- नागरिक व भवितव्य.
महान आचार्यांनी समृद्ध केलेली आपली संस्कृती आपली विचारधारा याची पुन्हा नव्याने ओळख करून घेऊन सर्वार्थाने समृद्ध राष्ट्राची निर्मिती हाच उद्देश.
आत्मतत्त्वाची ओळख अथवा मनाकडून विश्वमनाकडे प्रवास अथवा व्यष्टीकडून समष्टीकडचा प्रवास हेच अध्यात्म आहे.
परिपूर्ण जाणीवेकडचा प्रवास म्हणजेच अध्यात्म व परिपूर्ण जाणीव म्हणजे "वासुदेव ". सर्वांगीण उन्नती ह्याच उद्देशाने एकत्र आलेले कुटुंब म्हणजेच वेद वासुदेव प्रतिष्ठान.
वेद परमेश्वराचे निश्वसित , परमेश्वराचे चैतन्य वाङ्मयीन रूप.जिथून सर्व ज्ञानाचा उगम होतो.वासुदेव अपौरुषेय वेदांचे पौरूषेय रूप असे ज्याला जाणता येईल.भगवान श्रीमद् आद्य शंकराचार्यांचे समतुल्य , या भारतवर्षाला ललामभूत असलेले एक महानतम आचार्य अर्थात परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज.
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजे साक्षात ज्ञान- ज्ञानाचे चैतन्यरुप.ज्ञानोत्तर कर्म - भक्ती व वैराग्य यांचे सगुण रूप.ही विभूती आजही आपल्याला आपल्या विलक्षण चरित्रातून व आर्ष ग्रंथातून मार्गदर्शन करित आहे. भगवान दत्तात्रेयांचा जगत कल्याणासाठी झालेला मानवरूपी अवतार म्हणजे "वासुदेव."या ज्ञानयुगात" चैतन्य रुपी "गुरु तत्त्वाची सात्विक कर्मांनी ,निष्काम प्रेमाने आणि संपूर्ण समर्पित वृत्तीने उपासन करून भौतिक आणि आधिभौतिक उन्नती साधून भारत वर्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वेद वासुदेव प्रतिष्ठान कटिबद्ध आहे.विषय ज्योत लावण्याचा नसून मशाली पेटवण्याचा आहे वादळामध्ये विझून जाणारी ज्योत नव्हे तर धगधगणारी "अध्यात्म धर्माची" मशाल हीच राष्ट्राला 'राष्ट्रधर्माची' ओळख करून देण्यासाठी पेटवली पाहिजे व नित्य जागरणाने , बलदंड एकतेने सांभाळली पाहिजे. ज्ञानाच्या मशालीच्या उजेडात विभूती, आचार्य, ज्ञानसंपन्न महात्म्यांच्या चरित्राचे परिशीलन ,चिंतन व मननाच्या सहाय्याने जाणीवपूर्वक अभ्यास. राष्ट्राचा विकास हाच व्यक्तीच्या विकासाशी व्यक्तिमत्त्वाशी निगडित असतो.
प्रत्येक श्वास हा जाणिवेच्या उच्चतम पातळीवर जाण्यासाठी -सर्वार्थाने हीच" वेद वासुदेव प्रतिष्ठान "परिवाराची भूमिका आहे .परिपूर्ण जाणीवेकडचा प्रवास म्हणजेच "वासुदेव".
यावे... या वासुदेव मिशनला आपल्या असण्याची गरज आहे.
आपले आमच्या सोबत असणे हीच थोरल्या महाराजांची आमच्यावरील कृपा होय.
3 years ago | [YT] | 199
View 5 replies
VASUDEV SANGEET SABHA
"श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या जयंती उत्सवा निमित्त",
|| श्री श्रीमद् सद्गुरूसंग ||
परम पावन क्षण म्हणजेच सद्गुरूंचे अस्तित्व.
जे संपूर्ण चराचरात व्यापून आजही आम्हा जीवांचे सृजनत्व व पालकत्व घेऊन सृष्टीला पावन करीत आहेत व शाश्वत सामर्थ्याची साक्ष देत आहेत.प्रत्येक क्षणात, सृष्टीच्या कणाकणात ,जळाच्या निर्मळतेत आणि क्षुधा शांत करणाऱ्या ओलाव्यात केवळ आणि केवळ एकच तत्त्व भरून राहिले आहे , ते म्हणजेच गुरू तत्त्व होय....
सद्गुरूंना शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य.
पौष शुद्ध द्वितीया म्हणजेच , दत्त परंपरेतील द्वितीय अवतार भगवान श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जयंती होय.
शाश्वत सर्वांगसुंदर आणि स्थायी अशी ही दत्त परंपरा होय.या परंपरेची समृद्धता आजही चराचरातील प्राणी मात्रांवर कृपाछत्र देत राहिली आहे.
अज्ञासही कृपेचा वर्षाव करते आहे.कारण ही शाश्वत, अमर्याद, करूणामयी, दयार्द्र अशी कृपा गंगा होय.
प.प.श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी आपल्या गुरूव्दयांची म्हणजे च भगवान श्रीपाद श्रीवल्लभ आणि भगवान श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची अतिशय आर्त अशी करूणा भाकली आहे, स्तुती वर्णिली आहे ."श्रीपाद वल्लभ जय, नरसिंह सरस्वती यतिवर दत्ता." तीच आज आपणा सर्वांसमोर परत उदधृत करतोय.
"श्रीपाद वल्लभ जय, नरसिंह सरस्वती यतिवर दत्ता. "
https://youtu.be/iTMJXSAiS3U
4 years ago | [YT] | 224
View 7 replies
VASUDEV SANGEET SABHA
||श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा, वासुदेवानंद सरस्वती सद्गुरू नाथा कृपा करा||
एक अनुभव..
गुरुशिष्य परंपरा म्हणजेच सद्गुरूंच्या छत्रछायेत कृपांकीत होणे होय आणि ही परंपरा लाभलेले क्षेत्र म्हणजेच भारतभूमी आणि त्यातूनही संत परंपरेने समृद्ध असलेला आपला महाराष्ट्र प्रदेश. कलीयुगाच्या प्रभावातून तारून नेणारी देवता म्हणजेच दत्तात्रेय प्रभू होत. प्रत्येक व्यक्ति ही परमेश्वराचा अंश असल्याने विविध पद्धतीने सद्गुरुंच्या सहवासाची जाणीव प्रत्येक व्यक्तिला होत असते. अशाच एका जाणीवेतून अतिशय निर्मळ व जाज्वल्य अनुभव प. प. थोरले स्वामी महाराजांच्या ज्न्मस्थानी श्री क्षेत्र माणगाव येथे मला आला.
माझे गुरुवर्य आदरणीय श्री अजित दादांच्या (अध्यक्ष, वेद वासुदेव प्रतिष्ठान) समवेत माणगाव येथे प्रथमच माझे येणे झाले होते. मुळातच संपूर्ण परिसर हा लक्षवेधी आहे. मुख्य ओढ मंदिराकडे जाण्याची होती. याच मंदिराच्या प्रवेशद्वारावर वरच्या बाजूला ||“श्रीपाद श्रीवल्लभ नरहरि दत्तात्रेया दिगंबरा| वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा||” हा दत्तपरंपरेतील सर्वश्रुत असा सर्व कल्याणकारी ‘गजर’ वाचण्यात आला. ज्यावेळी मी तो गजर वाचत होते त्याचवेळी माझ्याही नकळत मला त्या गजराची चाल सुचली. हाच त्या चालीतील गजर जो ‘वासुदेव संगीत सभा’ या यू ट्यूब चॅनेलवर आपण ऐकला असेल. वैयक्तिक माझ्यासाठी चाल सुचण्याचा हा पहिलाच क्षण असल्याने हा अनुभव आजही तसाच मनात कोरला गेला आहे. यालाच गुरुकृपा असे म्हणत असावे असे वाटते. इथूनच पुढे संगीत सभेचा खरा प्रवास सुरू झाला. तद्नंतर या पदांना धरून संगीतसाधना, पहिला ध्वनिमुद्रणाचा प्रकल्प व व्यासपीठावरील ‘वासुदेव श्वसितम’ या तीन तासांच्या भव्य सादरीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात झाली, आजही सुरू आहे.
या निरंजन पदांची गायन सेवा अखंडीतपणे सुरू राहो व या पदांचा सुगंध सर्वदूर पसरो व स्वामी महाराजांच्या वाणी ने प्रत्येक आत्म्याचा प्रवास परमात्म्याकडे होवो म्हणजेच सद्गुरूचरणी लीन होवो.
आपल्या सदिच्छारूपी प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत..
श्री सद्गृरू कृपा ही केवलम..
सौ. कल्याणी आमलेकर कुळकर्णी
"वासुदेव संगीत सभा"
https://youtu.be/nWpIdWPZtzE
#वासुदेवसंगीतसभा #vasudevsangeetsabha
4 years ago | [YT] | 45
View 7 replies