*नमस्कार मित्रांनो, 🙏
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩
मी सुमित तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या तुमच्या हक्काच्या youtube channel मधे म्हणजेच आपली संस्कृती मधे. ❤️
हे channel सुरू करण्यामागे अनेक कारणं आहेत पण त्यातील एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपली मागे पडत असलेली मराठी संस्कृती, जीला जपण्यासाठी आपण हा एक एक छोटासा प्रयत्न करत आहोत. 💯
या channel द्वारे आपल्याला मी वेगवेगळ्या जागा तेथील इतिहास तसेच देव देवस्थान ची माहिती देणार आहे. इतकेच नव्हे तर वेगवेगळे गड किल्ले, शुर मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देखील आपण बघणार आहोत. महाराष्ट्रामध्ये साजरे केले जाणारे विविध सण, उत्सव त्यांची प्रथा परंपरा याची देखील माहिती आपल्याला या channel मधून मिळेल. आपल्या मराठी माणसाचे ग्रामीण तसेच शहरी जीवन व्यवसाय कसे आहे हे सुद्धा दाखवायचा प्रयत्न मी करेल. 😌
एकंदरीत तुम्हाला सगळ्या मराठी संस्कृती ची पर्वणी या channel द्वारे मिळेल म्हणूनच आपल्या या छोट्याश्या प्रयत्नाला नक्की सहकार्य करा आणि आपल्या channel ला subscribe करा. 👍
*
*
*
*
*
❤️
Aapli Sanskruti
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् ।
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥
नवीन video लवकरच... ❤️
1 year ago | [YT] | 17
View 0 replies
Aapli Sanskruti
⚓️🚩
1 year ago | [YT] | 22
View 0 replies
Aapli Sanskruti
०२ फेब्रुवारी १६६१ रोजी शिवाजी महाराजांचे सैन्य व कारतलब खानाचे मुघल सैन्य यांच्यात उंबरखिंड येथे युद्ध झाले व त्यात मुघलांचा पूर्ण पराभव झाला. मुघल सैन्याने शरणागती पत्करल्यावर खंडणी घेऊन त्यांना सोडण्यात आले. ह्या युद्धात शिवाजी महाराज स्वतः हजर होते , म्हणून हे युद्ध मराठा इतिहासात महत्त्वाचे मानले जाते.
1 year ago | [YT] | 35
View 3 replies
Aapli Sanskruti
राजगड 🚩
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैऋत्येला ४८ कि. मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात व भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते.
1 year ago | [YT] | 47
View 0 replies
Aapli Sanskruti
महिमतगड 🚩
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील किल्ला. देवरुख गावातून बेलारी फाटा मार्गे निरगुडवाडीच्या पुढे गडाच्या मेटापर्यंत गाडी रस्ता झालेला आहे. तेथून पुढे पायवाटेने किल्ला उजवीकडे ठेवत वळसा घालता येतो.
1 year ago | [YT] | 26
View 0 replies
Aapli Sanskruti
प्रतापगड 🚩
हा पश्चिम भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे . महाबळेश्वर हिल स्टेशनपासून 24 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. 10 नोव्हेंबर 1659 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आणि विजापूर सल्तनतचा सेनापती अफझल खान यांच्यात झालेल्या प्रतापगडाच्या लढाईमुळे किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आहे.
1 year ago | [YT] | 33
View 0 replies
Aapli Sanskruti
सिंहगड 🚩
सिंहगड हा भारतातील पुणे शहराच्या नैऋत्येस सुमारे ४९ किमी अंतरावर असलेला एक प्राचीन डोंगरी किल्ला आहे. हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे. तानाजी मालुसरे यांचा मोठा इतिहास या किल्ल्यावर आहे.
1 year ago | [YT] | 60
View 0 replies
Aapli Sanskruti
किल्ले विजयदुर्ग 🚩
विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग आहे. हा किल्ला मुंबईच्या दक्षिणेस सुमारे २२५ किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस १५० किलोमीटरवर आहे. सुमारे १७ एकर जागेत हा किल्ला पसरला आहे. या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत. त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात. याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत. या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत. एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरा पश्चिमेकडे.
1 year ago | [YT] | 29
View 0 replies
Aapli Sanskruti
सर्व विजेता स्पर्धकांचे अभिनंदन ❤️
सर्वांचे किल्ले लवकरच आपल्या Page वर Post करण्यात येतील. 🙏
तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद 💯
1 year ago | [YT] | 32
View 2 replies
Aapli Sanskruti
चला आपली संस्कृती जपूया!
For Registration : 8552945933
1 year ago | [YT] | 99
View 11 replies
Load more