Hello everyone and welcome to MyhobbyMycreation – where you will get chance to see dances, poems, stories, Ukhane, decoration ideas,rangoli, Crochet and many more. It is a place for creative and fun ideas about various things. You can make crafts and give unique gifts. Here you will find a lot of videos about various projects and many other interesting ideas. I hope you'll enjoy the videos. Get ready to be inspired!
नमस्कार आणि सुस्वागतम.
इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य, सजावट, रांगोळी, उखाणे, गोष्टी व क्रोशेटपासून तयार केलेल्या अनेक वस्तू पाहू शकता.
मी हे चॅनेल आम्ही केलेल्या नृत्य सादरीकरणाचे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी काढले होते. मी ज्यावेळी क्रोशेचा गजरा तयार केला त्यावेळी खूपजणांनी मला शिकायचे आहे म्हणून विचारले, त्यावेळी मी व्हिडिओज करून यूटुबवर अपलोड करायचे ठरवले. त्यावेळी मी आकाशकंदील करत होते, मग तो विडिओ अपलोड करून मी माझ्या चॅनेलची खऱ्या अर्थाने सुरुवात केली.
आपल्या सपोर्ट साठी खूपखूप आभार.
आता मस्तीत जगायचे व स्वतःला वाटेल तसे आणि वाटेल तेव्हा ते करून आनंदात जगायचे!
My hobby My creation
"स्नेह वाढतो तिळाने,गोडी वाढते गुळाने.
तुपाच्या मिश्रणाने एकजीव होतात
नात्याचे बंध.
वेलचीने पसरतो नात्यामध्ये सुगंध.
एकमेकांच्या सहवासात नात्यामध्ये मिळतो आनंद.
संक्रांतीच्या निमीत्ताने मिळो सर्वांना
अक्षय परमानंद. "
"तिळगुळ घ्या गोड गोड बोला."
"मकर-संक्रांती च्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा ".
3 years ago | [YT] | 4
View 2 replies
My hobby My creation
3 years ago | [YT] | 5
View 0 replies
My hobby My creation
“Art is never finished, only abandoned.” – Leonardo Da Vinci.
3 years ago | [YT] | 4
View 1 reply
My hobby My creation
रंगदेवता कायम तुमच्यावर प्रसन्न नसते, त्यामुळे तिच्या डोक्यावर पाय ठेवून न येता तिला प्रणाम करून नतमस्तक होऊन यावे
3 years ago | [YT] | 10
View 4 replies
My hobby My creation
https://youtu.be/9FBvR4gxj7g
Crochet Santa Cap/Hat
Easy & quick,
Beginner friendly
3 years ago | [YT] | 4
View 0 replies
My hobby My creation
काळ्या मुंग्यांची रांग ...त्यांचे काम... पानाचे लहान तुकडे घेऊन त्या मुंग्यांची शिस्तबध्द ये-जा चालू होती . जवळच त्यांचं वारुळ होत. मुंग्यांची लांबी जवळजवळ एक इंच होती आणि त्या पायावर उंच उभ्या राहिलेल्या दिसत होत्या. त्यांची प्रत्येक हालचाल संघटित आणि पूर्णपणे योजनापूर्वक होती. प्रथम पान तोडणारया मुंग्या; त्यांनी फक्त पानांचे तुकडे करायचे, थोड्या अवधीत त्या कौशल्यानं सारख्या आकाराचे तुकडे खाली जमिनीवर टाकत होत्या. खाली साधारण तशाच स्वरूपाच्या मुंग्या होत्या. फरक फक्त इतकाच की त्यांच्या तोंडाजवळ राखी रंगाचा लहानसा पट्टा दिसत होता. त्या अर्धवर्तुळात उभ्या होत्या, पानं वाहून नेणारया मुंग्यांवर त्या लक्ष पुरवत होत्या. उजवीकडून पानांचे तुकडे उचलल्यावर त्या डावीकडे वळून आपल्या प्रचंड वारुळाकडे कूच करीत; पण पानांचे तुकडे उचलायच्या धांदलीमध्ये काही काही वेळा तिथे गर्दी होई आणि क्रम चुके; की लगेच बाजूच्या लक्ष देणारया पोलीस मुंग्या हस्तक्षेप करीत आणि काम पुन्हा सुरळीत सुरु होई. त्यातल्या एका मुंगीचा काय अपराध झाला कुणास ठाऊक; पण तिला रांगेबाहेर काढण्यात आल. एका पोलीस मुंगीनं तिच्या डोक्याला कडकडून चावा घेतला आणि दुसरीनं तिचे मधोमध दोन तुकडे केले. त्या पोलीस मुंग्यानी ओळीतल्र्या दोन कामगारांना थांबवल, दोघींनी आपल्या डोक्यावरच ओझ बाजूला ठेवून एक लहानसा खड्डा तयार केला; अपराधी मुंगीचे तीन्ही भाग त्यात पुरुन टाकले आणि वर माती लोटली...
पॅपिलॅान
हेन्री शॅरियर
3 years ago | [YT] | 12
View 6 replies
My hobby My creation
पिकनिकला जायच्या किंवा कुठले महत्वाचे काम असेल तर त्याच्या आदल्या रात्री आपल्याला झोप येत नाही कारण
थोडीशी anxiety, थोडीशी excitement, थोडेसे happiness, थोडे planning.. ह्या सगळ्या गोष्टींनी मेंदूमध्ये जागा घेतलेली असते त्यामुळे मेंदू हे विसरून जातो की आपल्याला झोपायचय!!
दिल दोस्ती दुनियादारी दोबारा
3 years ago | [YT] | 14
View 0 replies
My hobby My creation
रागाने केले चांगल्या विचारांचे भक्षण.
होरपळून गेले मनाचे चांगलेपण.
त्याने आले मनाला दुबळेपण.
मनाला द्या चांगल्या विचारांचे संरक्षण.
दिले पाहिजे त्याला आरक्षण.
करा आपल्या प्रकृतीचे रक्षण.
राग आहे कोत्या मनाचे लक्षण.
म्हणूनच ठेवा रागावर नियंत्रण.
देऊ नका रागाला आमंत्रण.
करु नका रोगाला निमंत्रण.
राबवा आनंदाची यंत्रणा.
।।"आयुरारोग्य संपदा फल प्रात्यर्थंम्।।"
संध्या कुलकर्णी.
3 years ago | [YT] | 12
View 0 replies