अरुण निचिते महाराज

चॅनेल नाव: अरुण निचिते महाराज – गोंधळ परंपरा 🚩
Mob No- 9579663820
गोंधळ परंपरेची खरी ओळख आमच्या या चॅनेलद्वारे तुम्हाला अनुभवता येईल. अरुण निचिते महाराज यांच्या नेतृत्वाखाली देवीच्या गोंधळ, जागरण, आणि पारंपरिक कुलधर्म यांचे सखोल विवेचन येथे उपलब्ध आहे.

आम्ही गोंधळ परंपरेचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व उलगडून दाखवतो तसेच महाराष्ट्रातील विविध गावोगावच्या कुलाचार, देवींचे स्थान आणि लोकपरंपरा याबद्दल माहिती देतो.

✅ चॅनेलवर काय पाहायला मिळेल?

गोंधळ परंपरेचे थेट प्रक्षेपण (Live)

गोंधळ विधी आणि कुलाचार यांचे स्पष्टीकरण

पारंपरिक भक्तिगीते आणि मंत्रसंग्रह

विविध कुलदैवतांचे महात्म्य आणि त्यांचे विशेष गोंधळ


आपण ही अमूल्य परंपरा जतन करण्याच्या आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या प्रवासात सहभागी व्हा!


🔹 तुम्ही या प्रवासात कसे सहभागी होऊ शकता?

📌 चॅनेल सबस्क्राईब करा – नवीन व्हिडिओ अपडेटसाठी
📌 बेल आयकॉन दाबा – थेट गोंधळ आणि नवीन माहिती त्वरित मिळवा
📌 व्हिडिओ लाईक व शेअर करा – हा भक्तिरस इतरांपर्यंत पोहोचवा

देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहो!
🙏🏻 लखाबाई च्या नावानं चांगभलं 🙏🏻



अरुण निचिते महाराज

पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील भोपीवली या गावात गेल्यानंतर खरंच असं वाटलं की आपण कोकणात आल्यासारखं अनुभव घेत आहोत. गावाची निसर्गरम्यता, शांतता, हिरवाई आणि परिसराची सौंदर्यख्याती पाहून मन भारावून गेलं. रस्ते जरी काहीसे खराब असले तरी, तिथल्या माणसांकडून मिळालेलं प्रेम, सहकार्य आणि आपुलकी एवढं खूप गोड आणि दुहेरी होतं, की मन प्रफुल्लित झालं.कार्यक्रमाची तयारी पाहून खूप आनंद झाला. प्रत्येकाला काम व्यवस्थित वाटून दिलं गेलं, आणि प्रत्येकाने त्याला पूर्ण मनाने स्वीकारलं. लोकांच्या नजरा थांबत होत्या कारण जोगमार्गे परिवाराने गावाची सजावट अगदी प्रेमाने केली होती प्रत्येक कोपरा, प्रत्येक जागा नीट व्यवस्थित केली होती. प्रत्येक व्यक्तीने आपापल्या पद्धतीने मदतीचा हात दिला, आणि हे सगळं पाहून मनाला खूप समाधान मिळालं.माझ्या माहितीनुसार, रोशन पाटील हे अतिशय छान व्यक्तिमत्त्वाचे आहेत; त्यांचा सौम्य स्वभाव आणि माणुसकी प्रत्येकाला भावेल. तसेच, *गणेश कदम साहेब आणि त्यांचे सहकारी* यांनी त्यांच्या उत्कृष्ट आवाजाने आणि सहयोगी वृत्तीने कार्यक्रमाची गुणवत्ता आणि उत्साह अधिकच वाढवला.
आमचे *गुरुवार्य श्री अरुण निचिते महाराज* यांनी जोगमार्गे परिवाराला मार्गदर्शन केले, प्रत्येकाची योग्य दृष्टीने सेवा कशी करावी हे दाखवून दिलं, आणि कुलाचाराचं महत्त्व आणि खोल अर्थ समजावून सांगितलं. त्यांनी प्रत्येकाच्या कामाचे निरीक्षण केले, आणि ज्या पद्धतीने कुलाची माहिती दिली, ती खरोखरच प्रेरणादायक होती.त्याचबरोबर, महाराजांचा शिष्य स्वप्निल दिनकर महाराज यांचा देखील छान सहभाग जोगमार्गे परिवाराला मिळाला, आणि त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची उर्जा आणि आनंद अधिकच वाढवला.
तुम्हाला जोगमार्गे परिवाराचे जागरण गोंधळ आमच्या YouTube चॅनेलवर नक्की पाहायला मिळेल. मनापासून धन्यवाद जोगमार्गे परिवाराला, तुम्ही आम्हाला बोलावलं, आम्ही सहभागी होऊ शकलो, आणि हा अनुभव अविस्मरणीय बनवला.
YouTube Channel: https://youtu.be/3iTZe2WKy9k

2 days ago | [YT] | 8

अरुण निचिते महाराज

जिथे श्री अरुण निचिते महाराज यांचं नाव जरी उच्चारलं जातं, तिथे भक्तांची पावलं आपोआप वळतात… 🙏🚩माणसं जमणार नाही असं कधीच झालं नाही कारण ते फक्त नाव नाही, ती श्रद्धेची हाक आहे..

जागरण असो वा गोंधळ, वातावरण आपोआप आध्यात्मिक ऊर्जेने भारलेलं असतं.
ढोल-ताशांचा नाद, देवीचं गजर, आणि भक्तांच्या डोळ्यांतील विश्वास सगळं काही हाऊसफुल्ल च असतं… पण फक्त लोकांनी नाही, तर भक्तीने
जिथे महाराजांचं चरणस्पर्श होतात, तिथे देवत्व प्रकट होतं. त्यांच्या वाणीतील मार्गदर्शन आणि देवीच्या कृपेचा स्पर्श हीच खरी जागरण-गोंधळाची ओळख.....

#जागरण गोंधळ भोपीवली, जोगमार्गे परिवार, वाडा तालुका..... 🚩🚩

2 days ago | [YT] | 445

अरुण निचिते महाराज

भोपीवलीत होणारा गोंधळ म्हणजे फक्त एक कार्यक्रम नाही, तर भक्ती, परंपरा आणि श्रद्धेचा पवित्र उत्सव आहे. देवांची आवड, भक्तीची धडधड आणि जयघोषाने संपूर्ण गाव भक्तीमय होणार आहे. गावकऱ्यांची एकजूट आणि देवी-देवतांवरील अपार प्रेम यामुळे प्रत्येक क्षण उत्साहाने भारलेला जाणवणार आहे.
आज आदिशक्ती देवीचं जागरण मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने पार पडणार आहे. तर १६ तारखेला कुलदैवताचा जागरण गोंधळ पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. या दोन्ही सोहळ्यांमुळे भोपीवलीत भक्तीचा दिव्य संगम अनुभवायला मिळणार आहे.
या पवित्र प्रसंगी श्री अरुण निचिते महाराजांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभणार असल्यामुळे कार्यक्रमाला विशेष आध्यात्मिक तेज प्राप्त होणार आहे. महाराजांच्या उपस्थितीत होणारे विधी, कुलाचार आणि गोंधळ हे सर्वांसाठी अविस्मरणीय ठरणार आहेत.
तसेच वाडा तालुक्यातील प्रेमळ, आपुलकीची आणि देवभक्त माणसं, त्यांचं सहकार्य आणि आदरातिथ्य यामुळे हा सोहळा अजूनच भव्य आणि यशस्वी होणार आहे.
भोपीवलीचा हा उत्सव म्हणजे भक्तीचा जल्लोष, महाराजांचा आशीर्वाद आणि वाडा तालुक्याच्या माणुसकीचा सुंदर संगम.... 🚩🙏

#bhopivali #vada

1 week ago | [YT] | 283

अरुण निचिते महाराज

शैलेश बिडवी साहेब आणि त्यांच्या परिवाराने केलेलं मनापासून स्वागत खरंच अविस्मरणीय होतं. त्यांच्यासोबत झालेलं छान संभाषण, आपुलकी आणि कुटुंबासोबत घालवलेले क्षण मनाला खूप समाधान देऊन गेले. बिडवी साहेबांच्या घरी जाऊन इतकं प्रेम, आदर आणि आत्मीयता मिळाली की ही भेट कायम आठवणीत राहील.
एवढं मनापासून प्रेम दिल्याबद्दल आणि सन्मानाने सत्कार केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद....

1 week ago | [YT] | 444

अरुण निचिते महाराज

आज तिवरे परिवार, बावघर येथे परमपूज्य श्री अरुण महाराज निचिते यांच्या हस्ते पार पडलेला कार्यक्रम अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. गावातील सर्व मंडळींची देवभक्ती, श्रद्धा आणि एकजूट पाहून मन अक्षरशः भरून आलं. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अतिशय उत्तम होते.
महाराजांनी पारंपरिक पद्धतीने कुलाचा कुलाचार विधीवत पूर्ण करून सुंदर फोड केली, तसेच संचारही मोठ्या प्रमाणात आले. पण नेहमीप्रमाणे महाराजांचे शब्द मनाला भिडणारे दहा संचार येण्यापेक्षा दोन जरी आले, तरी त्यांनी कुळाचा योग्य मार्ग धरायला हवा..गोंधळ कसा असावा, त्यात भक्ती, शिस्त आणि संस्कार कसे असावेत, याचं जिवंत उदाहरण महाराजांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं. खरंच, प्रत्येक कुलाचा उद्धार असाच त्यांच्या हस्ते होत राहो, हीच देवीचरणी प्रार्थना.याच शुभ प्रसंगी ठाणे जिल्ह्याला आपल्या आवाजाने वेड लावणारे गायक गणेश कदम साहेब यांचा वाढदिवसही महाराजांच्या हस्ते साजरा करण्यात आला. त्यांना मनःपूर्वक आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यात आल्या.पुन्हा एकदा माझ्याकडून
गणेश कदम साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.त्यांना उदंड आयुष्य, लाभो, हीच लखाबाई चरणी प्रार्थना 🙏🚩

1 week ago | [YT] | 480

अरुण निचिते महाराज

🙏 तिवरे परिवाराची जेजुरीतील पवित्र एकजूट 🙏
श्री खंडेरायाच्या चरणी तिवरे परिवार एकत्र येऊन भक्तीभावाने दर्शन घेतले.
येलकोट जय मल्हार च्या गजरात कुटुंबातील प्रेम, श्रद्धा आणि एकता अधिक दृढ झाली.

देवाची कृपा सदैव परिवारावर राहो हीच प्रार्थना... 🙏

✨ जय मल्हार ✨
#जेजुरी #तिवरेपरिवार #जयमल्हार #भक्ती #एकजूट

1 week ago | [YT] | 255

अरुण निचिते महाराज

Original माऊली ढाबा – जेजुरीकरांची पहिली पसंती! 🌿
📍 सकुर्ड, जेजुरी | चव्हाण बंधू

४० वर्षांची परंपरा…
घरच्यासारखी चव…
आणि मनापासून सेवा… ❤️

माऊली शेठ चव्हाण यांनी प्रेमाने उभारलेला हा ढाबा आजही शुद्ध, स्वच्छ आणि चविष्ट जेवणासाठी प्रसिद्ध आहे.
अनेक भक्त, प्रवासी आणि भाविकांची इथली जेवणाची खास जागा!

अलीकडेच श्री अरुण महाराज निचिते यांनी येथे भेट देऊन जेवणाचा आनंद घेतला आणि ढाब्याच्या चवीचं कौतुक केलं. 🙏

🍛 गरमागरम भाकरी
🥘 चवदार भाजी
🍚 घरगुती आमटी-भात
💯 पूर्ण समाधानाची हमी

जेजुरीला दर्शनाला जाताना…
एकदा माऊली ढाब्यावर थांबा, जेवा आणि मन तृप्त करा!

#माऊलीढाबा #Sakurad #JejuriFood #घरगुतीजेवण

1 week ago | [YT] | 300