FDA suspends licence of iconic Burger King outlet in Camp: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अन्न व औषध प्रशासनाने आता आपला मोर्चा बड्या कंपन्यांकडे वळवल्याचं दिसून येतंय. पुण्यात प्रसिद्ध असलेल्या 'बर्गर किंग'वर एफडीएने कारवाई केलीय. शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या आऊटलेटवर प्रशासनाने छापेमारी केली आहे.
👉पुण्यातील हजारो लोक दरदिवशी याच ठिकाणी बर्गर खाण्यासाठी जात असतात. परंतु या ठिकाणी एफडीएच्या टीमला अनियमितता आढळून आली. त्यामुळे 'बर्गर किंग कॅम्प'चा परवाना अन्न व औषध प्रशासनाने रद्द केला आहे. बर्गर जॉईंटमध्ये खाद्यपदार्थांच्या संदर्भात गंभीर त्रुटी आढळल्याची बाब समोर आली आहे. रेस्टॉरंटमधील अस्वच्छतासुद्धा कारवाईचे प्रमुख कारण असल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुणे : हवेली तालुक्यातील कोळवाडी मांजरी-थेऊर रोड येथील 'सृष्टी हाइट्स' या गृहप्रकल्पातील ४१ फ्लॅटधारकांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. २०१३ मध्ये आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या कुटुंबांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र तब्बल १३ वर्षानंतरही प्रकल्प पूर्ण झालाच नाही अन् फ्लॅटचा ताबाही मिळाला नाही. दरम्यान, हा वाद न्यायालयात गेला आणि तडजोडीअंती दिलेले धनादेशही बिल्डरने बाऊन्स केल्याचा आरोप सदनिकाधारकांनी केला आहे. 'घर मिळालेच नाही, आता किमान आमचे पैसे तरी व्याजासह परत द्या, अशी म्हणण्याची वेळ या कुटुंबियांवर आली आहे. या संदर्भात फ्लॅटधारकांनी 'लोकमत' कडे कैफियत मांडली. याबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय गाठले असता गेल्या दहा वर्षापासून कार्यालयदेखील सोडले असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
👉धक्कादायक बाब म्हणजे, बिल्डरने भागीदारीत वडगाव व वाघोली येथे 'श्रुस्टी रिजंसी' नावाने १९८० फ्लॅट्स, ३६ रो हाऊस, ९३ शॉप्स् अशा प्रत्येकी १४ ते ३७ लाख किंमत आकारून भव्य गृहप्रकल्पाची जाहिरात केली होती. मात्र या गृहप्रकल्पाला नगर रचना विभागाची परवानगीच घेतली नाही. दहा वर्षानंतर देखील या ग्राहकांना ताबा दिलेला नाही. या गृहप्रकल्पाची जागाच परस्पर दुसऱ्यांना विकून टाकल्याचा आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर यांनी केला आहे. ग्राहकांना कुठल्याही अॅमिनिटी दिल्या नाहीत सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी साडेसातशे रुपयांऐवजी प्रत्येक ग्राहकांकडून २० हजार रुपये घेतले, पार्किंग शुल्क ५० हजार तर विद्युत मीटरसाठी ३५ हजार व डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून २५ हजार रुपये घेतल्याचे देखील त्यांनी सांगितले. मात्र अद्याप ग्राहकांना सदनिका व दुकान दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.
👉याच बरोबर याच बिल्डरने डब्लुएस डेव्हलपर्स प्रा. लि. या कंपनीने गट क्रमांक ७२३, कोळवाडी, मांजरी थेऊर रोड, ता. हवेली, जिल्हा पुणे येथे 'सृष्टी हाइट्स' हा गृहप्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. कंपनीचे संचालक योगेश वसंत शेलार यांनी ग्राहकांशी फ्लॅट विक्रीचे करार केले.
👉ग्राहकांनी मांडली व्यथा...बिल्डरने २०१३ मध्ये करारनामा केला. त्यात २०१५ मध्ये सदनिकांचा ताबा देण्याची अट होती. मात्र बिल्डरने कराराचा भंग केला. त्यानंतर आम्ही ग्राहक मंचात धाव घेतली, तिथे आमच्या बाजूने कौल मिळाला, पण बिल्डरने आदेशाचा भंग केला. #pune#punecity#punebuilders flat scam #punekar#punelife#पुणे#punenews#puneupdates#mh12 news
Pune Crime News: पुण्यातील (Pune) गणेश पेठ (Ganesh Peth) परिसरातील डुल्या मारुती चौकात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडापाव (Vadapav) खरेदी करताना अनावधानाने एकमेकांच्या पायाला पाय लागल्याच्या किरकोळ वादातून एका 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवम परदेशी (वय 28) असे या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर वैभव साळुंखे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
👉याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत शिवम आणि आरोपी वैभव हे दोघेही गणेश पेठ परिसरातच राहणारे असून त्यांची आपापसांत तोंडओळख होती. घटनेच्या दिवशी दोघेही डुल्या मारुती चौकातील एका वडापावच्या गाडीवर वडापाव खरेदी करण्यासाठी गेले होते. तेथे गर्दीत अनावधानाने एकाच्या पायाला दुसऱ्याचा पाय लागला.या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद पेटला. वादाच्या भरात रागाच्या भरात असलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर जोरदार बुक्क्या मारल्या. या मारहाणीमुळे शिवमच्या शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. गंभीर दुखापत झालेल्या शिवमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
👉घटना घडलेले आरोपी आणि पीडित हे दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आरोपी वैभव हा एका बिल्डरकडे अकाउंटंट म्हणून नोकरी करतो. तर विशेष म्हणजे, मृत शिवम आणि आरोपी वैभव या दोघांचेही वडील रिक्षाचालक म्हणून काम करतात. केवळ एका क्षणिक रागातून आणि किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे गणेश पेठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. #pune#punecity#crimenews#punenews#punekar#punelife#पुणे#puneupdates#mh12
पुणे : खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून एक लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आल्याची घटना रविवार पेठेतील कापडगंज परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे.
👉तक्रारदार ५० वर्षीय महिला सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात राहायला आहेत. त्या शनिवारी (दि. ८) सायंकाळी पाचच्या सुमारास रविवार पेठेतील कापडगंज परिसरात खरेदीसाठी आल्या होत्या. रामसुख मार्केटजवळ गर्दीत चोरट्याने त्यांच्या पिशवीतून एक लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली.
👉लॅपटॉप चोरीला...कारची काच फोडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप चोरून नेल्याची घटना शिवाजीनगर गावठाण भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. एका तरुणाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार तरुणाने शिवाजीनगर गावठाण परिसरातील सुदामा हॉटेलजवळील गल्लीत कार लावली होती. त्यातून दोन लॅपटॉप चोरले. #pune#punecity#crimenews#punenews#punekar#पुणे#puneupdates#punelife#puneinstagrammers#mh12
पुणे : खासगी वाहनांवर 'पोलिस' असे नाव लिहून अथवा पोलिसांचा लोगो, स्टिकर लावून त्याचा गैरवापर करण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा वाहनांचा वापर अवैध कामे, दहशत निर्माण करणे तसेच प्रवासी व मालवाहतुकीसाठी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता अशा वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
👉अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच महामार्ग पोलिस अधीक्षकांना याबाबत निर्देश दिले आहेत. नाकाबंदी, पेट्रोलिंग तसेच वाहन तपासणीदरम्यान अशा वाहनांची विशेष तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
👉दंडात्मक व फौजदारीची काय तरतूद ? मोटार वाहन कायद्यानुसार नियमभंगाबद्दल दंडात्मक कारवाई होऊ शकते. बनावट पोलिस असल्याचे भासवून फसवणूक, धमकी अथवा अन्य गुन्हे केल्यास संबंधितांविरोधात स्वतंत्र फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो.
👉पोलिस नाव लिहून चक्क प्रवासी आणि मालवाहतूक,अनेकदा 'पोलिस' नावाचा वापर करून खासगी वाहनांतून प्रवासी तसेच मालाची वाहतूक केली जात असल्याचेही आढळले आहे. अनेकदा पोलिस नावाची पाटी किंवा लोगो पाहून वाहनांची सखोल तपासणी होत नसल्याने गैरप्रकारांना वाव मिळतो.
👉मुले, नातलगांच्या वाहनांवरही पाटी पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या, नातेवाइकांच्या खासगी वाहनांवरही पोलिस पाटी अथवा लोगो लावल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा वाहनांवर कारवाई करून संबंधितांकडून पोलिस नाव अथवा लोगो हटवण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. #pune#punepolice news #policecar news #पुणे#punenews#puneupdates#punecity#punekar#mh12
पुणे आणि राज्याच्या पोलिस दलातील न १५० पोलिस निरीक्षकांच्या य विनंती बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये न विविध पोलिस घटकांतून १२ . निरीक्षकांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली झाली आहे. तर आयुक्तालयातील दोन को निरीक्षकांची अन्य घटकांत बदली झाली. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गतही सहा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
👉पोलिस निरीक्षक प्रशांत आरदवाड (दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), हेमंत कदम (धाराशिव), रवींद्र कदम पुणे शहर), सिद्धराम म्हेत्रे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), विजयकुमार शिंदे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), देवेंद्र चव्हाण (पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), सुरेखा घार्गे (मुंबई शहर), चंद्रकांत जाधव (नांदेड), राजेंद्र निकाळजे (ठाणे शहर) गोताराम शेवाळे (ठाणे शहर) सोमनाथ जाधव (छत्रपत संभाजीनगर शहर), अमोल गवळी (पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. रवींद्र कदम यांची यापूर्वी पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे बदली आदेशाधीन होती. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातून निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांची रायगड येथे, त शत्रुघ्न माळी यांची नवी मुंबई ये बदली करण्यात आली आहे.
👉या अधिकाऱ्यांच्या बदल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. संतोष पाटील यांची तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखेत, अर्जुन घोडे पाटील यांची निगडी पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखेत, विजयानंद पाटील यांची पिंपरी पोलीस ठाण्यातून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात, नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षातून गुन्हे शाखेत, प्रदीप पाटील यांची नियंत्रण कक्षातून वाहतूक शाखेत, तर तेजस्विनी कदम यांची गुन्हे शाखेतून वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. ( Orders have been issued for the requested transfers of 150 police inspectors within the state police force. Among them, 12 inspectors have been transferred to the Pimpri-Chinchwad Police Commissionerate from various police units. ) #pune#pimprichinchwad#punepolice#punekar#punecity#पुणे#punenews#mh14#puneupdates#mh12 pimpari Chinchwad police station
mh12 punekar
FDA suspends licence of iconic Burger King outlet in Camp: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अन्न व औषध प्रशासनाने आता आपला मोर्चा बड्या कंपन्यांकडे वळवल्याचं दिसून येतंय. पुण्यात प्रसिद्ध असलेल्या 'बर्गर किंग'वर एफडीएने कारवाई केलीय. शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या आऊटलेटवर प्रशासनाने छापेमारी केली आहे.
👉पुण्यातील हजारो लोक दरदिवशी याच ठिकाणी बर्गर खाण्यासाठी जात असतात. परंतु या ठिकाणी एफडीएच्या टीमला अनियमितता आढळून आली. त्यामुळे 'बर्गर किंग कॅम्प'चा परवाना अन्न व औषध प्रशासनाने रद्द केला आहे.
बर्गर जॉईंटमध्ये खाद्यपदार्थांच्या संदर्भात गंभीर त्रुटी आढळल्याची बाब समोर आली आहे. रेस्टॉरंटमधील अस्वच्छतासुद्धा कारवाईचे प्रमुख कारण असल्याची प्राथमिक माहिती आहे.
#pune #tukarammundhe
Fda investigation news about #punecamp #burger #hotel #punelife #पुणे #punenews #puneupdates #punecity #punekar #mh12 #punekars
23 hours ago | [YT] | 13
View 0 replies
mh12 punekar
गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वरः|
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः||
.
.
.
14 ऑगस्ट 2026
आपल्या बाप्पांचे दर्शन ❤️
.
.
.
.
#dagdushethganpati #shrimant #dagdusheth #bappa #pune
1 day ago | [YT] | 1,225
View 9 replies
mh12 punekar
!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !!
!! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !!
.
.
13 August 2026
आपल्या बाप्पांचे दर्शन ❤️
.
.
.
#shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
2 days ago | [YT] | 1,601
View 15 replies
mh12 punekar
पुणे : हवेली तालुक्यातील कोळवाडी मांजरी-थेऊर रोड येथील 'सृष्टी हाइट्स' या गृहप्रकल्पातील ४१ फ्लॅटधारकांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. २०१३ मध्ये आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या कुटुंबांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र तब्बल १३ वर्षानंतरही प्रकल्प पूर्ण झालाच नाही अन् फ्लॅटचा ताबाही मिळाला नाही. दरम्यान, हा वाद न्यायालयात गेला आणि तडजोडीअंती दिलेले धनादेशही बिल्डरने बाऊन्स केल्याचा आरोप सदनिकाधारकांनी केला आहे. 'घर मिळालेच नाही, आता किमान आमचे पैसे तरी व्याजासह परत द्या, अशी म्हणण्याची वेळ या कुटुंबियांवर आली आहे. या संदर्भात फ्लॅटधारकांनी 'लोकमत' कडे कैफियत मांडली. याबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय गाठले असता गेल्या दहा वर्षापासून कार्यालयदेखील सोडले असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
👉धक्कादायक बाब म्हणजे, बिल्डरने भागीदारीत वडगाव व वाघोली येथे 'श्रुस्टी रिजंसी' नावाने १९८० फ्लॅट्स, ३६ रो हाऊस, ९३ शॉप्स् अशा प्रत्येकी १४ ते ३७ लाख किंमत आकारून भव्य गृहप्रकल्पाची जाहिरात केली होती. मात्र या गृहप्रकल्पाला नगर रचना विभागाची परवानगीच घेतली नाही. दहा वर्षानंतर देखील या ग्राहकांना ताबा दिलेला नाही. या गृहप्रकल्पाची जागाच परस्पर दुसऱ्यांना विकून टाकल्याचा आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य विजय सागर यांनी केला आहे. ग्राहकांना कुठल्याही अॅमिनिटी दिल्या नाहीत सोसायटी रजिस्ट्रेशनसाठी साडेसातशे रुपयांऐवजी प्रत्येक ग्राहकांकडून २० हजार रुपये घेतले, पार्किंग शुल्क ५० हजार तर विद्युत मीटरसाठी ३५ हजार व डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून २५ हजार रुपये घेतल्याचे देखील त्यांनी सांगितले. मात्र अद्याप ग्राहकांना सदनिका व दुकान दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.
👉याच बरोबर याच बिल्डरने डब्लुएस डेव्हलपर्स प्रा. लि. या कंपनीने गट क्रमांक ७२३, कोळवाडी, मांजरी थेऊर रोड, ता. हवेली, जिल्हा पुणे येथे 'सृष्टी हाइट्स' हा गृहप्रकल्प उभारण्याची घोषणा केली होती. कंपनीचे संचालक योगेश वसंत शेलार यांनी ग्राहकांशी फ्लॅट विक्रीचे करार केले.
👉ग्राहकांनी मांडली व्यथा...बिल्डरने २०१३ मध्ये करारनामा केला. त्यात २०१५ मध्ये सदनिकांचा ताबा देण्याची अट होती. मात्र बिल्डरने कराराचा भंग केला. त्यानंतर आम्ही ग्राहक मंचात धाव घेतली, तिथे आमच्या बाजूने कौल मिळाला, पण बिल्डरने आदेशाचा भंग केला. #pune #punecity #punebuilders flat scam #punekar #punelife #पुणे #punenews #puneupdates #mh12 news
2 days ago | [YT] | 9
View 1 reply
mh12 punekar
!! वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटि समप्रभ !!
!! निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा !!
.
.
12 ऑगस्ट 2026
आपल्या बाप्पांचे दर्शन ❤️
.
.
.
.
#shrimant #dagdusheth #shrimantdagdushethhalwaiganpati #ganpati #ganpatibappa
3 days ago | [YT] | 1,533
View 15 replies
mh12 punekar
Pune Crime News: पुण्यातील (Pune) गणेश पेठ (Ganesh Peth) परिसरातील डुल्या मारुती चौकात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडापाव (Vadapav) खरेदी करताना अनावधानाने एकमेकांच्या पायाला पाय लागल्याच्या किरकोळ वादातून एका 28 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिवम परदेशी (वय 28) असे या दुर्दैवी घटनेत जीव गमावलेल्या तरुणाचे नाव आहे. तर वैभव साळुंखे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
👉याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत शिवम आणि आरोपी वैभव हे दोघेही गणेश पेठ परिसरातच राहणारे असून त्यांची आपापसांत तोंडओळख होती. घटनेच्या दिवशी दोघेही डुल्या मारुती चौकातील एका वडापावच्या गाडीवर वडापाव खरेदी करण्यासाठी गेले होते. तेथे गर्दीत अनावधानाने एकाच्या पायाला दुसऱ्याचा पाय लागला.या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद पेटला. वादाच्या भरात रागाच्या भरात असलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर जोरदार बुक्क्या मारल्या. या मारहाणीमुळे शिवमच्या शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. गंभीर दुखापत झालेल्या शिवमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
👉घटना घडलेले आरोपी आणि पीडित हे दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आरोपी वैभव हा एका बिल्डरकडे अकाउंटंट म्हणून नोकरी करतो. तर विशेष म्हणजे, मृत शिवम आणि आरोपी वैभव या दोघांचेही वडील रिक्षाचालक म्हणून काम करतात. केवळ एका क्षणिक रागातून आणि किरकोळ कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे गणेश पेठ परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. #pune #punecity #crimenews #punenews #punekar #punelife #पुणे #puneupdates #mh12
4 days ago | [YT] | 13
View 2 replies
mh12 punekar
पुणे : खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून एक लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आल्याची घटना रविवार पेठेतील कापडगंज परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे.
👉तक्रारदार ५० वर्षीय महिला सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात राहायला आहेत. त्या शनिवारी (दि. ८) सायंकाळी पाचच्या सुमारास रविवार पेठेतील कापडगंज परिसरात खरेदीसाठी आल्या होत्या. रामसुख मार्केटजवळ गर्दीत चोरट्याने त्यांच्या पिशवीतून एक लाख ४० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबवले. दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली.
👉लॅपटॉप चोरीला...कारची काच फोडून चोरट्यांनी दोन लॅपटॉप चोरून नेल्याची घटना शिवाजीनगर गावठाण भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. एका तरुणाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार तरुणाने शिवाजीनगर गावठाण परिसरातील सुदामा हॉटेलजवळील गल्लीत कार लावली होती. त्यातून दोन लॅपटॉप चोरले. #pune #punecity #crimenews #punenews #punekar #पुणे #puneupdates #punelife #puneinstagrammers #mh12
4 days ago | [YT] | 8
View 0 replies
mh12 punekar
🌺 मंगळवारचे सजलेले बाप्पांचे सुंदर रूप🌺
11 ऑगस्ट 2026
आपल्या बाप्पांचे दर्शन ❤️
#shrimant #dagdushethhalwaiganpati
#shrimantmoraya
#shrimantdagdusheth
#dagdusheth dagdushethganpati pune punekar
4 days ago | [YT] | 1,508
View 7 replies
mh12 punekar
पुणे : खासगी वाहनांवर 'पोलिस' असे नाव लिहून अथवा पोलिसांचा लोगो, स्टिकर लावून त्याचा गैरवापर करण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा वाहनांचा वापर अवैध कामे, दहशत निर्माण करणे तसेच प्रवासी व मालवाहतुकीसाठी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता अशा वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
👉अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच महामार्ग पोलिस अधीक्षकांना याबाबत निर्देश दिले आहेत. नाकाबंदी, पेट्रोलिंग तसेच वाहन तपासणीदरम्यान अशा वाहनांची विशेष तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
👉दंडात्मक व फौजदारीची काय तरतूद ?
मोटार वाहन कायद्यानुसार नियमभंगाबद्दल दंडात्मक कारवाई होऊ शकते. बनावट पोलिस असल्याचे भासवून फसवणूक, धमकी अथवा अन्य गुन्हे केल्यास संबंधितांविरोधात स्वतंत्र फौजदारी गुन्हाही दाखल होऊ शकतो.
👉पोलिस नाव लिहून चक्क प्रवासी आणि मालवाहतूक,अनेकदा 'पोलिस' नावाचा वापर करून खासगी वाहनांतून प्रवासी तसेच मालाची वाहतूक केली जात असल्याचेही आढळले आहे. अनेकदा पोलिस नावाची पाटी किंवा लोगो पाहून वाहनांची सखोल तपासणी होत नसल्याने गैरप्रकारांना वाव मिळतो.
👉मुले, नातलगांच्या वाहनांवरही पाटी पोलिस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या, नातेवाइकांच्या खासगी वाहनांवरही पोलिस पाटी अथवा लोगो लावल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा वाहनांवर कारवाई करून संबंधितांकडून पोलिस नाव अथवा लोगो हटवण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. #pune #punepolice news #policecar news #पुणे #punenews #puneupdates #punecity #punekar #mh12
5 days ago | [YT] | 17
View 0 replies
mh12 punekar
पुणे आणि राज्याच्या पोलिस दलातील न १५० पोलिस निरीक्षकांच्या य विनंती बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये न विविध पोलिस घटकांतून १२ . निरीक्षकांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली झाली आहे. तर आयुक्तालयातील दोन को निरीक्षकांची अन्य घटकांत बदली झाली. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गतही सहा पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.
👉पोलिस निरीक्षक प्रशांत आरदवाड (दहशतवाद विरोधी पथक, मुंबई), हेमंत कदम (धाराशिव), रवींद्र कदम पुणे शहर), सिद्धराम म्हेत्रे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), विजयकुमार शिंदे (गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), देवेंद्र चव्हाण (पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा), सुरेखा घार्गे (मुंबई शहर), चंद्रकांत जाधव (नांदेड), राजेंद्र निकाळजे (ठाणे शहर) गोताराम शेवाळे (ठाणे शहर) सोमनाथ जाधव (छत्रपत संभाजीनगर शहर), अमोल गवळी (पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर यांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे. रवींद्र कदम यांची यापूर्वी पोलीस प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे बदली आदेशाधीन होती. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातून निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांची रायगड येथे, त शत्रुघ्न माळी यांची नवी मुंबई ये बदली करण्यात आली आहे.
👉या अधिकाऱ्यांच्या बदल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. संतोष पाटील यांची तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखेत, अर्जुन घोडे पाटील यांची निगडी पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखेत, विजयानंद पाटील यांची पिंपरी पोलीस ठाण्यातून तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात, नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षातून गुन्हे शाखेत, प्रदीप पाटील यांची नियंत्रण कक्षातून वाहतूक शाखेत, तर तेजस्विनी कदम यांची गुन्हे शाखेतून वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. ( Orders have been issued for the requested transfers of 150 police inspectors within the state police force. Among them, 12 inspectors have been transferred to the Pimpri-Chinchwad Police Commissionerate from various police units. )
#pune #pimprichinchwad #punepolice #punekar #punecity #पुणे #punenews #mh14 #puneupdates #mh12 pimpari Chinchwad police station
5 days ago | [YT] | 16
View 0 replies
Load more