कोकण भजन मंडळ

कोकणातील भजन संस्कृती या आमच्या छोट्याश्या चॅनल वरती तुम्हा सर्वां माय माऊली यांचे स्वागत आहे. आमच्या कोकणात खुप भजनी मंडळी आहेत त्यांचे मनतृप्त करणारे अभंग तसेच कोकणावर आणि चालु घडामोडीवर बनवलेले गजर, गवळणी आहेत त्या आपल्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम्हाला जर भजनाची आवड असेल तर आमच्या कोकणातील कोकणातील भजन मंडळ (@kokanbhajanmandal) या चॅनल ला नक्की शेअर आणि subscribe करा तसेच कोणता अभंग, गवळण आणि गजर आवडला असेल तर नक्की सांगा


कोकण भजन मंडळ

#एक_हात_मदतीचा

चला पुन्हा उभं करू पूरग्रस्त भागातील आपली माती आपल्या माणसांना...

निसर्ग जो नवनिर्मिती करतो आणि सृष्टी फुलवतो त्याच प्रमाणे तो कधीतरी त्याच रौद्र रूप सुद्धा दाखवतो...त्याचा कोप कधी कुठे कसा होईल हे आपल्या हातात नाही...दुर्दैवाने अशीच परिस्थिती या वर्षी संभवली आणि मराठवाडा,सोलापूर,छत्रपती संभाजी नगर अशा अनेक भागात अतिवृष्टी झाल्यामुळे पूर परिस्थिती उद्भवली..नैसर्गिक आपत्तीचे संकट आपण रोखू शकत नसलो तरीही ,या समाजात राहताना आपण त्याचे देणे लागतो याची जाणीव ठेवून मदत करणे हे आपले कर्तव्य समजत आपल्या पूरग्रस्थ बांधवांपर्यंत मदतीचा हात देऊन त्यांच्या आयुष्यात थोडा आनंद घेऊन येण्याचा आमचा मानस आहे...
गेली अनेक वर्ष गडसंवर्धना सोबतच सामाजिक बांधिलकी जपत आम्ही दुर्गवीर प्रतिष्ठान आनंदाची दिवाळी या संकल्पनेतून दरवर्षी गरजवंतांसाठी उपक्रम राबवत आहोत..पण या वर्षी उद्भवलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना जीवनोपयोगी वस्तू (शालेय वस्तू/वैद्यकीय) देऊन त्यांना मदतीचा हात देण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान प्रयत्न करत आहे....
कोणत्याही उपक्रमात आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपल्यासारख्या दानशूर देणगीदारांचा मोलाचा वाटा असतो,याही वेळी आपला विश्वास सार्थकी लावण्यासाठी आम्ही तत्पर आहोत तरी पूरग्रस्थ बांधवांना मदत करण्यासाठी आपल्याला शक्य तेवढे सहकार्य करून आमच्यासोबत या कार्यात सहभागी व्हा अशी विनंती..

दुर्गवीर प्रतिष्ठान
महाराष्ट्र राज्य
संपर्क:
कल्पना निवाते:९७६९१८२२९२
सूरज गोरीवले:८९२८७०३५५०
सायली येरूणकर:७०३९७९१९९६
प्रशांत डिंगणकर :८००७९३०२१०

3 months ago | [YT] | 0

कोकण भजन मंडळ

सर्व स्वामी भक्तांना दसऱ्याच्या आणि विजयादशमीच्या स्वामीमय शुभेच्छा

1 year ago | [YT] | 4