महाराष्ट्र प्राईम न्यूज हे आपल्या सर्वांचे हक्काचे चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील घडामोडीचे अपडेट प्रसारीत केले जातात.
डिकसळ इस्लामपुरा भागात ₹७० लाख निधीतून पायाभूत सुविधा पूर्ण – शिवसेनेचे नेते अजित दादा पिंगळे यांच्या प्रयत्नांना यश
डिकसळ (ता. कळंब, जि. धाराशिव) – राज्य शासनाच्या अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या ₹७० लाख निधीचा वापर करून मौजे डिकसळ (इस्लामपुरा) परिसरात महत्त्वाची विकासकामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत.
या सर्व विकासकामांची प्रेरणा व पुढाकार शिवसेनेचे नेते मा.अजित दादा पिंगळे यांच्या प्रयत्नातून घेण्यात आली असून, शिवसेना तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत हुलजुते आणि डिकसळचे माजी सरपंच अमजद मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी करण्यात आली.
🔷 पूर्ण झालेली विकासकामे पुढीलप्रमाणे:
1. रफीक शेख यांचे घर ते वहाब मनियार यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता – ₹10 लाख
2. मोहम्मदीया मस्जिद ते अस्सलम तांबोळी यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता – ₹10 लाख
3. इम्रान शेख यांचे घर ते नसीर मोमीन यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता – ₹10 लाख
4. युसुब सय्यद यांचे घर ते अमजद मिर्जा यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता – ₹10 लाख
5. मौजे डिकसळ मुस्लिम कब्रस्तान अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता – ₹10 लाख
6. मुस्लिम कब्रस्तान अंतर्गत संरक्षण भिंत बांधणे – ₹10 लाख
7. मक्का मस्जिद जवळ पावर ब्लॉक उभारणी – ₹10 लाख
📌 एकूण मंजूर व पूर्ण निधी – ₹ ७०लाख
🟢 या कामांमुळे इस्लामपुरा भागात दळणवळण, सार्वजनिक आरोग्य, धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवेश, आणि सुरक्षिततेसंबंधी सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्या आहेत. स्थानिक रहिवाशांनी या कामांचे स्वागत करत शिवसेनेच्या नेतृत्वाचे विशेष आभार मानले आहेत.
🔸 शिवसेना पक्षाचे लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कार्य यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे, असे ग्रामस्थांनी नमूद केले.
या विकास कामांबाबत डिकसळ ग्रामपंचायतीचे सदस्य इम्रान मुल्ला, मोबीन मनियार व सौ. इर्शाद रफीक सय्यद यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “या भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.” तसेच त्यांनी शिवसेनेचे नेते मा.अजित दादा पिंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले आणि म्हणाले की, “या विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. या कामामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.”
एसटी कॉलनी, फरीद नगर व संभाजीनगर जलमय; प्रशासनाचे दुर्लक्ष
डिकसळ (ता. कळंब) येथील एसटी कॉलनी, फरीद नगर, संभाजीनगर या भागांतील नागरिक सध्या पाण्याच्या वेढ्यात अडकले असून, अक्सा मस्जिद आणि मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर तब्बल १२ फूट पर्यंत पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, पादचारी आणि लहान वाहनांची वाहतूक पूर्णतः थांबली आहे.
रहिवाशांनी सांगितले की, "दरवर्षी पावसाळ्यात हीच समस्या निर्माण होते, मात्र यंदा परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. आमच्या मुलांना शाळेत पाठवणे, ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्यात नेणे, किंवा किराणा आणणे अशक्य झाले आहे."
प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. "डिकसळ ग्रामपंचायत कार्यालय आणि सरपंच झोपेत आहेत का?" असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या गंभीर समस्या कायमस्वरूपी सोडवाव्यात, रस्त्यावरील निचरा त्वरित व्हावा आणि येथील नागरिकांचे हाल थांबावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे. अन्यथा, प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी तिर्थक्षेत्र जन्मभूमी मंदिराचा जिर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा उत्साहात संपन्न!
कळंब : संत शिरोमणी मन्मथ स्वामी तिर्थक्षेत्र जन्म भुमी मंदीर जिर्णोध्दार व कलशारोहन सोहळ्यामध्ये शिवाचार्य यांच्या उपस्थितीत विविध देवी देवतांची शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये दहा हजार पेक्षा जास्त भाविक सहभागी झाले होते.
संत शिरोमणी मन्मथ स्वामी तिर्थक्षेत्र जन्म भुमी मंदीर जिर्णोध्दार व कलशारोहन सोहळा दोन दिवसापासून चालू आहे. दिनांक २० जुलै रोजी स्थापन करण्यात येणाऱ्या संत शिरोमणी मन्मथ स्वामी, महादेव, नंदी, अण्णपुर्णा, हनुमान यासह विविध देवतांच्या मुर्तीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली आहे. यावेळी.. शिवाचार्य यांचा सहभाग होता. मन्मथ स्वामी मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेनरोड या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेच्या वतीने फ्रुटी व कॉग्रेस शहराध्यक्ष शशिकांत निरफळ यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले आहे. दुपारी दोन वाजता विविध शिवाचार्य यांच्या उपस्थितीत धर्मसभा झाली आहे. यावेळी अर्जुन चिंचकर यांनी अन्नदान केले. रात्री शिवकिर्तन श्री.ष.ब्र.प.पू. १०८ दिगंबर शिवाचार्य महाराज - वसमत यांचे झाले, यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष सागर मुंडे यांचा सन्मान करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते.
यावेळी टाळांच्या मंगल निनादात, पारंपरिक वेशभूषेत महिला एकसुरी पद्धतीने पाऊल खेळत भक्तिरसात रंगलेल्या दिसल्या, त्याच बरोबर रुद्र तांडव नृत्याने सर्वांचे लक्ष वेधले.
आमदार कैलास घाडगे पाटील, विरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे ओमप्रकाश कोयटे, लिंगायत संघर्ष समिती अध्यक्ष सुनिल रुकारी, लिंगायत संघर्ष समिती उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे, माजी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन काळे, कपिलधार ट्रस्ट चे अध्यक्ष आप्पा हलगे यांच्यासह अनेकांनी मिरवणूकीचे स्वागत केले.
२१ जुलै रोजी सकाळी महादेव शिवाचार्य महाराज-वाईकर व विरुपाक्ष शिवाचार्य महाराज-मानुरकर यांच्या हस्ते कलशारोहन सोहळा पार पडला. यानंतर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज बाळापुरकर यांचे प्रवचन झाले. यावेळी काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरी, ह.भ.प. संदीपान महाराज हासेगावकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली, व आभारप्रदर्शन निलेश होनराव व अविनाश खरडकर यांनी मानले.
विवेक सुरवसे यांची गरुडझेप, शास्त्रज्ञ म्हणून झाली निवड
कळंब - कळंब तालुक्यातील शेलगाव (दि.) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे ज्ञानेश्वर गोपीनाथ सुरवसे यांचा मुलगा विवेक याची भारत सरकारच्या न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. विवेक चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. तर माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय मुरुड येथे झाले आहे. सुरवाती पासूनच अभ्यासात कायम अग्रस्थानी असणाऱ्या विवेकने दहावीत शंभर टक्के गुण घेऊन आपली भविष्यातील दिशा दाखवून दिली होती. आणि तेव्हा पासूनच शास्त्रज्ञ होण्याचे त्याचे स्वप्न होते. लातूर येथील नामांकित राजर्षी शाहू महाविद्यालयातून आयआयटी जेईई तयारी करून भारतातील अव्वल असणाऱ्या आयआयटी मद्रास (चेन्नई) तामिळनाडू येथून बी.टेक .(इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग ) मधून प्रथम श्रेणीत पुर्ण केले. GATE परीक्षा 2025 यशस्वी होवून या द्वारे वैज्ञानिक क्षेत्रात पदार्पण केले. विवेकने लहाणपणापासून बाळगलेल स्वप्न साकार होत असताना या पर्यंतच्या प्रवासात वडिलांबरोबर आईचे कष्ट अधिक मोलाचे ठरले आहे. त्यामुळे विवेकचे वडील विवेकच्या यशाचे श्रेय त्याच्या आईला व मार्गदर्शक सर्व शिक्षक यांना देतात. विवेकच्या या यशाबद्दल सर्व संबंधित शिक्षक, तसेच नेहमी मार्गदर्शन करणारे धर्मराज काळमाते, गटशिक्षणाधिकारी कळंब, व विविध अधिकारी आणि सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सामान्य शिक्षकाच्या मुलाने मिळवलेले यश आदर्शवत असून त्याबद्दल विवेक बरोबर त्याच्या आई वडिलाचे देखिल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या युतीचा प्रस्ताव स्वीकारला, दादरमध्ये मोठी घोषणा
मुंबई : महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे यांच्याशी काम करण्याची माझी तयारी आहे, असे म्हणत शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी मांडला. त्यांच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आमच्यातली किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. फक्त माझ्यासोबत येऊन महाराष्ट्राचं हित पाहायचं की भाजपसोबत जाऊन हित पाहायचं, याची स्पष्टोक्ती झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. अभिनेते महेश मांजरेकर यांना राज ठाकरे यांनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत महाराष्ट्र, मराठी माणूस, मुंबई महापालिका निवडणूक, एकनाथ शिंदे यांचे राजकारण, उद्धव ठाकरेंशी युती, भाजपशी जुळत असलेले सूर आदी विषयांवर राज ठाकरे यांनी मनमोकळी उत्तरे दिली. मुंबई महापालिकेच्या तोंडावर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टाळी देण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या टायमिंगची चर्चा होत आहे. उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्या प्रस्तावावर लगोलग भूमिका स्पष्ट केली. दादरच्या शिवाजी महाराज स्मृती मंदिरमधून कामगार सेनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
Breaking : सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या
सोलापूर : वैद्यकीय क्षेत्रात खळबळ - प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी केली आत्महत्या सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.
शहरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना आज (दि. १८ एप्रिल) रोजी घडल्याची माहिती असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे.
अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडुन शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण!
महिलेने गावातील ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लाऊ नयेत, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातुन एका रात्रीत ऊपचार करून तिला घरी पाठवले.
सदरील घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कळंब : तालुक्यातील मुस्लिम समाजातील मंडळींनी शुक्रवारी वक्फ संशोधन विधेयकाच्या विरोधात कळंब उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यादरम्यान शेकडोच्या संख्येत मुस्लिम समाज आंदोलना बसले होते. कुल जमात तंजीम कळंब शहर व तालुकाच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटलंय की, नुकतेच वक्फ सुधारण विधेयक 2025 हे लोकसभा व राज्यसभा येथे संमत करून अत्यंत घाईंगडबडीने मा. राष्ट्रपतीजी यांची सुध्दा स्वाक्षरी घेण्यात आली आहे. सरकारची ही कृती भारत देशात राहणाऱ्या जवळ-जवळ. 30 ते 35 कोटी मुस्लिम समाजाच्या हिताच्या विरोधात असुन आम्ही त्याचा तीव्र निषेध करीत आहोत, असं म्हटलंय. पुढे निवेदनात लिहलय की, सदरील विधेयक व त्यातील तरतूदी या संविधानाच्या कलम 21, 25 व 3 या तरतुदीचे सरासर उल्लंघन करीत असुन देशात राहनरून नागरीकांच्या धर्म स्वतंत्र या मुलभुत अधिकारावरच गदा आणत आहेत. देशात जवळ-जवळ 9 लक्ष एकर जमीन व इतर स्थावर जंगम मालमत्ता मुस्लीम धर्मातील लोकांनी आपली खाजगी जमीन व संपत्ती वक्फ करुन समाजहितासाठी दान केली आहे. ही संपत्ती कुठल्याही सरकारच्या मालकीची नाही. सदरील जमीन व मालमत्तेचे व्यवस्थापन, होणारे तंटे त्याचे निवारण याबाबत अनेक 'वर्षापासुन अथक प्रयत्न करुन सन 1995 मध्ये एक परिपुर्ण व मजबुत असा वक्फ कायदा संसदेने पास केला होता. त्याला देशातील सर्व मुस्लीम समाजाची अनुमती होती व हा कायदा देशात लागु होवुन त्यातुन व्यवस्थीत कार्य पार पाडले जात असताना सरकारने अल्पसंख्यांक मुस्लीम समाजाच्या बाबतीत द्वेष भावनेतुन वक्फच 9 लक्ष एकर जमीनीवर डोळा ठेवून जमीन मोठमोठे उद्योगपती संस्था. गैरमुस्लिम खाजगी व्यक्ती यांना देण्याच्या उद्देशाने हा कायदा पारीत कला आहे असे आम्हाला वाटते, असं निवेदनात म्हटलंय.
त्यामुळे सदरील जमीनीचे सुलभ हस्तांतरण व्हावे यासाठी जिल्हयातील जिल्हाधिकारी यांना वक्फ संपतीबाबत सर्वस्वी निणयाचे अधिकार देणे, वक्फ वक्फ बोर्डावर दोन गैरमुस्लिम सदस्यांची नियुक्ती करणे, वक्फ बोर्ड व त्यांची न्यायाधिकरण यांचे अधिकार कमी करणे, वक्फ संपती दान करण्यासाठी अत्यंत चुकीची पात्रता लावणे, प्रचलीत वक्फ संपती शोधण्यासाठी सर्व्हेचा अधिकार रद्द करणे अशा अनेक घातक तरतुदी या विधेयकात असुन ते आम्ही कदापीही मान्य करणार नाही. मुस्लीम समाजाच्या सहनशिलतेचा अंत न पाहता संपूर्ण भारतीयांच्या जनभावना लक्षात घेवुन सदर विधेयक आपण व भारत सरकारने विनाविलंब माघारी घ्यावे, जेणेकरुन भारतातील सामाजिक सौम्य, शांतता अबाधीत राहुन देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल ही विनंती, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
चॉकलेटचे आमिष दाखवत 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, कळंब तालुक्यातील दुर्दैवी घटना
कळंब : एका 4 वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना धाराशिव जिल्ह्यातील शिराढोण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून त्या गावातील आरोपीने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी शिराढोण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलिस अधिक तपास करीत आहेत. वेदपाठक याने यापुर्वी देखील असे प्रकार केल्याची चर्चा गावात आहे.
Maharashtra Prime News
डिकसळ इस्लामपुरा भागात ₹७० लाख निधीतून पायाभूत सुविधा पूर्ण – शिवसेनेचे नेते अजित दादा पिंगळे यांच्या प्रयत्नांना यश
डिकसळ (ता. कळंब, जि. धाराशिव) – राज्य शासनाच्या अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा विकास योजनेअंतर्गत सन २०२४-२५ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या ₹७० लाख निधीचा वापर करून मौजे डिकसळ (इस्लामपुरा) परिसरात महत्त्वाची विकासकामे पूर्णत्वास नेण्यात आली आहेत.
या सर्व विकासकामांची प्रेरणा व पुढाकार शिवसेनेचे नेते मा.अजित दादा पिंगळे यांच्या प्रयत्नातून घेण्यात आली असून, शिवसेना तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत हुलजुते आणि डिकसळचे माजी सरपंच अमजद मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली याची अंमलबजावणी करण्यात आली.
🔷 पूर्ण झालेली विकासकामे पुढीलप्रमाणे:
1. रफीक शेख यांचे घर ते वहाब मनियार यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता – ₹10 लाख
2. मोहम्मदीया मस्जिद ते अस्सलम तांबोळी यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता – ₹10 लाख
3. इम्रान शेख यांचे घर ते नसीर मोमीन यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता – ₹10 लाख
4. युसुब सय्यद यांचे घर ते अमजद मिर्जा यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्ता – ₹10 लाख
5. मौजे डिकसळ मुस्लिम कब्रस्तान अंतर्गत सिमेंट काँक्रिट रस्ता – ₹10 लाख
6. मुस्लिम कब्रस्तान अंतर्गत संरक्षण भिंत बांधणे – ₹10 लाख
7. मक्का मस्जिद जवळ पावर ब्लॉक उभारणी – ₹10 लाख
📌 एकूण मंजूर व पूर्ण निधी – ₹ ७०लाख
🟢 या कामांमुळे इस्लामपुरा भागात दळणवळण, सार्वजनिक आरोग्य, धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवेश, आणि सुरक्षिततेसंबंधी सुविधा मोठ्या प्रमाणात सुधारल्या आहेत. स्थानिक रहिवाशांनी या कामांचे स्वागत करत शिवसेनेच्या नेतृत्वाचे विशेष आभार मानले आहेत.
🔸 शिवसेना पक्षाचे लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कार्य यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे, असे ग्रामस्थांनी नमूद केले.
या विकास कामांबाबत डिकसळ ग्रामपंचायतीचे सदस्य इम्रान मुल्ला, मोबीन मनियार व सौ. इर्शाद रफीक सय्यद यांनी समाधान व्यक्त करताना सांगितले की, “या भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांना गती मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.”
तसेच त्यांनी शिवसेनेचे नेते मा.अजित दादा पिंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले आणि म्हणाले की, “या विकास कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. या कामामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.”
5 months ago | [YT] | 1
View 0 replies
Maharashtra Prime News
एसटी कॉलनी, फरीद नगर व संभाजीनगर जलमय; प्रशासनाचे दुर्लक्ष
डिकसळ (ता. कळंब) येथील एसटी कॉलनी, फरीद नगर, संभाजीनगर या भागांतील नागरिक सध्या पाण्याच्या वेढ्यात अडकले असून, अक्सा मस्जिद आणि मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या रस्त्यावर तब्बल १२ फूट पर्यंत पाणी साचले आहे. यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, पादचारी आणि लहान वाहनांची वाहतूक पूर्णतः थांबली आहे.
रहिवाशांनी सांगितले की, "दरवर्षी पावसाळ्यात हीच समस्या निर्माण होते, मात्र यंदा परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. आमच्या मुलांना शाळेत पाठवणे, ज्येष्ठ नागरिकांना दवाखान्यात नेणे, किंवा किराणा आणणे अशक्य झाले आहे."
प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. "डिकसळ ग्रामपंचायत कार्यालय आणि सरपंच झोपेत आहेत का?" असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या गंभीर समस्या कायमस्वरूपी सोडवाव्यात, रस्त्यावरील निचरा त्वरित व्हावा आणि येथील नागरिकांचे हाल थांबावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे. अन्यथा, प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
5 months ago | [YT] | 3
View 0 replies
Maharashtra Prime News
श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी तिर्थक्षेत्र जन्मभूमी मंदिराचा जिर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा उत्साहात संपन्न!
कळंब : संत शिरोमणी मन्मथ स्वामी तिर्थक्षेत्र जन्म भुमी मंदीर जिर्णोध्दार व कलशारोहन सोहळ्यामध्ये शिवाचार्य यांच्या उपस्थितीत विविध देवी देवतांची शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये दहा हजार पेक्षा जास्त भाविक सहभागी झाले होते.
संत शिरोमणी मन्मथ स्वामी तिर्थक्षेत्र जन्म भुमी मंदीर जिर्णोध्दार व कलशारोहन सोहळा दोन दिवसापासून चालू आहे. दिनांक २० जुलै रोजी स्थापन करण्यात येणाऱ्या संत शिरोमणी मन्मथ स्वामी, महादेव, नंदी, अण्णपुर्णा, हनुमान यासह विविध देवतांच्या मुर्तीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली आहे. यावेळी..
शिवाचार्य यांचा सहभाग होता. मन्मथ स्वामी मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेनरोड या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेच्या वतीने फ्रुटी व कॉग्रेस शहराध्यक्ष शशिकांत निरफळ यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले आहे.
दुपारी दोन वाजता विविध शिवाचार्य यांच्या उपस्थितीत धर्मसभा झाली आहे. यावेळी अर्जुन चिंचकर यांनी अन्नदान केले. रात्री शिवकिर्तन श्री.ष.ब्र.प.पू. १०८ दिगंबर शिवाचार्य महाराज - वसमत यांचे झाले, यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष सागर मुंडे यांचा सन्मान करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते.
यावेळी टाळांच्या मंगल निनादात, पारंपरिक वेशभूषेत महिला एकसुरी पद्धतीने पाऊल खेळत भक्तिरसात रंगलेल्या दिसल्या, त्याच बरोबर रुद्र तांडव नृत्याने सर्वांचे लक्ष वेधले.
आमदार कैलास घाडगे पाटील, विरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे ओमप्रकाश कोयटे, लिंगायत संघर्ष समिती अध्यक्ष सुनिल रुकारी, लिंगायत संघर्ष समिती उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे, माजी उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन काळे, कपिलधार ट्रस्ट चे अध्यक्ष आप्पा हलगे यांच्यासह अनेकांनी मिरवणूकीचे स्वागत केले.
२१ जुलै रोजी सकाळी महादेव शिवाचार्य महाराज-वाईकर व विरुपाक्ष शिवाचार्य महाराज-मानुरकर यांच्या हस्ते कलशारोहन सोहळा पार पडला. यानंतर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज बाळापुरकर यांचे प्रवचन झाले. यावेळी काशिनाथ शिवाचार्य महाराज पाथरी, ह.भ.प. संदीपान महाराज हासेगावकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली, व आभारप्रदर्शन निलेश होनराव व अविनाश खरडकर यांनी मानले.
6 months ago | [YT] | 5
View 0 replies
Maharashtra Prime News
विवेक सुरवसे यांची गरुडझेप, शास्त्रज्ञ म्हणून झाली निवड
कळंब - कळंब तालुक्यातील शेलगाव (दि.) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असणारे ज्ञानेश्वर गोपीनाथ सुरवसे यांचा मुलगा विवेक याची भारत सरकारच्या न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या ठिकाणी शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. विवेक चे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. तर माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय मुरुड येथे झाले आहे. सुरवाती पासूनच अभ्यासात कायम अग्रस्थानी असणाऱ्या विवेकने दहावीत शंभर टक्के गुण घेऊन आपली भविष्यातील दिशा दाखवून दिली होती. आणि तेव्हा पासूनच शास्त्रज्ञ होण्याचे त्याचे स्वप्न होते. लातूर येथील नामांकित राजर्षी शाहू महाविद्यालयातून आयआयटी जेईई तयारी करून भारतातील अव्वल असणाऱ्या आयआयटी मद्रास (चेन्नई) तामिळनाडू येथून बी.टेक .(इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग ) मधून प्रथम श्रेणीत पुर्ण केले. GATE परीक्षा 2025 यशस्वी होवून या द्वारे वैज्ञानिक क्षेत्रात पदार्पण केले. विवेकने लहाणपणापासून बाळगलेल स्वप्न साकार होत असताना या पर्यंतच्या प्रवासात वडिलांबरोबर आईचे कष्ट अधिक मोलाचे ठरले आहे. त्यामुळे विवेकचे वडील विवेकच्या यशाचे श्रेय त्याच्या आईला व मार्गदर्शक सर्व शिक्षक यांना देतात. विवेकच्या या यशाबद्दल सर्व संबंधित शिक्षक, तसेच नेहमी मार्गदर्शन करणारे धर्मराज काळमाते, गटशिक्षणाधिकारी कळंब, व विविध अधिकारी आणि सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सामान्य शिक्षकाच्या मुलाने मिळवलेले यश आदर्शवत असून त्याबद्दल विवेक बरोबर त्याच्या आई वडिलाचे देखिल सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक होत आहे.
6 months ago | [YT] | 5
View 1 reply
Maharashtra Prime News
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या युतीचा प्रस्ताव स्वीकारला, दादरमध्ये मोठी घोषणा
मुंबई : महाराष्ट्रासाठी, मराठी माणसांसाठी उद्धव ठाकरे यांच्याशी काम करण्याची माझी तयारी आहे, असे म्हणत शिवसेनेसोबत युती करण्याचा प्रस्ताव राज ठाकरे यांनी मांडला. त्यांच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आमच्यातली किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे. फक्त माझ्यासोबत येऊन महाराष्ट्राचं हित पाहायचं की भाजपसोबत जाऊन हित पाहायचं, याची स्पष्टोक्ती झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अभिनेते महेश मांजरेकर यांना राज ठाकरे यांनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत महाराष्ट्र, मराठी माणूस, मुंबई महापालिका निवडणूक, एकनाथ शिंदे यांचे राजकारण, उद्धव ठाकरेंशी युती, भाजपशी जुळत असलेले सूर आदी विषयांवर राज ठाकरे यांनी मनमोकळी उत्तरे दिली. मुंबई महापालिकेच्या तोंडावर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना टाळी देण्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या टायमिंगची चर्चा होत आहे. उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्या प्रस्तावावर लगोलग भूमिका स्पष्ट केली. दादरच्या शिवाजी महाराज स्मृती मंदिरमधून कामगार सेनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
#uddhavthackeray #rajthackeray #shivsenaubt #mns
9 months ago (edited) | [YT] | 20
View 0 replies
Maharashtra Prime News
Breaking : सोलापुरातील सुप्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या
सोलापूर : वैद्यकीय क्षेत्रात खळबळ - प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी केली आत्महत्या सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.
शहरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना आज (दि. १८ एप्रिल) रोजी घडल्याची माहिती असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे.
9 months ago | [YT] | 3
View 0 replies
Maharashtra Prime News
अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकीली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडुन शेतात रिंगण करून काठ्या आणि जे.सी.बी पाईपने जबर मारहाण!
महिलेने गावातील ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा, लाऊडस्पीकर लाऊ नयेत, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या यात महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातुन एका रात्रीत ऊपचार करून तिला घरी पाठवले.
सदरील घटनेची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
9 months ago | [YT] | 3
View 0 replies
Maharashtra Prime News
कळंब तालुक्यातील एकुण ९२ ग्रामपंचायतीसाठी सन 2025-2030 या कालावधीकरीता सरपंच पदासाठी निश्चित झालेले आरक्षण...
9 months ago | [YT] | 14
View 1 reply
Maharashtra Prime News
वक्फ संशोधन विधेयकाच्या विरोधात कळंब तालुक्यातील मुस्लिम आक्रमक
तहसील कार्यालयावर शेकडोंच्या संख्येत ठिय्या आंदोलन!
कळंब : तालुक्यातील मुस्लिम समाजातील मंडळींनी शुक्रवारी वक्फ संशोधन विधेयकाच्या विरोधात कळंब उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यादरम्यान शेकडोच्या संख्येत मुस्लिम समाज आंदोलना बसले होते. कुल जमात तंजीम कळंब शहर व तालुकाच्यावतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटलंय की, नुकतेच वक्फ सुधारण विधेयक 2025 हे लोकसभा व राज्यसभा येथे संमत करून अत्यंत घाईंगडबडीने मा. राष्ट्रपतीजी यांची सुध्दा स्वाक्षरी घेण्यात आली आहे. सरकारची ही कृती भारत देशात राहणाऱ्या जवळ-जवळ. 30 ते 35 कोटी मुस्लिम समाजाच्या हिताच्या विरोधात असुन आम्ही त्याचा तीव्र निषेध करीत आहोत, असं म्हटलंय. पुढे निवेदनात लिहलय की, सदरील विधेयक व त्यातील तरतूदी या संविधानाच्या कलम 21, 25 व 3 या तरतुदीचे सरासर उल्लंघन करीत असुन देशात राहनरून नागरीकांच्या धर्म स्वतंत्र या मुलभुत अधिकारावरच गदा आणत आहेत. देशात जवळ-जवळ 9 लक्ष एकर जमीन व इतर स्थावर जंगम मालमत्ता मुस्लीम धर्मातील लोकांनी आपली खाजगी जमीन व संपत्ती वक्फ करुन समाजहितासाठी दान केली आहे. ही संपत्ती कुठल्याही सरकारच्या मालकीची नाही. सदरील जमीन व मालमत्तेचे व्यवस्थापन, होणारे तंटे त्याचे निवारण याबाबत अनेक 'वर्षापासुन अथक प्रयत्न करुन सन 1995 मध्ये एक परिपुर्ण व मजबुत असा वक्फ कायदा संसदेने पास केला होता. त्याला देशातील सर्व मुस्लीम समाजाची अनुमती होती व हा कायदा देशात लागु होवुन त्यातुन व्यवस्थीत कार्य पार पाडले जात असताना सरकारने अल्पसंख्यांक मुस्लीम समाजाच्या बाबतीत द्वेष भावनेतुन वक्फच 9 लक्ष एकर जमीनीवर डोळा ठेवून जमीन मोठमोठे उद्योगपती संस्था. गैरमुस्लिम खाजगी व्यक्ती यांना देण्याच्या उद्देशाने हा कायदा पारीत कला आहे असे आम्हाला वाटते, असं निवेदनात म्हटलंय.
त्यामुळे सदरील जमीनीचे सुलभ हस्तांतरण व्हावे यासाठी जिल्हयातील जिल्हाधिकारी यांना वक्फ संपतीबाबत सर्वस्वी निणयाचे अधिकार देणे, वक्फ वक्फ बोर्डावर दोन गैरमुस्लिम सदस्यांची नियुक्ती करणे, वक्फ बोर्ड व त्यांची न्यायाधिकरण यांचे अधिकार कमी करणे, वक्फ संपती दान करण्यासाठी अत्यंत चुकीची पात्रता लावणे, प्रचलीत वक्फ संपती शोधण्यासाठी सर्व्हेचा अधिकार रद्द करणे अशा अनेक घातक तरतुदी या विधेयकात असुन ते आम्ही कदापीही मान्य करणार नाही. मुस्लीम समाजाच्या सहनशिलतेचा अंत न पाहता संपूर्ण भारतीयांच्या जनभावना लक्षात घेवुन सदर विधेयक आपण व भारत सरकारने विनाविलंब माघारी घ्यावे, जेणेकरुन भारतातील सामाजिक सौम्य, शांतता अबाधीत राहुन देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल ही विनंती, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
9 months ago (edited) | [YT] | 10
View 0 replies
Maharashtra Prime News
चॉकलेटचे आमिष दाखवत 4 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, कळंब तालुक्यातील दुर्दैवी घटना
कळंब : एका 4 वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना धाराशिव जिल्ह्यातील शिराढोण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली
आहे. मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून त्या गावातील आरोपीने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी
शिराढोण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलिस अधिक तपास करीत आहेत. वेदपाठक याने यापुर्वी देखील असे प्रकार केल्याची चर्चा गावात आहे.
10 months ago (edited) | [YT] | 0
View 2 replies
Load more