Mi Hirkani is a Marathi podcast dedicated to real stories, expert conversations, health awareness, women empowerment, entrepreneurship, personal growth, and social impact.

Through insightful interviews with doctors, professionals, entrepreneurs, artists, and changemakers, we bring practical knowledge, inspiring journeys, and meaningful life lessons that help you make informed decisions and grow with confidence.

मी हिरकणी हा एक मराठी पॉडकास्ट आहे जिथे आरोग्य, महिला सक्षमीकरण, व्यवसाय, व्यक्तिमत्व विकास आणि सामाजिक जाणीवा यांवरील अर्थपूर्ण संवाद अनुभवायला मिळतात. येथे तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रेरणादायी अनुभव आणि वास्तव जीवनातील कथा यांमधून ज्ञान, प्रेरणा आणि सकारात्मक बदलाचा प्रवास घडवण्याचा प्रयत्न केला जातो.

Real Stories | Expert Insights | Meaningful Conversations

📩 Podcast Collaborations & Business Enquiries: hirakani2021@gmail.com
🎙️ Guest Invitations & Social Cause Initiatives Welcome


Mi Hirkani

प्रत्येक पॉडकास्ट एक नवा अनुभव असतो. काही पॉडकास्ट माहिती देतात, काही विचार करायला लावतात... आणि काही आपल्याच सवयींकडे नव्याने पाहायला भाग पाडतात.

दातांची समस्या सुरू झाल्यावर आपण डॉक्टरांकडे जातो.
पण दातांची काळजी आजार होण्यापूर्वी कशी घ्यावी याबद्दल आपण किती जागरूक असतो?

या पॉडकास्टदरम्यान भारतीय संस्कृती मध्ये गोड पदार्थ हा जेवणाच्या ताटात का असतो , हे जाणून खरंच आपली संस्कृती किती विचार पूर्वक बनवली आहे याचा पुनः प्रत्यय आला.

👇 तुम्ही नियमित Dental Check-up करता का?

✅ हो
✅ नाही
✅ फक्त त्रास झाला तर


तुम्ही हा भाग पाहिला आहे का?
https://youtu.be/h5ArMef895Y?si=-VVV1...

1 week ago | [YT] | 2

Mi Hirkani

तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा!

2 months ago | [YT] | 1

Mi Hirkani

नर्मदा परिक्रमा का करावी? अध्यात्म हा एक भाग झाला. 21 km जेव्हा तुम्ही चालता तेव्हा हा प्रवास अध्यात्म, मैत्री. साथीदार असा न राहता तो स्वतः चा होतो. आपण हळू हळू स्वतः च्या आत बघू लागतो. तो एक स्वतः चा प्रवास होतो. नर्मदेच्या साक्षीने, संपूर्ण प्रवासात नर्मदा तुमच्या उजव्या हाताला pravahit असते. सुरुवातीला मी काही फोटो विडिओ करायचा प्रयत्न केला पण काही वेळातच मोबाईल खिशात गेला. सुरवातीच्या अंधारात मोबाईल आपला साथी असतो, फोटो काढायला, आपले साथी आपल्या बरोबर आहेत ना की आपण रस्ता चुकतोय, मागे तर रहात नाही पण असे काहीच होत नाही. महादेवाचे दर्शन घेऊन आपण खऱ्या अर्थाने चालायला लागतो आणि सगळ्या शंका भीती विरून जाते. पहाटे 4 ला चालू झालेली ही परिक्रमा 10/10:30 पर्यंत पूर्ण होते. मन शांत समाधानी झालेले असते. आपण हे करू शकलो याचा आनंद आत्मविश्वास वाढलेला असतो. गरूडेश्वाराला संकल्प करून त्याच्याकडे बळ मागून केलेली सुरवात संकल्प पूर्ती साठी पुन्हा त्याचे आभार मानण्यासाठी तिथेच येऊन आम्ही थांबलो.
नर्मदा ही कुमारिका आहे म्हणुन आपण जवळच्या भागातील कुमारी मुलींचे पूजन करतो. त्यांना खाऊ खेळणी शृंगार साहित्य देतो आणि नर्मदा देवी चे आशिर्वाद घेतो तेव्हा तृप्त झालेलो असतो.
तिथून Statue Of Unity पाहून सरदार पटेल जी पुढे नतमस्तक होऊन रात्री 7:30 वाजता नर्मदा ची पद्धतशीर आरती होते त्यामुळे तुमची ऊर्जा प्रचंड वाढलेली असते.

2018 आणि 2026 मी दोनदा परिक्रमा केली आता खूप बदल झाले आहेत. कच्चे रस्ते पक्के झाले आहेत, वल्हवाच्या नावा जाऊन मोटर बोट आल्या आहेत, स्वच्छ शौचालय सोयी झालेल्या आहेत.
वर्षातून एकदा चैत्र महिन्यात संथ शांत नर्मदेच्या साथीने ही परिक्रमा प्रत्येकाने करावी आणि आपल्या नवीन वर्षाची सुरवात करावी.

संपूर्ण नर्मदा परिक्रमा चे अनुभव जगन्नाथ कुंटे सर नी खूप उत्कृष्ट असे लिहिले आहेत, जरूर वाचा - "नर्मदे हर हर" amzn.to/4sPGuaB

#mihirkani #narmada #uttarvahini #parikrama #statueofunity

2 months ago (edited) | [YT] | 4

Mi Hirkani

✨The Inspiring Journey of Jeevangani reveals a powerful story of determination, courage, and transformation that will motivate anyone chasing their dreams. In this episode, we dive deep into the life journey of Jeevangani, from facing struggles and self-doubt to building strength, confidence, and purpose.🙌🏻

This inspiring story highlights how resilience, mindset, and the courage to keep moving forward can completely transform a person’s life. If you have ever felt stuck, overwhelmed, or unsure about your path, this journey will remind you that every challenge can become an opportunity for growth.🥳

Through real experiences, lessons, and powerful insights, this video shares how belief in yourself can unlock endless possibilities. Whether you are looking for motivation, personal growth, or a story that inspires you to take action, this episode will leave you feeling empowered. Watch till the end to discover the lessons, struggles, and victories that make Jeevangani’s journey truly inspiring.💫

3 months ago | [YT] | 3

Mi Hirkani

गुढी पाडव्याच्या अनेक अनेक शुभेच्छा !! येणारे वर्ष सर्वांना सुख शांती समृद्धी व आनंदाचे जावो !!

3 months ago | [YT] | 2

Mi Hirkani

होळी आणि धूलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जुने राग विकार होलीकेच्या ओटीत घालून, तिच्या राखेला वंदन करून नव्या उत्साहात चांगल्या सवयी गुणांना घेऊन पुन्हा आयुष्याच्या प्रवासाला लागुया. HAPPY HOLI ❤️

#mihirkani #happy holi

3 months ago | [YT] | 2

Mi Hirkani

मराठी नाट्यसृष्टि खूप प्रगल्भ विकसित आहे. तितकीच प्रायोगिक रंगभूमि देखील सशक्त आहे. आपल्यात प्रयोगशीलता आहे आणि वेगवेगळे प्रयोगाचे परीक्षण करणेही आपल्याला आवडते. नाटक सृष्टीचाच एक भाग पथनाट्य आहे. पथनाट्य संवेदनशील विचारांवर खूप प्रभावी पणे काम करते. अनेक असे विषय जे व्यावसायिक रंगभूमि वर येण्यासाठी कोणीतरी प्रभावी नाट्यकाराने लिहावे लागते तितक्याच दमदार दिग्दर्शकानी त्याला उभे करावे लागते आणि उत्तम कलाकार जेव्हा ते सादर करतात तेव्हा चिरकाल टिकेल अशी एक कलाकृती बनते. पण ही एक long process आहे.

रोजच्या जीवनात अनेक प्रश्न असतात, मुलांचे करियर घडवण्यासाठी पालकांना स्वतःच्या करियर वरचा focus दूर करून चालत नाही. महागाई, विविध आजार, त्यातून येणारी tensions / depression , corporate life च्या समस्या रोज स्वतःला सिद्ध करताना होणारी दमछाक आणि या सगळ्यात हरवलेला संवाद नात्यांमध्ये दुरावा आणतो. नेमक कधी कसे कुठे व्यक्त व्हायचे हे कळत नाही. स्वतः कडे त्रयस्थ भूमिकेतून बघितले तर अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. पण एवढा वेळ आणि त्यासाठी लागणारी समज कमी होते आहे. chatgpt AI च्या जमान्यात आपण समोरच्या माणसा ऐवजी मशीनशी बोलू लागलो आहोत.

नाटक / मीडिया हे एक अस प्रभावी क्षेत्र आहे जे आपल्याला त्या घटना प्रत्यक्ष साकारून दाखवते आणि ते बघत असताना आपण आपल्याला त्यात शोधू शकतो. जे प्रत्यक्ष स्पष्ट बोलता येत नाही ते कसे बोलते करायचे याचा रस्ता दाखवते. आणि हेच काम अतिशय प्रभावीपणे गेली 15+ वर्षे करणारी आपली हिरकणी आहे तेजस्वी पटवर्धन. शाळा कॉलेज पासून ते कॉर्पोरेट जगता मध्ये अनेक ठिकाणच्या समस्या घेऊन त्यांना नाट्य स्वरूपात मांडून समस्यांचे निवारण करण्याचा तिचा हा अनोखा तितकाच प्रभावशाली मार्ग त्यामुळेच google ने ही सन्मानित केला आहे.

तिचा हा एवढा मोठा प्रवास एक भागात मांडणे शक्य नव्हते त्यामुळे दोन भागात हे episode प्रसारित केले आहेत. त्याचा जरूर लाभ करून घ्या. तुमचे विचार comment द्वारे कळवा.

4 months ago | [YT] | 2

Mi Hirkani

ॲलोपॅथी आणि आयुर्वेद यांमधील खरा फरक शोधा 🩺🌱
आध्यात्मिकता खऱ्या उपचारांना कशी साथ देते ते जाणून घ्या ✨
प्राचीन भारतीय ज्ञान, आधुनिक काळातील स्पष्टता 💫

तुम्हाला शरीर आणि मनासाठी नैसर्गिक, दीर्घकालीन उपाय हवे असतील—तर हा एपिसोड खास तुमच्यासाठी आहे 💚

👉 Watch till the end & transform your perspective on health.
👉 Like | Share | Subscribe for more Marathi health & spirituality podcasts

#AyurvedaVsAllopathy #NaturalHealing #WomensWellness #HolisticHealth #MarathiPodcast

5 months ago | [YT] | 1

Mi Hirkani

या मकर संक्रांतीच्या निमित्ताने,
"मी हिरकणी" परिवाराकडून प्रत्येक प्रेरणादायी स्त्रीला सलाम.



संक्रांत म्हणजे सकरात्मकतेकडे वाटचाल,
स्वप्नांना नवी दिशा
आणि आत्मविश्वासला नवी ऊंची.

हा प्रवास असाच सुरू राहो.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !


अशाच हिरकणीच्या प्रवासाच्या वाटचाली जाणून घेण्यासाठी चॅनल ला subscribe करा व bell icon ही दाबा.
#mihirkani #makarsankrant

5 months ago | [YT] | 3

Mi Hirkani

प्रत्येक स्री ने पहावा असा powerful podcast आहे.

Dr. Shama Kulkarni (MD Homeopathy | Bach Flower Therapy | Women’s Health Coach) यांनी अतिशय सोप्या भाषेत स्त्रियाच्या समस्या बद्दल जिथे स्त्रिया मोकळेपणी बोलायला टाळतात किंवा गृहीत धरून जातात. दोन्ही गोष्टी अपायकारक आहेत.

या episode मध्ये Homeopathy बरोबरच Bach Flower Remedies आणि संतुलित आहार च्या सहाय्यानें Menopause, PCOD, PCOS, लहान वयात सुरू होणारी पाळी, stress, भावनांचा उद्रेक विषयी सविस्तर उपाय चर्चा केली आहे.

या केवळ औषधे नाही तर हे का होते ते जाणून घेतले तर संपूर्ण परिवाराला त्याचा फायदा होतो.
तेव्हा episode तरूणांपसून घरातील मोठ्यांनी पहावा असा आहे. Episode आवडल्यास Like Comment Share करा.

5 months ago | [YT] | 1