IBM MAHARASHTRA NEWS

नमस्कार , आम्ही IBM महाराष्ट्र न्यूज हा सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह प्रादेशिक मराठी न्यूज चॅनेल ब्रँड आहे.
आमचा लोगो आणि ब्रँडनेम मूळ आणि अनन्य बातम्या कव्हरेजसाठी आमची मालमत्ता बनली आहे.

आमची व्यावसायिक पूर्णवेळ समर्पित टीम ऑन स्पॉट कव्हरेज, संपादक, ग्राफिक डिझायनर उत्कटतेने तल्लीन
संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे विस्तृत कव्हरेज सादर करणे.

आम्ही मुख्यतः थेट YouTube टेलिकास्ट प्रसारित करतो, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय भाषणे, मुलाखती, उत्सव कार्यक्रम, सार्वजनिक मेळावे,
विशेष कथा, माहितीपट, लघुपट, कौटुंबिक मनोरंजन सामग्री इत्यादी तयार करते.

आमच्या न्यूज नेटवर्कचे उद्दिष्ट अस्सल सामग्री प्रदान करण्यात आघाडीवर असणे आहे.
Maharashtra News, Politics, Breaking News

महाराष्ट्रातील बातम्यांचा आढावा मोबाईल वर मिळवण्यासाठी you tube  चॅनेल subscribe करा बेल वाजवा...👇

" आय बी एम महाराष्ट्र न्यूज चॅनेल  " 
जाहिरात आणि बातम्यांसाठी
प्रमुख - असिफ मुजावर
संपर्क -8380929302
इमेल - ibmmaharashtra@gmail.com
maharashtranewschannel@gmail.com


IBM MAHARASHTRA NEWS

🎓 राजुरी माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी


📍 राजुरी | प्रतिनिधी

राजुरी माध्यमिक विद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती, लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि स्वर्गीय ना. चंदूकाका जगताप यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही महान व्यक्तींच्या कार्यावर मनोगते व्यक्त केली.

मुख्याध्यापक नसीर बागवान यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, समाजप्रबोधनातील कार्य तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, समाजजागृती आणि सामाजिक परिवर्तनातील योगदान याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Rajuri #LokmanyaTilak #AnnabhauSathe #SchoolProgram #Education #IBMMaharashtra

5 days ago | [YT] | 9

IBM MAHARASHTRA NEWS

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उद्या जेजुरी दौऱ्यावर; १०१ विद्यार्थ्यांना सायकली, महिला बचत गटांना साहित्याचे वाटप

5 days ago | [YT] | 6

IBM MAHARASHTRA NEWS

🚨 सासवड बायपासवर भीषण अपघात; भरधाव ब्रेझा कार ट्रॅक्टर-ट्रॉलीवर आदळली

1 week ago | [YT] | 4

IBM MAHARASHTRA NEWS

जेजुरीती पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मीनारायण लॉजवर पोलिसांचा धाडसी छापा;६ महिलांची सुटका


**जेजुरीमध्ये अनैतिक मानवी वेश्याव्यवसायाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जेजुरी येथील लक्ष्मीनारायण लॉजवर टाकलेल्या छाप्यात तब्बल सहा महिलांची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी लॉज चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना २० जुलै २०२६ रोजी या लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहितीची खात्री केली आणि रात्री सुमारे नऊच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत लॉज चालक रामा नारायण मोगाविरा याला ताब्यात घेण्यात आले, तर सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली. आरोपीविरुद्ध अनैतिक मानवी वेश्याव्यवसाय प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत कलम ३, ४ आणि ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील पुढील तपास करत आहेत.**

2 weeks ago | [YT] | 7

IBM MAHARASHTRA NEWS

बिहारच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आले
खास गिफ्ट, लोकांना झाली मजनू
भाईची आठवण!
🚨 मुख्यमंत्र्यांना दिलेल्या स्केचमुळे उद्योगपती ट्रोल!

बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना पल्लवी राज कन्स्ट्रक्शनचे चेअरमन संजीव श्रीवास्तव यांनी हाताने काढलेले रेखाचित्र भेट दिले. मात्र, या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच नेटकऱ्यांनी त्या स्केचची खिल्ली उडवत संजीव श्रीवास्तव यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. वाढता ट्रोलिंग पाहता त्यांनी पोस्ट डिलीट केली, मात्र तोपर्यंत फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

#Bihar #SamratChaudhary #ViralPhoto #SocialMedia #TrendingNews #IBMMaharashtraNews

2 months ago | [YT] | 10

IBM MAHARASHTRA NEWS

एमएस धोनी पुन्हा ठरले सर्वाधिक आयकर भरणारे वैयक्तिक करदाता; 2025-26 मध्ये सर्वाधिक कर भरला

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार MS Dhoni पुन्हा एकदा बिहार-झारखंड विभागातील सर्वाधिक आयकर भरणारे वैयक्तिक करदाता ठरले आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये त्यांनी वैयक्तिक श्रेणीत सर्वाधिक आयकर जमा केला आहे.

आयकर विभागाच्या माहितीनुसार, क्रिकेटमधून निवृत्तीनंतरही जाहिराती, गुंतवणूक आणि विविध व्यावसायिक उपक्रमांमधून धोनी यांचे उत्पन्न मजबूत राहिले आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा सर्वाधिक कर भरणाऱ्यांमध्ये अव्वल स्थान मिळवले.

धोनी यांच्या या कामगिरीची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत असून, प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांसाठीही हे प्रेरणादायी उदाहरण मानले जात आहे.

#MSDhoni #MahendraSinghDhoni #IncomeTax #TaxPayer #CricketNews #IndiaNews #IBMmaharashtraNews

2 months ago | [YT] | 8

IBM MAHARASHTRA NEWS

विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीला नितेश राणेंचे समर्थन; सोशल मीडियावरील पोस्टची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणाला आता नवे राजकीय वळण मिळाले आहे. या घटनेनंतर मंत्री नितेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या कृतीचे समर्थन केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

संग्राम भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच नितेश राणे यांच्या पोस्टमुळे या प्रकरणाची राज्यभर जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, या पोस्टवर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत असून, समर्थक आणि विरोधकांकडून तीव्र मतप्रदर्शन सुरू आहे.

ताज्या घडामोडींसाठी IBM Maharashtra News ला लाईक, फॉलो आणि शेअर करा!

#NiteshRane #VikasLavande #SangramBhandare #PoliticalNews #BreakingNews #MaharashtraNews #IBMmaharashtraNews

2 months ago | [YT] | 6

IBM MAHARASHTRA NEWS

कीर्तनकार भंडारेंकडून राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते विकास लवांडे यांच्यावर कीर्तनकार भंडारे यांनी शाईफेक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर विकास लवांडे यांच्या समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, अधिक तपशील प्रतीक्षेत आहे.

राजकीय वातावरण तापले असून या घटनेची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.

#VikasLavande #InkAttack #PoliticalNews #BreakingNews #MaharashtraNews #IBMmaharashtraNews

2 months ago | [YT] | 16

IBM MAHARASHTRA NEWS

पुणे - पंढरपूर मार्गावरील टोलविरोधी आंदोलन पेटणार; मनसेचा बॅनरद्वारे इशारा

पुरंदर तालुक्यातील तक्रारवाडी फाटा - बेलसर हद्दीत उभारण्यात आलेल्या टोलप्लाझावर लवकरच टोलवसुली सुरू होणार आहे. मात्र, स्थानिक भूमिपुत्रांना टोलमाफी न देता टोलवसुली सुरू करण्याच्या हालचालींमुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत.

स्थानिकांनी महामार्गासाठी जमिनी दिल्या, व्यवसायाच्या जागा दिल्या, तरी आता त्यांच्यावरच टोलचा बोजा टाकला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सासवड, जेजुरी आणि पूर्व पुरंदर भागातील नागरिकांना दैनंदिन कामांसाठी या मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे २० किलोमीटर परिसरातील स्थानिकांना पूर्ण टोलमाफी द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

मनसेने याबाबत टोलविरोधी बॅनर लावत आंदोलनाचा इशारा दिला असून, मागणी मान्य न झाल्यास टोलनाक्यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

#Purandar #TollPlaza #MNS #TollFree #Jejuri #Saswad #PunePandharpurRoad #LocalProtest #MaharashtraNews

3 months ago | [YT] | 8