banjara bhajan
banjara vidios
banjara songs
banjara bhajan
banjara audios and vidios
Banjara culture videos
Banjara culture videos maharatra
banjara lokageet bhajan
banjara bhakti geet
banjara bhakti songs
sevalal maharaj
sant sevalal maharaj banjara vidios
gor banjara vidios
banjara audios
kesula tv 3755
संत सेवालाल महाराज
सेवालाल महाराज
बंजारा विडीओ
बंजारा गीत
बंजारा सोंग
बंजारा
बंजारा ऑडिओ
गोरमाटी बंजारा
गोर सेना,अंकुश चव्हाण,बंजारा विडीओ गीत
#Banjarabhajan
#KesulaTV3755
#BanjaraBhajanNew
#KTVBanjara
#banjarabhajannew
से गोर भाईन मार विनंती छ की सेवेन Kesula TV
3755 तमारो हक्केरो YOUTUBE CHANNEL
SUBSCRIBE करो 🙏🙏🙏🙏🙏🙏
my social media link.
👇👇👇👇👇👇👇👇👇
my Facebook page 👇👇
www.facebook.com/profile.php?id=100035420390539
my instagram pej 👇👇👇
www.instagram.com/ankush_chavan_3755/
Gor Ankush Chavhan
Mo.9834438039. Jio.
महानायक रेकॉर्डिंग स्टुडिओ.
गोर अंकुश चव्हाण
मार मोबाईल न.
9665219073
महानायक रेकॉर्डिंग स्टुडिओ. जनुना तांडो
ता.सिंदखेड राजा जि.बुलढाणा.
KESULA TV 3755 केसुला टिव्ही
श्री ययाती नाईक हे कारंजा मानोरा मतदार संघात निवडणूक लढत आहे,,, आपल्याला काय वाटतं की ते आमदार होतील की नाही , आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा🙏
1 year ago | [YT] | 7
View 2 replies
KESULA TV 3755 केसुला टिव्ही
श्री ययाती नाईक हे कारंजा मानोरा मतदार संघात निवडणूक लढत आहे,,, आपल्याला काय वाटतं की ते आमदार होतील की नाही , आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा🙏
1 year ago | [YT] | 29
View 3 replies
KESULA TV 3755 केसुला टिव्ही
यवतमाळ वाशिम जिल्ह्याचा खासदार म्हणून आपल्याला कोण आवडेल.
1 year ago | [YT] | 35
View 4 replies
KESULA TV 3755 केसुला टिव्ही
यवतमाळ वाशिम जिल्ह्याचा खासदार म्हणून आपल्याला कोण आवडेल
आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया कळवा.
1 year ago | [YT] | 26
View 3 replies
KESULA TV 3755 केसुला टिव्ही
MAHANAYAKN RECORDING
2 years ago | [YT] | 10
View 0 replies
KESULA TV 3755 केसुला टिव्ही
फ्री रेकॉर्डिंग
2 years ago | [YT] | 18
View 0 replies
KESULA TV 3755 केसुला टिव्ही
नम्र विनंती नम्र विनंती🙏🙏🙏🙏
2 years ago | [YT] | 5
View 0 replies
KESULA TV 3755 केसुला टिव्ही
https://youtu.be/HaK-eJoUODc
Vijay Chavan | विजय चव्हाण | गोर कुळी र माही नायक जलम न लेतो | Gor Kuli R Mahi Nayak Jalam N leto.
2 years ago | [YT] | 2
View 0 replies
KESULA TV 3755 केसुला टिव्ही
Happy birthday dear Bhiya 🎂🎂🎂💐💐
2 years ago | [YT] | 29
View 0 replies
KESULA TV 3755 केसुला टिव्ही
दखल -गोरबंजारा समाजातील एका अल्पवयी मुलीच्या *मर्डर केसची*
*गोर सेनेची धडक* ----------------------------------------
*माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच ..जोडगव्हाण येथील विधवा गुंफाबाई नामदेव चव्हाणचा...... टाहो!*
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
*ग्राउंड रिपोर्ट ✍️याडीकार पंजाबराव चव्हाण ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक पुसद -94 21 77 43 72*
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*ठळक घडामोडी.......!*
1) माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच मृत्तक नेहाच्या विधवा आईचा टाहो!
2) कु. नेहाची हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना !
3) प्रथम खबर घेण्यास पोलीस प्रशासनाची टाळाटाळ मुत्तक नेहाच्या आईचा गंभीर आरोप!
4) गोरसेनेच्या गोर सैनिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर रिपोर्ट दर्ज!
5) सदर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याची दाट शक्यता असल्याची चर्चा ?
6) प्रथम खबर अहवाल आणि टंकलेखन FIR कॉपी मध्ये कमालीची तफावत ?
7) आरोपींना सेफ करण्याचा संशय?
8) आमदार इंद्रनील नाईक यांनी दिले उपमुख्यमंत्र्यांना पत्र !
9) सदर केस मध्ये भां.द.वी.- 376(2)N,306, 363, 34, गुन्हा दाखल पंरतु भां.द.वी 302 का दाखल नाही?
10) बंजारा बिग्रेडच्या वतीने 4 जानेवारी 2023 रोजी वाशिम येथे आंदोलन !
11) प्रफुल्ल चव्हाण यांनी केले मदतीचे आव्हान.
12) सदर गंभीर प्रकरणाची इलेक्ट्रॉनिक मिडीयाने दखल का घेतली नाही?
13) गोरबंजारा समाजातील विचावंत ,पुढारी गप्प का?
*ग्रांऊड रिपोर्ट*
दोन दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील जोडगव्हाण तांड्यातील अल्पवयीन कुमारी नेहा या मुलीला जबरदस्तीने गाडीवर नेऊन,अत्याचार करून गळा दाबून खुन करून विहिरीत फेकल्या बाबतची बातमी सोशल मीडियावर वाचली. आणि धक्काच बसला. *काल बंजारा अस्मिता संघाचे संयोजक प्रफुल डी. चव्हाण प्रशासकीय अधिकारी चंद्रपूर* यांनी मला फोन केला. हरपणी बीग्रेडच्या अध्यक्षा जिजाताई राठोड यांच्यासह घटनास्थळी भेट देण्याचे ठरले. रात्रभर झोप लागली नाही. प्रचंड वेदना आणि दुःखदायक घटनेने झोप उडाली होती. सकाळी प्रफुल चव्हाण यांच्या गाडीने शिक्षक संजय चव्हाण यवतमाळ यांच्यासह आम्ही वाशिमला निघालो. प्रवासात एकच चिंता.... कशी झाली असेल कुमारी नेहाची हत्या? समाजात होणाऱ्या अशा गंभीर हत्या केव्हा आणि कधी थांबतील? या व अशा अनेक विचारासह आम्ही वाशिमला पोहोचलो. उमरीगडाचे महंत खुशाल महाराज, नेमीचंद महाराज ,नारायण चव्हाण शिक्षक आणि बंजारा बिग्रेडचे विभागीय अध्यक्ष सुरेश राठोड, उपाध्यक्ष वसंत जाधव, अखिल राठोड नांदेड जिल्हा अध्यक्षासह प्रथम आम्ही *खासदार मा. भावनाताई गवळी* यांची भेट घेऊन त्यांना हा विषय समजावून सांगितला. त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आम्ही सर्व मंडळी *मा. जिल्हा पोलीस अधीक्षक वाशीम* यांच्याकडे गेलो असता विंनती केल्यानंतर त्यांच्या रायटर यांनी प्रफुल चव्हाण यांच्यासोबत मोबाईलवर बोलणे करून दिले. प्रफुल्ल चव्हाण यांनी एफआयआर मधील तफावत बाबत अचुक माहिती साहेबांना दिली. आणि नियमानुसार कारवाई होईल असे त्यांनी आम्हाला अवगत केले. मा.जिल्हा पोलीस अधिक्षकाची भुमिका न्याय देणारी वाटली. त्यानंतर आम्ही सर्व मंडळी *मा.जिल्हाधिकारी वाशीम* यांच्या कडे गेलो असता. ते प्रशिक्षण करीता बाहेरगावी गेल्यामुळे भेट झाली नाही. त्यानंतर आम्ही जोडगव्हाण येथे गेलो. गावात शिरता शिरताच ....भयान शांतता..जसे काही गाव सामसूम ... असल्याचे जाणवले. आम्ही उतरल्याबरोबर गावातील मंदिराजवळ बसलेली काही बुजुर्ग मंडळी यांना आम्ही येण्याचे कारण सांगितले असता त्यांनी आम्हाला मृत्तक कुमारी नेहा यांच्या घरापर्यंत घेऊन गेली. लोकांच्या नजरा आमच्यावर भिर भिरत होत्या. आम्ही जाऊन बसताच मृत्तक नेहाच्या आईने आपल्या डोळ्याला पदर लावला . आणि आजीने टाहो फोडला. जवळ बसलेल्या बायांनी सुद्धा आपापली पदर डोळ्याला लावली. भयान शांतता.....हळूहळू गावातील पुरुष आणि बाया मंडळी जमा होवू लागली. सर्वांचे डोळे पाणावलेले. संपूर्ण वातावरणात शोककळा पसरली. प्रंचड वेदना आणि दु:खदायक घटनेने पार खचुन गेलेल्या आजी आणि आईला काय बोलावे ? काही सुचत नव्हते ? हे सर्व पाहून आमचेही डोळे पाणावले. शेवटी हिम्मत करून महंत खुशाल महाराज यांनी सुरुवात केली. आणि प्रचंड वेदना आणि दुःखदायक घटनेत सापडलेल्या कुमारी मृत्तक नेहाच्या आजी आणि आईला बोलते केले. त्यांचे ऐकून घेतल्यानंतर प्रफुल डी. चव्हाण यांनी रीतसर कायद्याच्या बाजू त्यांना समजावून सांगितल्या.आपण घाबरू नका. संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे. आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे सांगून त्यांनी धिर दिला. आणि त्यानंतर एफआयआर ची कॉपी वाचण्यात आली .त्यामध्ये आणि मृत्तक नेहाच्या आईने दिलेला प्रथम रिपोर्ट आणि टंकलिखित एफआयआर यामध्ये प्रचंड तफावत दिसून आली. खरी मेक येथेच आहे. राजकीय दबाव झाल्याचा संशय पदोपदी येत होता. तुम्ही घाबरू नका आम्ही जन आंदोलन करू असे सुरेश राठोड यांनी सांगताच . माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच आहे. तिला आरोपीने जबरदस्तीने इतर आरोपीच्या साह्याने गाडीवर नेऊन अत्याचार केल्यानंतर तिचा खून करून विहरीत फेकून देण्यात आले .हे सत्य असून एफआयआर कॉफी मधील मजकूर चुकीचा असुन माझ्या अज्ञानाचा फायदा घेऊन अंगठा घेतल्याचे तिने रडता रडता सांगत असतांना त्या गावातील एका तरुणाने ठाणेदार यांना फोन लावुन मोबाईल प्रफुल्ल चव्हाण यांच्या हातामध्ये दिला. प्रफुल्ल चव्हाण यांनी एफआयआर मधील शेवटच्या ओळी या प्रथम खबर मध्ये नसतांना आपण टंकलिखित काँपी मध्ये कशा काय टाकल्या हे बरोबर नसुन आम्ही पिडीत कुंटुबाला न्याय मिळवून देण्यासाठी मा. पोलिस महासंचालका पंर्यत जावु असे ठणकावून सांगितले. त्यावर ठाणेदार यांनी म्हटले की, आताच मला मा. एसपी साहेबाचा फोन आला होता. मी नियमानुसार कार्यवाही करतो असे सांगितले हा संवाद ऐकुन पिडीत कुंटुब आणि गावकऱ्यामध्ये आशा निर्माण झाली. त्यानंतर पुरवणी रिपोर्ट देण्याचे सर्वानुमते ठरले. त्यानुसार आज पिडीत कुंटुबासोबत काही मंडळी येऊन पुरवणी रिपोर्ट सादर करणार आहे. एवढी गंभीर घटना घडल्यानंतर प्रथम रिपोर्ट घेण्यासाठी टाळाटाळ करणे ,आणि माझ्या रिपोर्ट मधील मजकूर न टाकता भलताच मजकुर टाकल्याबद्दल तिने प्रंचड नाराजी व्यक्त केली. हे सर्व ऐकताना मन शून्य झाले होते. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्यानंतरही प्रशासनाकडून साधे प्रथम रिपोर्ट घेण्यासही उशीर होत असेल तर महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे किंवा नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो. *गोरसेनेच्या जाँबाज गोरसैनिकांनी या प्रकरणात उडी घेतल्यानंतर मात्र प्रशासनाला एफआरआय दाखल करावा लागला. हे सांगण्यासही मृत्तकाची आई विसरली नाही.* कदाचित गोरसेनाने या प्रकरणात भाग घेतला नसता तर गुन्हा शुद्धा दाखला झाला नसता. असे काही उपस्थित गावकऱ्यांनी सांगितले. एका कोवळया सतरा वर्षाच्या मुलीला जबरदस्तीने उचलून नेणे, आणि तिच्यावर अत्याचार करणे ,आणि त्यानंतर तिला जीवाने मारून विहिरीत फेकून दिल्यानंतरही जर समाजमन आणि प्रशासन जागत नसेल तर लोकशाहीत आपण राहतो की नाही असा गंभीर प्रश्न पडतो? रिपोर्ट घेण्यास केलेला उशीर यामुळे सदर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचे नाकारता येत नाही. राजकीय हस्तक्षेप करणारा तो पदाधिकारी कोण? याची सर्वत्र दबक्या आवाजात चर्चा दिसून येत होती. विधवा गुंफाबाई चव्हाण यांची परिस्थिती बेताचीच .नवऱ्याने नापिकीमुळे आत्महत्या केल्यामुळे घर संसार चालवण्यासाठी आपल्या मुलास घेऊन ती ऊस कापण्यासाठी गेली होती. आणि आपल्या सासू बरोबर तिने कुमारी नेहाला वाशिम येथे शिक्षणासाठी ठेवले असताना असे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली असताना सुद्धा समाज आणि प्रशासन त्याला जर मदत करत नसेल तर ही फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल? हे प्रकरण पाहिजे तेवढे सोपे नाही. प्रंचड गंभीर प्रकरण असताना सुद्धा प्रथम खबर रिपोर्ट आणि टंकलिखित एफआयआर मधील तफावत ही आरोपीला सहाय्य करणारी बाब असून हे भयानक कृत्य जवळपास तीन-चार आरोपींनी केल्याची शक्यता नाकारता येत नाही . यासाठी इतर आरोपीला सुद्धा ताब्यात घेण्याची गरज आहे. आणि एफआयआर नोंदविण्याऱ्या संपूर्ण प्रकीयाची शुद्धा चौकशीची गरज लोकांनी बोलुन दाखवली. आरोपीची एवढी हिम्मत की, त्यानेच मुत्तक नेहाच्या मोबाईल वरून नेहाच्या मेव्हण्याला फोन लावून नेहाच्या आईला निरोप दिला की, तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे. आणि त्यांनी त्यानंतर आपले संभाषण बंद केले. यावरून पोलिसांनी त्या कॉल डिटेलची तपासणी करण्याची गरज सुद्धा त्या ठिकाणी बोलून दाखवण्यात आली. एकंदरीत हे मृत्तक नेहाचे हत्या प्रकरण गंभीर असल्यामुळे आरोपीवर भांदवी 302 चा गुन्हा दाखल करून लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण कायदा 2012 (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करून माझ्या मुलीला योग्य न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी रडतरडत मृत्तक नेहाच्या विधवा आई गुंफाबाई गजानन चव्हाण ही वारंवार करत होती. शेवटी आम्ही तिला समजावत धीर देऊन निरोप घेत असताना मृत्तक नेहाच्या आजीने टाहो फोडला. सुरेश राठोडनीं आजीला मिठी मारली. आणि खुब समजावण्याचा प्रयत्न केला. पंरतु ती रडतच होती. *आपल्या नातीसाठी तिचे भान हरपल्याचे सतत जाणवत होते. आपल्या डोळ्यासमोर जवान मुलगा गजानन यांनी नापिकीमुळे काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. आणि रात्रंदिवस सोबत असणाऱ्या नातीला सुद्धा आरोपी नराधमांनी अत्याचार करून मारून टाकले किती भयानक ही परिस्थिती...! शब्दात या कुटुंबाचे दुःख व्यक्त करता येत नाही .शेवटी आम्ही निशब्द झालो..... थोडे थांबलो! आणि भरल्या डोळ्यांनी परतलो . प्रफुल्ल चव्हाण हा संवेदनशील आणि भावनिक माणुस.... परतीच्या प्रवासात काहीच बोलला... नाही.. काका ..काका एवढे दोन शब्दच.. तो पुटपुटत होता.!*
सदर प्रकरणात जन आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. असाच सर्वत्र सूर त्यामध्ये निघत होता. सदर प्रकरणाअंतर्गत महंत खुशाल महाराज आणि प्रशासकीय अधिकारी प्रफुल डी. चव्हाण चंद्रपूर ,सुरेश राठोड यांनी गंभीर दखल घेऊन या प्रकरणाबाबत योग्य न्याय देण्याच्या दिशेने चांगले नियोजन करत असल्याचे दिसून येत आहे. बघुया...शासनस्तरावर काय घडामोडी घडतात त्या..?
*अपील*
1) सदर प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असल्यामुळे भांदवी 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा.
2) उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी.
3) पिढीत कुटुंबियांना 25 लाख रुपयाची मदत शासनाकडून मिळावी .
4) गोरबंजारा समाजातील सर्वच संघटना यांनी न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र लढा उभारावा.
5) पिडीत कुंटुबाची आर्थिक परिस्थिती फारच नाजूक असल्यामुळे त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. तरी त्यांच्या बँक खात्यात यथाशक्ती मदत करावी.
सदर प्रकरणाची गुहमंत्रालयाने गंभीर दखल घेऊन पीडित कुटुंबाला न्याय द्यावा. ही तमाम जनतेची मागणी आज रोजी जोर धरत आहे.
चला तर आपण पिडीत कुंटुबाला मदत करूया.....! बँक खाते विवरणासाठी दुसरी पोस्ट वाचा.🙏🙏
*जन माहितीस्तव सादर*
या प्रकरणातील कायदेशीर बाबीबाबत संपर्क करू शकता- *प्रफुल्ल डी.चव्हाण-8408032117*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*✍️याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद -94 21 77 43 72*
3 years ago | [YT] | 5
View 0 replies
Load more