KrushiGuru – Dr. Ranjeet Shinde

🌱 शेतीतून विज्ञान, विज्ञानातून समृद्धी.
मी डॉ. रणजीत शिंदे – भारत, इस्रायल, कॅनडा आणि सध्या कॅलिफोर्निया येथे कृषी संशोधन आणि प्रगत शेती तंत्रज्ञानावर कार्यरत असलेला भारतीय कृषीशास्त्रज्ञ.
शेती ही केवळ पिकं घेण्याची प्रक्रिया नाही, तर ती अन्न सुरक्षा, मानवी पोषण आणि पर्यावरणीय संकटे अशा जागतिक प्रश्नांवरचा प्रभावी उपाय आहे.

📌 या चॅनेलवर तुम्हाला मिळेल:
🌾 अजैविक ताण व्यवस्थापन
उष्णता, दुष्काळ आणि खारटपणा
🦠 जैविक ताण व्यवस्थापन
वैज्ञानिक दृष्टिकोनातून कीड व रोगांचे नियंत्रण
🧪 अन्नद्रव्य व्यवस्थापन
सूक्ष्म व स्थूल अन्नद्रव्यांचे संतुलित व प्रभावी नियोजन
🍀 सेंद्रिय शेती
सेंद्रिय पद्धती, फायदे व व्यावसायिक तंत्रज्ञान
🏛️ शासकीय योजना व बाजारभाव
कृषी धोरणे, शासकीय योजना आणि बाजारातील बदल विश्लेषण
🚜 जागतिक कृषी तंत्रज्ञान
कॅनडा, इस्रायल आणि कॅलिफोर्नियातील आधुनिक तंत्रांचा अनुभव

📢 आपला दृष्टिकोन:
जगात आजही ८० कोटी लोक उपाशी आहेत.
पर्यावरणाची हानी करून उत्पादन वाढवणारी शेती ही शाश्वत समाधान देऊ शकत नाही.
"जास्त उत्पादन, कमी निविष्ठा आणि पर्यावरणपूरक शेती" — हाच KrushiGuru चा खरा ध्यास आहे.