पिस्तूल, जिवंत काडतुसे व प्राणघातक शस्त्रांसह ७ सराईत दरोडेखोरांना गुन्हे शाखेकडून बेड्या; १०.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर (. PARIVARTAN24NEWS ) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात मध्यरात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्यीय टोळीचा सोलापूर शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. मुळेगाव रोड परिसरातील अमर ज्योती नगरमध्ये धाड टाकून पोलिसांनी ७ सराईत गुन्हेगारांना शिताफीने जेरबंद केले. त्यांच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्तूल, ५ जिवंत राऊंड, २ तलवारी, ३ खंजीर, महिंद्रा XUV 500 कार आणि १ मोटारसायकलसह एकूण १० लाख २९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अमर ज्योती नगरमध्ये मध्यरात्री छापा
सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी शहरातील मालमत्ताविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, सपोनि भरत चंदनशिव व पोलीस अंमलदार अमोल यादव (ब.नं. १६६४) यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, काही संशयित इसम प्राणघातक शस्त्रांसह काळ्या रंगाच्या चारचाकी व मोटारसायकलसह अमर ज्योती नगर (प्लॉट नं. ८३, नरसिंग नगर शेजारी, मुळेगाव रोड) येथे दरोडा टाकण्यासाठी जमा झाले आहेत.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भरत चंदनशिव, सपोनि निलेश सोनवणे, पोउपनि विजय बनसुडे, पोउपनि मनोज मोरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून संशयितांना चहूबाजूंनी घेराव घातला आणि ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले ७ सराईत आरोपी
१. मनदीपसिंग दयासिंग संधू (वय ४३, व्यवसाय: मजुरी, रा. गुरुद्वारा लंगर साहिब, नगीना घाट, नांदेड) २. बलप्रीतसिंग सतनामसिंग खैरा (वय २५, व्यवसाय: मजुरी, रा. खैरा निवास, बडपुरा, गुरुद्वारा गेट नं. ४, नांदेड) ३. अंकुर राजकुमार प्रताप सिंह (वय २८, व्यवसाय: मजुरी, रा. तारवा, ता. अरप, जि. पाटणा, बिहार) ४. लक्ष्मण नामदेव जगताप (वय ३५, व्यवसाय: मजुरी, रा. म्हसोबा मंदिराजवळ, जगताप वस्ती, भागगाव, जि. औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर) ५. सुखदेवसिंग बलविदरसिंग गिल (वय ४२, व्यवसाय: मिस्त्री, रा. वैरोवाल, खडूर साहिब, जि. तरनतारन, पंजाब) ६. दिलीपसिंग हरीसिंग पवार खालसा (वय ३४, व्यवसाय: मजुरी, रा. ब्रम्हसिंग नगर, तरोडा बु., नांदेड) ७. राजेश कन्नीराम राठोड (वय ४४, व्यवसाय: मजुरी, रा. घर नं. १४, नरसिंग नगर, मुळेगाव रोड, सोलापूर)
१० लाख २९ हजारांचा मुद्देमाल व शस्त्रसाठा जप्त
अग्निशस्त्रे व शस्त्रे: १ देशी बनावटीचे पिस्तूल, ५ जिवंत राऊंड (आरोपी अंकुर सिंह याच्याकडून जप्त), २ तलवारी, ३ खंजीर. दरोड्याचे साहित्य: २ कटावणी, १ छन्नी, १ लांब दोरखंड, ३ जोडी हॅन्डग्लोव्ज, २ नंबर प्लेट, १ कलर स्प्रे बॉटल, ७ मोबाईल. वाहने: १ काळ्या रंगाची महिंद्रा XUV 500 कार (क्र. MH 12 HB 7700) व १ यामाहा मोटारसायकल (क्र. TG 07 AJ 6467). एकूण जप्त किंमत: ₹ १०,२९,७००/-
आरोपींचा गंभीर गुन्हेगारी इतिहास उघड
पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी राजेश राठोड याने कबुली दिली की, ते रात्री ते पहाटेदरम्यान सोलापूर शहरात मोठा दरोडा टाकून लूटमार करण्याच्या तयारीत होते.
आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे दिलीपसिंग खालसा याच्यावर विमानतळ पो. ठाणे (नांदेड), परळी ग्रामीण (बीड) आणि भाग्यनगर येथे खून (भादंवि ३०२), खुनाचा प्रयत्न (भादंवि ३०७) आणि आर्म्स ॲक्टचे तब्बल १३ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. मनदीपसिंग संधू याच्यावर नांदेडमध्ये खून (३०२) आणि आर्म्स ॲक्टचे ४ गुन्हे नोंद आहेत. लक्ष्मण जगताप याच्यावर सिडको व वाळुंज (छत्रपती संभाजीनगर) येथे खुनाचा (३०२) गुन्हा दाखल आहे. अंकुर सिंह याच्यावर विश्रामबाग (पुणे) येथे जबरी चोरी व आर्म्स ॲक्टचा गुन्हा दाखल आहे. राजेश राठोड याच्यावर जोडभावी पेठ (सोलापूर) तसेच बारघरा (ओडिशा) येथे जबरी चोरी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पो.शि. १६६४ अमोल यादव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. ८४७/२०२६, बीएनएस कलम ३१०(४), आर्म्स ॲक्ट ३/२५, ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(२)/१३५ अन्वये गुन्हा नोंदवून सर्व ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भरत चंदनशिव, सपोनि निलेश सोनवणे, पोउपनि विजय बनसुडे, पोउपनि मनोज मोरे, अंमलदार अंकुश भोसले, नंदराम गायकवाड, जावेद जमादार, विजय वाळके, तात्यासाहेब पाटील, वाजीद पटेल, बापू साठे, योगेश बर्डे, आबाजी सावळे, धीरज सातपुते, अमोल यादव, विठ्ठल यलमार, गणेश शिंदे, अभिजीत पवार, शंकर याळगी, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, वसीम शेख, युवराज गायकवाड, भारत पाटील, विशाल कुलकर्णी, सायबरचे मच्छींद्र राठोड तसेच चालक शाम सुरवसे, परबत आणि राजशेखर पाटील यांनी केली आहे.
कर्तव्यनिष्ठ, धडाडीचे अधिकारी एपीआय राहुल डोंगरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हेगारीविरोधातील प्रभावी कार्यातून निर्माण केली वेगळी ओळख
सोलापूर : वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पोलीस सेवेत कर्तव्यनिष्ठा, शिस्त, सतर्कता आणि धाडसी निर्णयक्षमता यांचा प्रभावी संगम साधत एपीआय राहुल डोंगरे यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. दक्षिण सोलापूर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.
गुन्ह्यांच्या तपासात बारकाईने लक्ष देणे, संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे, अवैध व्यवसायांविरोधात कठोर कारवाई करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही त्यांच्या कार्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. मद्रे परिसरातील बनावट दारू निर्मिती कारखान्यावर करण्यात आलेली मोठी कारवाई त्यांच्या सतर्कतेचे आणि कार्यतत्परतेचे उल्लेखनीय उदाहरण ठरली आहे.
कर्तव्य बजावताना धाडस आणि प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता परिस्थितीचा सामना करण्याची वृत्ती त्यांच्या सेवाभावाची साक्ष देते. उजनी जलाशयातील दुर्घटनेच्या प्रसंगी त्यांनी दाखवलेले धैर्यही विशेष उल्लेखनीय ठरले.
अशा कर्तव्यदक्ष, धडाडीच्या आणि संवेदनशील पोलीस अधिकाऱ्याला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या पुढील पोलीस सेवेला अधिक यश, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेच्या कार्यात नवनवीन उंची लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
शुभेच्छुक :
पत्रकार बंदेनवाज शेख जिल्हा कार्याध्यक्ष, युवा विकास सेना सामाजिक संघटना. #parivartannews
दोन तासांच्या शोधानंतर चिमुकला रुद्र सुखरूप आई-वडिलांच्या कुशीत; राधा-सोनालीसह पोलीस कॉन्स्टेबल गोपाल शिंदे यांचे कौतुक अक्कलकोट | दि. २९ ऑगस्ट २०२६ अक्कलकोट शहरातील वीर सावरकर चौक परिसरात शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दोन वर्षांचा चिमुकला रुद्र गर्दीच्या रहदारीच्या रस्त्यावर आढळून आला. त्याचवेळी राधा बमनपट्टी यांच्या लक्षात ही बाब आली. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनामुळे मोठा अनर्थ होण्यापूर्वी राधा यांनी प्रसंगावधान राखत चिमुकल्या रुद्रला सुरक्षितपणे बाजूला घेतले. त्यानंतर रुद्रला वैभव लक्ष्मी साडी सेंटर येथे सुरक्षित बसवून ११२ क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. पोलिसांच्या मदतीने तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर रुद्रचा त्याच्या आई-वडिलांशी संपर्क झाला आणि त्याला सुखरूप त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. रुद्रला पाहताच त्याचे वडील अविनाश, आई तसेच मावशी-मामा यांनी भावूक होत हंबरडा फोडला. आई-वडिलांच्या कुशीत विसावलेला रुद्र पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू आले. या संपूर्ण घटनेत राधा आणि सोनाली या दोन्ही मुलींनी दाखवलेले प्रसंगावधान आणि माणुसकीचे भान कौतुकास्पद ठरले. तसेच पोलीस कॉन्स्टेबल गोपाल शिंदे यांनीही चांगली कामगिरी बजावत चिमुकल्याला त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
सोलापूर : रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. रक्षाबंधनाच्या दिवशीच श्री मार्कंडेय रथोत्सवाची मिरवणूक निघण्याची परंपरा आहे. यंदाही पारंपरिक उत्साहात रथोत्सवाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीचे उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह महिलांच्या लेझीम पथकाने सादर केलेल्या आकर्षक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
दरम्यान, विजापूर वेस चौकात महिलांचे लेझीम पथक पाहत असताना एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. सानवी योगेश पगडीमल या चिमुकलीने आमदार देवेंद्र कोठे यांना राखी बांधली. अनपेक्षितपणे मिळालेली ही राखी आमदार कोठे यांनी मोठ्या आपुलकीने स्वीकारली.
चिमुकल्या बहिणीच्या प्रेमाने भारावून गेलेल्या आमदार कोठे यांनी तिचे आशीर्वाद घेत तिच्या भावनेचा सन्मान केला. रथोत्सवाच्या जल्लोषात घडलेल्या या बहीण-भावाच्या प्रेमळ भेटीने उपस्थितांचेही लक्ष वेधून घेतले.
रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी जपलेला हा स्नेहबंध उपस्थितांसाठी भावनिक आणि आनंददायी क्षण ठरला.
आज मुंबई येथे देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आले असता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचे स्वागत केले.
धडाडीचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचा दोन वर्षांचा यशस्वी कार्यकाळ; वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
सोलापूर : सोलापूर शहरातील गुन्हेगारांना कायद्याचा धडा शिकवणारे धडाडीचे अधिकारी म्हणून पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सोलापूरात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. कठोर कारवाई आणि जनतेप्रती असलेली संवेदनशीलता या दुहेरी भूमिकेमुळे त्यांनी सोलापूरकरांची मने जिंकली असून, त्यांच्या यशस्वी दोन वर्षांच्या कार्यकिर्दीबद्दल तसेच वाढदिवसानिमित्त नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सोलापूर शहर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. गेल्या काही वर्षांत शहरासमोर गुन्हेगारीचे आव्हान उभे राहिले होते. अशा परिस्थितीत शहराची कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी कंबर कसली. आपल्या धाडसी कर्तृत्वाने, नियोजनबद्ध कामकाजाने आणि कठोर कारवाईच्या भूमिकेमुळे त्यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याचे काम केले.
एम. राजकुमार हे त्यांच्या धमाकेदार आणि धडाडीच्या कारवाईसाठी ओळखले जातात. सोलापूरमध्ये पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून शहरातील गुन्हेगार, अंमली पदार्थ विक्रेते, टोळ्या आणि विविध बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असलेल्या घटकांविरोधात त्यांनी सातत्याने कारवाईची मोहीम राबवली.
“गुंडोवालों जरा होशियार, यहाँ के हम हैं राजकुमार!”
हा संदेश जणू त्यांनी आपल्या कार्यशैलीतून शहरातील गुन्हेगारांना दिला आहे. त्यांचा स्पष्ट संदेश एकच —
“कायद्यापुढे कोणीही मोठा नाही.”
एका बाजूला गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका, तर दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेणारा संवेदनशील आणि लोकाभिमुख अधिकारी, अशी एम. राजकुमार यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
गुन्हेगारांवर धडक आणि कडक कारवाई
सोलापूरमध्ये अंमली पदार्थांची समस्या, अवैध दारू, जुगार अड्डे, भूमाफिया, वाळू माफिया, गुटखा माफिया, घरफोडी, जबरी चोरी, खून, वाहन चोरी आणि इतर गंभीर गुन्ह्यांविरोधात विशेष मोहिमा राबवण्यात आल्या. या कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांचे धाबे दणाणले.
शहरातील अनेक बडे आणि कुख्यात गुन्हेगारांविरोधात कायदेशीर चौकटीत कठोर कारवाई करण्यात आली. राजकीय किंवा इतर कोणत्याही दबावाला बळी न पडता तडीपार, मोक्का आणि इतर कठोर कायदेशीर कारवायांचा प्रभावी वापर करून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शहरात टोळीगिरी करून दहशत पसरवणाऱ्या आणि निरपराध नागरिकांना त्रास देणाऱ्यांना एम. राजकुमार यांच्या कठोर, धाडसी आणि बेधडक कारवाईला सामोरे जावे लागले. केवळ एखाद्या गुन्हेगारावर कारवाई न करता गुन्हेगारीच्या मुळापर्यंत जाऊन टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याची कार्यपद्धती त्यांनी स्वीकारली.
नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
एम. राजकुमार यांनी केवळ गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठीही विविध सकारात्मक उपक्रम राबवले.
- महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक आणि मदत व्यवस्था अधिक सक्रिय करण्यात आली. - शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. - वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कडक अंमलबजावणीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. - नागरिकांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करण्यात आला. - गुन्हेगारीबाबत माहिती देणाऱ्या नागरिकांचा विश्वास टिकवून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यावर भर देण्यात आला.
“पोलीस तुमचे मित्र” संकल्पनेला प्रत्यक्ष रूप
पोलिसांविषयी समाजात विश्वास निर्माण करणे हे मोठे आव्हान असते. मात्र, पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी आपल्या कार्यपद्धतीतून हे शक्य करून दाखवले. नागरिकांना कोणत्याही अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी पोलीस प्रशासन तत्पर राहावे, यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले.
कठोर अधिकारी असतानाही जनतेच्या वेदना समजून घेणारे, संवेदनशील आणि भावुक व्यक्तिमत्त्व म्हणूनही एम. राजकुमार यांची ओळख आहे. याच गुणांमुळे सामान्य नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक मजबूत झाले आहे.
डीजेमुक्तीचा इतिहास रचणारे पोलीस आयुक्त
सोलापूर शहर हे उत्सवप्रिय शहर म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने मोठ्या मिरवणुका निघतात. या मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजाचे डीजे, लेसर किरणे आणि नागरिकांच्या आरोग्याला व सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या साधनांचा वापर वाढत होता.
या परिस्थितीचा संभाव्य धोका वेळीच ओळखून पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी धाडसी पावले उचलली. शहरातील विविध समाजघटक, नागरिक, आयोजक आणि राजकीय नेत्यांशी संवाद साधून डीजेच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली.
सामूहिक संवाद, जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून सोलापूर शहराला डीजेमुक्त करण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले. या उपक्रमामुळे महाराष्ट्रात डीजेमुक्तीचा इतिहास रचणारे पोलीस आयुक्त म्हणून एम. राजकुमार यांनी वेगळी ओळख निर्माण केली.
सोलापूरकरांचा एकच स्वर...
पोलीस आयुक्त म्हणून एम. राजकुमार यांना सोलापूरमध्ये पदभार स्वीकारून दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत त्यांच्या कार्यशैलीने सोलापूरकरांमध्ये सुरक्षिततेची भावना आणि पोलीस प्रशासनाविषयी विश्वास निर्माण केला आहे.
“गुन्हेगारांचा धसका, नागरिकांचा विश्वास — अशा धडाडीच्या पोलीस आयुक्तांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सोलापूरकरांसाठी दिलासादायक आणि समाधानकारक ठरला आहे.”
कठोर प्रशासन, धाडसी निर्णय, लोकाभिमुख कार्यशैली आणि जनतेप्रती असलेली संवेदनशीलता यामुळे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची कार्यशैली सोलापूरच्या इतिहासात विशेष ठसा उमटवणारी ठरत आहे.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या पुढील वाटचालीस उत्तुंग यश लाभो आणि जनतेच्या सेवेसाठी त्यांचे कार्य अधिक प्रेरणादायी ठरो, हीच सोलापूरकरांची मनःपूर्वक सदिच्छा!
हार्दिक शुभेच्छा!
पोलीस आयुक्त मा. श्री. एम. राजकुमार साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
Parivartan 24 news
2 weeks ago |[YT] | 2
View 0 replies
Parivartan 24 news
सोलापुरात दरोड्याचा मोठा कट उधळला!
पिस्तूल, जिवंत काडतुसे व प्राणघातक शस्त्रांसह ७ सराईत दरोडेखोरांना गुन्हे शाखेकडून बेड्या; १०.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर (. PARIVARTAN24NEWS ) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात मध्यरात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्यीय टोळीचा सोलापूर शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. मुळेगाव रोड परिसरातील अमर ज्योती नगरमध्ये धाड टाकून पोलिसांनी ७ सराईत गुन्हेगारांना शिताफीने जेरबंद केले. त्यांच्याकडून १ देशी बनावटीचे पिस्तूल, ५ जिवंत राऊंड, २ तलवारी, ३ खंजीर, महिंद्रा XUV 500 कार आणि १ मोटारसायकलसह एकूण १० लाख २९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अमर ज्योती नगरमध्ये मध्यरात्री छापा
सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी शहरातील मालमत्ताविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, सपोनि भरत चंदनशिव व पोलीस अंमलदार अमोल यादव (ब.नं. १६६४) यांना खात्रीशीर बातमी मिळाली की, काही संशयित इसम प्राणघातक शस्त्रांसह काळ्या रंगाच्या चारचाकी व मोटारसायकलसह अमर ज्योती नगर (प्लॉट नं. ८३, नरसिंग नगर शेजारी, मुळेगाव रोड) येथे दरोडा टाकण्यासाठी जमा झाले आहेत.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भरत चंदनशिव, सपोनि निलेश सोनवणे, पोउपनि विजय बनसुडे, पोउपनि मनोज मोरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून संशयितांना चहूबाजूंनी घेराव घातला आणि ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले ७ सराईत आरोपी
१. मनदीपसिंग दयासिंग संधू (वय ४३, व्यवसाय: मजुरी, रा. गुरुद्वारा लंगर साहिब, नगीना घाट, नांदेड)
२. बलप्रीतसिंग सतनामसिंग खैरा (वय २५, व्यवसाय: मजुरी, रा. खैरा निवास, बडपुरा, गुरुद्वारा गेट नं. ४, नांदेड)
३. अंकुर राजकुमार प्रताप सिंह (वय २८, व्यवसाय: मजुरी, रा. तारवा, ता. अरप, जि. पाटणा, बिहार)
४. लक्ष्मण नामदेव जगताप (वय ३५, व्यवसाय: मजुरी, रा. म्हसोबा मंदिराजवळ, जगताप वस्ती, भागगाव, जि. औरंगाबाद/छत्रपती संभाजीनगर)
५. सुखदेवसिंग बलविदरसिंग गिल (वय ४२, व्यवसाय: मिस्त्री, रा. वैरोवाल, खडूर साहिब, जि. तरनतारन, पंजाब)
६. दिलीपसिंग हरीसिंग पवार खालसा (वय ३४, व्यवसाय: मजुरी, रा. ब्रम्हसिंग नगर, तरोडा बु., नांदेड)
७. राजेश कन्नीराम राठोड (वय ४४, व्यवसाय: मजुरी, रा. घर नं. १४, नरसिंग नगर, मुळेगाव रोड, सोलापूर)
१० लाख २९ हजारांचा मुद्देमाल व शस्त्रसाठा जप्त
अग्निशस्त्रे व शस्त्रे: १ देशी बनावटीचे पिस्तूल, ५ जिवंत राऊंड (आरोपी अंकुर सिंह याच्याकडून जप्त), २ तलवारी, ३ खंजीर.
दरोड्याचे साहित्य: २ कटावणी, १ छन्नी, १ लांब दोरखंड, ३ जोडी हॅन्डग्लोव्ज, २ नंबर प्लेट, १ कलर स्प्रे बॉटल, ७ मोबाईल.
वाहने: १ काळ्या रंगाची महिंद्रा XUV 500 कार (क्र. MH 12 HB 7700) व १ यामाहा मोटारसायकल (क्र. TG 07 AJ 6467).
एकूण जप्त किंमत: ₹ १०,२९,७००/-
आरोपींचा गंभीर गुन्हेगारी इतिहास उघड
पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी राजेश राठोड याने कबुली दिली की, ते रात्री ते पहाटेदरम्यान सोलापूर शहरात मोठा दरोडा टाकून लूटमार करण्याच्या तयारीत होते.
आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे
दिलीपसिंग खालसा याच्यावर विमानतळ पो. ठाणे (नांदेड), परळी ग्रामीण (बीड) आणि भाग्यनगर येथे खून (भादंवि ३०२), खुनाचा प्रयत्न (भादंवि ३०७) आणि आर्म्स ॲक्टचे तब्बल १३ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मनदीपसिंग संधू याच्यावर नांदेडमध्ये खून (३०२) आणि आर्म्स ॲक्टचे ४ गुन्हे नोंद आहेत.
लक्ष्मण जगताप याच्यावर सिडको व वाळुंज (छत्रपती संभाजीनगर) येथे खुनाचा (३०२) गुन्हा दाखल आहे.
अंकुर सिंह याच्यावर विश्रामबाग (पुणे) येथे जबरी चोरी व आर्म्स ॲक्टचा गुन्हा दाखल आहे.
राजेश राठोड याच्यावर जोडभावी पेठ (सोलापूर) तसेच बारघरा (ओडिशा) येथे जबरी चोरी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पो.शि. १६६४ अमोल यादव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. ८४७/२०२६, बीएनएस कलम ३१०(४), आर्म्स ॲक्ट ३/२५, ४/२५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(२)/१३५ अन्वये गुन्हा नोंदवून सर्व ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक
सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भरत चंदनशिव, सपोनि निलेश सोनवणे, पोउपनि विजय बनसुडे, पोउपनि मनोज मोरे, अंमलदार अंकुश भोसले, नंदराम गायकवाड, जावेद जमादार, विजय वाळके, तात्यासाहेब पाटील, वाजीद पटेल, बापू साठे, योगेश बर्डे, आबाजी सावळे, धीरज सातपुते, अमोल यादव, विठ्ठल यलमार, गणेश शिंदे, अभिजीत पवार, शंकर याळगी, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, वसीम शेख, युवराज गायकवाड, भारत पाटील, विशाल कुलकर्णी, सायबरचे मच्छींद्र राठोड तसेच चालक शाम सुरवसे, परबत आणि राजशेखर पाटील यांनी केली आहे.
3 weeks ago |[YT] | 4
View 0 replies
Parivartan 24 news
कर्तव्यनिष्ठ, धडाडीचे अधिकारी एपीआय राहुल डोंगरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हेगारीविरोधातील प्रभावी कार्यातून निर्माण केली वेगळी ओळख
सोलापूर : वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होत असून, त्यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस अधिकारी, कर्मचारी, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पोलीस सेवेत कर्तव्यनिष्ठा, शिस्त, सतर्कता आणि धाडसी निर्णयक्षमता यांचा प्रभावी संगम साधत एपीआय राहुल डोंगरे यांनी आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. दक्षिण सोलापूर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तींवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.
गुन्ह्यांच्या तपासात बारकाईने लक्ष देणे, संशयास्पद हालचालींवर नजर ठेवणे, अवैध व्यवसायांविरोधात कठोर कारवाई करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही त्यांच्या कार्यशैलीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. मद्रे परिसरातील बनावट दारू निर्मिती कारखान्यावर करण्यात आलेली मोठी कारवाई त्यांच्या सतर्कतेचे आणि कार्यतत्परतेचे उल्लेखनीय उदाहरण ठरली आहे.
कर्तव्य बजावताना धाडस आणि प्रसंगी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता परिस्थितीचा सामना करण्याची वृत्ती त्यांच्या सेवाभावाची साक्ष देते. उजनी जलाशयातील दुर्घटनेच्या प्रसंगी त्यांनी दाखवलेले धैर्यही विशेष उल्लेखनीय ठरले.
अशा कर्तव्यदक्ष, धडाडीच्या आणि संवेदनशील पोलीस अधिकाऱ्याला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या पुढील पोलीस सेवेला अधिक यश, उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेच्या कार्यात नवनवीन उंची लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!
शुभेच्छुक :
पत्रकार बंदेनवाज शेख
जिल्हा कार्याध्यक्ष, युवा विकास सेना सामाजिक संघटना. #parivartannews
1 month ago (edited) |[YT] | 5
View 0 replies
Parivartan 24 news
दोन तासांच्या शोधानंतर चिमुकला रुद्र सुखरूप आई-वडिलांच्या कुशीत; राधा-सोनालीसह पोलीस कॉन्स्टेबल गोपाल शिंदे यांचे कौतुक
अक्कलकोट | दि. २९ ऑगस्ट २०२६
अक्कलकोट शहरातील वीर सावरकर चौक परिसरात शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दोन वर्षांचा चिमुकला रुद्र गर्दीच्या रहदारीच्या रस्त्यावर आढळून आला. त्याचवेळी राधा बमनपट्टी यांच्या लक्षात ही बाब आली. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनामुळे मोठा अनर्थ होण्यापूर्वी राधा यांनी प्रसंगावधान राखत चिमुकल्या रुद्रला सुरक्षितपणे बाजूला घेतले.
त्यानंतर रुद्रला वैभव लक्ष्मी साडी सेंटर येथे सुरक्षित बसवून ११२ क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. पोलिसांच्या मदतीने तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर रुद्रचा त्याच्या आई-वडिलांशी संपर्क झाला आणि त्याला सुखरूप त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.
रुद्रला पाहताच त्याचे वडील अविनाश, आई तसेच मावशी-मामा यांनी भावूक होत हंबरडा फोडला. आई-वडिलांच्या कुशीत विसावलेला रुद्र पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू आले.
या संपूर्ण घटनेत राधा आणि सोनाली या दोन्ही मुलींनी दाखवलेले प्रसंगावधान आणि माणुसकीचे भान कौतुकास्पद ठरले. तसेच पोलीस कॉन्स्टेबल गोपाल शिंदे यांनीही चांगली कामगिरी बजावत चिमुकल्याला त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
#parivartan24news #solapurnews #Akkalkotnews #policenews
1 month ago |[YT] | 5
View 0 replies
Parivartan 24 news
रथोत्सवाच्या मिरवणुकीत जपला बहीण-भावाचा स्नेह;
चिमुकली सानवीने आमदार देवेंद्र कोठेंना बांधली राखी
सोलापूर : रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने पद्मशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. रक्षाबंधनाच्या दिवशीच श्री मार्कंडेय रथोत्सवाची मिरवणूक निघण्याची परंपरा आहे. यंदाही पारंपरिक उत्साहात रथोत्सवाची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
या मिरवणुकीचे उद्घाटन आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह महिलांच्या लेझीम पथकाने सादर केलेल्या आकर्षक प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
दरम्यान, विजापूर वेस चौकात महिलांचे लेझीम पथक पाहत असताना एक हृदयस्पर्शी प्रसंग घडला. सानवी योगेश पगडीमल या चिमुकलीने आमदार देवेंद्र कोठे यांना राखी बांधली. अनपेक्षितपणे मिळालेली ही राखी आमदार कोठे यांनी मोठ्या आपुलकीने स्वीकारली.
चिमुकल्या बहिणीच्या प्रेमाने भारावून गेलेल्या आमदार कोठे यांनी तिचे आशीर्वाद घेत तिच्या भावनेचा सन्मान केला. रथोत्सवाच्या जल्लोषात घडलेल्या या बहीण-भावाच्या प्रेमळ भेटीने उपस्थितांचेही लक्ष वेधून घेतले.
रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी जपलेला हा स्नेहबंध उपस्थितांसाठी भावनिक आणि आनंददायी क्षण ठरला.
#parivaritan24news #solapurnews #bjpnews #DevendraKote
1 month ago |[YT] | 4
View 0 replies
Parivartan 24 news
आज मुंबई येथे देशाचे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर आले असता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांचे स्वागत केले.
रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी अमित शाह यांना राखी बांधून त्यांनी रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
#parivartan24news #solapurnews
#AmitShah #DevendraFadnavis #EknathShinde #SunetraPawar #RakshaBandhan
1 month ago |[YT] | 3
View 0 replies
Parivartan 24 news
गुन्हेगारांचा धसका, नागरिकांचा विश्वास!
धडाडीचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचा दोन वर्षांचा यशस्वी कार्यकाळ; वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
सोलापूर : सोलापूर शहरातील गुन्हेगारांना कायद्याचा धडा शिकवणारे धडाडीचे अधिकारी म्हणून पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सोलापूरात आपली आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे. कठोर कारवाई आणि जनतेप्रती असलेली संवेदनशीलता या दुहेरी भूमिकेमुळे त्यांनी सोलापूरकरांची मने जिंकली असून, त्यांच्या यशस्वी दोन वर्षांच्या कार्यकिर्दीबद्दल तसेच वाढदिवसानिमित्त नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सोलापूर शहर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. गेल्या काही वर्षांत शहरासमोर गुन्हेगारीचे आव्हान उभे राहिले होते. अशा परिस्थितीत शहराची कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी कंबर कसली. आपल्या धाडसी कर्तृत्वाने, नियोजनबद्ध कामकाजाने आणि कठोर कारवाईच्या भूमिकेमुळे त्यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्याचे काम केले.
एम. राजकुमार हे त्यांच्या धमाकेदार आणि धडाडीच्या कारवाईसाठी ओळखले जातात. सोलापूरमध्ये पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून शहरातील गुन्हेगार, अंमली पदार्थ विक्रेते, टोळ्या आणि विविध बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असलेल्या घटकांविरोधात त्यांनी सातत्याने कारवाईची मोहीम राबवली.
“गुंडोवालों जरा होशियार, यहाँ के हम हैं राजकुमार!”
हा संदेश जणू त्यांनी आपल्या कार्यशैलीतून शहरातील गुन्हेगारांना दिला आहे. त्यांचा स्पष्ट संदेश एकच —
“कायद्यापुढे कोणीही मोठा नाही.”
एका बाजूला गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका, तर दुसऱ्या बाजूला सामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेणारा संवेदनशील आणि लोकाभिमुख अधिकारी, अशी एम. राजकुमार यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
गुन्हेगारांवर धडक आणि कडक कारवाई
सोलापूरमध्ये अंमली पदार्थांची समस्या, अवैध दारू, जुगार अड्डे, भूमाफिया, वाळू माफिया, गुटखा माफिया, घरफोडी, जबरी चोरी, खून, वाहन चोरी आणि इतर गंभीर गुन्ह्यांविरोधात विशेष मोहिमा राबवण्यात आल्या. या कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांचे धाबे दणाणले.
शहरातील अनेक बडे आणि कुख्यात गुन्हेगारांविरोधात कायदेशीर चौकटीत कठोर कारवाई करण्यात आली. राजकीय किंवा इतर कोणत्याही दबावाला बळी न पडता तडीपार, मोक्का आणि इतर कठोर कायदेशीर कारवायांचा प्रभावी वापर करून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
शहरात टोळीगिरी करून दहशत पसरवणाऱ्या आणि निरपराध नागरिकांना त्रास देणाऱ्यांना एम. राजकुमार यांच्या कठोर, धाडसी आणि बेधडक कारवाईला सामोरे जावे लागले. केवळ एखाद्या गुन्हेगारावर कारवाई न करता गुन्हेगारीच्या मुळापर्यंत जाऊन टोळ्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याची कार्यपद्धती त्यांनी स्वीकारली.
नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
एम. राजकुमार यांनी केवळ गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्यासाठीही विविध सकारात्मक उपक्रम राबवले.
- महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष पथक आणि मदत व्यवस्था अधिक सक्रिय करण्यात आली.
- शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले.
- वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी कडक अंमलबजावणीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.
- नागरिकांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
- गुन्हेगारीबाबत माहिती देणाऱ्या नागरिकांचा विश्वास टिकवून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यावर भर देण्यात आला.
“पोलीस तुमचे मित्र” संकल्पनेला प्रत्यक्ष रूप
पोलिसांविषयी समाजात विश्वास निर्माण करणे हे मोठे आव्हान असते. मात्र, पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी आपल्या कार्यपद्धतीतून हे शक्य करून दाखवले. नागरिकांना कोणत्याही अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी पोलीस प्रशासन तत्पर राहावे, यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले.
कठोर अधिकारी असतानाही जनतेच्या वेदना समजून घेणारे, संवेदनशील आणि भावुक व्यक्तिमत्त्व म्हणूनही एम. राजकुमार यांची ओळख आहे. याच गुणांमुळे सामान्य नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक मजबूत झाले आहे.
डीजेमुक्तीचा इतिहास रचणारे पोलीस आयुक्त
सोलापूर शहर हे उत्सवप्रिय शहर म्हणून महाराष्ट्रात ओळखले जाते. विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने मोठ्या मिरवणुका निघतात. या मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजाचे डीजे, लेसर किरणे आणि नागरिकांच्या आरोग्याला व सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या साधनांचा वापर वाढत होता.
या परिस्थितीचा संभाव्य धोका वेळीच ओळखून पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी धाडसी पावले उचलली. शहरातील विविध समाजघटक, नागरिक, आयोजक आणि राजकीय नेत्यांशी संवाद साधून डीजेच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली.
सामूहिक संवाद, जनजागृती आणि प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून सोलापूर शहराला डीजेमुक्त करण्याच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले. या उपक्रमामुळे महाराष्ट्रात डीजेमुक्तीचा इतिहास रचणारे पोलीस आयुक्त म्हणून एम. राजकुमार यांनी वेगळी ओळख निर्माण केली.
सोलापूरकरांचा एकच स्वर...
पोलीस आयुक्त म्हणून एम. राजकुमार यांना सोलापूरमध्ये पदभार स्वीकारून दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालावधीत त्यांच्या कार्यशैलीने सोलापूरकरांमध्ये सुरक्षिततेची भावना आणि पोलीस प्रशासनाविषयी विश्वास निर्माण केला आहे.
“गुन्हेगारांचा धसका, नागरिकांचा विश्वास — अशा धडाडीच्या पोलीस आयुक्तांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सोलापूरकरांसाठी दिलासादायक आणि समाधानकारक ठरला आहे.”
कठोर प्रशासन, धाडसी निर्णय, लोकाभिमुख कार्यशैली आणि जनतेप्रती असलेली संवेदनशीलता यामुळे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची कार्यशैली सोलापूरच्या इतिहासात विशेष ठसा उमटवणारी ठरत आहे.
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या पुढील वाटचालीस उत्तुंग यश लाभो आणि जनतेच्या सेवेसाठी त्यांचे कार्य अधिक प्रेरणादायी ठरो, हीच सोलापूरकरांची मनःपूर्वक सदिच्छा!
हार्दिक शुभेच्छा!
पोलीस आयुक्त मा. श्री. एम. राजकुमार साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
शुभेच्छुक.... Parivartan24news
1 month ago |[YT] | 6
View 0 replies
Parivartan 24 news
ब्रेकिंग न्यूज ,,, हैदराबाद रोड मुंळेगाव फाटा येथे अपघात झाला
मोठा अनर्थ टाळला
3 years ago |[YT] | 5
View 0 replies