नमस्कार मित्रांनो,
आपल्या सर्वांचं या मराठी युट्युब चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे ' Amey Pednekar'
या चॅनेल मध्ये आपल्याला आपले सण, उत्सव, खाद्य पदार्थांच्या रेसिपि, कौटुंबिक कार्यक्रम,
कोकण (पर्यटन स्थळे, देवस्थाने, सण ), कला आणि माझ्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टींचे विडिओ बघायला मिळतील.
तर चॅनेलला Subscribe करायला विसरू नका.
Amey Pednekar
जय सियाराम
मी काढलेली रांगोळी.
2 years ago | [YT] | 8
View 0 replies
Amey Pednekar
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
🙏🏻दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…🙏🏻
2 years ago | [YT] | 5
View 0 replies
Amey Pednekar
सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या खुप साऱ्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
2 years ago | [YT] | 4
View 1 reply
Amey Pednekar
जागतिक महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Women's day
3 years ago | [YT] | 5
View 0 replies
Amey Pednekar
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा महाराजा..........
आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा टोरा, म्हातारे कोतारे, मिळान साजारो करतत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा असात त दूर कर रे महाराजा....
जी काय बाहेरची भुतुरची इडा पीडा असात तिचा वाटोळा कर आणि लेकरा बाळाका सुखात ठेव रे महाराजा.
कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केला असात तर ता बाहेरच्या बाहेर निघाण जाऊं दे रे महाराजा..........
वडाची साल पिंपळाक कर आणि पिंपळाची साल वडाक
लावून तेचेच दांत तेच्याच घशात घाल रे म्हाराजा!
वर्षाच्या आत, तुझो गुण दाखव म्हाराजा!
बा म्हाराजा.. काय कोणाची करणी, मय माणता, जय जप गाऱ्हाणा असात तर तुझ्या पायाखाली घाल
कोणाक पोर होत नसात तर त्याक पोर होऊ दे, काम धंद्यात सर्वानका यश दे, पोरा टोराक शिक्षणात यश दे, कोणाचा लग्न जुळत नसात तर ता तुझ्या क्रुपेन जमानदे रे महाराजा.......
हे देवा महाराजा आज जो काय महाराष्ट्रात दुष्काळ पडलो हा, त्याचो तू नाय नाट कर आणि तुझ्या कृपा दुष्टीने भरभरून पाणी दे रे महाराजा........
होय महाराजा.......
हे देवा महाराजा आणि जो काय आजकाल पोरी टोरीन वर अत्याचार होतंत आणि जे करतत त्याचो नाय नाट कर रे महाराजा.....
होय महाराजा....
ह्या बघा देवक मी नारळ देऊन सगळ्यांच्या वतीने गराणा घातलाय
चला आता सगळ्यांनी पाय पडा आणि शिमगो खेळाक यवा.
बोला होळी रे होळी,
पुरणाची पोळी ............
सर्वांना होळी आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏻
अमेय पेडणेकर
3 years ago | [YT] | 14
View 0 replies
Amey Pednekar
चला हवा येऊद्या या कार्यक्रमातील विनोदी कलाकार श्री. कुशल बद्रीके यांच्याशी अचानक झाली भेट.
3 years ago | [YT] | 16
View 0 replies