Karmkand Darshan

कर्मकांड दर्शन हे एक विश्वासार्ह आध्यात्मिक यूट्यूब चॅनल आहे, जिथे सनातन हिंदू धर्माच्या परंपरेनुसार ज्योतिष शास्त्र, ग्रह-नक्षत्र, वास्तु शास्त्र, कर्मकांड, पूजा-विधी आणि शास्त्रशुद्ध उपाय यांची सविस्तर व सोप्या भाषेत माहिती दिली जाते 🙏

या चॅनलवर तुम्हाला मिळेल—
🔹 कुंडली अभ्यास, ग्रहदोष व त्यावरील शास्त्रीय उपाय
🔹 वास्तुदोष निवारण व गृहशांतीसाठी मार्गदर्शन
🔹 सत्यनारायण पूजा, हवन, यज्ञ, अभिषेक यांची योग्य विधी
🔹 जीवनातील अडचणींवर आध्यात्मिक व वैदिक उपाय
🔹 सनातन धर्मातील परंपरा, संस्कार व धार्मिक ज्ञान

कर्मकांड दर्शन चा मुख्य उद्देश म्हणजे समाजापर्यंत खरे, प्रमाणिक आणि शास्त्राधारित आध्यात्मिक ज्ञान पोहोचवणे, जेणेकरून प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी व सकारात्मक ऊर्जा नांदेल 🌿

आध्यात्मिक मार्गदर्शन, वैदिक उपाय आणि धार्मिक माहिती हवी असल्यास
कर्मकांड दर्शन या चॅनलला Subscribe करा व सनातन परंपरेशी जोडलेले रहा 🕉️✨

शास्त्र ही शस्त्र हे


Karmkand Darshan

​ ॥ श्री रेणुकअष्टक ॥
​माहुगडची माता रेणुका देवीच्या चरणी समर्पित हे अष्टक ऐकताना मनाला मिळणारी शांती आणि संगीताची अप्रतिम लय खरोखरच मंत्रमुग्ध करणारी आहे.
​धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष देणारी कल्पवृक्ष स्वरूपातील आई रेणुकेची ही स्तुती ऐकून मन प्रसन्न होते. या अष्टकातील शब्दांची मांडणी आणि संगीताचा गोडवा मनाला थेट मातेच्या चरणांशी नेऊन जोडतो.
​हे प्रभावी अष्टक नक्की ऐका आणि आई रेणुकेचा आशीर्वाद घ्या.
​सौजन्य: @HPDvinePath
विडियो लिंक: https://youtu.be/yALdZEUsHJk?si=Yklqp...
#renikaashtakam #renukamata #renukadevi #mahurgad

2 months ago | [YT] | 9

Karmkand Darshan

ब्रम्ह देव ज्यानं विषयी तुम्हास नसेल ही माहिती
हंस' वाहनाचे रहस्य
​ब्रह्मदेवांचे वाहन हंस आहे, जो 'नीर-क्षीर विवेका'चे प्रतीक आहे. हंस ज्याप्रमाणे दूध आणि पाणी वेगळे करू शकतो, त्याचप्रमाणे सृष्टी निर्माण करताना काय चांगले आणि काय वाईट याचा विवेक असावा, हे यातून सूचित होते
ज्ञानाचे मूळ उगमस्थान
​जरी आपण सरस्वतीला ज्ञानाची देवता मानतो, तरी 'ब्रह्मज्ञान' किंवा वेदांचे पहिले ज्ञाता ब्रह्मदेव आहेत. त्यांनीच हे ज्ञान सर्वात आधी ऋषी-मुनींना दिले. भगवान विष्णूंनी जेव्हा त्यांना वेदांचे ज्ञान दिले, तेव्हा त्यांनी ते आत्मसात करून सृष्टीची रचना केली.
स्वतःच्या शरीरातून निर्मिती
​असे मानले जाते की ब्रह्मदेवांनी सृष्टीच्या निर्मितीसाठी केवळ संकल्प केला नाही, तर त्यांनी स्वतःच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागातून विविध शक्ती निर्माण केल्या. उदाहरणार्थ, त्यांच्या मुखातून गायत्री, तर त्यांच्या सावलीतून 'कर्दम ऋषीं'चा जन्म झाला असे मानले जाते.

ब्रह्मदेव हे 'रजोगुणा'चे प्रतीक मानले जातात, कारण सृष्टीच्या निर्मितीसाठी क्रियाशीलता आणि ऊर्जेची आवश्यकता असते.
#DailyDevotion #SpiritualVibes #HinduDeity #DivineEnergy #Peace #Wisdom #AncientIndia #Dharma #ब्रह्मज्ञान #वेद #पुराण #हिंदूधर्म #भक्ती #मराठीसंस्कृती #परमेश्वर #सृष्टी #ज्ञान​#ब्रह्मदेव #Brahmadev #LordBrahma #सृष्टीरचयिता #CreatorOfTheUniverse #अध्यात्म #भारतीयसंस्कृति #Karmakand #SpiritualGrowth #karamkanddrashan

3 months ago | [YT] | 10

Karmkand Darshan

नालंदा कर्तृत्व गौरव पुरस्कार २०२६ आमच्या कार्याची पोच पावती

नालंदा कर्तृत्व गौरव पुरस्कार मिळणे हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे
हा सन्मान आमच्या कार्याची पोचपावती असून, आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच शक्य झाला आहे
यापुढेही आम्ही अधिक श्रद्धा, निष्ठा आणि प्रामाणिकपणे सेवा देत राहू
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार
टीम कर्मकांड दर्शन

#नालंदा #कर्तृत्वगौरव #पुरस्कार #TeamKarmakandDarshan #कर्मकांड #धार्मिककार्य #गौरवक्षण #Achievement #AwardWinning #ProudMoment #SpiritualJourney #SanatanDharma #VedicWork #SuccessStory #Blessings

3 months ago | [YT] | 11

Karmkand Darshan

गुढीपाडवा या दिवशी नेमके काय घडले असे मानले जाते?

4 months ago | [YT] | 7

Karmkand Darshan

काही पूजा या फक्त पूजा नसतात…
त्या एक आनंदमय कार्यक्रम बनून जातात आणि दिवसभराचा थकवा क्षणात घालवून टाकतात. ✨
आज अशीच एक पवित्र आणि मंगलमय भूमी पूजन विधी करण्याचा योग आला.
नवीन कार्याची सुरुवात पृथ्वी मातेला वंदन करून, वैदिक मंत्रांच्या साक्षीने करण्यात आली. 🙏
📍 हडपसर, पुणे, महाराष्ट्र
अशा प्रत्येक विधीतून परंपरा, श्रद्धा आणि आनंद यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.
– टीम कर्मकांड दर्शन
#भूमीपूजन #BhumiPujan #KarmakandDarshan #VedicRituals #SanatanDharma #Pune #Hadapsar #VedicTradition #HinduRituals #Maharashtra

4 months ago | [YT] | 11

Karmkand Darshan

📿 होलाष्टक म्हणजे काय?
फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंतचे ८ दिवस होलाष्टक म्हणून ओळखले जातात. या काळात शुभकार्य (लग्न, गृहप्रवेश, मुहूर्त इ.) टाळले जातात.
🔥 होलाष्टक का मानले जाते?
पुराणानुसार या दिवसांत भक्त प्रह्लाद यांना विविध प्रकारचे क्लेश देण्यात आले होते. त्यामुळे हा काळ अशुभ मानला जातो.

5 months ago | [YT] | 6

Karmkand Darshan

धानोरी परिसरात आयोजित उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकप्रिय आमदार मा. श्री. सुनील विजय टिंगरे साहेब उपस्थित होते.
या मंगलप्रसंगी त्यांच्यासोबत हा स्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा योग आला.
सामाजिक, विकासात्मक आणि लोकहिताच्या उपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या साहेबांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.
🙏✨ अशा उपक्रमांमुळे परिसराच्या प्रगतीला नवी दिशा मिळो, हीच सदिच्छा.
माननीय आमदार साहेबांचे मनःपूर्वक आभार.
🚩 जय महाराष्ट्र 🚩

5 months ago | [YT] | 12

Karmkand Darshan

आज सायलेंटली म्हंटलेलं श्री काळ भैरव अष्टक ज्याची लिंक मी खाली देत आहे
https://youtu.be/qR4n829tr7k?si=HYQNu...
हे मी ऐकलं आणि मन नकळत खूप शांत झालं.
शब्द कमी होते, पण परिणाम खूप खोल होता.
भीती नाही, उलट आधार मिळाल्यासारखं वाटलं.
डोळे ओले झाले, पण त्या अश्रूंमध्ये वेदना नव्हती—शांती होती.
काळ भैरवांची उपस्थिती मनाला भिडून गेली.
असा अनुभव देणाऱ्या या अष्टकासाठी मनापासून तुम्ही देखील एकदा नक्की श्रवण करा धन्यवाद...!
🙏🖤

5 months ago | [YT] | 9

Karmkand Darshan

सिन्नर–नाशिकचं शिव पंचायतन मंदिर खूपच पवित्र आणि शांत ऊर्जेचं स्थान आहे.
महादेवांसोबत गणपती, देवी, विष्णू आणि सूर्य—पंचायतन दर्शन झालं म्हणजे मन आपोआप स्थिर होतं 🕉️
इथे दर्शन घेतल्यावर जी शांती मिळते, ती शब्दांत सांगणं कठीणच.

5 months ago | [YT] | 11

Karmkand Darshan

कधी कधी नकळत काही सुंदर आठवणी तयार होतात…
तीन वर्षांपूर्वी अशीच एक हृदयात घर करून बसलेली सुंदर आठवण तयार झाली.

5 months ago | [YT] | 11