महाराष्ट्रातील mpsc आणि upsc च्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेतील उत्तरलेखना मध्ये सहकार्य करण्यासाठी आपण MAINS CIRCLE या intitave द्वारे मोफत मार्गदर्शन करत आहोत . जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आमचा उपक्रम पोहचवण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे.
Telegram channel link - @mainscircle_1
Contact number: 9767699352
#UPSC 2025 #MPSC2025 #MARATHI MEDIUM
UPSC MAINS CIRCLE
🛑 R.K.MERTON AND MIDDLE RANGE THEORY
आर के मर्टन यांना आपण नव प्रकार्यवादी (neo Functionalist) तसेच नव प्रत्यक्षार्थवादी ( neo Positivist) म्हणतो, त्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांचा मध्यम व्याप्ती चा सिद्धांत (MIDDLE RANGE THEORY) . जो अल्प अनुभववाद (raw empiricism) आणि पार्सन्स यांच्या बृहत् सिद्धांत (grand theory) या दरम्यानचा दुवा ठरतो. जिची त्रिनिती म्हणजेच सिद्धांत ,माहिती आणि पद्धतीशास्र आहे (theory,data and methodology) . ज्या द्वारे समाजशास्त्राचे उपयोजन अधिक अनुभवजन्य होते.
3 months ago | [YT] | 0
View 0 replies
UPSC MAINS CIRCLE
"Tomorrow, we're going to tackle the biggest challenge worth 500 marks. It all starts today, right now, because the message you're reading is itself a part of sociology. Yes, it begins with symbolic interactionism. When you come to the demo lecture tomorrow, some of you will arrive by bus, some by car, and some by bike, each representing a specific class-based stratification - that's sociology too. Even in the lecture, when I explain certain concepts based on evidence and facts, it will be positivist. When I share my experiences, it will be non-positivist. When you aspire to become an IAS officer and look up to certain individuals as role models, they become your reference group in sociological terms. The PRAYAAS through which you'll learn sociology isn't just an institution; it becomes a social system. Let's unravel how sociology is embedded in everything.
Welcome to the Sociology as a discipline
Onkar Kalidas Parte
6 months ago | [YT] | 1
View 0 replies
UPSC MAINS CIRCLE
https://youtu.be/t4ljX_jtn_U?si=7RccC...
6 months ago | [YT] | 0
View 1 reply
UPSC MAINS CIRCLE
🚨 लहान असताना सर्वात आवडता सुगंध कोणता? असा कोणी प्रश्न केला की आपसुकच उत्तर यायचं ' नवीन पुस्तकांच्या पानांचा ', पण खरा सुगंध द्विगुणित होतो जेव्हा ते पुस्तकं तुमचं स्वतःच असतं.* ♥️🖋️ *Thank you so much Prayaas Education Publication* 😊
8 months ago | [YT] | 6
View 0 replies
UPSC MAINS CIRCLE
🔴 संत साहित्य
होईल तो भोग भोगीन आपुला । न घाली विठ्ठला भार तुज ।।
तुम्हापासाव हे इच्छीतसे दान । अंतरीचे ध्यान मुखी नाम ।।
न ये काकुलती गर्भवासासाठी । न धरी हे पोटी भय काही ।।
तुका म्हणे मज उदंड एवढे । नाचेन मी पुढे मायबापा ।।
:- जगतगुरु संत तुकाराम महाराज
उपरोक्त अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवंताला सांगतात, मला माझ्या जीवनाच्या निश्चित भागातून मुक्ती नको, किंवा तशी अपेक्षा ठेवून मी भक्ती करत देखील नाही. जे भोग आहेत ते मी भोगिल. जीवनाच्या मुक्ती साठी (असंख्य गर्भांच्या मुक्ती साठी ) मी भक्ती करत नाही. मला फक्त इतकेच दान हवे आहे की तुझे नाम माझ्या मुखी रहावे. मी याच आनंदात हर्षोल्हासने नाचेन.
इतका शुद्ध भक्ती भाव असावा.
जे श्रीकृष्णाने भगवतगितेतून मांडताना निष्काम कर्म सांगितले तेच भक्तिभावातून तुकाराम महाराजांनी मांडले.
अर्थात भक्ती केवळ भक्ती साठी अन्य कोणत्याही स्तूप्त इच्छे साठी नव्हे.
सदर संत साहित्य ethics आणि essay साठी खूप महत्त्वाचे ठरते. तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवर अजून अनेक अभंग गोळा करू शकता.
तुमचाच विद्यार्थी मित्र
ओंकार पारटे
t.me/Mainscircle
9 months ago | [YT] | 1
View 0 replies
UPSC MAINS CIRCLE
🔴 खास MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी
कालच MPSC च्या PRELIM चा अनपेक्षीत किंवा माहीत असूनही कानाडोळा केलेला कटऑफ कळाला जो तुम्हा आम्हाला चिंताग्रस्त करणारा होता.
अर्थात हा शेवटचा objective पॅटर्न ने होणारा पेपर होता , त्यामुळे तुमच्या पैकी अनेकांना याचा त्रास झाला असेल.
असो सांत्वनाचे शब्द दुबळ बनवतात आणि वास्तवाचे कठोर.
समोर येणार सत्य न स्वीकारता आपण स्वतःला अद्वितीय समजतो आणि आपण या वेळी नक्कीच यशस्वी होऊ अस वाटणं नैसर्गिकच.
मग अगदी कालपरवा अभ्यास सुरू केलेल्या विद्यार्थ्यांना ही वाटू लागत की, " काय सांगता येत थोडा अभ्यास करून आपली ही exam निघू शकते, उगाच आतापासून descriptive चा अभ्यास कशाला? असेही आपण याच exam मध्ये पास होऊन जाऊ."
मग असे वाटणारे दोन चार हजार नव्हे तीन चार लाख असतात.
अगदी काल च्या result मधून सुद्धा जरी सहा-सात हजार विद्यार्थी मुख्य परीक्षे साठी पात्र ठरले असले तरी होणार मात्र फक्त 470(approx) . म्हणजे उरलेले जवळपास साडेसहाहजार काय करणार? पण हे सगळ कागदावरच गणित तुम्ही आता जरी काल result मध्ये नाव असणाऱ्या कोणालाही ज्याचा अगदी mains चा अभ्यास शून्य आहे, त्याला सुद्धा तू जर झाला नाहीस तर descriptive करणार का? अस विचारलं तर तो एक तर हे मान्य च करणार नाही की, तो होणार नाही. प्रत्येक जन स्वतः ला एकमेवाद्वितीय मानतोच , त्यातीलच हा प्रकार.आणि जरी मान्य केलं तरी
त्याही पुढे ग्रुप C च गाजर आहेच. जे कोणालाही descriptive ची तयारी करण्यापासून रोखू शकतच.
काही गोष्टी पटत नाहीत किंवा पटत ही नव्हत्या , अनेकांना अनेकदा समजावून सांगितलं अजून वेळ आहे किमान ऑप्शनल करून घ्या. डिस्क्रिप्टीव म्हणजे संकट नव्हे, तुम्हाला एक वेगळी संधी आहे. तुमचं वेगळे पण व्यक्त करायची .
असो Mpsc ची पंढरी अशी आहे की इथे सेन्स ऑफ ह्युमर ऐवजी सेन्स ऑफ रुमर (अफवा) जास्त आहेत.
मग यशाची दिंडी एकाच वर्षासाठी घेऊन येणारा कधी इथला पंचवार्षिक वारकरी होतो. हे त्यालाही समजत नाही.
अगदी स्पष्ट बोलायला गेल तर येणारा काळ डिस्क्रिप्टीव चा आहे.
अपयशाची होळी करायला, यशाचा शिमगा करायला आणि पोस्ट च्या पूरण पोळ्या खायला , दूरदृष्टी ठेवावी लागेल. आली exam की झालो अस होत असत तर तुमचा प्रत्येक मित्र मैत्रीण पोस्ट होल्डर असता.
बाकी तुम्ही सगळ जाणताच. दारिद्य्र निखळ असत पुष्कळदा वैभवाच्या खाली चिखल असतो. असाच चिखल त्या प्रत्येक झगमगणाऱ्या स्वप्नात आहे. त्यापेक्षा वास्तवातील अज्ञानाच दारिद्र्य ओळखा आणि जागे व्हा.
काही वाटल तरी नक्की बोला.
तुमचाच विद्यार्थी मित्र
ओंकार पार्टे
9767699352
t.me/Mainscircle
9 months ago | [YT] | 2
View 0 replies
UPSC MAINS CIRCLE
🚨 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024
नुकत्याच लागलेल्या result नुसार , राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या कट ऑफ ने उच्चांकी पातळी गाठली आहे. 117.5 असाही कट ऑफ असेल असा कोणी अंदाज बांधला नसेल.
असो आपल्या साठी यातून काही संकेत मिळतात
जसे की,
UPSC करणारे किंवा UPSC ची PRELIM सहजरित्या काढणारे MPSC ची PRELIM कोणताही अधिकचा अभ्यास न करता काढू शकत नाहीत.
तुम्हाला जाणीवपूर्वक राज्यसेवा चे PYQ पाहावेच लागतील. वेळ प्रसंगी Current affairs, Science, Geography, History या सारख्या विषयांना Mpsc च्या दृष्टीने तसेच राज्यभिमुख करावे लागेल.
अर्थात हेच सर्व विद्यार्थी Mpsc ची 2025 ची prelim पुन्हा देणार त्यामुळे या सर्वांना मागे टाकणं नवीन तसेच UPSC च्या विद्यार्थ्यांना सहज निश्चितच जाणार नाही.
यासाठी वेळेतच( नवीन मुलानी किमान मे महिन्या नंतर ) Prelim ची तयारी चालु करू शकता.
चार महिन्यात वरील विषय व PYQ होतात.
तोपर्यंत मेन्स करता येऊ शकते. तुमचा ऑप्शनल आताच होणे आवश्यक आहे.
PRELIM आणि MAINS यातील कोणत्याच स्टेज ला कमी न लेखात, समतोल साधत अभ्यास सुरू ठेवा.
तुमचाच विद्यार्थी मित्र
ओंकार पारटे
10 months ago | [YT] | 0
View 0 replies
UPSC MAINS CIRCLE
🔴 Essay writing
या अकल्पनीय बुद्धिमतेच्या आणि अचंबित करणारे साधेपणा टिपणाऱ्या व्यक्ती च्या कित्येक कविता तूम्ही तुमच्या निबंध लिखाणात वापरू शकता. क्षणात तुमच्याही लिखाणाचा दर्जा वाढवणारा हा परिस स्पर्श आहे.
# आद्यकवी कुसुमाग्रज ❤️
10 months ago | [YT] | 2
View 0 replies
UPSC MAINS CIRCLE
🎯🔴UPSC BOOKLIST मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
UPSC MAINS CIRCLE
🚨मराठीतून UPSC/MPSC descriptive ची तयारी खरचं अवघड आहे का?
जेव्हा आपण मराठीतून सुरवात करतो, तेव्हा सर्वात मोठा प्रश्न असतो मराठीतून टॉपर आहेत का? किंवा होतात का?
अर्थातच आपल्याला काहीच माहीत नसते आणि याचाच सर्वाधिक फायदा होतो coaching institutes ला. जेव्हा जेव्हा exam बाबत अस्थिरता असते तेव्हा तेव्हा guidance ची गरज भासते. मग गरज जर guidance ची आहे, तर मग आपण शिकवणी का लावतो. Graduation नंतर ही खरचं आपल्याला कोणी शिकवत बसण्याची आवश्यकता असते का? जी गोष्ट वाचून समजू शकते you tube वरून clear होऊ शकते तिच्या साठी दररोज ४-४ तासांचे क्लास कशासाठी?
तुम्हाला काय हवय ? हे स्पष्ट असायला हव.
कारण जर तुम्हाला फक्त जाणून घ्यायच आहे की संदर्भ साहित्य काय वापरू? तर मग कोचिंग ची सक्ती का?
शेवटी येवढ्या मोठ्या exam ची तयारी करताय तर एकच गोष्ट लक्षात घ्या . नोट्स तुमच्या तुम्हाला काढणे आहे . Writing तुमच तुम्ही केलं पाहिजे. कोणताही क्लास हे करत नाही तस फुकटची आश्वासने आणि रद्दी समान नोट्स साठी तुम्हाला हे करायच असेल तर खुशाल करा. यातून तुमचेच लाखो रुपये जातील.
या नंतर एक मोठी समस्या आहे की ज्या प्रमाणे इंग्लिश आणि हिंदी मिडीयम च्या मुलांना मटेरियल त्यांच्या भाषेत प्राप्त होत तितकं material मराठीत नाही.
अंशतः हे खर आहे, पण पूर्ण सत्य नाही. माझ्या पहिल्या मेन्स ला मला हेच वाटायचं की का व्हिजन आयएएस सारखं सेम current मला कोणी मराठीत translate करून देत नाही.
पण मी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले. की अनेक mpsc साठी उपलब्ध असणारी current ची मासिके बहुतांश महत्वाच्या घडामोडी मराठीत देतात. आता माझी इच्छाच शब्दशः भाषांतराची असेल तर ती कुठेच शक्य नाही.
यानंतरच्या मेन्स ला मी अनेक मराठी मासिके पाहिलीत त्यातून मला हवा तो शेलका data, points उचलले . कदाचित त्याचं योगदानही मोठं होतच .
यानंतर मेन्स चे writing न करता केवळ नोट्स गोळा करण्याचा मोह आपल्याला नोट्स collector करतो. कदाचित या मुळे सुद्धा demand च समजली नाही तर नोट्स उपलब्धच नाहीत. मराठीत काहीच नाही मराठी घेऊन चुकलो असा कांगावा करायला आपल्याला अधिक सोयीस्कर जात.
अगदी optional सुद्धा 250+ चा हवा असेल तर इंग्लिश मटेरियल वाचण्या शिवाय पर्याय नाही. त्यातही काही लोकप्रिय optional सोडले तर बाकीच्या optional चे फारसे कंटेंट मराठीत उपलब्ध नसल्याने translation चा problems होतोच. अर्थात तोही टाळता येतो. वेळेतच तुमच answer writing तपासून , तुमच्या मार्गदर्शकां सोबत बोलून.
शेवटी क्लास नसला तरी चालेल. परंतु एक खात्रीलायक मार्गदर्शक हवाच.
त्यातही prelim नावाचं भूत मराठीत करून उपयोग नाही. नाहीतर शब्दांचा खेळ समजण्यात prelim जाते.
या सगळ्या गोष्टी प्रत्येक मराठी aspirant च्या पाचवीला पुजल्या आहेत याची मला खात्री आहे. कारण मी या सर्वातून गेलोय. त्यामुळेच सांगेल तुम्ही स्वतः वेळेत सावध व्हा आणि जवळच्या प्रत्येकाला सावध करा. योग्य निवड करण्यासाठी कारण चककणारी प्रत्येक गोष्ट सोने नसते. आणि गुणवत्तापूर्ण गोष्टींना जाहिरातीची आवश्यकता नसते.
तुमचाच विद्यार्थी मित्र
ओंकार पारटे
9767699352
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
Load more