2 Cutting Podcast

At 2 Cutting, we brew more than just tea—we brew stories. Join us as we sit down with real-life personalities, from successful businessmen and inspiring actors to visionary politicians and deep thinkers. Our conversations are unfiltered, insightful, and packed with wisdom that you can sip on while you enjoy your own cup of tea.

In each episode, we delve into the journeys, challenges, and triumphs of our guests, offering you a blend of inspiration and practical advice. Whether you're an aspiring entrepreneur, a creative mind, or simply someone who loves a good story, 2 Cutting is the place to be.



2 Cutting Podcast

कंटेंट क्रिएशन असो किंवा कंटेंट क्रिएटर असो सध्या त्याकडे थोडं नकारात्मक प्रकारे पाहिले जाते मात्र हाच दृष्टिकोन बदलायला भाग पाडणारी एक कंटेंट क्रिएटर म्हणजे सायली वाघ. गावकडचा एकदम साधा, सोपा आणि सरळ कंटेंट बनवणारी या युवतीला 9 लाखांहून अधिक फॉलोअर्स फॉलो करतात. तिच्या याच कंटेंट क्रिएशनचा प्रवास जाणून घेण्यासाठी 2 कटिंग पॉडकास्ट या यूट्यूब चॅनेलवर पॉडकास्टसाठी आमंत्रित केले होते. हा सर्व प्रवास आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही आशा करतो तुम्हाला तो नक्कीच आवडेल.


#sayaliwagh #sayliwagh #2cuttingpodcast

7 months ago | [YT] | 14

2 Cutting Podcast

बीप (इव्हेंट बीप) या संकल्पनेचे व ॲपचे संस्थापक सदस्य श्री. सौरभ मंगरुळकर यांनी 2 कटिंग पॉडकास्टला भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत त्यांनी निर्माण केलेल्या ॲप बद्दल तसेच यातून तरुणांसाठी नोकऱ्या कश्या पद्धतीने उपलब्ध होतात हे जाणून घेतले. यावेळी त्यांनी या ॲपची उपयुक्तता तर सांगितलीच सोबतच त्यांनी शार्क टँक मधील अनुभव देखील सांगितला. हा संपूर्ण व्हिडिओ आम्ही आमच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केला असून आपण हा संपूर्ण नक्की पहा व तुमच्या प्रतिक्रिया कळवा.

#eventbeep #beep #jobs #maharashtra #marathi #podcast #marathipodcast #sharktankindia

8 months ago (edited) | [YT] | 7

2 Cutting Podcast

डीपी हाऊस ऑफ मिडीयाच्या माध्यमातून काम करणाऱ्या युवा उद्योजिका व ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असणाऱ्या देवयानी पवार यांनी 2 कटिंग पॉडकास्ट या यूट्यूब चॅनेलच्या स्टुडिओला भेट दिली. महिला दिनानिमित्त खास त्यांची मुलाखत घेतली असून समाजामध्ये महिलांना भेडसावणारे विविध प्रश्न तसेच युवक व युवतींच्या रोजगाराबद्दल व नोकरीच्या संधीवर देखील त्यांनी भाष्य केले. AI च्या काळात व्यवसायाच्या व नोकरीच्या संधी यावर बोलत असताना जगातील स्पर्धात्मक युगावर देखील भाष्य केले. दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये भारतातर्फे सामील होणाऱ्या त्या अवघ्या दुसऱ्या भारतीय ठरल्या असून यावेळी त्यांनी तिथे विविध प्रश्न उपस्थित करून परिषदेचे लक्ष वेधले. लवकरच संपूर्ण पॉडकास्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत व यासाठी आमच्या युट्युब चॅनेलला नक्की भेट द्या.

Miss. Devyani Pawar’s Podcast on Women’s Day at 2 Cutting Podcast, Davos World Economic Forum, Womens From Indian Rural Area, AI and Opportunities for Youth, Digital Marketing and Business Growth.

#devyanipawar #globalshapers #globalshaperscommunity #davos #worldeconomicforum #digitalmarketing #podcast #marathi #marathipodcast #baramati #2cuttingpodcast #womensdayspecial #womensday

9 months ago | [YT] | 7

2 Cutting Podcast

श्रावणी सावंत ही अगदी 10 वी मध्ये असणारी मुलगी आज इंस्टाग्राम वर ट्रेंडिंग कंटेंट बनवते व तिच्या कंटेंटचे फॅन अगदी घराघरात तिचे व्हिडिओ पाहतात. इंस्टाग्राम वरील श्रावणीचा हा प्रवास नक्की सुरू कसा झाला? हे जाणून घेण्यासाठी आपण थेट तिच्यासोबत संवाद साधुया. अगदी कमी वयात ती कंटेंट कशी बनवते इथपासून ते फेम प्राप्त झाल्यावर तिचा प्रवास त्याचसोबत अभ्यास व सोशल मिडीया याचे संतुलन कशी साधते यावर देखील चर्चा झाली.

आम्ही हा पॉडकास्ट तुमच्यासाठी प्रदर्शित केला असून तुम्ही नक्कीच हा पॉडकास्ट संपूर्ण पहाल अशी अपेक्षा आहे.

#influencer #ReelStar #marathireels #marathi #podcast #socialmedia #socialmediainfluencer

10 months ago (edited) | [YT] | 2

2 Cutting Podcast

प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर वीरू वज्रवाड (@veeruvajrawad )यांनी सांगली सारख्या भागातून कॉमेडी कंटेंट तसेच सामाजिक कंटेंट, गाणी आणि वेब सिरीज देखील बनवल्या आहेत व त्यातून संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली आहे. आज 2 कटिंग पॉडकास्टच्या सेट ला वीरू वज्रवाड यांनी भेट दिली व यावेळी आपण त्यांचा पॉडकास्ट घेतला व लवकरच आम्ही तो प्रदर्शित करीत आहोत.


#veeruvajrawad #contentcreator #2cuttingpodcast #marathicontent #comedyking #podcastcomingsoon

10 months ago (edited) | [YT] | 22

2 Cutting Podcast

पॉडकास्टसाठी पुढचा पाहुणा कोण असावा ?

10 months ago | [YT] | 3

2 Cutting Podcast

प्रसिद्ध लेखक व व्यावसायिक श्री. शरद तांदळे सरांनी 2 कटिंग पॉडकास्टला भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत संवाद साधला व आम्ही हा पॉडकास्ट तुमच्यासाठी प्रदर्शित केला असून तुम्ही नक्कीच हा पॉडकास्ट संपूर्ण पहाल अशी अपेक्षा आहे.

आमच्या नव्या पॉडकास्टमध्ये प्रसिद्ध लेखक व व्यावसायिक श्री. शरद तांदळे यांच्याशी खास संवाद!
https://youtu.be/aJaEM1SJ-bo?si=O1mlG...

#मराठी #महाराष्ट्र #मराठीस्टेटस #sharadtandale #marathi #maharashtra #podcast #marathistatus #2cuttingpodcast

10 months ago (edited) | [YT] | 9

2 Cutting Podcast

अवघ्या 15 व्या वर्षी इन्स्टाग्रामवर कंटेंट क्रिएशन करून 3 लाखांहून अधिक फॉलोवर्स असणाऱ्या श्रावणी सावंतने आज 2 कटिंग पॉडकास्टला भेट दिली. यावेळी तिचा संपूर्ण प्रवास आम्ही जाणून घेतला व अभ्यास आणि कंटेंट क्रिएशन मध्ये समतोल कसा साधते हे देखील जाणून घेतले. लवकरच आम्ही हा पॉडकास्ट तुमच्या भेटीसाठी घेऊन येत आहोत.


#shravanisawant #influencer #podcast #marathi #marathipodcast #2cuttingpodcast

10 months ago | [YT] | 5

2 Cutting Podcast

शेअर मार्केट पॉडकास्टमधून तुम्हाला सर्वाधिक उपयुक्त माहिती कोणी दिली ?

10 months ago | [YT] | 6

2 Cutting Podcast

2 कटिंग मध्ये कोणता विषय ऐकायला आवडेल ?

10 months ago | [YT] | 3