All god All history

About
Hello Friends This chennel and all videos rom this chennel is for only information purpose only. DiclaimerThe information provided in this channel and its videos is for general purposes and should not be considered as professional advice. This video for informational purpose. Any information provided in this video should not be considered as a substitute for prescriptions suggested by local beauty, diet and health care professionals. Viewers are subjected to use information provided in video on their own risk. This channel doesn't take any responsibility for any harm, side-effects, illness or any health or skin care problems cased due to use of our content, information or anything related to this video. #Besttips Thank u !!

All god All history

दीपावली पूजा 2025 दिंडोरी प्रणित
श्री स्वामी समर्थ
दिवाळी २०२५ चे वेळापत्रक
याची सुरुवात नरक चतुर्दशी म्हणजेच छोटी दिवाळीने होते आणि भाऊबीजला या सणाचा समारोप होतो. यावर्षी अमावस्या तिथी २० ऑक्टोबरला दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी सुरू होईल आणि २१ ऑक्टोबरला संध्याकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी संपेल. त्यामुळे दिवाळीचा सण २१ ऑक्टोबरला साजरा केला जाईल.

2 months ago (edited) | [YT] | 4

All god All history

कारुण्य सिंधु भव दु:ख हारी...तुज विण शंभु मज कोण तारी…हर हर महादेव ! महाशिवरात्रीनिमित्त नातेवाईक, मित्र आणि प्रियजनांना हार्दिक शुभेच्छा

10 months ago | [YT] | 5

All god All history

कालभैरव जयंती सर्वांना हार्दिक शुभेच्छा

1 year ago | [YT] | 16

All god All history

🙏🌳 आधार जीवांचा श्रीगुरुमाऊली 🌹🙏

🌹🙏 आज #गोरक्षनाथ महाराज प्रकट दिन आहे.🙏

🌹देवांचा #मिलिटरी फोर्स म्हणजे नवनाथ महाराज 🌳

👇🌳 ‼️आज ही #सेवा करावी‼️☘️👇

🙏🌳 #नाथ संप्रदायातील दुसरे प्रमुख अवतार🌹🙏

‼️ #आजही ते चैतन्य स्वरुपात गिरनार पर्वतावर वास्तव्य करून भगवान दत्तात्रेयांच्या सेवेत आहेत.‼️

‼️ #ध्यान मंत्र ‼️

‼️मृगस्थली स्थलीपुण्या भालनेपालमंडले ।
यत्र गोरक्षनाथेन मेघमालाऽऽसनीकृता ।।‼️

‼️🙏 🌳आज '#कार्तिक शुक्ल त्रयोदशी' नाथ संप्रदायातील महान श्री गोरक्षनाथ महाराज* यांचा प्रकटदिन आहे .गाईच्या शेणात म्हणजे गोवर गिरीतून प्रकटले म्हणून त्यांचे नाव गोरक्षनाथ असे त्यांचे गुरू मच्छिन्नद्रनाथ यांनी ठेवले.

‼️🙏 #महायोगी श्रीगोरक्षनाथ यांना बोली भाषेत ‘गोरखनाथ’ या नावाने संपूर्ण भारतीय उपखंडात ओळखतात. दक्षिण भारतात ‘कोरक्कर नाधार’ हे त्यांचे नाव प्रचलित आहे. ‘गो’ म्हणजे इंद्रिये. इंद्रिये ताब्यात ठेवणारे ते *"गोरक्षनाथ"*

🙏‼️🌳 #संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांनीही त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. श्रीज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात श्रीगोरक्षनाथांच्या कुंडलिनी योगाचे निरूपण सुद्धा केले आहे.

🌳‼️🙏श्री स्वामी माऊली 🙏‼️☘️

1 year ago | [YT] | 21

All god All history

दिवाळीच्या सर्व सदस्यांना व सबस्क्राईब यांना दीपावलीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुमच्यावर तुमच्या परिवारात
मेंबरशिप केलं चालू आहे ज्यांना जगदंबा घ्यायच्या असतील त्यांनी घेऊ शकता

1 year ago | [YT] | 28

All god All history

श्री स्वामी समर्थ

आज वसुबारस. दिवाळीचा पहिला दिवस. गाय भगवान श्रीकृष्ण यांना अतिशय प्रिय. श्री गुरू दत्तात्रेयांबरोबर सुद्धा कायम गाय असतेच. आपण तिला माता मानतो. गोमाता. पृथ्वी प्रमाणेच ती सुद्धा ममत्व, क्षमाशीलता आणि सात्विकता यांचं प्रतिक. कुणी कसंही वागलं तरी आपला हा अंगीभूत स्वभाव गोमाता कधीच सोडत नाही. तिच्या डोळ्यातलं कारुण्य आणि प्रेम पाहिलं की वाटतं आपली साधना कशासाठी तर याच गुणांचा आपल्यातही अंगिकार व्हावा म्हणून. ओढून ताणून नव्हे तर तोच आपला स्वाभाविक, नैसर्गिक, सहजसुंदर असा स्वभाव बनावा म्हणून !

* * वसुबारस निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा*

1 year ago | [YT] | 5

All god All history

कोजागिरी पौर्णिमा 2024 मांडणी कशी करावी

1 year ago | [YT] | 6

All god All history

Welcome to my channel
तुम्ही आम्हाला जॉइन धन्यवाद

1 year ago | [YT] | 6

All god All history

*गुढीपाडवा*🪷🪷🌿🌿
*(चैत्र शु. १), (दि.९ एप्रिल २०२४)*
या दिवसापासून मराठी नवीन वर्षात प्रारंभ होतो. हा दिवस वर्षातील चार मुख्य मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन कार्यास शुभारंभ करतात. *याच दिवशी श्रीराम नवरात्र व चैत्र नवरात्र प्रारंभ होतो*. म्हणून *चैत्र नवरात्र पासून श्रीराम नवमीपर्यंत श्री राम रक्षा पठण करावी*.
*चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत कुटुंबातील महिलांनी कुलस्वामिनीची सेवा म्हणून श्री दुर्गा सप्तशतीचे १४ किंवा २१ पारायण करावेत.*

चैत्र शुद्ध प्रतिपदेस *ब्रह्मध्वजारोहण* करतात, म्हणजेच गुढी उभारतात.
*कृती*... सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घेऊन त्यास तेल लावून, गरम पाण्याने स्नान घालावे. या काठीस हळदी कुंकवाचे पट्टे ओढा. नंतर त्याच्या निमुळत्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून ठेवून त्याच्या समवेत कडुनिंबाचा पाला ,चाफ्याच्या फुलाची माळ, साखरेचे कंकण, गाठीची माळ या गोष्टी एक सूत्राने पक्क्या बांधून त्यावर कलश सदृश एखादे पात्र उपडे झाकावे.
ही गुढी आपल्या गृहप्रवेशासमोर (जवळ) उभी करावी व ती पक्की बांधावी. गुढीच्या खाली नैवेद्यासाठी पाट ठेवावा. रांगोळी काढावी. दाराला आंब्याचे पानांचे तोरण बांधावे. पुढील ध्यानमंत्र गुढी उभारण्याच्या आधी म्हणावा.
*ब्रह्मध्वज नमस्तेs स्तु सर्वाभिष्ट फलप्रदे l*
*प्राप्तेsस्मिन् संवत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू l l*
*अर्थ*..... ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो. सर्व प्रकारचे फल मला मिळू दे. या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल व्हावे, ही प्रार्थना हा मंत्र म्हणून झाल्यानंतर
*"ॐ ब्रह्मध्वजाय नमः l"*
या मंत्राने गुढीची पंचोपचार पूजा श्री स्वामी समर्थ सेवा मासिकात दिल्याप्रमाणे करावी. पूजा झाल्यावर गुढी घराबाहेर उभी करावी.
घरातील पूजा झाल्यानंतर *नवीन पंचांगावरील श्री गणेशाचे पूजन करावे.* *पंचांगात प्रारंभी दिलेले संवत्सर फल वाचावे.*

.*दुपारी सर्व शेतकरी सेवेकऱ्यानी आपल्या शेतात मध्यभागी खड्डा करून त्यात सीतामातेचा नैवेद्य अर्पण करावा*.

चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकऱ्यांनी वडाच्या झाडाची तीन इंच लांबीची मुळी आणावी. ही मुळी व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंबप्रमुखांनी आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ *'श्री स्वामी समर्थ'* जप करावा .नंतर त्या वस्तू पाटावर ठेवून त्यांची पंचोपचार पूजा करावी व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या खिळ्यास ती टांगावी. *या उपायामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार व बाधा व संकटे यापासून संरक्षण होते*.
या दिवशी कडुनिंबाचा पाला फुले, हिंग, जिरे, मीरे ,ओवा, गुळ यांचे मिश्रण करून घ्यावे व ते मिश्रण घरातील सर्वांना द्यावे. कडुनिंब हे अमृता पासून उत्पन्न झालेले असल्याने ते जंतुनाशक आरोग्यदायी आहे. त्याचे सेवन आता प्रतिकात्मक मानले जात असले तरी त्याचे नित्य अनाशा पोटी सेवन केल्यास शरीर सुदृढ निरोगी राहते. अनेक रोगांवर त्याचा उपयोग होतो.
सर्व शुभकार्याचा मंगलमूर्त पाडवाच होय. म्हणून या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ करावा *फक्त विवाह व उपनयन (मुंज) यास हा मुहूर्त नाही.*

1 year ago | [YT] | 7

*...........श्री स्वामी समर्थ

1 year ago | [YT] | 9