गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
नांदेड/भोकर | विज्ञानाच्या युगात देश प्रगतीच्या वाटेवर असताना, समाजात आजही अंधश्रद्धेचे भयावह रूप कायम असल्याचे पुन्हा एकदा भोकर तालुक्यात उघडकीस आले आहे.
गुप्तधनाच्या हव्यासापोटी एका तरुणाला नरबळीच्या दिशेने ढकलण्याचा धक्कादायक प्रकार भोकर तालुक्यातील बल्लाळ शिवारात समोर आला असून, या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. बल्लाळ येथील एका शेतात गुप्तधन असल्याच्या अंधश्रद्धेतून हा थरारक प्रकार घडला.
मंगळवारी (दि. ४) रात्री आरोपींनी श्रीकांत बाजेकर या तरुणाला शेतात नेले. तेथे त्याला बळजबरीने कपडे काढायला लावून गळ्यात लिंबाची माळ घालण्यात आली. त्यानंतर लिंबू, मिरची, हळद, कुंकू, नारळ आदी साहित्य वापरून त्याच्याकडून तथाकथित अघोरी पूजा करून घेण्यात आली.
या अमानुष प्रकारामुळे श्रीकांत प्रचंड घाबरून गेला होता. दरम्यान, या घटनेची चर्चा गावात पसरताच त्याचा भाऊ सिद्धांत शेषेराव बाजेकर यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व पूजेचे साहित्य जप्त केले.
नरबळीचा डाव? पोलिसांचा सखोल तपास
पीडित तरुणाला विवस्त्र करून अघोरी पूजा करायला लावण्यात आल्याने, हा नरबळीचा प्रयत्न होता का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. गुप्तधनासाठी अशा प्रकारे माणसाच्या जीवाशी खेळ करण्याचा हा प्रकार असल्याने पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यासह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास अधिक तीव्र केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण भोकर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, अंधश्रद्धेविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
Hi everyone, welcome to my new YouTube Community. Now you can post on my channel too. To get started, tell me in a post what you'd like to see next on my channel. Visit my Community: youtube.com/@almnetwork-7/community
हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजी DRUCC सदस्य गौतमचंद सुरजमल पिंचा, गणेशराव शिंदे आणि प्रवीण कोमावार यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद जनरल मॅनेजर यांच्या दौऱ्यादरम्यान पत्र देत हिमायतनगर, नांदेड व परिसरातील प्रवाशांच्या सुविधांसाठी रेल्वे सेवांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडत चार महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आदिलाबाद–परळी वैजनाथ पॅसेंजर (गाडी क्र. 57564) ला एक्सप्रेस दर्जा देऊन वेळापत्रकात सुधारणा करावी, जेणेकरून ही गाडी सकाळी १० वाजेपर्यंत परळी वैजनाथ येथे पोहोचेल अशी प्रमुख मागणी आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
तसेच पनवेल–हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस (गाडी क्र. 17613) चे वेळापत्रक पहाटे ४.२० वाजता निश्चित करावे, जेणेकरून आदिलाबाद व नांदेड येथील प्रवाशांना 77615 या गाडीशी सोयीस्कर कनेक्शन मिळू शकेल, असे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय नागपूर–नांदेड- नागपूर नवीन एक्सप्रेस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, यामुळे मराठवाडा व विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच दीक्षाभूमी एक्सप्रेस (11045/11046) ला हिमायतनगर रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या सेवेचा लाभ प्रवाशांना मिळत नसल्याने ही मागणी जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर विचार करू असे आश्वासन देण्यात आले आहे.
दरम्यान गुरुवारी दुपारी सिकंदराबाद रेल्वे विभागाचे डिव्हिजनल जनरल मॅनेजर यांनी हिमायतनगर रेल्वे स्थानकाला प्रत्यक्ष भेट देत येथे सुरू असलेल्या अमृत भारत योजनेतील विकासकामांची पाहणी केली. कामांच्या प्रगतीबाबत माहिती घेत त्यांनी संबंधित ठेकेदाराला कामाच्या दर्जात सुधारणा करण्याच्या तसेच विकासकामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी नांदेड रेल्वे डिव्हिजनचे वरिष्ठ विभागीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी–कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त उपस्थित होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे आणि अमृत भारत योजनेतील कामांना मिळालेल्या गतीमुळे हिमायतनगर–नांदेड रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुविधा सुधारण्याच्या अपेक्षा बळावल्या असून, दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व तालुक्यात महावितरणच्या कारभारातील गंभीर गैरप्रकार उघडकीस आला असून, कोणतीही अधिकृत परवानगी, डिमांड नोट किंवा नोंद नसताना बसविण्यात आलेला एक अनधिकृत ट्रान्सफॉर्मर अखेर उपविभागीय कार्यालयात जमा करण्यात आला आहे. मात्र, इतर अनधिकृत डीपी अद्याप कार्यरत असून, एवढा मोठा प्रकार समोर येऊनही जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने उपोषणकर्ते व सर्वसामान्य वीजग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात महावितरणच्या कार्यपद्धतीतील गंभीर शिथिलता या प्रकरणातून स्पष्ट झाली आहे. अधिकृत प्रक्रियेशिवाय ट्रान्सफॉर्मर बसवणे हे थेट अपघाताला आमंत्रण देणारे ठरू शकले असते. दुसरीकडे, मागणी करूनही शेतकऱ्यांना दोन-दोन वर्षे ट्रान्सफॉर्मर व खांब मिळत नाही, तसेच सुरळीत वीजपुरवठाही होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. याशिवाय, वीजबिल भरूनही ती रक्कम तीन ते चार महिने महावितरणकडे जमा न होता अडवून ठेवली जाते, त्यामुळे गरजूंना वीजपुरवठा मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी हिमायतनगर येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी अर्धनग्न आंदोलन, तर दुसऱ्या दिवसापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले. आज आंदोलनाचा चौथा दिवस असून, नागरिकांच्या तीव्र दबावानंतर महावितरण प्रशासन खडबडून जागे झाले आणि एका ठिकाणचा अनधिकृत ट्रान्सफॉर्मर कार्यालयात जमा करण्यात आला. मात्र, या गैरकारभारास जबाबदार असलेल्यांवर प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही.
विशेष म्हणजे, उपोषण सुरू असतानाही उपकार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यापैकी एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये “दाल में कुछ काला है” अशी जोरदार चर्चा रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे.
महावितरणकडून “योग्य चौकशी करून कारवाई करू” असे आश्वासन दिले जात असले, तरी कारवाईचा कोणताही ठोस आराखडा समोर आलेला नाही. त्यामुळे हिमायतनगरातील महावितरणचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून, जबाबदार अधिकारी व ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे का? असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
एकूणच, अनधिकृत ट्रान्सफॉर्मर बसवण्याची परवानगी कोणी दिली? वीजबिल भरूनही ग्राहकांना पुरवठा का मिळाला नाही? वसूल केलेली रक्कम चार-चार महिने अडवून कशी ठेवली जाते? दोषींवर कारवाई कधी होणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर बडतर्फीसारखी कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा उपोषणकर्ते वामनराव पाटील वडगावकर व त्यांना पाठिंबा देणाऱ्या नागरिकांनी दिला आहे.
हिमायतनगर| शहरातील श्रद्धास्थान असलेल्या इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात चतुर्थीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घालत मोठी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून, दोन ते तीन कुलूप असलेला लोखंडी गल्ला तोडून त्यातील रोख रक्कम व इतर साहित्य लंपास केले आहे. एवढेच नव्हे तर, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्हीचा DVRही चोरून नेण्यात आला आहे.ही घटना शुक्रवार, दिनांक ६ रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या निदर्शनास आली.
मंदिरात झालेली तोडफोड व चोरी पाहून भाविकांनी तत्काळ मंदिर समितीला माहिती दिली. त्यानंतर हिमायतनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करत प्राथमिक पाहणी केली.पोलिसांनी या घटनेचा तपास श्वान पथकाच्या मदतीने करण्यात येईल, असे सांगितले आहे. मात्र, विशेष बाब म्हणजे हे मंदिर पूर्वीही चोरट्यांच्या निशाण्यावर राहिले असून मागील काही वर्षांत ७ ते ८ वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत.
त्या घटनांचा तपास अद्याप पूर्णपणे उघडकीस आलेला नसतानाच, आता चतुर्थीसारख्या पवित्र दिवशीच पुन्हा चोरी झाल्याने भाविकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.वाढोणा येथील वरद विनायक मंदिर इच्छा पूर्ण करणारे मंदिर म्हणून ओळख असलेल्या या देवस्थानात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास लावून दोषींना अटक करावी, तसेच मंदिराच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी भाविक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ALM Network
गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
नांदेड/भोकर | विज्ञानाच्या युगात देश प्रगतीच्या वाटेवर असताना, समाजात आजही अंधश्रद्धेचे भयावह रूप कायम असल्याचे पुन्हा एकदा भोकर तालुक्यात उघडकीस आले आहे.
गुप्तधनाच्या हव्यासापोटी एका तरुणाला नरबळीच्या दिशेने ढकलण्याचा धक्कादायक प्रकार भोकर तालुक्यातील बल्लाळ शिवारात समोर आला असून, या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. बल्लाळ येथील एका शेतात गुप्तधन असल्याच्या अंधश्रद्धेतून हा थरारक प्रकार घडला.
मंगळवारी (दि. ४) रात्री आरोपींनी श्रीकांत बाजेकर या तरुणाला शेतात नेले. तेथे त्याला बळजबरीने कपडे काढायला लावून गळ्यात लिंबाची माळ घालण्यात आली. त्यानंतर लिंबू, मिरची, हळद, कुंकू, नारळ आदी साहित्य वापरून त्याच्याकडून तथाकथित अघोरी पूजा करून घेण्यात आली.
या अमानुष प्रकारामुळे श्रीकांत प्रचंड घाबरून गेला होता. दरम्यान, या घटनेची चर्चा गावात पसरताच त्याचा भाऊ सिद्धांत शेषेराव बाजेकर यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व पूजेचे साहित्य जप्त केले.
नरबळीचा डाव? पोलिसांचा सखोल तपास
पीडित तरुणाला विवस्त्र करून अघोरी पूजा करायला लावण्यात आल्याने, हा नरबळीचा प्रयत्न होता का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. गुप्तधनासाठी अशा प्रकारे माणसाच्या जीवाशी खेळ करण्याचा हा प्रकार असल्याने पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यासह अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास अधिक तीव्र केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण भोकर तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, अंधश्रद्धेविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
6 days ago | [YT] | 0
View 0 replies
ALM Network
Hi everyone, welcome to my new YouTube Community. Now you can post on my channel too. To get started, tell me in a post what you'd like to see next on my channel.
Visit my Community: youtube.com/@almnetwork-7/community
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
ALM Network
हिमायतनगर स्थानकात सुरु असलेल्या अमृत भारत योजनेच्या कामांची वरिष्ठांकडून पाहणी
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर येथील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. माजी DRUCC सदस्य गौतमचंद सुरजमल पिंचा, गणेशराव शिंदे आणि प्रवीण कोमावार यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद जनरल मॅनेजर यांच्या दौऱ्यादरम्यान पत्र देत हिमायतनगर, नांदेड व परिसरातील प्रवाशांच्या सुविधांसाठी रेल्वे सेवांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडत चार महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आदिलाबाद–परळी वैजनाथ पॅसेंजर (गाडी क्र. 57564) ला एक्सप्रेस दर्जा देऊन वेळापत्रकात सुधारणा करावी, जेणेकरून ही गाडी सकाळी १० वाजेपर्यंत परळी वैजनाथ येथे पोहोचेल अशी प्रमुख मागणी आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
तसेच पनवेल–हुजूर साहिब नांदेड एक्सप्रेस (गाडी क्र. 17613) चे वेळापत्रक पहाटे ४.२० वाजता निश्चित करावे, जेणेकरून आदिलाबाद व नांदेड येथील प्रवाशांना 77615 या गाडीशी सोयीस्कर कनेक्शन मिळू शकेल, असे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय नागपूर–नांदेड- नागपूर नवीन एक्सप्रेस सेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, यामुळे मराठवाडा व विदर्भातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यासोबतच दीक्षाभूमी एक्सप्रेस (11045/11046) ला हिमायतनगर रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या सेवेचा लाभ प्रवाशांना मिळत नसल्याने ही मागणी जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर विचार करू असे आश्वासन देण्यात आले आहे.
दरम्यान गुरुवारी दुपारी सिकंदराबाद रेल्वे विभागाचे डिव्हिजनल जनरल मॅनेजर यांनी हिमायतनगर रेल्वे स्थानकाला प्रत्यक्ष भेट देत येथे सुरू असलेल्या अमृत भारत योजनेतील विकासकामांची पाहणी केली. कामांच्या प्रगतीबाबत माहिती घेत त्यांनी संबंधित ठेकेदाराला कामाच्या दर्जात सुधारणा करण्याच्या तसेच विकासकामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी नांदेड रेल्वे डिव्हिजनचे वरिष्ठ विभागीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी–कर्मचारी तसेच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त उपस्थित होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे आणि अमृत भारत योजनेतील कामांना मिळालेल्या गतीमुळे हिमायतनगर–नांदेड रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सुविधा सुधारण्याच्या अपेक्षा बळावल्या असून, दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाकडून लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा प्रवासी वर्गातून व्यक्त होत आहे.
1 week ago | [YT] | 2
View 0 replies
ALM Network
हिमायतनगरमध्ये महावितरणचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर
एक अनधिकृत ट्रान्सफॉर्मर कार्यालयात जमा; जबाबदारांवर कारवाई शून्य
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहर व तालुक्यात महावितरणच्या कारभारातील गंभीर गैरप्रकार उघडकीस आला असून, कोणतीही अधिकृत परवानगी, डिमांड नोट किंवा नोंद नसताना बसविण्यात आलेला एक अनधिकृत ट्रान्सफॉर्मर अखेर उपविभागीय कार्यालयात जमा करण्यात आला आहे. मात्र, इतर अनधिकृत डीपी अद्याप कार्यरत असून, एवढा मोठा प्रकार समोर येऊनही जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने उपोषणकर्ते व सर्वसामान्य वीजग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात महावितरणच्या कार्यपद्धतीतील गंभीर शिथिलता या प्रकरणातून स्पष्ट झाली आहे. अधिकृत प्रक्रियेशिवाय ट्रान्सफॉर्मर बसवणे हे थेट अपघाताला आमंत्रण देणारे ठरू शकले असते. दुसरीकडे, मागणी करूनही शेतकऱ्यांना दोन-दोन वर्षे ट्रान्सफॉर्मर व खांब मिळत नाही, तसेच सुरळीत वीजपुरवठाही होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. याशिवाय, वीजबिल भरूनही ती रक्कम तीन ते चार महिने महावितरणकडे जमा न होता अडवून ठेवली जाते, त्यामुळे गरजूंना वीजपुरवठा मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी हिमायतनगर येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी अर्धनग्न आंदोलन, तर दुसऱ्या दिवसापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले. आज आंदोलनाचा चौथा दिवस असून, नागरिकांच्या तीव्र दबावानंतर महावितरण प्रशासन खडबडून जागे झाले आणि एका ठिकाणचा अनधिकृत ट्रान्सफॉर्मर कार्यालयात जमा करण्यात आला. मात्र, या गैरकारभारास जबाबदार असलेल्यांवर प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही.
विशेष म्हणजे, उपोषण सुरू असतानाही उपकार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यापैकी एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांमध्ये “दाल में कुछ काला है” अशी जोरदार चर्चा रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे.
महावितरणकडून “योग्य चौकशी करून कारवाई करू” असे आश्वासन दिले जात असले, तरी कारवाईचा कोणताही ठोस आराखडा समोर आलेला नाही. त्यामुळे हिमायतनगरातील महावितरणचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून, जबाबदार अधिकारी व ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे का? असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
एकूणच, अनधिकृत ट्रान्सफॉर्मर बसवण्याची परवानगी कोणी दिली? वीजबिल भरूनही ग्राहकांना पुरवठा का मिळाला नाही? वसूल केलेली रक्कम चार-चार महिने अडवून कशी ठेवली जाते? दोषींवर कारवाई कधी होणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर बडतर्फीसारखी कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा उपोषणकर्ते वामनराव पाटील वडगावकर व त्यांना पाठिंबा देणाऱ्या नागरिकांनी दिला आहे.
1 week ago | [YT] | 0
View 0 replies
ALM Network
हिमायतनगरातील इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ
चतुर्थीच्या दिवशीच गल्ला फोडून रक्कम लंपास; CCTV फोडून DVRही पळवला
हिमायतनगर| शहरातील श्रद्धास्थान असलेल्या इच्छापूर्ती वरद विनायक मंदिरात चतुर्थीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घालत मोठी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून, दोन ते तीन कुलूप असलेला लोखंडी गल्ला तोडून त्यातील रोख रक्कम व इतर साहित्य लंपास केले आहे. एवढेच नव्हे तर, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने सीसीटीव्हीचा DVRही चोरून नेण्यात आला आहे.ही घटना शुक्रवार, दिनांक ६ रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या निदर्शनास आली.
मंदिरात झालेली तोडफोड व चोरी पाहून भाविकांनी तत्काळ मंदिर समितीला माहिती दिली. त्यानंतर हिमायतनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करत प्राथमिक पाहणी केली.पोलिसांनी या घटनेचा तपास श्वान पथकाच्या मदतीने करण्यात येईल, असे सांगितले आहे. मात्र, विशेष बाब म्हणजे हे मंदिर पूर्वीही चोरट्यांच्या निशाण्यावर राहिले असून मागील काही वर्षांत ७ ते ८ वेळा चोरीच्या घटना घडल्या आहेत.
त्या घटनांचा तपास अद्याप पूर्णपणे उघडकीस आलेला नसतानाच, आता चतुर्थीसारख्या पवित्र दिवशीच पुन्हा चोरी झाल्याने भाविकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.वाढोणा येथील वरद विनायक मंदिर इच्छा पूर्ण करणारे मंदिर म्हणून ओळख असलेल्या या देवस्थानात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास लावून दोषींना अटक करावी, तसेच मंदिराच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी भाविक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
1 week ago (edited) | [YT] | 0
View 0 replies