समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारे एकमेव निर्भीड न्यूज चैनल


ZEP NEWS MEDIA

१८ ऑगष्ट वसंतराव नाईक साहेब यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...!

महानायक वसंतराव नाईक त्यांच्या यशस्वी कारकिर्दीमुळे कल्याणकारी लोकनेता, समाजसुधारक, नैतिक मूल्यांची जोपासना करणारे, शेतकरी व दीन दुबळ्यांचे, गोर-गरिबांचे दुःख स्वतःचे मानणारे, जनसेवा हाच धर्म मानणारे, शेतकरी व शेतमजुरांचे खरे कैवारी, कुशल प्रशासक, महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते, ग्रामीण भागातील युवकांच्या शिक्षणाची तळमळ असलेले, हळव्या मनाचे सक्षम व्यक्तिमत्त्व, अशा अनेक उपाधीचे जनक ठरले. त्यांच्या कार्यकाळातील शब्द वाक्यांची स्मृती म्हणून काही मोजकेच महत्त्वाचे शब्द ‘वसंतवाणी’ म्हणून प्रसिध्द आहे. त्यांचा प्रत्येक शब्द सूज्ञ माणसाला प्रेरणा देतो.

1 year ago (edited) | [YT] | 2

ZEP NEWS MEDIA

पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने रौप्य पदक विजेती कामगिरी केली आहे. भालाफेकीमध्ये त्याने हे यश मिळवलं. नीरजकडून सर्वांना सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. पण नीरजला टोक्यो ऑलिम्पिकची पुनरावृत्ती करता आली नाही. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमला सुवर्ण पदक मिळालं. नीरजने 89.45 अंतरावर थ्रो करुन रौप्य पदकाला गवसणी घातली. तेच पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 92.97 मीटर अंतरावर थ्रो करुन सुवर्ण पदक मिळवलं. परंतु निरज चोप्राने भारताला पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिलं रौप्य पदक मिळवून दिलं आहे.
निरज चोप्रा च्या या पदक विजेत्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.. 💐💐

#NeerajChopra #Silvermedal #parisolympic2024 #olympic2024 #ZepNewsMedia

1 year ago | [YT] | 1

ZEP NEWS MEDIA

जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

केवळ भारतातच नाही तर जगाच्या सर्व भागात आदिवासी समाजाचे लोक राहतात. त्यांची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, चालीरीती इत्यादी सामान्य लोकांपेक्षा भिन्न असतात. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेल्याने ते मागे पडले आहेत. या कारणास्तव भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांचा प्रचार करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात. या भागामध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने १९९४ हे पहिल्यांदा आदिवासींचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. 

#WorldTribalDay #ZepNewsMedia

1 year ago (edited) | [YT] | 0

ZEP NEWS MEDIA

विनेश फोगाट पॅरिस ऑलम्पिक मधून अपात्र..!

#Olympics2024 #vineshphogat #zepnewsmedia

1 year ago | [YT] | 1

ZEP NEWS MEDIA

मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने रचला इतिहास ; ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पटकावलं कांस्य ! स्वप्नीलने ५० मीटर रायफल स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. त्याचा एकूण स्कोर ४५१.४ होता. तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे. 💐💐

#Olympic2024 #swapnilkusale

1 year ago | [YT] | 1

ZEP NEWS MEDIA

तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करतात.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ..! 💐

#लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

1 year ago | [YT] | 2

ZEP NEWS MEDIA

मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या नेमबाजांनी भारतीयांना पुन्हा एकदा जल्लोषाची संधी देताना मंगळवारी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले. मनू-सरबजोत यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात दक्षिण कोरियाच्या जोडीला नमवत कांस्य पटकावले. मनू एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी स्वातंत्र्यकाळानंतरची पहिली भारतीय ठरली. दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी मनू ही दुसरी भारतीय महिला, तर तिसरी भारतीय खेळाडूही ठरली. 💐💐

#Olympic2024 #manubhakar #Sarabjotsingh #india

1 year ago (edited) | [YT] | 0

ZEP NEWS MEDIA

भारताने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाचं खातं उघडलं आहे. महिला नेमबाज मनु भाकर हीने भारताला कांस्य पदक मिळवून दिलं आहे. मनुने यासह इतिहास रचला आहे. मनु ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली आहे. मनुने 10 मीटर एअर पिस्तुलच्या अंतिम सामन्यात 221.7 पॉइंट्ससह कांस्य पदक मिळवलं. 💐💐

#Olympic2024 #Manubhakar #India

1 year ago (edited) | [YT] | 1

ZEP NEWS MEDIA

कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या आठवणी जागवल्या जातात. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे. २६ जुलै हा कारगिल दिन म्हणून साजरा होतो...

#kargilvijaydivs #zepnewsmedia #pusad

1 year ago | [YT] | 3