सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सोलापूर विमानतळावर सन्मान
सोलापूर – देशाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई हे काही वेळासाठी सोलापूर विमानतळावर दाखल झाले असता, त्यांचा सोलापूर बार असोसिएशन आणि न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी अॅड. बाबासाहेब जाधव, अॅड. रियाज शेख, अॅड. मिलिंद थोबडे, तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा, सत्र न्यायाधीश योगेश राणे, आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
सरन्यायाधीश गवई यांनी पदाधिकाऱ्यांशी थोडक्यात संवाद साधत, “भविष्यात नक्कीच सोलापूरला अधिकृत भेट देईन,” अशी ग्वाही दिली. या अल्प भेटीमुळे सोलापूरच्या न्यायव्यवस्थेसाठी हा क्षण ऐतिहासिक ठरला.
वळसंग पोलिसांची मोठी कारवाई | तिल्ल्याळ येथे तीन ठिकाणी हातभट्टी दारूवर छापा सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने वळसंग पोलीस ठाणे हद्दीत मौजे तिल्ल्याळ येथे तीन ठिकाणी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर छापा टाकून कारवाई केली आहे. ही कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट उपविभाग विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राहुल डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. रविराज कांबळे, तसेच पोलीस हवालदार श्री. श्रीशैल माळी, सुनील कुवर, अशोक पाटील, दर्याप्पा व्हाणमोरी आणि संतोष कुंभार यांनी सहभाग घेतला. छाप्यात एकूण १,४०० लिटर गुळमिश्रित रसायन आणि बॅरलसह ₹५०,४०० किमतीचा मुद्देमाल, तसेच ७० लिटर तयार हातभट्टी दारू (किंमत अंदाजे ₹७,०००) जप्त करण्यात आली. या प्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
सोलापूर पोलिस मुख्यालय येथे पोलिस स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहीद पोलीस बांधवांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर डॉ . सुजीत मिश्रा, पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त गौहर हसन, विजय कबाडे व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या हस्ते शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी, अंमलदार, शहीद कुटुंबीय व नागरिक उपस्थित होते.
मित्रहो, थिंक टँक डिजिटल मीडियाकडून "सांगोला पॉलिटिक्स" हे खास राजकीय युट्यूब चॅनल सुरू करण्यात आलं आहे. आपणास विनंती आहे की, आपण हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करावे. आपले प्रेम वृध्दींगत होवो. संपादक डॉ. बाळासाहेब मागाडे लिंक खाली दिली आहे youtube.com/@sangolapolitics-e8t?si=AmHlupO9zjd8Z_…
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ८ जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या आदेशान्वये सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्तीवरील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत. कोणत्याही सफाई कामगारांवर वारसा हक्क नियुक्तीच्या अनुषंगाने अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
सोलापूर : राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून ,त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. गुरुवार दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 8.45 वाजता पुणे येथून विमानाने सोलापूरकडे प्रयाण. सकाळी 09.45 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व नवीन जिल्हाधिकारी कार्यालय कडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी 01.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून सोलापूर विमानतळ कडे प्रयाण व दुपारी 01.15 वाजता सोलापूर येथून विमानाने पुणे कडे प्रयाण करतील .
गुईलेन बॅरे सिंड्रोम (GBS) या आजाराच्या नियंत्रणासाठी उपाययोजना
गुईलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक गंभीर न्यूरोलॉजिकल रोग आहे, जो अचानक पॅरालिसीस आणि स्नायूंच्या दुर्बलतेसाठी ओळखला जातो. पुणे जिल्ह्यात या आजाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या लेखात, GBS च्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना, सूचना आणि जनजागृती या अनुषंगाने माहिती देण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातीत विविध रुग्णालयांतील G.B.Syndrome सदृष्य आजाराचे रूग्ण दाखल होत आहेत. याबाबत आरोग्य विभागामार्फत कार्यवाही सुध्दा होत आहे. आरोग्य विभागाशी चर्चा करून योगय त्या सुचना सुध्दा दिलेल्या आहेत. या आजाराबाबत न्युरोजलॉलीकल सोसायटी ऑफ पुणे यांच्या सुचना सुध्दा उपलब्ध आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावर पुढील कार्यवाही आणि उपाययोजनांच्या दृष्टीने मार्गदर्शक सुचना पुढील प्रमाणे देण्यात येत आहेत. 1.आकस्मीक उद्भवणाऱ्या पॅरालिसीस (Acute Progressive onset of Weakness) ची लक्षणे असलेल्या रुग्णाबाबत बाधित कार्यक्षेत्रात सर्व्हेक्षण करून, रुग्ण शोधुन त्यांच्यावर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. 2.खाजगी रुग्णालयांना संपर्क साधून अशाप्रकारचे रुग्ण आढळल्यास त्याबाबत जिल्हापरिषद, महानगरपालिकेस कळविण्यात यावे. जेणेकरून पुढील कार्यवाही वेळेत करता येईल. 3. आपल्या कार्यक्षेत्रात सर्व्हेक्षण कक्ष सतर्क राहतील आणि नवीन रुग्ण निदान होणाऱ्या भागात त्वरील सर्व्हेक्षण सुरू होईल. याबाबत दक्षात घ्यावी. 4. आजाराबाबत दैनंदिन अहवाल घेऊन पुढील उपाययोजना कराव्यात. तसेच covid19solapur@gmail.com व idspsolapur@rediffmail.com या ई-मेलवर दैनंदिन अहवाल सादर करण्यात यावा. 5. आपल्या रुग्णालयात उपचाराच्या सोयी सुविधा उपलब्ध राहतील Ventilator, Medicine याची खातरजमा करावी. तसेच उपलब्ध सुविधा असलेल्या रुग्णांलयांनी नागरीकांना आणि आपल्याला आरोग्य यंत्रणेला माहिती राहील यासाठी कार्यवाही होणे आवश्यक आहे. जेणेकरून योग्य ठिकाणी वेळेत रुग्णांना संदर्भित व भरती करात येईल. 6. रुग्णालयात भरती रुग्णांचे रक्त, लघवी व शौच नमुने NIV Pune येथे पाठवावेत. 7. सदर आजार अन्न किंवा पाणी दुषित असल्यास, दुषित अन्न किंवा पाण्याच्या माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे बाधित विभागातील पाणी पुरवठ्याची तपासणी करून लिकेजेस किंवा User End पाण्याची गुणवत्ता योग्य आहे का? याची तपासणी करून आवश्यकतेनुसार उपाययोजना करावी. 8. लोकांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी.
9 सदर आजार हा सहसा अचानक उद्भवतो आणि 4 आठवड्यापर्यंत सुध्दा वाढत जाऊ शकतो. हा आजार सौम्य किंवा तीव्र स्वरूपात सुध्दा वाढू शकतो, त्यामुळे रुग्णभरती असलेल्या रुग्णालयात Ventilator सुविधा उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे.
10 काही प्रतिबंधात्मक सुचना- अ.पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदा.पाणी उकळून घेणे. ब. अन्न स्वच्छ आणि ताजे असावे. क.वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा. ड. शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यास सुध्दा संसर्ग टाळता येईल.
11. पुढली लक्षणे आढळल्यास त्वरील वैद्यकिय मदत घेण्याबात जनजागृती करावी. अ.अचानक पायातील किंवा हातात येणार अशक्तपणा, लकवा ब. अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील आस किंवा अशक्तपणा. क. डायरिया (जास्त दिवसांचा) उपरोक्त प्रमाणे मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
जी बी एस च्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन, सर्व संबंधित आरोग्य यंत्रणा व नागरिकांनी एकत्र येऊन कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आपण या गंभीर आजाराचा प्रभाव कमी करू शकतो. हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, फक्त योग्य खबरदारी घ्यावी. तसेच दूषित पाणी व कच्चे मांस खाऊ नये. या आजाराची लक्षणे आढळल्यास मेडिकल स्टोअरवरून औषधे न घेता तात्काळ वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत त्यामुळे या आजाराचा प्रभाव राहणार नाही.
जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर 00000
# गुईलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) आणि आरोग्य सेवा उपाययोजना
## उपाययोजना
1. **रुग्ण शोधणे आणि उपचार करणे:** - आकस्मीक उद्भवणाऱ्या पॅरालिसीसची लक्षणे असलेल्या रुग्णांचे सर्व्हेक्षण करणे आवश्यक आहे. या रुग्णांवर तातडीने उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
2. **खाजगी रुग्णालयांशी संपर्क:** - खाजगी रुग्णालयांनी GBS सारखे रुग्ण आढळल्यास जिल्हापरिषद आणि महानगरपालिकेस कळवणे आवश्यक आहे.
3. **सर्व्हेक्षण कक्षाची दक्षता:** - आपल्या कार्यक्षेत्रात सर्व्हेक्षण कक्ष सतर्क राहतील आणि नवीन रुग्णांचे निदान होताच त्वरीत सर्व्हेक्षण सुरू केले जाईल.
4. **दैनंदिन अहवाल:** - आजाराबाबत दैनंदिन अहवाल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात. अहवाल covid19solapur@gmail.com आणि idspsolapur@rediffmail.com येथे सादर करणे आवश्यक आहे.
5. **उपचार सुविधा:** - रुग्णालयात वेंटिलेटर आणि आवश्यक औषधांची खातरजमा करणे महत्त्वाचे आहे.
6. **रक्त, लघवी व शौच नमुने:** - भरती रुग्णांचे नमुने NIV पुणे येथे पाठवणे आवश्यक आहे.
7. **पाण्याची गुणवत्ता तपासणी:** - अन्न किंवा पाणी दुषित असल्यास, पाण्याच्या पुरवठ्याची तपासणी करणे आवश्यक आहे.
8. **जनजागृती:** - लोकांमध्ये GBS च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.
9. **वेंटिलेटर सुविधा:** - रुग्णालयात वेंटिलेटर सुविधा उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे, कारण हा आजार अचानक उद्भवतो.
10. **प्रतिबंधात्मक सूचना:** - पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे. - अन्न स्वच्छ व ताजे असावे. - वैयक्तिक स्वच्छतेवर भर देणे. - शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यास संसर्ग टाळता येईल.
11. **त्वरीत वैद्यकीय मदतीची आवश्यकता:** - खालील लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकीय मदतीसाठी जनजागृती करणे: - अचानक पायातील किंवा हातात येणार अशक्तपणा. - चालण्यात आलेला आस किंवा अशक्तपणा. - दीर्घकालीन डायरिया.
Think Tank Live
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सोलापूर विमानतळावर सन्मान
सोलापूर – देशाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई हे काही वेळासाठी सोलापूर विमानतळावर दाखल झाले असता, त्यांचा सोलापूर बार असोसिएशन आणि न्यायालयीन अधिकाऱ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी अॅड. बाबासाहेब जाधव, अॅड. रियाज शेख, अॅड. मिलिंद थोबडे, तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा, सत्र न्यायाधीश योगेश राणे, आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
सरन्यायाधीश गवई यांनी पदाधिकाऱ्यांशी थोडक्यात संवाद साधत, “भविष्यात नक्कीच सोलापूरला अधिकृत भेट देईन,” अशी ग्वाही दिली.
या अल्प भेटीमुळे सोलापूरच्या न्यायव्यवस्थेसाठी हा क्षण ऐतिहासिक ठरला.
5 months ago | [YT] | 2
View 0 replies
Think Tank Live
वळसंग पोलिसांची मोठी कारवाई | तिल्ल्याळ येथे तीन ठिकाणी हातभट्टी दारूवर छापा
सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने वळसंग पोलीस ठाणे हद्दीत मौजे तिल्ल्याळ येथे तीन ठिकाणी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या भट्ट्यांवर छापा टाकून कारवाई केली आहे. ही कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतम यावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट उपविभाग विलास यामावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. राहुल डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक श्री. रविराज कांबळे, तसेच पोलीस हवालदार श्री. श्रीशैल माळी, सुनील कुवर, अशोक पाटील, दर्याप्पा व्हाणमोरी आणि संतोष कुंभार यांनी सहभाग घेतला. छाप्यात एकूण १,४०० लिटर गुळमिश्रित रसायन आणि बॅरलसह ₹५०,४०० किमतीचा मुद्देमाल, तसेच ७० लिटर तयार हातभट्टी दारू (किंमत अंदाजे ₹७,०००) जप्त करण्यात आली.
या प्रकरणी तीन आरोपींवर गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
5 months ago | [YT] | 2
View 0 replies
Think Tank Live
Breaking : सोलापूर मार्केट यार्ड चौकात खड्ड्यांमुळे भले मोठे पवनचक्कीचे वाहन पलटी
5 months ago | [YT] | 2
View 0 replies
Think Tank Live
सोलापूर पोलिस मुख्यालय येथे पोलिस स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहीद पोलीस बांधवांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर डॉ . सुजीत मिश्रा, पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपायुक्त गौहर हसन, विजय कबाडे व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या हस्ते शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी, अंमलदार, शहीद कुटुंबीय व नागरिक उपस्थित होते.
6 months ago | [YT] | 4
View 0 replies
Think Tank Live
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची पत्रकार परिषद; अक्कलकोट मतदारसंघाला मिळणार १०६ कोटींची मदत !
6 months ago | [YT] | 2
View 0 replies
Think Tank Live
सोलापूर येथील सिद्धेश्वर तलावातील पाणी प्रदूषित झाल्यामुळे हजारो मासे मरून पडले आहेत..
11 months ago | [YT] | 1
View 0 replies
Think Tank Live
मित्रहो, थिंक टँक डिजिटल मीडियाकडून "सांगोला पॉलिटिक्स" हे खास राजकीय युट्यूब चॅनल सुरू करण्यात आलं आहे. आपणास विनंती आहे की, आपण हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करावे. आपले प्रेम वृध्दींगत होवो.
संपादक
डॉ. बाळासाहेब मागाडे
लिंक खाली दिली आहे
youtube.com/@sangolapolitics-e8t?si=AmHlupO9zjd8Z_…
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
Think Tank Live
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ८ जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या आदेशान्वये सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने देण्यात येणाऱ्या नियुक्तीवरील स्थगिती उठविली आहे. त्यामुळे सफाई कामगारांना वारसा हक्काने नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत. कोणत्याही सफाई कामगारांवर वारसा हक्क नियुक्तीच्या अनुषंगाने अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
Think Tank Live
पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा
सोलापूर : राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून ,त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
गुरुवार दि. 30 जानेवारी रोजी सकाळी 8.45 वाजता पुणे येथून विमानाने सोलापूरकडे प्रयाण. सकाळी 09.45 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व नवीन जिल्हाधिकारी कार्यालय कडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व जिल्हा नियोजन समिती बैठकीस उपस्थिती. दुपारी 01.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून सोलापूर विमानतळ कडे प्रयाण व दुपारी 01.15 वाजता सोलापूर येथून विमानाने पुणे कडे प्रयाण करतील .
1 year ago | [YT] | 6
View 0 replies
Think Tank Live
आरोग्य सेवा विशेष लेख....
गुईलेन बॅरे सिंड्रोम (GBS) या आजाराच्या नियंत्रणासाठी उपाययोजना
गुईलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक गंभीर न्यूरोलॉजिकल रोग आहे, जो अचानक पॅरालिसीस आणि स्नायूंच्या दुर्बलतेसाठी ओळखला जातो. पुणे जिल्ह्यात या आजाराच्या वाढत्या प्रकरणांमुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या लेखात, GBS च्या नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना, सूचना आणि जनजागृती या अनुषंगाने माहिती देण्यात येत आहे.
पुणे जिल्ह्यातीत विविध रुग्णालयांतील G.B.Syndrome सदृष्य आजाराचे रूग्ण दाखल होत आहेत. याबाबत आरोग्य विभागामार्फत कार्यवाही सुध्दा होत आहे. आरोग्य विभागाशी चर्चा करून योगय त्या सुचना सुध्दा दिलेल्या आहेत. या आजाराबाबत न्युरोजलॉलीकल सोसायटी ऑफ पुणे यांच्या सुचना सुध्दा उपलब्ध आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावर पुढील कार्यवाही आणि उपाययोजनांच्या दृष्टीने मार्गदर्शक सुचना पुढील प्रमाणे देण्यात येत आहेत.
1.आकस्मीक उद्भवणाऱ्या पॅरालिसीस (Acute Progressive onset of Weakness) ची लक्षणे असलेल्या रुग्णाबाबत बाधित कार्यक्षेत्रात सर्व्हेक्षण करून, रुग्ण शोधुन त्यांच्यावर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
2.खाजगी रुग्णालयांना संपर्क साधून अशाप्रकारचे रुग्ण आढळल्यास त्याबाबत जिल्हापरिषद, महानगरपालिकेस कळविण्यात यावे. जेणेकरून पुढील कार्यवाही वेळेत करता येईल.
3. आपल्या कार्यक्षेत्रात सर्व्हेक्षण कक्ष सतर्क राहतील आणि नवीन रुग्ण निदान होणाऱ्या भागात त्वरील सर्व्हेक्षण सुरू होईल. याबाबत दक्षात घ्यावी.
4. आजाराबाबत दैनंदिन अहवाल घेऊन पुढील उपाययोजना कराव्यात. तसेच covid19solapur@gmail.com व idspsolapur@rediffmail.com या ई-मेलवर दैनंदिन अहवाल सादर करण्यात यावा.
5. आपल्या रुग्णालयात उपचाराच्या सोयी सुविधा उपलब्ध राहतील Ventilator, Medicine याची खातरजमा करावी. तसेच उपलब्ध सुविधा असलेल्या रुग्णांलयांनी नागरीकांना आणि आपल्याला आरोग्य यंत्रणेला माहिती राहील यासाठी कार्यवाही होणे आवश्यक आहे. जेणेकरून योग्य ठिकाणी वेळेत रुग्णांना संदर्भित व भरती करात येईल.
6. रुग्णालयात भरती रुग्णांचे रक्त, लघवी व शौच नमुने NIV Pune येथे पाठवावेत.
7. सदर आजार अन्न किंवा पाणी दुषित असल्यास, दुषित अन्न किंवा पाण्याच्या माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे बाधित विभागातील पाणी पुरवठ्याची तपासणी करून लिकेजेस किंवा User End पाण्याची गुणवत्ता योग्य आहे का? याची तपासणी करून आवश्यकतेनुसार उपाययोजना करावी.
8. लोकांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी.
9 सदर आजार हा सहसा अचानक उद्भवतो आणि 4 आठवड्यापर्यंत सुध्दा वाढत जाऊ शकतो. हा आजार सौम्य किंवा तीव्र स्वरूपात सुध्दा वाढू शकतो, त्यामुळे रुग्णभरती असलेल्या रुग्णालयात Ventilator सुविधा उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे.
10 काही प्रतिबंधात्मक सुचना-
अ.पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदा.पाणी उकळून घेणे.
ब. अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
क.वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
ड. शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यास सुध्दा संसर्ग टाळता येईल.
11. पुढली लक्षणे आढळल्यास त्वरील वैद्यकिय मदत घेण्याबात जनजागृती करावी.
अ.अचानक पायातील किंवा हातात येणार अशक्तपणा, लकवा
ब. अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील आस किंवा अशक्तपणा.
क. डायरिया (जास्त दिवसांचा)
उपरोक्त प्रमाणे मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
जी बी एस च्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन, सर्व संबंधित आरोग्य यंत्रणा व नागरिकांनी एकत्र येऊन कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आपण या गंभीर आजाराचा प्रभाव कमी करू शकतो. हा आजार संसर्गजन्य नसल्याने नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, फक्त योग्य खबरदारी घ्यावी. तसेच दूषित पाणी व कच्चे मांस खाऊ नये. या आजाराची लक्षणे आढळल्यास मेडिकल स्टोअरवरून औषधे न घेता तात्काळ वैद्यकीय सल्ल्याने उपचार घ्यावेत त्यामुळे या आजाराचा प्रभाव राहणार नाही.
जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर
00000
# गुईलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) आणि आरोग्य सेवा उपाययोजना
## उपाययोजना
1. **रुग्ण शोधणे आणि उपचार करणे:**
- आकस्मीक उद्भवणाऱ्या पॅरालिसीसची लक्षणे असलेल्या रुग्णांचे सर्व्हेक्षण करणे आवश्यक आहे. या रुग्णांवर तातडीने उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
2. **खाजगी रुग्णालयांशी संपर्क:**
- खाजगी रुग्णालयांनी GBS सारखे रुग्ण आढळल्यास जिल्हापरिषद आणि महानगरपालिकेस कळवणे आवश्यक आहे.
3. **सर्व्हेक्षण कक्षाची दक्षता:**
- आपल्या कार्यक्षेत्रात सर्व्हेक्षण कक्ष सतर्क राहतील आणि नवीन रुग्णांचे निदान होताच त्वरीत सर्व्हेक्षण सुरू केले जाईल.
4. **दैनंदिन अहवाल:**
- आजाराबाबत दैनंदिन अहवाल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात. अहवाल covid19solapur@gmail.com आणि idspsolapur@rediffmail.com येथे सादर करणे आवश्यक आहे.
5. **उपचार सुविधा:**
- रुग्णालयात वेंटिलेटर आणि आवश्यक औषधांची खातरजमा करणे महत्त्वाचे आहे.
6. **रक्त, लघवी व शौच नमुने:**
- भरती रुग्णांचे नमुने NIV पुणे येथे पाठवणे आवश्यक आहे.
7. **पाण्याची गुणवत्ता तपासणी:**
- अन्न किंवा पाणी दुषित असल्यास, पाण्याच्या पुरवठ्याची तपासणी करणे आवश्यक आहे.
8. **जनजागृती:**
- लोकांमध्ये GBS च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.
9. **वेंटिलेटर सुविधा:**
- रुग्णालयात वेंटिलेटर सुविधा उपलब्ध ठेवणे आवश्यक आहे, कारण हा आजार अचानक उद्भवतो.
10. **प्रतिबंधात्मक सूचना:**
- पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे.
- अन्न स्वच्छ व ताजे असावे.
- वैयक्तिक स्वच्छतेवर भर देणे.
- शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यास संसर्ग टाळता येईल.
11. **त्वरीत वैद्यकीय मदतीची आवश्यकता:**
- खालील लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकीय मदतीसाठी जनजागृती करणे:
- अचानक पायातील किंवा हातात येणार अशक्तपणा.
- चालण्यात आलेला आस किंवा अशक्तपणा.
- दीर्घकालीन डायरिया.
.
* जिल्हा माहिती कार्यालय, सोलापूर
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
Load more