Suvarna Khandesh Live News



Suvarna Khandesh Live News

टी20 वर्ल्डकप 2026 साठी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला गेलेल्या भारत विरूद्ध पाकिस्तान या हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. या सामन्यात ईशान किशनच्या अर्धशतकाच्या मदतीने भारताने पाकिस्तानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले. दरम्यान, गोलंदाजी करताना हार्दिक पांड्या आणि बुमराह जोडीने पाकिस्तानच्या फलंदाजीचे अक्षरशः कंबरडे मोडल्याने 114 धावांवर पाकिस्तान संघ सर्वबाद झाला अन् 61 धावांनी भारताचा विजय झाला.

#indvspak #indiavspakistan #worldcup2026 #t20worldcup

3 days ago | [YT] | 0

Suvarna Khandesh Live News

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना रविवारी १५ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. भारत- पाकिस्तान सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना हा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक ६:३० वाजता होईल.

#indvspak #worldcup2026 #t20worldcup2026 #colombo

4 days ago | [YT] | 1

Suvarna Khandesh Live News

आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा थरार 7 फेब्रवारीपासून सुरू झाला असून, उद्घाटन सामन्यातच टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अमेरिकेचा 29 धावांनी पराभव केला. 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकन संघाला निर्धारित 20 षटकांत 132 धावांपर्यंतच मजल मारता आली.



#t20worldcup #worldcup2026 #suryakumaryadav #indvsusa #cricketupdates

1 week ago | [YT] | 6

Suvarna Khandesh Live News

जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया काल, गुरुवार दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष सभेत पार पडली. या विशेष सभेत जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी दीपमाला मनोज काळे यांची तर उपमहापौर पदासाठी मनोज सुरेश चौधरी यांची निवड करण्यात आली.

#jalgaonmahanagarpalika #mayor #deepmalakale #manojchudhary #jalgaonnews

1 week ago | [YT] | 1

Suvarna Khandesh Live News

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल 28 जानेवारी रोजी सकाळी विमान अपघातात दुर्दैवीपणे निधन झाल्याने संपुर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या धक्कादायक अपघाताची माहिती मिळताच पवार कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला. दरम्यान, आज सकाळी अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडी या त्यांच्या मूळगावी अंत्यदर्शनासाठी नेण्यात आलं होतं. त्यानंतर, बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. शोकाकूल वातावरणात साश्रू नयनांनी अजित दादांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी ‘अजित दादा अमर रहे...अमर रहे, अजित दादा परत या...परत या' अशा घोषणा देण्यात आल्या.

#ajitpawar #baramatinews #planeaccident #rip

2 weeks ago | [YT] | 10

Suvarna Khandesh Live News

धुळे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवत एकहाती सत्ता काबीज केलीय. धुळ्यात 74 जागांपैकी तब्बल 50 जागा भाजपने जिंकल्या असून महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. यामध्ये भाजपच्या चार जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या. तसेच अजित दादांच्या राष्ट्रवादीने 8 तर शिंदेंच्या शिवसेनेने 5 जागा जिंकल्या. तर दुसरीकडे एमआयएमने 20 जागा लढवत 10 जागांवर विजय मिळवल्याने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. तर एका जागेवार अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला आहे.

#mahapalikaelectionresult #electionresults #dhulemahanagarpalika #dhulenews

1 month ago | [YT] | 7

Suvarna Khandesh Live News

गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिका निवडणुकीची प्रतिक्षा केली जात होती. मात्र, आज ही प्रतिक्षा संपली असून राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केलीय. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार असून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दुपारी 4 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

#munciplecorporation #electionannouncement #dineshwaghmare #breakingnews

2 months ago | [YT] | 0

Suvarna Khandesh Live News

आजपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रीनिमित्त सर्वांना खुप खुप शुभेच्छा.

#navratri2025 #navratri #नवरात्री2025 #नवरात्रोत्सव2025 #suvarnakhandeshlivenews

4 months ago (edited) | [YT] | 2

Suvarna Khandesh Live News

मुंबईतील आझाद मैदानावार मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू होते. दरम्यान, या आंदोलनाचा आजच्या पाचव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आहे. मराठा आरक्षणासाठीच्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते लिंबू पाणी पित त्यांनी हे उपोषण सोडलं आहे. यावेळी मनोज जरांगे यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू निघाल्याचे दिसून आले. उपोषणाची सांगता ही गणपतीच्या आरतीने करण्यात आली. याप्रसंगी मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री उदय सामंत, मंत्री प्रताप सरनाईक, प्रशासनातील अधिकारी तसेच मराठा आंदोलक उपस्थित होते.

#manojjarange #marathareservation #azadmaidan #mumbai

5 months ago | [YT] | 2

Suvarna Khandesh Live News

18 वर्षांच्या संघर्षानंतर RCB चं स्वप्न अखेर पूर्ण; #RCB चं पहिलं IPL विजेतेपद! 🏆

Ee Sala Cup Namde – अखेर खरं ठरलं!

#RCBWin 🟥 #IPLFInal2025 🏏 #EeSalaCupNamdu #ChampionsRCB #ViratKohli 🐐 #RCBForever #RedArmy 🔥
#RCBChampion2025 #IPL2025Final #CricketHistory

8 months ago (edited) | [YT] | 2