Khamang Khandeshi

Hello friends. My name is Rucha and welcome to my channel "Khamang Khandeshi"

I will post all the authentic Khandeshi recipes along with basic daily Indian recipes for beginners and also recipes across multiple cuisines.
I have created these quick and easy recipes on my own cooking experience and along with some of recipes learned from my mother which are very famous. I try to use common things available in the kitchen in most of my recipes. As in our fast lives we want to make quick and easy food which are tasty and healthy at the same time.

I hope you all enjoy watching them .
Your comments are valuable & will be highly appreciated.

Thanks a lot friends

Do like and subscribe to my channel for more delicious quick and easy recipes with useful tips.

#khandeshirecipe #recipe #indiansnackrecipe #instantrecipe #food #indianfood #instantfood #khamangkhandeshi #homemade


Khamang Khandeshi

गणेश चतुर्थी विशेष......

गणपती बाप्पांचे लवकर सागमन होणार आहे त्यासाठी तळणीचे मोदक घरोघरी केले जातात परंतु बरेचदा जेव्हा गव्हाच्या पिठापासून मोदक करतो तेव्हा ते मोदक बऱ्याचदा लूज पडतात खुसखुशीत होत नाहीत.. शिवाय गूळ वापरून सारण केल्यास बरेचदा मोदक तळताना सारण परी फोडून बाहेर येते आणि तेलात तुपामध्ये पसरते... तर आज आपण व्हिडिओमध्ये अगदी खुसखुशीत पारीचे गुळातल्या सारणाचे न फुटणारे परफेक्ट असे मोदक कसे तयार करायचे त्याबद्दल भरपूर अशी माहिती घेणार आहोत भरपूर टिप्स मी शेअर केलेले आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा....

गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत तळणीचे मोदक.......

recipe link

https://youtu.be/-y9q4SLRae0

रेसिपी आवडल्यास रेसिपी ला लाईक आणि शेअर जरूर........

1 week ago | [YT] | 16

Khamang Khandeshi

बैलपोळा विशेष
टम्म फुगलेले खान्देशी पद्धतीने केलेले उडदाचे वडे......
‪@KhamangKhandeshi‬
Recipe link
https://youtu.be/d6HFWobl1Bw?si=bqT3q...


रेसिपी आवडल्यास रेसिपी ला लाईक आणि शेअर जरूर

1 week ago (edited) | [YT] | 14

Khamang Khandeshi

बैलपोळा विशेष
खान्देशात घरोघरी केली जाणारी गव्हाची खीर😋😋😋

Recipe link
https://youtu.be/VgzGNbs1dFk?si=WWIAX...

रेसिपी आवडल्यास रेसिपी ला लाईक आणि शेअर जरूर करा😊🙏

1 week ago | [YT] | 12

Khamang Khandeshi

गणेश चतुर्थी विशेष.....

घाईच्या वेळेस बनवा केळीचे मोदक घरगुती साहित्यात झटपट रेसिपी.....

केळीच्या स्वादाचे पौष्टिक मोदक........

Recipe link
https://youtu.be/KV5kumV2ZIs

रेसिपी आवडल्यास रेसिपी ला लाईक आणि शेअर जरूर करा😊🙏

1 week ago | [YT] | 15

Khamang Khandeshi

श्रावण सोमवार स्पेशल भगर विरहित रेसिपी......

खान्देश स्पेशल कच्च्या केळीची पौष्टिक उपवासाची भाकरी आणि चमचमीत ठेचा/भगर विरहित रेसिपी/raw banana bhakri उपवासाची ताकाची कढी

आज आपण खान्देश स्पेशल उपास म्हटला की खान्देशात घरोघरी बनवली जाणारी उपवास स्पेशल केळीच्या पिठाची चविष्ट मसाला भाकरी आणि त्यासोबतच चमचमीत ठेचा... हा मेनू बनवणार आहोत... आपल्या सगळ्यांना माहीतच आहे केळ्यामध्ये आवश्यक जीवनसत्वे, अँटिऑक्सिडंट आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात.. यामुळेच साबुदाणा किंवा भगर च्या तुलनेमध्ये ही उपवासाची भाकरी अधिकच पौष्टिक आहे... शिवाय बऱ्याचदा उपवासाला भगर चालत नाही त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.....

Recipe link
https://youtu.be/ajddkLc_0kE

रेसिपी आवडल्यास रेसिपी ला लाईक आणि शेअर जरूर करा😊🙏

2 weeks ago | [YT] | 27

Khamang Khandeshi

बिना गॅस वाली बर्फी/गुलकंद रोल्स 😋😋😋

रक्षाबंधनच्या दिवशी आयत्या वेळेला देखील करता येईल इतकी सोपी 15 मिनिटात तयार होणारे गुलकंद रोल्स.....
गुलकंद रोल्स मध्ये सुकामेवाचा वापर केल्यामुळे अधिक पौष्टिक असे तयार होतात.. गुलकंद रोल्स तयार करण्यासाठी गॅस लावायची सुद्धा गरज पडत नाही....

recipe link
https://youtu.be/kW0Dx4O21Ek

If you like recipe dont forget to like ,share and subscibe

3 weeks ago | [YT] | 22

Khamang Khandeshi

रक्षाबंधन विशेष.........

आता कंदी पेढे घ्यायला सातारा जाण्याची गरज नाही.... घरच्या घरीच अगदी दोन साहित्यामध्ये कंदी पेढे सातारा स्टाईलने तयार करा या माझ्या खऱ्याखुऱ्या सातारा स्टाईल कंदीपेढ्यांच्या रेसिपीने......

फक्त 2 साहित्यापासून घरच्या घरी झटपट बनवा साताऱ्याचे प्रसिद्ध कंदी पेढे/रक्षाबंधन स्पेशल रेसिपी/kandi pedha..........

Recipe link
https://youtu.be/0oUj74ajw4w

रेसिपी आवडल्यास रेसिपी ला लाईक आणि शेअर जरूर करा😊🙏

3 weeks ago | [YT] | 25

Khamang Khandeshi

न तळता न वाफवता झटपट खुसखुशीत बट्टी आणि चमचमीत आलू वांग्याची भाजी......

श्रावण महिन्यात सोमवार शिवाय अनेक इतरही उपवास असतात तर त्यासाठी उपवास सोडण्यासाठी बऱ्याचदा सगळीकडे बट्टी हा एक मेनू असतो... या दिवसाच्या थंडाव्यामुळे बट्टी खावीशी देखील वाटते.. तर आज आपण कढईमध्ये न तळता न वाफवता झटपट बनणाऱ्या बाहेरून बिस्किटासारख्या खुसखुशीत आणि आतून अगदी मऊसूद अशा चविष्ट बट्ट्या बनवणार आहोत.. आणि त्यासोबतच चमचमीत तरीवाली लग्न पंक्तीत वाढली जाणारी विदर्भ स्पेशल आलू वांग्याची भाजी करणार आहोत... आजचा हा श्रावण स्पेशल बेत आपल्या सगळ्यांना नक्कीच आवडेल.. भरपूर टिप्स साठी व्हिडिओ संपूर्ण बघा.........

Recipe link
https://youtu.be/iku7yhumCP0

रेसिपी आवडल्यास रेसिपी ला लाईक आणि शेअर जरूर करा😊🙏

4 weeks ago | [YT] | 20

Khamang Khandeshi

नागपंचमी स्पेशल......
युट्युब वर प्रथमच छोट्या छोट्या भांड्यांचे चविष्ट वरणफळ........

श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या नागपंचमीला आमच्याकडे सुरी आणि तवा याचा वापर केला जात नाही.... मग त्यासाठीच आज आपण अगदी गरमागरम आणि पौष्टिक मुले सुद्धा आवडीने खातील इतकी सुरेख दिसणारी वरण फळाची रेसिपी बघत आहोत.... खानदेशात वरणफळ करताना त्यामध्ये कणकेचे छोटे छोटे भांडे बनवले जातात त्यामुळे मुली सुद्धा आणि मोठे सुद्धा आवडीने हे वरणफळ खातात......

Recipe link
https://youtu.be/cmCnEdVYmd8

रेसिपी आवडल्यास रेसिपी ला लाईक आणि शेअर जरूर करा😊🙏

1 month ago | [YT] | 22

Khamang Khandeshi

नागपंचमीसाठी खानदेशात आवर्जून केले जातात ते म्हणजे नागदिवे😋😋 आणि सोबतच तांदळाची खीर तीही गूळ घालून 😋😋😋

हे नागदिवे एका विशिष्ट प्रकारच्या पिठापासून बनवले जातात आजच्या आपल्या रेसिपीमध्ये हे पीठ बनवण्यापासून तर दिवसभर नागदिवे मौसूत राहण्यासाठी आणि चविष्ट होण्यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स दिलेले आहे ......
या नागपंचमीला तुम्ही माझ्या पद्धतीने खानदेशी पद्धतीचे नागदिवे नक्कीच करून बघा .....
धन्यवाद 😊🙏🏻

Recipe link
https://youtu.be/nxVu09TYhOM

रेसिपी आवडल्यास रेसिपी ला लाईक आणि शेअर जरूर करा😊🙏

1 month ago (edited) | [YT] | 15