AGRICOSS☘️🌿


AGRICOSS

Holdeo Breeding Bull 🐂

2 weeks ago | [YT] | 1

AGRICOSS

Trend goes with agricoss #gemini #ai

3 months ago | [YT] | 0

AGRICOSS

3 months ago | [YT] | 0

AGRICOSS

*का मला शेतकरी म्हणतात ?*
मी एक शेतकरी आहे कारण मला एका दाण्यापासून ,
त्याचे हजार दाणे करता येतात !

मी शेतकरी आहे मलाही परिवार आहे ,
कधी कधी परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मला स्वतः गहाण राहावे लागते ,
कारण आम्ही शेतकरी आहोत !

आम्ही दुसऱ्यांच्या परिवारांचं पोट भरण्यासाठी कधी कधी आमचं पोट सुद्धा मारून घेतो , कारण आम्ही एक शेतकरी आहोत !

मी शेतकरी आहे मला राजकारण येत नाही ,
आणि त्यामध्ये मला जायचं सुद्धा नाही !

मी व्यापारी नाही , कारण मला आम्हा शेतकऱ्यांना स्वतःचं शेतमाल स्वतः विकता येत नाही ,
त्याचं बाजार भाव ठरवता येत नाही !

मी एक शेतकरी आहे , म्हणून तर आम्ही आमचे दुःख आमचे कष्ट लोकांना सांगूनही त्याचे काहीच होत नाही !


शेतकऱ्यांबद्दलची आपुलकी कुणाला नाही ,
म्हणून तर त्याला बाजारामध्ये सन्मान नाही ना त्याला किंमत आहे!

कर्ज मागायला जातो मी , पण कर्ज मागताना एक प्रश्न मात्र नक्की विचारले जातो ,
तू खरच फेडू ( भरू) शकशील का कर्ज !

मी स्वतः शेतकरी आहे शेतामध्ये भाजीपाला इतर धान्य पिकवतो मात्र बाजारामध्ये गेल्यानंतर ,
एक सामान्य ग्राहकच बनून जातो मी !

जी माझ्या हक्काची गोष्ट आहे ती सुद्धा मी मागू शकत नाही ,
मग काय मला तुम्ही शेतकरी म्हणता !

निसर्गही आमची परीक्षा घेतो ,
कधी पिकच येत नाही , आणि कधी पिक आलाच तर त्याला बाजार भाव मिळत नाही ,
मग फसगत तर शेतकऱ्याची झाली !

नोकरी करणाऱ्यांची व इतर कामधंदे करणाऱ्यांची कमाई ही शाश्वत असतो ,
पण माझी कमाई मात्र सहा महिने शेतामध्ये असतो !

आम्ही कधी आमचा सन्मान करावं असा आणि कधीच म्हणत नाही ,.
परंतु आम्हाला आमचा बाजार भाव आम्ही ठरवावा नाहीतर योग्य बाजारपेठा तयार करून द्याव्या एवढीच तर आमची मागणी असतो !

मग मला सांगा खरंच मी एक शेतकरी आहे का ,
कारण आमचा देश तर कृषीप्रधान आहे मग त्यामध्ये त्याला इतका छळल जाते !

मी एक शेतकरी आहे , या मातीमध्ये माझा इमान आहे म्हणून तर मी एक शेतकरी आहे !


*धन्यवाद !!*

लेख :
*पुष्यंत अशोक दहिकर*
स्व: मत !

1 year ago | [YT] | 2

AGRICOSS

1 year ago | [YT] | 1

AGRICOSS

Mushroom 🍄

1 year ago | [YT] | 6

AGRICOSS

गांडूळ खत निर्मिती प्रकल्प...

1 year ago | [YT] | 6

AGRICOSS

वेरूळचं कैलास लेणं हे संपूर्ण जगाला पडलेलं कोडं आहे. एकसंध खडकातून कोरण्यात आलेलं हे लेणं इ. स. 757 मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण (प्रथम) यांच्या राजवटीत कोरण्यात आलं.युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत वेरूळचं नाव हे पहिल्या पाच स्थळांमध्ये येतं.या मंदिराची निर्मिती ही 'आधी कळस मग पाया', या तत्त्वावर केली गेली आहे. भारतातील सगळ्या लेणी या एकतर खालून वर, नाही तर डोंगरफोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत.मात्र कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आली आहे.इतिहास संशोधक डॉ. दुलारी कुरेशी सांगतात, "कैलास मंदिर निर्माण करताना एका मोठ्या शिळेला तीन भागांमध्ये वरून खालपर्यंत खोदण्यात आलं. या खोदकामात जवळपास 20 हजार टन दगड फोडून वेगळा करण्यात आला. लेणीच्या मध्यभागी जे मुख्य मंदिर आहे त्यामध्ये वरच्या बाजूला एक मोठे शिवलिंग आहे."या शिवलिंगाच्या समोर मोठा महामंडप आहे.

1 year ago | [YT] | 4