नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube channel Marathi Collection वर. आपल्या चॅनल वर तुम्हाला दररोज नवनवीन facts videos, informative videos,आणि knowledgeable videos पाहायला मिळतील.त्यासाठी आपला चॅनल Subscribe करून ठेवा.
Business and sponsorship Mail on this Email account
👇👇👇
prashantpadmere706@gmail.com
Marathi Collection
तुमचा आवडता कोण?
1 month ago | [YT] | 93
View 6 replies
Marathi Collection
पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
https://youtu.be/x6IZEv3kcPM
1 month ago (edited) | [YT] | 30
View 0 replies
Marathi Collection
तुमचा सपोर्ट कोणाला?
1 month ago | [YT] | 27
View 3 replies
Marathi Collection
बेडकांचे शेती आणि पर्यावरणातील महत्त्व 🐸
बेडूक हे निसर्गाने दिलेले नैसर्गिक कीटकनाशक आहेत. एक प्रौढ बेडूक एका रात्रीत डझनावारी ते शेकडो डास, माशा, पतंग, अळ्या आणि पिकांचे नुकसान करणारे अनेक कीटक खातो. त्यामुळे शेतातील कीटकांची संख्या नैसर्गिकरीत्या नियंत्रणात राहते आणि रासायनिक कीटकनाशकांची गरज कमी होते.
बेडकांचा जीवनक्रमही खूप रंजक आहे. पावसाळ्यात मादी बेडूक पाण्यात शेकडो ते हजारो अंडी घालते. त्यातून बाहेर येणाऱ्या टॅडपोल (बेडकाची पिल्ले) सुरुवातीला पाण्यात राहतात आणि शेवाळ व सूक्ष्म वनस्पती खातात. काही आठवड्यांत त्यांना पाय येतात, शेपूट नाहीसं होतं आणि ते पूर्ण विकसित बेडूक बनून जमिनीवर येतात.
बेडूक हे अन्नसाखळीतील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहेत. ते कीटक खातात, तर त्यांना साप, घुबड, करकोचे आणि इतर अनेक पक्षी खातात. त्यामुळे बेडूक कमी झाले तर संपूर्ण परिसंस्थेचा समतोल बिघडू शकतो.
शास्त्रज्ञ बेडकांना "पर्यावरणाचे जैवसंकेतक" (Bioindicator) मानतात. कारण त्यांची त्वचा अतिशय नाजूक असते. पाणी किंवा माती प्रदूषित झाली की त्याचा परिणाम सर्वप्रथम बेडकांवर दिसून येतो. त्यामुळे एखाद्या परिसरात बेडूक कमी होत असतील, तर ते पर्यावरण बिघडत असल्याचे संकेत असू शकतात.
आज बेडूक कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत. पाणथळ जागा नष्ट होणे, रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा अतिरेकी वापर, जलप्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदल यामुळे त्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे.
बेडूक वाचवायचे असतील तर पाणथळ जागांचे संरक्षण करणे, रासायनिक औषधांचा वापर कमी करणे आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
लक्षात ठेवा, बेडूक फक्त पावसाळ्याचा आवाज नाहीत; ते शेतकऱ्यांचे नि:शब्द मित्र आणि निसर्गाचा समतोल राखणारे महत्त्वाचे रक्षक आहेत.
1 month ago | [YT] | 10
View 0 replies
Marathi Collection
*काजव्यांचे शेती मधील योगदान.*
पूर्वी पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी काजवे लुकलुकत असत. आईच्या मामाकडल्या घरी मी ह्या काजव्यांच्या मागे पळत असे आणि दहा पंधरा मिनिटात जवळपास शंभरएक काजवे पकडून ते बाटलीत भरून ती बाटली अंधाऱ्या खोलीत ठेवून आम्ही लहान मुले मज्जा करत असायचो.
अवघ्या तीस वर्षात हे काजवे अश्या पद्धतीनं गायब होतील याचा त्या काळी विचार पण केला नव्हता. आज तास भर अंधारात फिरलो तरी नजरेला जेमतेम एक तरी काजवा दिसला तर नशीब. हे काजवे गेले तरी कुठे???
त्यांचं भविष्य काय?? त्यांचा जीवनक्रम कसा असतो?? काजवे काय खातात?? ते कसे चमकतात??
*तर काजवे भुंग्यांच्या कुळात मोडतात, जगभरात काजव्याच्या जवळपास २००० विविध प्रजाती विखुरलेल्या आहेत. त्यातील भारतात जेमतेम ९ ते १० प्रजाती आढळतात. काजव्यांचा जीवनक्रम पूर्ण व्हायला एक वर्ष जातं. पावसाळ्यात एक मादी तब्बल १०० अंडी देते. ही अंडी ती एखाद्या झाडाच्या खोडामधे किव्वा पाणथळ जागांच्या शेजारी, किव्वा उंच गवताळ ठिकाणी पालापाचोळा मध्ये दिली जातात. काजव्याची अंडी व अळी दोन्ही अंधारात चमकतात. साधारण दोन आठवड्यात अंड्यातून कजव्याची अळी बाहेर येते, आणि मग सुरू होतो जगण्यासाठीचा तिचा संघर्ष. ह्या काळात ती छोटे मोठे किडे, शेतीस नुकसानदायक असलेले कीटक व अळ्या तसेच शेतात पिकावर ताव मारणाऱ्या गोगलगाई, इत्यादी खाऊन फस्त करतात. आणि त्या विकासाच्या पुढल्या टप्प्यात जातात. प्रतेक वेळी जेव्हा त्यांचा आकार वाढतो तेव्हा त्या कात टाकतात. एकूण पाच वेळा कात टाकल्यानंतर अळ्या विकासाच्या पुढच्या टप्प्यात येतात,जिथे त्या फुलपाखरा प्रमाणे कोश रुप धारण करतात. तो वेळ असतो मे ते जून महिन्याच्या. आणि पावसाच्या एक दोन जोरदार सरी येऊन गेल्या नंतर ह्या कोषातून लुकलुकणारे काजवे बाहेर येतात.* आता त्यांचे दुसरे आयुष्य सुरू होते, जिथे ते हवेत उडणारे लहान मोठे कीटक खातात. लहान मोठ्या किटकांव्यातिरिक्त ते स्वाजाती भक्षण देखील करत असल्याचे समोर आले आहे. प्रतेक जातीचा काजवा एका विशिष्ट पद्ध्तीने लुकलुकत असतो. काही काजवे अगदी कमी वेळात जलद गतीने लुकलुक करतात, तर काही मंद गतीने लुकलुकत असतात. त्यांच्या लुकलुकणाऱ्या ची वारंवारता त्यांना त्यांच्या जनुकीय संरचनेच्या आधारे मिळते. ज्या मुळे हे काजवे आपल्या जातीच्या नर व मादांना ओळखतात आणि आकर्षित करतात. काही जातीच्या मादा इतर जातींच्या लुकलुक करण्याच्या पद्धती ची नक्कल करून दुसऱ्या जातीच्या नराला आकर्षित करतात व त्याला भक्ष देखील बनवतात.
असे हे काजवे कोषातून बाहेर आले की त्यांच्या जवळ खूपच कमी वेळ असतो. कारण कोषातून बाहेर आल्यावर त्यांचे आयुष्य केवळ दहा ते पंधरा दिवसांचे असते. एवढ्या कमी वेळात त्यांना मादी सोबत मिलन करून त्यांची पुढली पिढी निर्माण करण्यासाठी स्पर्धा सुरू असते. म्हणून बहुदा बरेच नर काही न खाता केवळ मिलन करणे हाच एक क्रम सुरू ठेवतात आणि लवकरच मरून जातात. पुढे मादी देखील अंडी दिल्या नंतर अवघ्या काही दिवसात मरून जाते. आणि आता अंड्यातून अळी अळी पासून कोश आणि कोषापासून काजवा तयार व्हायला तब्बल एक वर्षाचा काळ लागतो. आपल्या आयुष्याचा खूप मोठा काळ अश्या रीतीने काजवे जमिनीवर काढत असतात.
*काजवे पूर्वी खूप दिसायचे कारण त्या काळी बऱ्याच पाणथळ जमिनी अस्तित्वात होत्या, ठीक ठिकाणी असलेल्या पाणथळ जमिनींमुळे भूजल पातळी काठोकाठ भरलेली असे परिणामी जमिनीतील आद्रता पूर्ण वर्षभर टिकून राहत असे, तसेच त्या वेळी मोठं मोठी गवताची कुरणे आमच्या पालघर जिल्ह्यात अस्तित्वात होती ज्या मुळे उंच वाढलेल्या दाट गवता मुळे सूर्यप्रकाश जमिनी पर्यंत पोहोचत नसे. ज्या मुळे तेथे काजव्यांसाठी योग्य आद्रता वर्षभर टिकून राही. तसेच शेतांच्या बांधावर नागफणी, थेंगड, इत्यादी काटेरी झाडांचे कुंपण असे ज्या मुळे अश्या ठिकाणी देखील आद्रता चांगल्या प्रकारे राहत असे आणि बरोबर ह्या ठिकाणी असलेल्या खेकड्याच्या सुक्या बिळात कजव्यांच्या अळ्या रात्री चमकताना दिसत. पुढे हळू हळू एका पाठोपाठ एक पाणथळ जागा आणि गवताळ कुरणे नष्ट होत गेल्या, ज्या मुळे जमिनीतील आद्रता पावसाळा संपल्यानंतर देखील टिकेनाशी झाली. परिणामी काजव्यांच्या अळीला जगण्यासाठी आवश्यक असलेली आद्रता मिळेनाशी झाली.
पुढे शेतात देखील माणसाने फवारणी आणि रासायनिक खते टाकायला सुरुवात केली. ज्या मुळे इतर उपद्रवी किटकांपाठोपाठ परागीभवनासाठी उपयुक्त असणाऱ्या मधमाश्या आणि इतर काजव्यांसरख्या शेतीस उपयुक्त कीटक देखील नष्ट झाले. उरली सुरली कसर वाढत्या शहरकरणाने पूर्ण केली. ज्या मुळे अगदी थोडा वेळ मिलनासठी पंख उघडून लुकलुक करणारे हे कीटक रात्रीच्या वेळी लावलेल्या एल. ई.डी. आणि इतर झगमगाटामुळे त्यांना त्यांचा जोडीदार शोधण्यात अडथळे येऊ लागले. ज्या मुळे आधीच कमी उरलेल्या काजव्यांच्या संख्येत आणखीन घट होत गेली. पुढे निसर्ग पर्यटन या नावाखाली उरल्या सुरल्या ठिकाणी जिथे आजही काजवे त्यांची शेवटची लुकलुक करून पृथ्वीच्या पाठीवरुन कायमचे नष्ट होणार आहेत अश्या ठिकाणी ही विचित्र शहरी माणसे यायला लागली तिथे नाईट ट्रेल, करत सोबत बॅटरी घेऊन फिरू लागली. ज्या मुळे काजव्याना घनदाट जंगलात देखील आता त्यांचा जोडीदार शोधण्यात अडथळे येऊ लागले आहेत.
माणसाची मानसिकता दिवसेंदिवस खूप घाणेरडी होत चालली आहे. आधी तो निसर्ग ओरबाडून काढतो, त्यातील जीवनाचा एकूण एक थेंब शोषून त्याचा कागदी पैसा बनवतो आणि नंतर हाच माणूस त्या पैशाने निसर्गात भ्रमंती करायला येतो. निसर्गाला बटिक समजतो पाहिजे तसे उपभोगाची आणि पैसे फेकून मोकळं व्हायचं. ह्याच वृत्ती मुळे आज सर्वत्र पृथ्वी वरील जीवन क्षणोक्षणी नष्ट होत आहे. अवघ्या तीस वर्षात काजव्या पाठोपाठ असे कितीतरी बहुउपयोगी कीटक आपण संपवले आहेत ज्याचा खूप भयानक परिणाम येत्या काळात आपल्याला भोगावा लागणार आहे. निसर्गाच्या काठीला आवज नसतो. कधी तो करोना बनून तर कधी अंफान, निसर्ग सारख्या चक्रीवादळाच्या रूपाने आपल्याला आपली जागा दाखवून देतो. येत्या फक्त पाच वर्षात जागतिक तापमान वाढीमुळे आणखी भयानक संकटे ओढवणार आहेत, ज्यात संपूर्ण मानवा सहित जीवसृष्टी विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. आता तरी निसर्गाची हाक ऐका पुन्हा नैसर्गिक शेती आणि माती कुडाच्या घरात जा तसे करणे मागास मुळीच नाही तेच खरे शास्वत जीवन आहे.
धन्यवाद.
1 month ago | [YT] | 20
View 0 replies
Marathi Collection
Finnally...! 100K completed 😃
4 months ago | [YT] | 33
View 2 replies
Marathi Collection
90k Subscribers complete 😍💓 100k🎯
Subscribe to achieve 100k subscriber 😀
5 months ago | [YT] | 9
View 2 replies
Marathi Collection
Thanks All Subscribers 💓
आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आपल्या चॅनलचे 100k सबस्क्राइबर्स पूर्ण होण्याच्या अगदी जवळ आलो आहोत! ❤️
आता फक्त तुमच्या छोट्याशा सपोर्टची गरज आहे.
जर तुम्ही अजून ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि या प्रवासाचा भाग बना.
तुमचा एक Subscribe माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. 🙏
चला मिळून 100k Subscribers पूर्ण करूया! 🔥
5 months ago | [YT] | 11
View 0 replies
Marathi Collection
तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो, म्हणून तुमची choice महत्वाची ❤️
तुम्हाला नेमकं काय पाहायला आवडेल ते सांगा — मी त्यावरच पुढचा व्हिडिओ बनवेन. 🙏
6 months ago | [YT] | 26
View 2 replies
Marathi Collection
TENT CAMPING BHANDARDARA
.
.
भंडारदऱ्यातील प्रत्येक निसर्गरम्य ठिकाणी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय marathi collection कडून केली जाईल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या काँटॅक्ट नंबर वर संपर्क साधा
.
.
Contact : 9423513380
8 months ago | [YT] | 12
View 0 replies
Load more