OnTheGo with Dr. Prajakta Purohit

Namaskar. I am Dr. Prajakta Purohit - A Painless Dental Surgeon practicing in my Dental Clinic. Besides being a Doctor, I am a life enthusiast. If you are into adventure, excitement, spirituality, you have come to the right place. I love travelling and making videos that document my journey, capture real life day to day moments, overall everything and anything that helps keep the vibrations positive, inturn help leading a happy life. Follow me on my journey to discover the world, one vlog at a time. Thank you.


OnTheGo with Dr. Prajakta Purohit

त्यांचे जन्मापासून मृत्युपर्यंतचे एक चक्र संपले...!
शेवटी आपण बरोबर नेतो ते फक्त आणि फक्त आपले कर्मच...

आज शांततेत स्मशानात उभी होते. तसा मनात कायम संवाद सुरूच असतो... पण आज बुद्धी आणि मन ह्यांचा सुसंवाद असा झाला....
बुद्धी - माणसं उगाचच अहंकार बाळगतात नई... त्याचा काय उपयोग ? आणि अहंकार कशाचा असावा ? शेवटी पचत्वातच विलीन व्हायचं आहे प्रत्येकाला...
आपले हे शरीर - काही क्षणात नष्ट होणारे..
मन - मग देह प्राप्तीपासून मिळालेल्या ह्या सुंदर आयुष्याचा मुख्य भर कशावर असावा ?
बुद्धी - फक्त आणि फक्त सत्कर्मावर... आपल्या आत्मिक उन्नती वर..
मन - सगळं पटतंय. पण मग आपण ह्या धकाधकीच्या जीवनात खरोखर कितपत वेळ देतोय आपल्या आत्मिक उन्नतीसाठी ?
बुद्धी - आपल्याला सतत जाण आहे ती फक्त ह्या देहरूपाची, आत्मिक स्थितीत आपण दिवसातला किती वेळ असतो ?
आणि मग असे असेल तर आपली वाटचाल खरच योग्य चालू आहे का ? विचार करण्यासारखी गंभीर बाब आहे बरका...!
मन - आयुष्याच्या उत्तरार्धात, हातातून अधिक वेळ निसटून गेल्यावर, कसा पुरेल वेळ आपल्याला ? आत्मिक उन्नतीसाठी ? कारण ध्येय जितके मोठे तितकी तयारी पण मोठीच गरजेची ना..!
बुद्धी - होय, ती तयारी तर अगदी कळत्या वयात आल्यापासूनच सुरू व्हायला हवी...
संतांना सुद्धा ह्या उन्नतीसाठी जिथे पराकोटीची साधना करावी लागली तिथे आपली किंमत काय ?
मन - म्हणजे विचार करायला हवा की आपल्या हातात खरतर वेळ फार कमी आहे आणी तयारी मात्र जणू आभाळभर करावयाची आहे....
बुद्धी - मग ही जाणीव सदैव आत्मसात कर...!
कसे आहे ना, जसे प्रत्येक देशात त्या त्या देशाचे चलन गरजेचे असते तसेच स्वर्गाच्या दारात लागणारे चलन म्हणजे सत्कर्म... तिकडे लागणारे चलन आयुष्यभर गोळा करावे लागते.
मन - अगदी बरोबर...
सत्कर्मची उघडे द्वार त्या स्वर्गाचे..!
तिकडे न चाले रुबाब पैशाचा ना पेशाचा..!

ह्या सुसंवादातून त्याच क्षणी माझ्या मुखातून निघणारे शब्द दुसरे काय असू शकतात...
सदा मुखी राहो हीच प्रार्थना,
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा... उपेक्षु नको गुणवंता अनंता... रघुनायका मागणे हेचि आता...

🥹🙏🏻🥹🙏🏻

आपल्याला सात्विक प्रकृती लाभणं, सद्गुरूंची साथ, सोबत लाभणं, आयुष्याचं अविरत सत्य समजणं व आपल्याला सदैव त्या परमात्म्याच्या जाणिवेत व छत्रछायेत एक एक श्वास सत्कर्म करत घेत राहता येणं ह्यापेक्षा पराकोटीचं भाग्य आणि काय असावं..!

धन्य झाला हा जीव साथ सद्गुरूंची लाभता...
हा देहची संपूर्ण त्यांच्यासाठी त्यागता...!

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

- डॉ. प्राजक्ता पुरोहित

2 years ago | [YT] | 6

OnTheGo with Dr. Prajakta Purohit

आपल्या सर्वांना दर्शनासाठी अगत्याचे निमंत्रण...!

आपल्याकडे, येत्या
१६ ऑक्टोबर २०२३, सोमवार रोजी, अक्कलकोट श्रीस्वामी समर्थ महाराज पादुकांचे आगमन होत आहे, तरी सर्वांनी दर्शनाचा लाभ जरूर घ्यावा...!
स्थळ :-
डॉ. प्राजक्ता पुरोहित ह्यांचा दातांचा दवाखाना,
नौपाडा पोलीस स्टेशन लेन, ठाणे (प).

अधिकाधिक जणांना हा संदेश जरूर पाठवावा जेणेकरून सर्वांना दर्शनाचा लाभ घेता येईल...!

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्रीस्वामी समर्थ
श्री गुळवणी महाराज की जय

- डॉ. प्राजक्ता पुरोहित

2 years ago | [YT] | 9