नमस्कार मित्रांनो..जय शिवराय...आपल्या चॅनेल चा उद्देश आपल्या मनातील सापांबद्दलची भीती, अंधश्रद्धा , गैरसमज दुर करुन सापांप्रती प्रेम सोबतचं सांपाचे महत्त्व पटवुन देऊन दिवसेंदिवस होणारी या मुक्या जीवाची हत्या थांबवुन त्यांना संरक्षण मिळावे असा आहे..🙏🏻🐍साप वाचवा🌿निसर्ग वाचवा 🙏🏻 धन्यवाद
Sarpmitra Nita Gajare
🫰🏻❤️ @sarpmitranitagajare
1 day ago | [YT] | 1,595
View 44 replies
Sarpmitra Nita Gajare
लुप्त होत चाललेली ही एक लाकडी वस्तू तुम्हाला माहीत आहे का?
1 week ago | [YT] | 1,414
View 37 replies
Sarpmitra Nita Gajare
राधा🐮🥰
1 week ago | [YT] | 1,092
View 8 replies
Sarpmitra Nita Gajare
@sarpmitranitagajare
2 weeks ago | [YT] | 1,744
View 57 replies
Sarpmitra Nita Gajare
🥰आज दोन शब्द खास बायको तुझ्यासाठी कितीही स्तुती केली तरी ती तिच्यासाठी कमीच आहे कारण दिवस असू रात्र, पाऊस, थंडी कधी न पाहणारी माझी सखी दिवस रात्र प्राण्यांसाठी झटणारी आज तिचा वाढदिवस आहे माझ्याकडून तिला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आता पर्यंत मी तर खूप सारा पाठिंबा दिलाच आहे त्याच बरोबर त्यामध्ये तुम्हां सर्वांचे प्रेमही खूपच अमूल्य आहे जशी आता पर्यंत तुम्ही साथ दिली भरभरून प्रेम दिले ते असेच सर्वांचे या पुढेही राहुद्या, अजून खूप अशी नि स्वार्थ मुक्या जिवांना वाचविण्यासाठी तुमच्या ताईला बळ द्या , आणि सर्वांनी तिला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या🥰😊🙏🏻
3 weeks ago | [YT] | 2,224
View 364 replies
Sarpmitra Nita Gajare
नक्की वाचा 👍🏻जय शिवराय माझ्या आपण सर्व प्रियजनांना 🙏🏻 सर्वप्रथम लक्षात घ्यावे..कुठलाही साप इंग्रज बिंग्रजांनी इकडुन तिकडुन इथे आणुन सोडला नाही ही एक अफवा आहे…ज्याने माणुस घडविला त्यानेच साप ही घडवला…माणुस सोडून प्रत्येक जीव निसर्गात काहीना काही कार्य पार पाडतो..निसर्गामधे अन्नसाखळी निसर्गाचा समतोल सांभाळते…यामधे एक जरी घटक आपण नष्ट केला तर त्याचा परिणाम त्या समतोलनामधे अडथळा निर्माण करतो..आणि नैसर्गिक गोष्टी बिघडल्या तर मानवी जिवन संकटात येते…कधी विचार केला का?पुर्वी वेळेवर पाऊस पडायचा आता पडत नाही..पडला तर खुपचं पडतो नाहीतर काहीच नाही…याला जबाबदार माणूस आहे…. तसचं विषारी साप नष्ट केला तर शेती हि होणारचं नाही जमीनीचं संरक्षण साप करतात बिनविषारी सापापेक्षा जास्त विषारी साप उंदीर-घुशींना फस्त करतात…सापापासून इतर जीव धोक्यात येऊ नये म्हणुन निसर्गाने त्याला भित्रा प्राणी बनवलयं त्यामुळे तो नेहमी लपुन लपुन स्वतःचे आयुष्य जगतो…उंदीर घुशींसाठी केमिकल्स वापरून आपण त्यांना मुळासकट नष्ट नाही करु शकत…केमीकल्स चा खर्च आयुष्यभर न परवडणारा आहे याउलट केमीकल हे सुद्धा एक विषचं आहे कि, सर्वात गंभीर रोगराई हे उंदीर घुस मुळे पसरते…आता साप मेला पाहीजे कि,जगला पाहिजे हे तुम्ही ठरवा…आता माणुसचं अन्न/पालेभाज्या/दुध व त्यापासून बनल्या जाणाऱ्या कित्येक गोष्टीत नको ती भेसळ टाकुन माणसाचं आरोग्य नी जीवन धोक्यात आणतोय अगदी फुड प्रॉयझनने जीव जातात कित्येकांचे …जाणीवपूर्वक हजारो जीव माणुस माणसांचे घेतो तिथे आपण गप बसतो आणि नकळत एखादा जीव सापामुळे जातो सर्वांचा किती कालवा होतो😇🙏🏻 साप मारणे वाचविणे तुमच्याच हातात आहे मी तर फक्त एक सर्वसाधारण रेस्कु करणारी महिला जिला पकडणे माहीत आहे मारणे नाही मित्रहो…. मारणारे मारतातचं ज्यांना वाचवायचायं ते मला फोन करतात…बाकि सर्पमित्र मला माहिती नाही पण मी विषारी साप अश्या ठिकाणी सोडते जिथे तो खुश राहील आणि त्यापासून कोणाचा जीव धोक्यात येणार नाही.. बरेचं कमेंट करतात तु तुझ्या घरी ने साप पकडलाय तर…मी साप तुमचा जीव धोक्यात नको म्हणुनचं पकडते..असेल एखादा शहाणा मी एका फटक्यात गार करतो म्हणणारा सगळेचं एकसारखे नाहीत मुक्या प्राण्यांवर दया करा हे संत परंपरेच्या हिताने वागणारे लोक ही आहेत समाजामधे.. एका फटक्यात गार करणारेचं स्नेक बाईट होऊन रुग्णालयात बेडवर गार पडलेत पाहा जाऊन…रेप होतात एवढे तो नराधम खरा अंत्यत विषारी साप आहे आरे त्याला ठेचा जाऊन तिथं बळ दाखवा तुमचं तो बिनहातापायचा नी वाचा नसलेल्या सापाच्या मागे लागुन काय होणारे…सापापेक्षा त्या भ्रष्टाचारी नेत्याला ठेचा ज्यांमुळे हजारोंच्या संख्येने गोरगरींबाचं जगणं अवघड झालेय…आपण स्वतःहा स्वतःचे जीवन किती धोक्यात आणलेयं हे पाहा.. दुधासाठी वासरं आईपासुन तोडली जातात पैशासाठी आई म्हणार्या गाई किती कसायांकडे मारल्या जातात मगं ते प्राणी जाब विचारतात का हो आपल्याला….नवले सारख्या ब्रीज वर १०-१० गाड्या ठोकल्या जातात १०० कुटुंब नष्ट होतात मगं तिथे गाडी बनविणारा माणुस दिसतो का तुम्हाला नाही.. तिथे भुताटकी दिसते तुम्हाला… या समाजातील खरे साप ठेचा जे हजारो लाखो जिवन संकटात आणतात … ह्या निसर्गाच जतन करा जो आपल्याला अनगिनत ऑक्सिजन ,पाणी फुकट देतो ज्यावर आपण जिंवत आहोत … झाडे..पक्षी…प्राणी यांशिवाय जगण्याला शोभा नाही…तरूण वयात तरफडुन मारलेला मुका जीव मरण समोर आल्यावर डोळ्यासमोर दिसु लागेल … माफ करायला शिका..प्रत्येक कर्माचा हिशोब मरणाआधी चुकता होतो बरं😇🙏🏻 आणि हो हे सर्व views साठी नव्हतं बरं आणि मला माहिती आहे 😅 काहिंना मीच चुकिची वाटणार कारण कलीयुग आहे इथे चांगल्या गोष्टींना आणि विचारांना थारा नाही…तुम्ही मला चुकिचं ठरविण्यापेक्षा मीच बोलते कि हो मी चुकिची तुम्ही बरोबर😅😇🙏🏻
1 month ago | [YT] | 231
View 33 replies
Sarpmitra Nita Gajare
माझी लहानपणापासुन जवळची ही अशी एक मैत्रीण खास असायची
जी घराबाहेर बसुन माझी वाट पाहत बसायची❤️.. 🐈⬛
1 month ago | [YT] | 576
View 29 replies
Sarpmitra Nita Gajare
✍🏼🐍🖋️माणसाला निसर्गातील साप जरा खटकतोयं..
फुकटचा ऑक्सिजन सेकंदाला घेतोय,
पाण्याची तहानही माझ्याचमुळे भागवतोयं
आणि तुला माझ्यातील एक साप किती खटकतोय..
रोज झाडे तोडतोय,
लाकडांपासुन नवनवीन वस्तु तु बनवतोय,
घरातली चुलही लाकडांवर पेटवतोय
आणि तुला माझ्यातील एक साप किती खटकतोय..
रोज जंगले मोडतोय स्वतला घरं बनवतोय,
नवनवीन त्याजागी प्लाटींग ही पाडतोय
आणि तुला माझ्यातील एक साप किती खटकतोय..
जंगलातील प्राण्यांची तस्करी करतोयं ,
मोरांना मारून पिसारे विकतोय,
पोपटांना पाळुन पिंजऱ्यात कोंडतोय
आणि तुला माझ्यातील एक साप किती खटकतोय..
स्वच्छ नदीला गटाराने भरवतोय,
कितीतरी कचरा माझ्या नदीच्या पाण्यात फेकतोय,
मच्छर खुप झालेत सांगुन रोगराई पांगवतोय
आणि तुला माझ्यातील एक साप किती खटकतोय..
कितीतरी एकरभर शेती फुलवतोय,
माझ्याचं मातीत अन्नधान्य पिकवतोय
आणि तुला माझ्यातील एक साप किती खटकतोय..
माणुसचं माणसांचे लाखों जीव घेतोयं ,
पोलीस स्टेशनच्या डायरीत रोज गुन्हे नोंदवतोय
आणि तुला माझ्यातील एक साप किती खटकतोय…
गाड्यांच्या धडकेत रोज माणुस मरतोय,
कितीतरी कागद पंचनाम्याची भरतोय
आणि तुला माझ्यातील एक साप किती खटकतोय..
हो रे माणसां मी निसर्ग बोलतोयं🙏🏻 — निसर्गप्रेमी निता गजरे
3 months ago | [YT] | 1,081
View 102 replies
Sarpmitra Nita Gajare
The Beutiful indian spectacle cobra snake🐍❤️😇
3 months ago | [YT] | 163
View 5 replies
Sarpmitra Nita Gajare
😊जय शिवराय मित्रहो🙏🏻..आपण पाहत आहात हे फोटोज आपल्या पुण्यातील प्रसिद्ध गणपती बप्पाच्या श्रीमंत दगडुशेठ हलवाई या देवस्थानातील आहेत..गर्दीच्या ठिकाणी जाणे मी नेहमीच टाळते..देव मंदिरात नसुन सर्वामधेच तो आहे असं मी मानते..पण योगायोगाने एका छोट्याशा कामानिमीत्त पुण्यात गेलो तर ही वाट बंद केलीये असं पोलीस दादांनी सांगुन आमची वाट वळवली आणि दुसऱ्या वाटेने आम्ही थेट बाप्पा च्या रांगेत जाऊन भेटलो समोर पाहतो तर भव्य गणपती बाप्पाच प्रवेशद्वार आणि सुंदर डोळ्यांना मोहुन घेणारी बाप्पा ची मुर्ती ..मला पाहुन तेथिल ट्रस्ट मधील हा फोटोतील दादा हातात उपरणे,श्रीफळ आणि एक पुस्तीका घेऊन गर्दीतुन वाट काढत माझ्याकडे आले...आणि ताई मी आपले नेहमीचं व्हिडिओ पाहतो आपण फार छान काम करता अशा अनेक कौतुकांचा वर्षाव करत त्यांनी मला सन्मानीत केले..आजुबाजुचेही अनेक माझे चाहते/प्रियजनांनी माझ्या बाजुने जमले आणि अनगिणत असं माझं आणि माझ्या कामाचं कौतुक केलं😇…बाप्पाच्या दारात मिळालेल्या एवढ्या शुभेच्छा आणि कौतुकासाठी बाप्पाला हात जोडुन धन्यवाद केले आणि माझ्या आपण सर्व प्रियजनांना सुखी आनंदी आणि संकटमुक्त ठेवण्याची सदिच्छा त्यापुढे व्यक्त केली..शेवटी बाप्पा सोबत आपले सर्वाचेही धन्यवाद जे कि आपण मला इथपर्यंत पोहचविले🥰🙏🏻…गणपती बाप्पा मोरया,मंगलमुर्ती मोरया🌺
4 months ago | [YT] | 348
View 15 replies
Load more