@parmatma ek 435 status



समर्थ बाबा जुमदेवजी यांनी १९४६ साली बाबा हनुमानजीची प्राप्ती केल्यानंतर ते मानवाचे दुःख दूर करु लागले. परंतु त्या कृपेने मानवाचे दुःख पूर्णपणे नाहीसे झाले नाही त्यांनी अशा शक्तीचे संशोधन करण्यास सुरुवात केली की जी मानवाचे सर्व प्रकारचे दुःख हरण करु शकेल. शेवटी त्यांनी १९४८ साली एका भगवंताची प्राप्ती केली. तेव्हापासून परमेश्वराप्रती मानवाला जागविण्याचे कार्य निष्काम भावनेने ते सतत करीत आहेत.याकरिता बाबा मानवाला रोज मार्गदर्शन करतात.

मानवाला त्यांच्या शारीरिक आणि मानसिक दुःखातुन मोकळे केल्यावर त्याच्या आर्थिक आणि सामाजिक अडचणीचे निवारण करण्याकरिता बाबा आध्यात्मिक विषयाबरोबरच सामाजिक क्रांतीकडे वळले. त्यांनी त्याकरिता आपल्या सेवकांच्या गरजा भागविता याव्यात म्हणून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची स्थापना केली आणि त्या माध्यमाव्दारे परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक, गोळीबार चौक, नागपूर येथे स्थापन केली.


जागनाथ बुधवारी, नागपूर येथे "परमात्मा एक सेवक ग्राहक भांडार" उघडले. सालईमेटा आणि धोप या खेड्यांत तेथील सेवकांना शेतीबरोबर जोडधंदा मिळावा म्हणून दुध उत्पादक संस्था स्थापन